निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मला कसं नाही आठवलं हे? मी बॉटनी विसरत चालले की काय

जे ब-याच अवधीत वापरले जात नाही ते हार्डडिक्समधुन आपोआप डिलिट होते Happy

<<जे ब-याच अवधीत वापरले जात नाही ते हार्डडिक्समधुन आपोआप डिलिट होते <<
हो गं! परत अभ्यास सुरु केला पाहिजे आता!
(मी हादरले होते...वाटलं , " नको त्या ठिकाणी वापरल्यामुळे मुळे डिलिट होते' असं म्हणते की काय? Wink ) Proud

आपापल्या शेपटाचा उपयोग करा,
नाहीतर काय होईल ?
दोन पायाच्या माणसागत
आपले शेपूट झडून जाईल !

.. (शेपटीवाल्या प्राण्यांची पुर्वी भरली सभा..)

परवा कामासंर्दभात पूणे कोर्टात गेले होते तेव्हा कोर्टाच्याआवारात मूंबईत न बघितलेले झाड पूर्ण फूललेले दिसले.
कोर्टातील कामासाठी गेली होती म्हणून कॅमेरा बरोबर न घेतल्याचा भयंकर दु;ख करत शेवटी मोबाईलवरच फोटोसेशन केले.
ही ती फूल.
जाणकारांनी ह्या झाडाचे नाव व माहिती सांगावी.जॅकॅरंडा/ नीलमोहोरच म्हणतात का ह्याला?
25032011122.jpg25032011127.jpg

हे कुठे लिहायचे समजले नाही, म्हनून इथेच लिहित आहे..

गव्हाच्या तृणरसासाठी रोज घरी गहू लावायचा. त्याबाबत कुणी सांगेल का?

http://www.maayboli.com/node/20832
उजू, इथे माझा लेख आहे झकरंदा बद्दल.

जामोप्या, त्यासाठी सात कुंड्या किंवा वाफे करावे लागतील. रोज एकात गहू पेरायचा. सातव्या दिवशी तृण वापरण्यासाठीत्यार होतील. ते उपटले कि परत त्यात गहू पेरायचे. हा उद्योग रोज, न कंटाळता करावा लागतो. (बाजारात तयार चूर्ण उपलब्ध आहे.)

==

काही दिवसांपुर्वी मी घायपाताच्या एका प्रकारच्या, फूलाचा उंच मनोर्‍याचा फोटो टाकला होता, त्याचे हे फूल.
जेमतेम एक इंच व्यासाचे, रंगही खास नाही, तरीपण खूप मोहक. याला मंदसा सुगंधही येत होता.

अय्या, डॉक्टर तुम्हाला ख्रिसमस ट्री माहित नाही????? Happy Happy
दादरटीटी ला एका इमारतीच्या अंगणात हा आहे आणि अगदी इमारतीएवढाच वाढलाय पण. मस्त दिसतो.

हे झाड क्रिसमस ट्री ला पर्याय म्हणून वापरतात. पण युरपमधे एक कोनीफरस (सूचीपर्णी) झाड क्रिसमस ट्री म्हणून ओळखले जाते.
अनेक इंग्रजी सिनेमात हे झाड आपल्याला दिसते. या झाडाची, तिथल्या बर्फाळ हिवाळ्यातही पानगळ होत नाही. याच्या फांद्यांवर बर्फ साचलेला असतो, तरीही पाने शाबूत असतात. बर्फाळ प्रदेशातील काही प्राणी, हिवाळ्यात हि पाने खातात. या पानांचा "चहा" पण करतात.

हे झाड क्रिसमस ट्री ला पर्याय म्हणून वापरतात

आयला हे नव्हते माहित.. तरी मला वाटत होते की ख्रिसमस ट्रीला थंड हवा पाहिजे आणि तरीही हे मुंबईत मुबलक कसे काय आढळते.....

