निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे रविवारी कोण कोण येतंय राणीच्या बागेत.
सध्यातरी साधना, जिप्सी तयार आहेत.

दिनेशदा, पाचुंदा आणि मणीमोहराच्या झाडाचे लोकेशन सांगुन ठेवा, प्लीजच Happy

अनिल, त्यावेळी तसं होतं आता कसं असेल, असा विचार करत, प्रत्येक झाड बघेन !!

आज सकाळची मज्जा. मी रोज माझ्या मित्राबरोबर ऑफिसला येतो. सकाळचा चहा त्याच्याचकडे पितो. आज त्याच्या घराबाहेर थोडा वेळ उभा राहिलो. तिथेच त्याच्या दरवाज्यावरच्या एका फटीत, चिमणीचे घरटे आहे.

मी उभे राहिल्यावर चिमणा चिमणी बाहेर आले. आपले घरटे कुठे आहे, याचा पत्ता मला लागू द्यायचा नव्हता. त्या दोघांनी जे काही करुन दाखवले त्याला तोड नाही.
मला त्यांची भाषा येत असती, तर असे संवाद कानावर पडले असते.

"काय, सहजच ना ?" चिमणा मला विचारतोय.
"आम्ही पण सहजच. या ठिकाणी आमचं काही नाही हो." चिमणी मला.
"तसंहि मला इकडे आवडत नाही, आम्ही काही इथे घरटे वगैरे बांधणार नाही बरं " चिमणा मला.
"हो ना, मी म्हणतच होते याला. आधी आपलं लग्न बिग्न होऊ दे, मग घरट्याचं बघू" चिमणी मला.(त्याच्याकडे बघत.)
" मी कुठे घाई करतोय. पण घरटे इथे नाहिच बांधणार. जरा बाजूच्या ठिकाणी आलो होतो, सहज इथे
डोकावलो." चिमणा मला

मला माहित आहे त्या घरट्यात त्यांची पिल्ले आहेत. पण माझ्यासमोर दोघांची मस्त बतावणी चालली होती.
सहसा मी तिथे उभा रहात नाही, हे ते दोघे बघत असतात. आज जरा तिथे रेंगाळलो, तर दोंघांची चलबिचल चालली होती. पण तिथून उडूनही जात नव्हते, दोघे,

जिप्सी, तूला कृष्णवड आठवतच असेल ना ? त्याच्या दोन बाजूला हि झाडे आहेत. बार्किंग डियरचा पिंजरा आहे, उर्वशीची ३ झाडे आहेत, तिथून आपण मेन गेटच्या दिशेने वळलो, कि मणीमोहोराचे झाड आहे. त्याची पाने गुलमोहोरासारखीच असतात. पण जरा विरळ असतात.

तिथून वडाच्या खालून बाहेर पडलो, कि डाव्या हाताला चेंडू फळाचे झाड दिसले होते. त्याच्याच जरा पुढे, कोपर्‍यावर पाचुंद्याचे झाड आहे. या झाडाची फूले अगदी फिक्कट पिवळ्या रंगाची असल्यामुळे ती पालवीसारखीच दिसतात. तसेच तिथे जवळच, बहावा असल्याने तो पण लक्ष वेधून घेतो.

गेलास तर, वॉटरकूलर जवळच्या दोन झाडांकडे पण नजर टाक. जे मोठे दाट पर्णसंभाराचे आहे त्याच्याखाली तूला फूलांचा सडा दिसेल. तसेच त्या छोट्या गेटमधून आत गेल्यावर, उजव्या हाताला चाफ्याच्या बाजूला एक छोटेसे झाड आहे, त्याला केशरी स्प्रिंगसारखी फूले आलेली असतील.
सगळे बहावे (अस्वलाच्या पिंजर्‍याबाहेरचे) फूलले असतील.

नाहि, मणिमोहोर आणि मोठी करमळ, पावसाळ्यात सुरवातीलाच फूलेल. पाचुंदा, बहावा, कॅशिया आता असतील. माझ्या फोटोंच्या तारखा बहुतेक २७ एप्रिल आहेत.

दिनेशदा, त्या चिमणा-चिमणीचा संवाद तुम्हाला समजला, हे वाचून मला "अगबाई, अर्रेच्चा ह्या पिक्चरची आठवण झाली. Happy

जागू, हा मातीत लावलाय ना ? छान फोफावलाय. (इथे फोटो टाकायचे तंत्र पण जमले तर !)
प्रज्ञा, खरंच हि भाषा कळली असती तर !!

