Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिप्सी , अरेरे नाही झाल
जिप्सी , अरेरे नाही झाल का?
मी ठरवलेल की जायला नाही मिळत तर निदान व्रूत्तांत व फोटोंवर तरी समाधान मानू.
९ तारखेनंतर जायच ठरल तर मी येउ शकेल.
मुंबईत बघितल्याचे आठवत नाही.
मुंबईत बघितल्याचे आठवत नाही. नव्याने लागवड झालेल्या ठिकाणी हे असणार. याला एकच बी असलेली गोलाकार शेंग येते. माझ्या लेखातल्या फोटोत दिसतेय तशी.
हा अंजन फुलाचा फोटो (काल
हा अंजन फुलाचा फोटो (काल कॅमेरा सोबत नसल्याने मोबाईलमधुन काढलेला. दुधाची तहान ताकावर
)
वा जिप्सि काय सुंदर आहेत ही
वा जिप्सि काय सुंदर आहेत ही फुल. त्या झाडाचा पण जरा क्लोजअप फोटो घे म्हणजे आम्हालापण कुठे दिसल तर ओळखता येईल. कुठे आहे हे झाड ?
त्या झाडाचा पण जरा क्लोजअप
त्या झाडाचा पण जरा क्लोजअप फोटो घे म्हणजे आम्हालापण कुठे दिसल तर ओळखता येईल. कुठे आहे हे झाड ?>>>>> जागू, नक्कीच. आज कॅमेरा घेऊन जातोय ऑफिसला
पवईला सापडले हे झाड.
आत्ताच मला मुंबईतच बहरलेले
आत्ताच मला मुंबईतच बहरलेले अंजनाचे झाड दिसलेय
कुठे? तुम्ही हिरानंदानी मध्ये असता ना?
तुम्ही हिरानंदानी मध्ये असता
तुम्ही हिरानंदानी मध्ये असता ना?>>>>>येस्स, हिरानंदानी, पवईलाच दिसले झाड
जिप्सी काय सुरेख आहे रे हा
जिप्सी काय सुरेख आहे रे हा गुच्छ.... खरेच जडावाचा दागिना..
काल लेकीला सायकल घेतली. मग आज नेहमीचा डोंगर सोडुन सरळ वाट पकडुन बाहेर पडलो. सहज नजर गेली तर हे दिसले.
छबी आपल्या पॅशनफ्रूटसारखीच पण आकार मात्र रुपयाच्या नाण्याएवढाच. आणि वेलही एकदम लहान
ह्या झुडपावरुन अंदाज बांधा वेल किती लहान होती त्याचा.
साधना, फोटो दिसत नाहीत.
साधना, फोटो दिसत नाहीत.
साधना वेल आणि फुल दोन्ही
साधना वेल आणि फुल दोन्ही मस्त.
व्वा जिप्स्या! काय कलर आहे
व्वा जिप्स्या! काय कलर आहे त्या फुलांचा...एकदम निळाशार!!
पुर्ण झाडाचा फोटो टाक बाबा लवकर!
खरोखरच फुलं अगदी जडावाच्या दागिन्यांसारखी!
हे तुरे कसले?? हे निळ्या
हे तुरे कसले?? हे निळ्या रंगातही दिसतात
साधना हा त्याच कूळातला पण
साधना हा त्याच कूळातला पण रानटी वेल आहे. मी खर्या पॅशनफ्रूटच्या फूलाचा फोटो टाकतो रात्री.
जिप्स्या, मी सांगितल्याप्रमाणे फोटो काढत रहा. अंजनाच्या ज्वेलरी शॉपमधे, अनेक नमुने आहेत.
मग यालाही फळे लागतील काय?
मग यालाही फळे लागतील काय? चवीचे काय????? आता लक्ष ठेऊन राहायला पाहिजे...
तोपर्यंत वेल टिकला म्हणजे झाले.
साधना ते दुसरे झाड जंगली आहे.
साधना ते दुसरे झाड जंगली आहे. नाव माहीत नाही पण आमच्याकडे खुप पसरतात ही झाड. ह्यांची पान खरखरीत लागतात हाताला.