तसं माझ्या आरोग्य केंद्राला जाणीवपूर्वक आम्ही आजुबाजुस झाडे जोपासून थंड ठेवलं आहे.

आरोग्यकेंद्रा समोरची/मागची झाडांची भाऊ गर्दी.

डेरेदार पिंपळ..

मोहरु लागलेली जांभूळ

बाल्यावस्थेतील करज.

कडुलिंब

फणस

फणसाचं पिल्लू. Happy

कसलं तरी फुलझाड आहे...

मागच्या बाजूस असलेले आणखी एक झाड

म्हणजे त्या बाजुला आहे तर.. हा अलबेला हनुमान अजुन कुठेतरी पाहिलाय.. बहुतेक वडाळ्याला. हे नाव कशावरुन पडले असेल???? Happy

ह्म्म्म्म... काही कल्पना नाही..... Happy

त्याचा पुजारी माझा पेशंट आहे. उद्या विचारतोच.. Happy

दिनेशदा काल मी झाडांच्या शोधात आमच्याइथल्या एका जुन्या गार्डनमध्ये गेले होते. तिथे मला काही वेगळी झाडे आढळली. आज किंवा उद्या टाकते एकत्र करुन.

उजू, अगदी माझ्या मनातल ओळखलस का? अग ही फुले आमच्या इथे खूप आहेत. रस्त्यावर अगदी सडा पडलेला असतो. मी विचारच करत होते. या फुलांचा फोटो टाकून नाव विचारण्याचा. तर तू टाकलासच.
धन्यवाद.
दिनेशदा, घायपाताचे फूल किती मस्त आहे हो.
वैद्यबुवा मस्त फोटो.

खरंच मला माहीत नव्हतं... धन्स जागू,साधना.
धन्स डॉक, खिसमस ट्री मलादेखील माहित नव्हतं, तुम्हाला माहित नसल्यामुळे मलाबी कळालं.
Happy
बाकी तुमच्या कामाच्या जागी इतकी झाडी पाहुन बरं वाटलं,यामुळे आता आमच्या कईम्पसमधली असलेली झाड मी पाहायला खास वेळ काढेन.
Happy

युरेका युरेका युरेका!!!!
आत्ताच मला मुंबईतच बहरलेले अंजनाचे झाड दिसलेय आणि दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणेच फुल अक्षरश: जडावाचा एखादा दागिना दिसतोय. ज्याम खुश झालोय ती फुलं पाहुन Happy
आज कॅमेरा नाहीये. उद्या खास कॅमेरा घेऊन काढतो फोटो. Happy

(ऑफिसात जास्त काम नव्हते, कंटाळा आलेला म्हणुन जरा बाहेर एका गार्डनमध्ये गेलो असता हे झाड दिसले Happy (ऑफिसातले कुणी माबोकर नाही म्हणुन बिन्धास्त लिहितोय :फिदी:)

जिप्स्या, एवढ्यातच थांबू नकोस. ती फूले तूला अनेक रुपांत दर्शन देतील. अगदी फळे झाली तरी ती आधी हिरवी, मग लाल मग काळी होत जातात. प्रत्येक अवस्थेतले फोटो हवेत.

शांकली,दिनेशदा धन्स.
दिनेशदा लिंक व इतक्या माहितीपर लेखासाठी खूप खूप आभार.
किती अचूक वर्णन केल आहेत झकरांडाचे .
खरच पूर्ण फूललेला नीलमोहोर बघायला किती सुंदर दिसतो ना.
दिनेशदा त्याला शेंगा येतात का?
मुंबईत कूठे आहे का नीलमोहोरचे झाड?
काल नि. ग. झाले का राणीच्या बागेतले? कोण कोण होत?

काल नि. ग. झाले का राणीच्या बागेतले? कोण कोण होत?>>>>>नाही झाले Sad

मुंबईत कूठे आहे का नीलमोहोरचे झाड?>>>>>दिनेशदा, मुंबईत आहे हे झाड?

Pages