निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी , अरेरे नाही झाल का?
मी ठरवलेल की जायला नाही मिळत तर निदान व्रूत्तांत व फोटोंवर तरी समाधान मानू.
९ तारखेनंतर जायच ठरल तर मी येउ शकेल.

मुंबईत बघितल्याचे आठवत नाही. नव्याने लागवड झालेल्या ठिकाणी हे असणार. याला एकच बी असलेली गोलाकार शेंग येते. माझ्या लेखातल्या फोटोत दिसतेय तशी.

हा अंजन फुलाचा फोटो (काल कॅमेरा सोबत नसल्याने मोबाईलमधुन काढलेला. दुधाची तहान ताकावर Proud )

वा जिप्सि काय सुंदर आहेत ही फुल. त्या झाडाचा पण जरा क्लोजअप फोटो घे म्हणजे आम्हालापण कुठे दिसल तर ओळखता येईल. कुठे आहे हे झाड ?

त्या झाडाचा पण जरा क्लोजअप फोटो घे म्हणजे आम्हालापण कुठे दिसल तर ओळखता येईल. कुठे आहे हे झाड ?>>>>> जागू, नक्कीच. आज कॅमेरा घेऊन जातोय ऑफिसला Wink

पवईला सापडले हे झाड. Happy

जिप्सी काय सुरेख आहे रे हा गुच्छ.... खरेच जडावाचा दागिना..

काल लेकीला सायकल घेतली. मग आज नेहमीचा डोंगर सोडुन सरळ वाट पकडुन बाहेर पडलो. सहज नजर गेली तर हे दिसले.

छबी आपल्या पॅशनफ्रूटसारखीच पण आकार मात्र रुपयाच्या नाण्याएवढाच. आणि वेलही एकदम लहान
ह्या झुडपावरुन अंदाज बांधा वेल किती लहान होती त्याचा.

व्वा जिप्स्या! काय कलर आहे त्या फुलांचा...एकदम निळाशार!! Happy पुर्ण झाडाचा फोटो टाक बाबा लवकर!
खरोखरच फुलं अगदी जडावाच्या दागिन्यांसारखी!

साधना हा त्याच कूळातला पण रानटी वेल आहे. मी खर्‍या पॅशनफ्रूटच्या फूलाचा फोटो टाकतो रात्री.
जिप्स्या, मी सांगितल्याप्रमाणे फोटो काढत रहा. अंजनाच्या ज्वेलरी शॉपमधे, अनेक नमुने आहेत.

मग यालाही फळे लागतील काय? चवीचे काय????? आता लक्ष ठेऊन राहायला पाहिजे... Happy तोपर्यंत वेल टिकला म्हणजे झाले.

साधना ते दुसरे झाड जंगली आहे. नाव माहीत नाही पण आमच्याकडे खुप पसरतात ही झाड. ह्यांची पान खरखरीत लागतात हाताला.

आज कॉलनीत डी टाईप वसाहतींम्ध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. रस्ते असे सजवलेले आणि ही मोठी रांगोळीही काढलेली -

आज ब-याच दिवसांनी युएसबी चालणारा लॅपटॉप आणि सोबत इंटरनेट कनेक्षन असा योग नशिबी आला. सगळे फोटो उतरवले पण आता पिकासावर शोधत असताना फक्त आजचेच फोटो अपलोड केले हे लक्षात आले Sad आता लेकीला रिक्वेस्ट पाठवते माझे बाकिचे फोटोही अपलोड कर म्हणजे मला इथे टाकता येतील Happy

ते पिकासाच समिकरण अजुन मला जमल नाही. पिकासावर फोटो लोड केले पण इथे ते नाही लोड होत माझ्याने.

साधना..... आयकर कॉलनी वाले नशीबवान आहेत :). पारसिक हिल सारखे निसर्गरम्य स्थळ जवळच आहे त्यांना.

साधना, माझी आई सांगते ती वनस्पती, म्हणजे विंचवाच्या दंशावर उतारा आहे. त्याच्या तूरा विंचवाच्या नांगीसारखाच दिसतो म्हणून असेल कदाचित. त्या काळात माझ्या आजोळी देखील घरात विंचू निघायचे. आजीला एकदा डसला पण होता, बिचारी दिवसभर विव्हळत होती.
पण या बनस्पतीबद्दल मी खात्री देऊ शकणार नाही. शिवाय आता त्यावर औषधही उपलब्ध आहे.
==
आणि हो ती फळे नाही खायची. खर्‍या पॅशनफ्रुटची चव कशालाच येत नाही !

सांगा सांगा. लवकर सांगा. या फुलांचे नाव सांगा.
दिसायला कोरहांटीसारशीच आहेत. पण जरा जाड आहेत.
Image3876.jpg

हा आणखी एक फोटो.
Image3878.jpgदिनेशदा, जागू, साधना, जिप्सी, कुठे गेले सगळे फोटो काढायला? Lol

अरे फोटो टाकले आणि लगेच इतकी घाई???

मागे दिनेशनी धायटीचा फोटो टाकलेला इथे. त्याची आठवण झाली ही फुले पाहुन..
तुला कुठे मिळाली ही फुले??

वा शोभा सुंदर आहेत फुल. धायटीची डाळिंबासारखी होती फुल. ही वेगळीच वाटत आहेत.

ही माझ्या आईकडे सध्या लिली फुलली आहे.
lily.JPGlily1.JPG

अरे फोटो टाकले आणि लगेच इतकी घाई???>>>
साधने, अग फोटो काढून खूप दिवस झाले. बारावीची परीक्षा चालू असताना काढलेत. त्यामूळे फारच उत्सुकता लागलेय. आणि तुम्ही सर्व महाभाग आहात. लवकर सापडलात हे माझे नशीबच.
अग माझे वडील सकाळी फिरायला जातात ना, तेव्हा ते आणतात.
जागू, लिली किती सुंदर दिसतेय ग? आज प्रथमच पहातेय. पुण्यात रहायला असतीस तर सगळ्यांची रोपे तुझ्याकडून मिळवली असती.

Pages