निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा असा किस्सा झालाय याआधी.

पनवेलजवळ आपटा गावी असलेल्या तळ्यातली कमळं मिळवायला एका वर्करला घेउन गेलो होतो. त्याच्या कमरेला दोर वगैरे बांधून (गाळात अडकला तर)

कमळं घेउन तो बाहेर आला तेव्हा त्याचे पाय पोटर्‍यांपर्यंतही भीजले नव्हते.

डेलिया, काहि कायम रहात नाही. फुले येऊन गेल्यावर तो सुकणारच. त्याचेच एक मोठे फूल, झाडावरच सुकु द्यायचे आणि त्याच्या बिया खाली टाकायच्या. परत उगवतो.

जिप्सी त्यालाच सोनमोहोर,पेल्ट्रोफोरम पण म्हणतात ना?>>>>>>येस्स्स्स Happy

असे म्हणतात की, कमळाच्या वेलींच्या मुळांची विलक्षण गुंतागुंत झालेली असते. पाण्याच्या पृष्ठभागावर सुंदर उत्फ़ुल्ल कमळे परस्परांपासून अंतर राखुन आपापल्या जागी आपले एकटेपण जपत असतात तर पाण्याच्या पृष्ठभागाखाली त्यांच्या मुळांमधे भयानक गुंतवणुक असते. एखाद्याचे पाय त्या जाळ्यात अडकले तर तो त्यातून बाहेर पडू शकत नाही. जो जो आपले पाय सोडवून घेण्याची तो धडपड करतो तो तो अधिकच त्यात गुरफटत जातो.
माणसांमधले नातेसंबंध या कमळाच्या वेलींसारखेच असतात. सारी माणसे वर दिसायला अलग अलग, आपापल्या ठिकाणी स्वतंत्र पण आतुन नात्याची, प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि या सार्‍यातुन पुन्हा फ़ुटत गेलेल्या द्वेषाची, वैराची, हेव्याची विलक्षण अनाकलनीय गुंतागुंत. माणसा माणसांत नकळत, रुजत, पसरत जाणारं ते गैरसमजाचं जाळं. तो भयंकर अहंकार. एकदा का माणुस या गुंतागुंतीत सापडला तर त्याला जलसमाधीच मिळायची. वर पुन्हा सारी कमळे शांत, स्थिर, सुंदर . . . . ! शांता शेळके, आनंदाचे झाड.

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/126551.html?1180628514

काय ते प्रेम लोकांचे मदत करण्याबद्दल Happy

दिनेश मी कमळाबद्दल हे ऐकल्ये त्यामुळे कधीही कोणाला उतरु देत नाही पाण्यात... Happy

दोन वर्षांपुर्वीच्या गुढीपाडव्याला जीएसबरोबर ५ गडांच्या स्वारीवर निघालेलो, त्यावेळी वाटेत मिळालेली कमळे.

रच्याकने, आपण वॉटर लिलीजना सरसकट कमळे म्हणतो, पण कमळे वेगळी आणि वॉटरलिलीज वेगळ्या. कमळाच्या पाकळ्या मुळाशी पसरट असतात आणि शेवटी नाजुक टोक असते त्यांना तर वॉटरलिलीजच्या पाकळ्या लंबवर्तुळाकार, सुरवातीपासुन शेवटपर्यंत एकाच आकाराच्या असतात. हो ना दिनेश??

रच्याकने, मला तुमच्याकडे येणे जमले नाही, पॅशनफ्रुट राहिलेच Sad अगदीच वेळ अपुरा पडतोय. आल्यावर जाऊन येईन आणि पॅफ्रु इथेच लावेन. गावी नंतर नेईन.

माझ्या कॉलनीतल्या तळ्यातही पांढ-या वॉटरलिलीज आहेत, पण जर कमळे मिळाली नाहीत तरच त्यांच्या वाटेला जाईन. आता गावी गेल्यावर आधी पाँड बनवायचाय, यावेळी जर तो बनला तर फक्त मासे सोडुन येईन त्याच्यात, पुढच्या वेळेस कमळे. गावात कुठे सापडली तर आणिन उप्टुन आणि लावेल तात्पुरती.

साधना, तिथे अस्सल कमळे बघायला मिळतील. एरवीही पनवेल कमळांसाठीच प्रसिद्ध होते.

निदान पावसाळ्यात तरी वेल नक्की घेऊन जा. आमच्याकडे किती तग धरेल याची शंकाच आहे.

कमळाच्या पाकळ्या जरा रुंद असतात. आणि त्याचे फळ मोठे असते. त्याचे शंकूच्या आकाराचे आणि सपाट भागावर खोबणीत बिया असणारे हिरवे फळ बाजारात येते. सिंधी लोक खातात ते.

पण मुंबैत कल्चर कोठे मिळेल?
मूंबईत माहीम ला कल्चर मिळेल. मी पत्ता देईन. रू.१५० ला मोठे पाकीट मिळते. त्यांच्याकडे रेडिमेड गांडूळ खताचे किट देखील मिळ्तात. तसेच ठाण्याला देखील कीट बनऊन देतात. त्याची लिंक मी देईन. पण माहिम ला मीळ्णारे किट चांगले आहेत.