दिनेशदा,
खरंच हि भाषा कळली असती तर !!
या चिमण्यांशी मैत्री करता आली असती,गप्पा मारता आल्या असत्या !
Happy

दिनेशदा...गंमतच असते नाही या चिमण्यांची!!! आख्ख्या पुण्यात 'चिमण्या सध्या राहिल्या नाहीत हो...या मोबाईल टॉवर्समुळे" अशी ओरड चालु असतांना आमच्या जिन्याच्या वरची पत्र्याच्या टोपीमधे प्रत्येक खळग्यात चिमण्यांची घरटी आहेत. रोज सकाळी पाय-यांवर सडा पडलेला असतो.. घाणीचा! Sad पण आमची सकाळ उजाडते तीच त्यांच्या चिवचिवाटांनी! Happy
मी खुप वेळेस निरिक्षण करते त्यांचे...त्यांच्यातल्याच एका फॅमिलीने खिडकीतल्या पेलमेटच्या मागे घरटे बनवले होते. एकदा दुपारी मी त्यांची गम्मत बघत बसले. चिमणीबाईची पिलांना दाणे आणुन भरवण्याची लगबग! इकडे चिमणमहाराज दुरुन म्हणजे खिडकीच्या बाहेर हेलकावत असलेल्या केबलच्या वायरीवर बसुन तिरप्या डोळ्यांनी माझ्यावर नजर ठेउन होते. चिमणी तिथुन दुर झाली आणि मी लगेच खिडकीजवळच्या कॉटवर चढुन घरट्याला हात लावल्यासारखा अविर्भाव केला. इकडे चिमण्याची जी घालमेल....त्या केबलच्या वायरींवर एकसारखा इकडुन तिकडे नाचत होता. त्यात मी बाकीची दारं खिडक्या बंद केलेल्या! त्यामुळे बिचा-याला आतही येता येत नव्हतं! शेवटी मीच खेळ थांबवला... आणि मुद्दाम तिथुन गेल्याचं नाटक केलं!मी तिथुन दुर होताच दोघांनी पिलांकडे घरट्याकडे झेप घेतली, मी काय नुकसान तर नाही केल ना हे पहायला!
पक्षी/पक्षीणीपण पिलांना वाचवण्यासाठी किती आटापिटा करतात्...हम्म! 'आई' इथुन तिथुन सारखीच!!
पण इथे धोका आहे असं वाटुन दुस-या दिवसापासुन त्यांनी बि-हाड हलवलं! Sad
खुप वाईट वाटलं आणी आता कुठल्याही पक्षाच्या वाट्याला जाणार नाही असा कानाला खडा लावला. Sad

चिमण्या नष्ट होऊन सगळीकडे कबुतरांचा वेढा पडलाय. कबुतरांपेक्षा जास्त त्रासदायक पक्षी नसावा. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करतात, तसा कबुतरांचाही करायला हवा.

आर्या, आपल्या जागूच्या घरी तर बुलबुलचे कायम घरटे असते !

अमि, कबुतरांना पाश्चात्य देशांत "पेस्ट" चा दर्जा दिलाय. हा पक्षी कायम माणसाच्याच सोबतीने राहतो. तो झाडावर पण बसलेला फारसा दिसत नाही.
(इथेही धार्मिक घटक आहेच म्हणा !)

चिमण्यात मात्र फार जाती असतात. त्यांच्या गळ्यावरच्या नक्षीवरुन त्यांचे स्टेट्स ठरते. कुणी कुणासमोर बसायचे, कुणी बसायचे नाही, याचे कडक नियम असतात. ते मोडले तर खुप मारामारी होते त्यांच्यात.

मी एकदा आमच्या इथे कावळ्यांना चिमण्यांना मारून खाताना पाहिलंय (दोनदा/तीनदा) Sad Sad
ते दृष्य पाहिलं अन् लहाणपणी चिऊ काऊच्या गोष्टीची ती सुंदर फ्रेम खळकन् फुटली. Sad Sad
कदाचित चिमण्या कमी होण्याचे हे हि एक कारण असावं Sad

>> अमि, कबुतरांना पाश्चात्य देशांत "पेस्ट" चा दर्जा दिलाय. हा पक्षी कायम माणसाच्याच सोबतीने राहतो. तो झाडावर पण बसलेला फारसा दिसत नाही.
>>
अगदी बरोबर, कबुतरं कधीच झाडावर बसत नाहीत. त्यांना कायम इमारतींवरच बसायचे असते. एखादी मोक्याची जागा दिसली की, ती सोडायला ते तयार होत नाहीत.... अक्षरशः अतिक्रमण करतात. त्यांना विनासायास खायला मिळत असल्याने त्यांची भरमसाठ वाढ झालीय.