आज कॉलनीत डी टाईप
आज कॉलनीत डी टाईप वसाहतींम्ध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. रस्ते असे सजवलेले आणि ही मोठी रांगोळीही काढलेली -
आज ब-याच दिवसांनी युएसबी चालणारा लॅपटॉप आणि सोबत इंटरनेट कनेक्षन असा योग नशिबी आला. सगळे फोटो उतरवले पण आता पिकासावर शोधत असताना फक्त आजचेच फोटो अपलोड केले हे लक्षात आले
आता लेकीला रिक्वेस्ट पाठवते माझे बाकिचे फोटोही अपलोड कर म्हणजे मला इथे टाकता येतील 
योग्या अंजनाचे फोटो मस्तच
योग्या अंजनाचे फोटो मस्तच
ते पिकासाच समिकरण अजुन मला
ते पिकासाच समिकरण अजुन मला जमल नाही. पिकासावर फोटो लोड केले पण इथे ते नाही लोड होत माझ्याने.
जागु तुला मेल पाठवते सचित्र
जागु तुला मेल पाठवते सचित्र
धन्यु ग.
धन्यु ग.
जागु तुला मेल पाठवते सचित्र
जागु तुला मेल पाठवते सचित्र >>>> मला पण, मला पण.... प्लीज.
साधना..... आयकर कॉलनी वाले
साधना..... आयकर कॉलनी वाले नशीबवान आहेत :). पारसिक हिल सारखे निसर्गरम्य स्थळ जवळच आहे त्यांना.
हिरनंदानीला कुठे?
हिरनंदानीला कुठे?
जिप्सी, काय मस्त गुच्छ आहे तो
जिप्सी, काय मस्त गुच्छ आहे तो . झुंबरच आहे अस वाटतय. धन्यवाद.
साधना, मस्त फोटो. फुलाचा आणि रांगोळीचा ही.
साधना, माझी आई सांगते ती
साधना, माझी आई सांगते ती वनस्पती, म्हणजे विंचवाच्या दंशावर उतारा आहे. त्याच्या तूरा विंचवाच्या नांगीसारखाच दिसतो म्हणून असेल कदाचित. त्या काळात माझ्या आजोळी देखील घरात विंचू निघायचे. आजीला एकदा डसला पण होता, बिचारी दिवसभर विव्हळत होती.
पण या बनस्पतीबद्दल मी खात्री देऊ शकणार नाही. शिवाय आता त्यावर औषधही उपलब्ध आहे.
==
आणि हो ती फळे नाही खायची. खर्या पॅशनफ्रुटची चव कशालाच येत नाही !
सांगा सांगा. लवकर सांगा. या
सांगा सांगा. लवकर सांगा. या फुलांचे नाव सांगा.

दिसायला कोरहांटीसारशीच आहेत. पण जरा जाड आहेत.
हा आणखी एक फोटो.
दिनेशदा, जागू, साधना, जिप्सी, कुठे गेले सगळे फोटो काढायला? 
अरे फोटो टाकले आणि लगेच इतकी
अरे फोटो टाकले आणि लगेच इतकी घाई???
मागे दिनेशनी धायटीचा फोटो टाकलेला इथे. त्याची आठवण झाली ही फुले पाहुन..
तुला कुठे मिळाली ही फुले??
वा शोभा सुंदर आहेत फुल.
वा शोभा सुंदर आहेत फुल. धायटीची डाळिंबासारखी होती फुल. ही वेगळीच वाटत आहेत.
ही माझ्या आईकडे सध्या लिली फुलली आहे.


मस्त गं जागुडे...
मस्त गं जागुडे...
अरे फोटो टाकले आणि लगेच इतकी
अरे फोटो टाकले आणि लगेच इतकी घाई???>>>
साधने, अग फोटो काढून खूप दिवस झाले. बारावीची परीक्षा चालू असताना काढलेत. त्यामूळे फारच उत्सुकता लागलेय. आणि तुम्ही सर्व महाभाग आहात. लवकर सापडलात हे माझे नशीबच.
अग माझे वडील सकाळी फिरायला जातात ना, तेव्हा ते आणतात.
जागू, लिली किती सुंदर दिसतेय ग? आज प्रथमच पहातेय. पुण्यात रहायला असतीस तर सगळ्यांची रोपे तुझ्याकडून मिळवली असती.
Pages