निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनक म्हणजे सोने ना ? मुचकुंदाच्या फुलांचा रंग पिवळा कुठे असतो ?>>>>हो ना, ज्यांनी हे फोटो अपलोड केले त्यांनी त्याचे नाव सरळ कनकचंपा लिहिले आहे. मुचकुंदाचा फोटो तुमच्याच लेखात पाहिला त्यामुळे लगेच ओळखु आला. Happy

बघ रे, आपण हि आवड जोपासली नाही, तर वडाला, पिंपळ पण म्हणतील ना रे लोकं !

मी इतकी वर्षे मुंबईत राहतो, पण हि आवड गेल्या १५/२० वर्षातलीच. परदेशी राहिल्याने, भारतातील झाडांच्या जास्तच आठवणी यायच्या. मग हातात काही छान पुस्तके आली. त्यांची पारायणे झाली.
आधी न बघितलेलं झाड दिसलं (हे गोव्यात फार व्हायचं) किंवा एखादे झाड ओळखू आले तर खुप आनंद व्हायला लागला.

आता तर धावत्या रेल्वेमधूनही झाडे ओळखू येतात. (त्यांना भेटायला चालत्या गाडीतून उडी कसा मारत नाही मी, हेच नवल आहे.)

हीच आवड नव्या लोकांत पोहोचली याचे खुप समाधान वाटते. नुसत्या वारस फूलाच्या एका फोटोवरुन, त्याचा ध्यास घेऊन, थेट गोव्यापर्यंत मजल मारणारा, विजय. हा मी माझाच "विजय" समजतो.

हा मी माझाच "विजय" समजतो

खरे आहे दिनेश...तुमच्यामुळे इथे ब-याच जणांना झाडांनी झपाटले Proud
मला आधीपासुनच झाडांचे वेड होते पण कोणाचे नाव काय गाव कुठले काही माहित नव्हते. तुमच्यामुळे हक्काचे माणुस मिळाले माहिती विचारायला Happy

पण कोणाचे नाव काय गाव कुठले काही माहित नव्हते. तुमच्यामुळे हक्काचे माणुस मिळाले माहिती विचारायला >>> साधना एकदम मनातलं बोललीस, सुरवातीला फक्त ट्रेकिंग च्या माध्यमातून निसर्गा कडे ओढला गेलेलो मी, आता ट्रेकिंग ला गेल्यावर नजर किल्ल्यांच्या अवशेषा बरोबर रानफुले, पक्षी, आणि अन्य घटकांकडेही गेल्या शिवाय रहात नाही. एखाद्या पुस्तक प्रदर्शनात गेल्यावर प्रथम भेट असते ती गड किल्ल्यांचा विभाग आणि पर्यावरण-निसर्गाच्या पुस्तकांच्या दालनाकडे. आणि याचे श्रेय दिनेशजी, जिएस, आणि मायबोलीलाच

मला पुण्यात फिकट पिवळ्या रन्गाचा सोनचाफा कुठे मिळेल? http://www.flickr.com/photos/dinesh_valke/624168100/in/photostream/ इथे दिसतो तसा..
(फोटो नेटवरुन घेतला आहे मि काढला नाहि. )

पण कोणाचे नाव काय गाव कुठले काही माहित नव्हते. तुमच्यामुळे हक्काचे माणुस मिळाले माहिती विचारायला >>> साधना एकदम मनातलं बोललीस, सुरवातीला फक्त ट्रेकिंग च्या माध्यमातून निसर्गा कडे ओढला गेलेलो मी, आता ट्रेकिंग ला गेल्यावर नजर किल्ल्यांच्या अवशेषा बरोबर रानफुले, पक्षी, आणि अन्य घटकांकडेही गेल्या शिवाय रहात नाही.>>>>>साधना, सचिनला १०० उकडीचे मोदक. Happy

उन्हाळा सुरू झाला आहे. फळांची रेलचेल बाजारात वाढली Happy आपणही फळांच्या बिया वाळवून साठवून ठेवल्या पाहिजेत.

कशासाठी ????