अमि पण कबुतरांच्या दोन खास बाबी आहेत.
१) कबुतर खाली मान करुन पाणी पिऊ शकतात. बाकि बहुतेक पक्ष्यांना मान वर करुन पाणी प्यावे लागते.
२) कबुतर आपल्या पिल्लाना, चोचीने "दूध" पाजतात. त्यांच्या पोटात दूधासारखा एक पदार्थ तयार होतो.

हिरवे कबूतर हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे. पण तो फारच क्वचित दिसतो. मी एकदाच कर्नाळ्याला बघितला होता त्याला.

जिप्स्या, कावळ्याचे ते अन्नच आहे. तो मोठ्या चिमणीच्या मागे लागणार नाही, पण असहाय्य पिल्लू मात्र खाणारच. त्यांच्या जगातले नियम वेगळे. त्याचे दु:ख त्या चिमण्या चिमणीला पण फार होत नाही.

मूळात पक्षी पिल्ले केवळ कर्तव्यभावनेने वाढवतात. त्या पिल्लाने म्हातारपणी आधार द्यावा, अशी काही अपेक्षा नसते त्यांची.

<<<<मूळात पक्षी पिल्ले केवळ कर्तव्यभावनेने वाढवतात. त्या पिल्लाने म्हातारपणी आधार द्यावा, अशी काही अपेक्षा नसते त्यांची.>>>> अगदि खरं आहे. "निरपेक्ष वृत्ती"चे ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे. Happy

>> हिरवे कबूतर हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे. >>
कबुतर आपले राज्यपक्षी आहे !!!! हाय रे देवा Sad

>> पण इथे धोका आहे असं वाटुन दुस-या दिवसापासुन त्यांनी बि-हाड हलवलं! >>
आर्या, त्यांनी पिलांना दुसर्‍या ठिकाणी कसे हलवले?

<<आर्या, त्यांनी पिलांना दुसर्‍या ठिकाणी कसे हलवले?<<
माहित नाही...त्यांची पिल्लं थोडीफार उडत असतील तर शक्य आहे! Uhoh

सचिन फोटो क्लोजप नसल्याने त्याचा रंगच कळत नाही.

हल्ली खरच चिमण्या कमी झाल्या आहेत. नाहीतर मला लहानपणी आठवतय खुप चिवचिवाट असायचा चिमण्यांचा शिवाय आमच्या घरात तसबिरिंच्या मागे ह्या चिमण्या घरट करायच्या. काढून टाकल तरी परत येउन जिद्दीने करायच्या. हे पक्षी भारी जिद्दी असतात बाबा. आमच्या घरातले बुलबुल पण तसेच आहे.
आर्या तुला मी लिंक देते बुलबुलची.

अरे रविवारी कोण कोण येतंय राणीच्या बागेत.
सध्यातरी साधना, जिप्सी तयार आहेत.

इकडे लक्ष द्या लोकहो. नंतर योग्याने फोटो टाकले की लगेच लोक सुरू करतील आम्हाला माहितच नव्हते म्हणुन......

अरे रविवारी कोण कोण येतंय राणीच्या बागेत.<< मी या शनिवार चा विचार करतोय काय करायचे ते, पण पुण्याच्या बाहेर नाही पडता येणार

हो बहुतेक तेच आहे हिरवे कबुतर.
माझे लिहायचे राहिले, जागूच्या फोटोतल्या मनिप्लांटच्या पांढर्‍या भागाचे काय प्रयोजन आहे माहिती आहे ?
तो भाग चक्क लेन्सचे काम करतो. त्यावर पडणारा सूर्यप्रकाश तो हिरव्या भागावर फोकस करतो. हे अगदी सूक्ष्म पातळीवर होतं.
ज्या पानांचा खालचा भाग लाल जांभळा असतो, तो भाग प्रकाश खाली झिरपू देत नाही.

<<तो भाग चक्क लेन्सचे काम करतो. त्यावर पडणारा सूर्यप्रकाश तो हिरव्या भागावर फोकस करतो. हे अगदी सूक्ष्म पातळीवर होतं<<
व्वा...दिनेशदा अचुक विश्लेषण!! Happy
(पण मला कसं नाही आठवलं हे? मी बॉटनी विसरत चालले की काय? Uhoh )

Pages