साधना,रानजाईच्या फुलांचा गजरा करता येत नाही कारण त्या फुलांचा देठ फारच नाजुक असतो.
ह्या फुलांचा वास खरंच घरभर दरवळत असतो. मला मोती मोगर्‍याचे रोप हवे आहे. पुण्यात ते रुजेल का? कारण इथे मी ते कुणाकडे असल्याचे ऐकले नाहीये. मुंबईत ही फुले खूप येतात. त्याच्या लागवडी बद्द्ल मला कोणी सांगेल का?

विजयजी कल्याणच्या पाठारे नर्सरीत मिळेल का?
मी अंबरनाथला रहाते ना , कल्याण जवळ पडेल मला.
नसेलच मिळणार तर जाईलच माहिमला. तूम्हि पत्ता देउन ठेवा.( पत्त्याची वाट पहाणारी बाहूली)

शांकली, मोगर्‍याची जाडसर फांदी पावसाळ्यात लावली तर जगते. तिला पहिले एक वर्ष फूल येऊ द्यायचे नाही. आधी झाड नीट वाढू द्यायचे.
मग बहर यायच्या आधी सगळी पाने खुडून टाकायची, म्हणजे चांगला बहर येतो.
उष्ण हवामान असेल तर मोगर्‍याला जास्त सुगंध येतो. पण आत पुणेही तितके थंड उरले नाही.
त्यामूळे तिथेही येईल.
जर नर्सरी मधून रोप घ्यायचे असेल तर जास्त फूले आलेले रोप घेण्यापेक्षा, जाड फांदीचे रोप घ्यावे. ज्यांच्याकडे मोगर्‍याचे झाड आहे, ते ओक अधूनमधून छाटणी करतात, त्यांना सांगून ठेवले, तर ते देतील फांदी.

uju
विजयजी कल्याणच्या पाठारे नर्सरीत मिळेल का?

पाठरे नर्सरीत कल्चर मिळत नाही. दूसरीकडून घेतलत तर आयसेना फोटेडो च घ्या. घरी गांडूळ खतासाठि ही गांडूळे उपयूक्त असतात.

पण मोती मोगर्‍याचे रोप पुण्यात मिळत नाही. तशी माझ्याकडे डबल मोगरा,सिंगल मोगरा आणि मदनबाण आहेत. पण मोती मोगरा (जी फक्त मुंबईची खासियत आहे) तो माझ्याकडे नाहीये. आणि मुंबईत कुठे मिळेल?

त्याला भरपूर फूले येतात.<< हजारी मोगरा आपोआप पसरत जातो आणि फुलेही खुप येतात, पण मला तो जास्त उग्र वाटतो

सचिन साचिना अनुमोदन! हजारी मोगर्‍याला खूप उग्र वास येतो. पण दिनेशदा तुम्ही मोती मोगर्‍याबद्दल काही सांगाना!

मोती मोगरा म्हणजे गजर्‍यात असतो तोच ना ? त्याची पण फांदीच लावावी लागते. माझ्या मते तो वसईहून येतो मुंबईत. (निदान पुर्वी तरी यायचा.) आपल्याकडे वसईचे मायबोलीकर आहेत ना. ते नक्की सांगू शकतील.

होय दिनेशदा,गजर्‍यात असतो तोच! तो पुण्यात नाही मिळत. त्याला दमट हवामान (समुद्र किनार्‍याचे) लागते का? पुण्यात तो रुजेल का?

तो मोगरा गल्फ मधे पण होतो. म्हणजे गरम हवेत जास्त सुगंध येतो त्याला.
पण बाकिच्या मोगर्‍याची झाडे आहेत, तर हा नक्कीच फूलेल.

एक पाकळी नावाची मायबोलीकर आहे.
चंदनवेल नावाची पण एक वेल असते. तिला पण सुंदर सुवासिक पांढरी फूले येतात आणि त्या फूलांचा आकारही छान असतो.

धन्यवाद शोभा१२३, मी लिहिताना चुकले. मला त्याचे रोप हवे आहे. मी सिंहगड रोड
च्या सगळ्या नर्सरी पालथ्या घातल्या पण कुठेहि
मीळाले नाही.

दिनेशदा तुम्ही वर दिलेली लिंक मी वाचली,त्यात चंदनवेलीचा फोटो आणि माहिती पण वाचली.इथे पुण्यात ती वेल मिळाली तर जरूर लावीन.

योगेश ने काढ्लेले अजंन चे फोटो पाहीले. ते झाड देखील बघून आलो.
अजंन काचंन .... हे गाण लिहील त्या वेळी महाराष्ट्र राज्य झाल नव्हतं. नंतर मराठ वाडा व विदर्भ समावेश होऊन मोठे मराठी राज्य झाले.तेव्हां अभ्यासकांच्या लक्षात आले की विदर्भात दूसर्या एका झाडाला अजंन नाव आहे.या मोठ्या झाडाचे मोठेपण मान्य करून त्याला अजंन म्हणावे व या सह्याद्री सूंदरीला अजंनी म्हणावे असे ठरले. वन विभागाने ही या नावाला मान्यता दिली. म्हणून आता या झाडाचे नांव अजंनी आहे.

Pages