माझा मायबोलीवरच्या पहिल्या लेखातील परीच्छेद वाचा Happy
http://www.maayboli.com/node/2399

"प्रत्येकजणांच्या मनात विचार असेल कि, मी काय करू शकतो पर्यावरणाचे रक्षण करण्याकरीता. मागे एका मासिकात वाचलेल्या एका उपक्रमाचा येथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तो उपक्रम असा होता कि, आपण वर्षभर जी फळे खातो उदा. आंबा, संत्री, फणस, जांभुळ इ. (उन्हाळ्यात तर भरपुर फळे उपलब्ध असतात) त्या फळांच्या बिया फेकून न देता त्या साठवून ठेवाव्यात आणि पावसाळा सुरू झाला कि आपल्या वर्षासहलीच्या दरम्यान त्या रुजतील अशा ठिकाणी उधळायच्या. मस्त आहे ना हा उपक्रम! विचार करा त्या बियांपैकी काही जरी रुजल्या आणि हजारो हातांनी हे काम केले तर नक्कीच परिसर सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. सध्या वर्षासहलीला जाण्याचे फॅड वाढले आहे. काही हौशी पर्यटक अशा निसर्गरम्य स्थानी जाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या इ. कचरा फेकतात. त्याच ऐवजी जर या बिया उधळल्या तर आपल्या हातून पर्यावरणाचे रक्षण करण्यात खारीचा वाटा झाला याचे समाधान मिळेल.

याच बरोबर मी अजून एक सुचवू इच्छितो कि, ज्यांना वर्षासहलीस जाणे शक्य नाही त्यांनी या सर्व बिया साठवून ठेवाव्यात. आपल्या महाराष्ट्रात आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपुरास पायी जाणारे वारकरी असतात त्यांच्याकडे त्या द्यावेत. आषाढी एकादशी तर भर पावसात म्हणजेच साधारणतः जुलै महिन्यात असते. त्या बिया जर तुम्ही वारकऱ्यांकडे दिल्या तर ते आपल्या दिंडी परिक्रमेत उधळत जातील. अशा प्रकारे त्यांना ईश्वरसेवेबरोबर निसर्गाचीही सेवा करण्याची संधी मिळेल."

योगेश, आवडली कल्पना! नक्की अंमलात आणणार! Happy रच्याकने तो अंजनचा फोटो सही आलाय. हिरानंदानीत कुठे दिसला तुला हा?

वरचा रानजाईचा फोटो पण मस्त आलाय. रानजाईला वास असतो का?

रच्याकने तो अंजनचा फोटो सही आलाय. हिरानंदानीत कुठे दिसला तुला हा?>>>>धन्स माधव.
हिरानंदानीला डिमार्टच्या पुढे (विंचेस्टर बिल्डिंगच्या रस्त्याला) महानगरपालिकेचे एक उद्यान आहे. (वेळ सकाळी ५ ते १० Happy आणि संध्याकाळी ४ ते रात्रौ ८ :-)) तेथेच दिसले अंजनाचे झाड. सध्या दोन अंजनाची झाडे आहेत एकाला बहर येण्यास सुरूवात झाली आहे, वरचा फोटो त्याच झाडांच्या फुलांचा आहे. दुसर्‍या झाडाला आत्ताशी कळ्या येण्यास सुरुवात झाली आहे. त्या उद्यानात भरपूर वेगवेगळी झाडे आहेत. तिथेच मला बहरलेला कनकचंपाही (रामधनचंपा) दिसला. हिरानंदानी परिसरात अशी भरपूर झाडे आहेत. या परिसरात कदंबाची भरपूर झाडे आहेत. कुणी इच्छुक असेल तर फोन करा. Happy मी दाखवतो अंजन आणि कनकचंपाची झाडे. Happy

जिप्सी, सुरेख कल्पना. अशा बिया पावसाच्या सुरवातीस टाकल्या पाहिजेत, म्हणजे पावसाचे चार महिने, ति झाडे व्यवस्थित रुजतात, वाहत्या ओहोळाच्या बाजूला त्या रूजण्याची शक्यता जात असते.

जिप्सी सुंदर कल्पना... या वर्षीच्या सगळ्या ट्रेकवाल्यांनी ही कल्पना राबवा बरे.. म्हणजे पुढच्या वर्षी किल्ल्यांवर जाताना आम्ही सिताफळे आणि चिकु खातखात जाऊ Happy

स्वरा, तुला हवी असलेली सोनचाफ्याची फुले पुण्यात तुला, बाबूगेनू चौकात फुलवाल्यांकडे मिळतील. तसेच पांढर्‍या रंगाची सोनचाफ्याची फुले मी रविवारी भरत नाट्य मंदीरासमोर एका मुलाकडे पाहीली. तो ती विकत होता.
कनक चंपा, रानजाई व सर्व फोटोंबद्दल व माहीती बद्दल धन्यवाद.
जिप्सी, तुझा उपक्रम खरच चांगला आहे.
साधने, तुझी कल्पना आवडली. Lol

योगेश तो करंजच आहे. आमच्याकडेही दिसतो जांभळ्या रंगाच्या फुलांचा करंज.
तुझी उपक्रमाची आयडीयाही छान आहे.

काल एक दिवस आले नाही पण बर्‍याच गप्पा मिसल्या.

