रागावर आधारित गाणी

Submitted by girishmusic on 9 June, 2008 - 21:31

खालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत?
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...
४. सीने मे सुलगते है अर्मा...
५. ना, जिया लागे ना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य, सिडी आहे त्या चित्रपटाची.. ते गाणे मी देखील आधी कुठे ऐकले नव्हते. आणि माझ्याकडे सिडीचा नेमका पहिलाच भाग आलाय. दुसर्‍या भागातही लताची छान गाणी असणार. दुसरा भाग पॅकमधेच नव्ह्ता बहुतेक.

लताचेच आणखी एक गाणे ऐकले,~

बडे भोले हो, ह्सते हो
सुनके दुहाई.... कन्हाई कन्हाई...

याचि चाल थेट, अमर भूपाळी मधल्या, तूझ्या प्रितीचे दू:ख मला दावू नको रे... ची आहे.

जय जय गंगे शुभंकरे..

राग कोणता ?

गन्ध फुलाम्चा गेला साम्गुन

त्ञाच रागात आहे ना ?

संमि,
जय जय दुर्गे शुभंकरे आणि गंध फुलांचा गेला सांगुन- एकाच रागातली वाटतायत. नक्की राग ओळखता येत नाहिये.

छान छान छान . मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान

...

राग कुठला ?

'योगी पावन मनाचा ' याच्याशी साम्य वाटते. राग मधुकंस का ?

काल क्रिमिनल मधलं 'तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये' ऐकलं आणि 'केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा' ची हुबेहूब कॉपी केलेय असं वाटलं! दोन्ही एकाच रागातली आहेत काय?

तसंच साम्य 'आचंद्रसूर्य राहो स्वातंत्र्य भारताचे' आणि एक फूल दो माली मधल्या 'मेरा नाम करेगा रोशन जगमे मेरा दुलारा' या दोन गाण्यांमधे वाटतं. मुखडयाची चाल बरीचशी सारखी आहे.

तू मिले ... हे धानी रागात आहे.

धानीतही पाच स्वर व भूपातही पाच स्वर.

धानीचा षडज बदलला की भूप / पहाडी / मालकंस / मधमाद सारंग काहीही होउ शकतो. त्याला शास्त्रीय संगीतात मूर्छना म्हणतात.
पेटी असेल तर प्रयोग करून बघा.

म्हणून तुम्हाला केशवा माधवाचा भास झाला .

भूप आणि मालकंस ऐकताना किती दूरची टोके वाटतात. पण नुसता षड्ज बदलून लगेच एकाचा दुसर्‍यात बदलून माहौल कसा काय बदलून जातो देव जाणे.
तुम्ही भूपाचे स्वर पेटीच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत सलग वाजवत जाता तेंव्हा तुम्ही मालकंसाचेही स्वर वाजवत असता. पण मनात एकाला धरून वाजवतो असतो म्हणून दुसरा जाणवत नाही का?

गजानन,
राग हा नुसताच त्यामधील स्वरांवर अवलंबुन नसतो तर त्यातील कुठले स्वर मुख्य आहेत (वादी संवादी). कुठल्या स्वरांवर थांबायचे असते. अश्या अनेक गोश्टी असतात. त्यामुळे स्वर अगदी सेम असले तरी राग वेगळे असु शकतात.
उदा. भुप व देशकार ह्या दोन्ही रागात सा रे ग प ध हे सुर आहेत. पण भुपाचा वादि/संवादी ग आणि ध आहे तर देशकार चा वादी/संवार ध आणि ग आहे.

हो काळी ४ चा भूप हा पांढरी एकचा मालकंस असेल आणि कुठल्या पट्टीत वेगळाच राग असेल.
भूप -> सा (०) रे (२) ग (४) प (७) ध (९) सा (१२) कंसामध्ये सा पासून अंतर लिहिलंय. म्हणजे दोन स्वरातला डिफरन्स २-२-३-२-३ आला.
मालकंस- सा (०) ग (३) म(५) ध(८) नि(१०) सा(१२) म्हणजे दोन दोन स्वरातलं अंतर ३-२-३-२-२ आलं.
हे वरच्या भूपच्या अंतराशी कम्पेअर केलं तर तिसऱ्या स्वरापासून जर भूप चालू केला (म्हणजे तिसऱ्या स्वराला सा मानून) तर ३-२-३-२-२ होईल थोडक्यात तो मालकंस होऊ शकतो. तिसरा स्वर म्हणजे ग. म्हणजे काळी चार च्या रेफ नी पांढरी एक.
तसंच आणि कुठल्याही पट्टीतला भूप हा त्याचा 'ग' जिकडे असेल त्या पट्टीचा मालकंस असेल. हे गणितात मांडता आलं तर वर अनिलभाई म्हणतायत तसं चलन, वादी इ. ने राग ठरेल.
पंडित अजय चक्रवर्तीच्या एका मैफिलीत त्यांनी एक राग गात असताना तेच स्वर ठेवून पण चलन बदलून दुसऱ्या रागात जाऊन दाखवलेलं. ऐकायला अशक्य भारी वाटलेलं, आता लिहिताना अंगावर शहारे आले. Happy

भाई, मी म्हणतोय "भूपाचे स्वर पेटीच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत सलग वाजवत जाता तेंव्हा तुम्ही मालकंसाचेही स्वर वाजवत असता. पण मनात एकाला धरून वाजवतो असतो म्हणून दुसरा जाणवत नाही का?"

यात कोणत्याही पट्टीवर "न रेंगाळता" असे म्हणायचे आहे. त्यामुळे वादी संवादी वगैरे काहींचा विचार न करता, नुसते सारेगपधसारेगपधसारेगपधसारेगपधसारेगपधसारेगपधसारेगपधसारेगपध वाजवणे अपेक्षीत होते.

आमचे मास्तर म्हणाले असते, सारेगपधसा असं धडधडत वाजवलं तर ते 'सारेगपधसा' आहे भूप नाहीचे मुळात.
ग प ध हे स्वर जो पर्यंत नीट वाजत नाहीत, तो पर्यंत भूप नाही.

बैला चाव

किरवाणी रागात आहे का ??

Pages