हीच आवड नव्या लोकांत पोहोचली याचे खुप समाधान वाटते. नुसत्या वारस फूलाच्या एका फोटोवरुन, त्याचा ध्यास घेऊन, थेट गोव्यापर्यंत मजल मारणारा, विजय. हा मी माझाच "विजय" समजतो.
दिनेशदा,
वाह क्या बात है !
आणि हा विजय नक्कीच तुमचाच आहे,मला वाटतं आजवर असे कितीतरी विजय तुम्ही नोंदवले असतील !
Happy

कनक चंपा, रानजाई व सर्व फोटोंबद्दल व माहीती बद्दल धन्यवाद.
Happy

शांकली रानजूई मस्त फूलली आहे ग.
जिप्सि फोटो छान आले आहेत.
ओल्या कचर्यापासून खत बनवण्याची माहिती कोणी देऊ शकेल का?

अनिल, तू मागे झाडे लावणार्‍यांबद्दल बोलला होतास ना ? आपल्या आधीच्या पिढीत, झाडे लावायची ती पुढच्या पिढीसाठी हा विचार होता. त्या काळात कलमी झाडे नव्हती, त्यामूळे ती झाडे सावकाश वाढायची, आणि अनेक वर्षे जगायची. कोल्हापूर शहरात शिरताना, दोन्ही बाजूने जी वडाची झाडे आहेत, कि किती दूरचा विचार करुन लावली असतील. आजही तो हिरवा बोगदा डोळ्यांना शीतलता देतो.

उजु, आरतीने (इट्स्मी) इथे सविस्तर लेख लिहिला होता. कचर्‍याच्या विल्हेवाटीबद्दल.

मला मदत करा मंडळी. आताच एका नर्सरीला भेट देऊन आले. मला कमळाची रोपे/बीया हव्यात. त्या नर्सरीत वॉटरलीलीज आहेत, कमळे नाहीत. आणि त्याने एका रोपाचे रु. १००० सांगितले. Sad मी आता गावाहुन आल्यावर शोधेनच पण तोवर ही किंमत बरोबर आहे का ते सांगा Happy

सध्या प्रचंड प्रमाणात फुललेल्या हळदी रंगाच्या फुलांच्या झाडाचे नाव सांगा मला कोणीतरी..ठाण्यात तर रस्त्याच्या दुतर्फा आहेत... प्रचंssssssssssssssड सुंदर. . आणि झाडाखाली सडा. Happy

साधने, धीर धर. बर्‍याच रेल्वेलाईन्सच्या बाजूला, गावातल्या तळ्यात वगैरे मी बघितलीयेत कमळाची (वॉटरलिलीजची रोपं) मी ही ट्राय करतोचे. नको उगाच पैशे वाया घालवू

साधना,
थोडे धाडस लागेल (एकटी जाऊ नकोस )
कळंबोली हून पनवेल ला वळल्यावर, डाव्या हाताला स्मृति उद्यान लागते, त्याच्या मागे एक मोठे सरोवर आहे. तिथे अस्सल कमळे आहेत. आता कदाचित त्या तळ्यात कमी पाणी असेल, त्यामूळे आता जाता येईल.
या कमळांना फळे पण येतात. एखादे सुके फळ मिळाले तर लॉटरीच.

सचिन_साचि धन्स लिंक दिल्याबद्द्ल.
पण मुंबैत कल्चर कोठे मिळेल?
साधना, जागू कोणाला माहिती आहे का?

सध्या प्रचंड प्रमाणात फुललेल्या हळदी रंगाच्या फुलांच्या झाडाचे नाव सांगा मला कोणीतरी..ठाण्यात तर रस्त्याच्या दुतर्फा आहेत... प्रचंssssssssssssssड सुंदर. . आणि झाडाखाली सडा.>>>>चिंगी, ते पितमोहराचे झाड Happy

उजु, (मुंबईत) दादरला धुरु हॉलच्या बाजूला, पुलाखाली जी नर्सरी आहे, त्यांच्याकडे असते बहुतेक. निदान ते सांगू शकतील.

धन्स दिनेशदा.
९ तारखेपर्यंत तरी दादरला जाणे जमेलसे वाटत नाहि.९ नंतर बघेन.
दिनेशदा मी मागे इथे माझ्या डेलियाचे आणि गूलाबाचे फोटो टाकले होते ना, त्या डेलियाला बहर संपल्यानंतर काय झाले काय माहित पण पूर्ण झाड शेंड्याकडून सूकत चालले आहे. कश्यामूळे असे होउ शकते?

कमळाच्या खोडांचे जाळे तयार झालेले असते आणि त्यात पाय अडकल्यास तळ्यातून बाहेर येणे अवघड होते, असं मी ऐकलय. त्यामुळे साधना आणि अमित, काळजी घ्या.

Pages