रागावर आधारित गाणी

Submitted by girishmusic on 9 June, 2008 - 21:31

खालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत?
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...
४. सीने मे सुलगते है अर्मा...
५. ना, जिया लागे ना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पवन दिवानी न माने...= बहार,
छोटासा बालमा = तिलंग,
सीने मे सुलगते है अर्मा...= यमन,
ना, जिया लागे ना...= मालगुंजी

मेरे ढोलना सुन..... हे मला खमाजमधील वाटत होते.. एका वेब साइटवर जयजयवंती असे वाचले.. ( जयजयवंती खमाज थाटातच आहे.. त्यामुळे माझे उत्तरही ५० % बरोबर.. Happy ) पण आता ते जयजयवंतीतच वाटत आहे.. Happy

मेरे ढोलना सुन हा मिश्र गारा आहे असेही वाचल्याचे आठवते.
मला जयजयवंती कुठेच जाणवला नाही. उलट बागेश्री जास्त जाणवला त्यात.
जयजयवंतीची खासियत अशी- नी(कोमल), नी(शुद्ध) (ग) रे- हे कुठेच जाणवत नाही मेरे ढोलनामध्ये.
http://www.raaga.com/play/?id=53968
(रागा डॉट कॉमवर हरिप्रसाद चौरासियांचा बागेश्री आहे. तो ऐकला तर मेरे ढोलनाचा भास होतो.)

मेरे ढोलना... जयजय. मध्ये दोन गंधार लागतात.. मुखड्यात आहेत.

म प नि सां ( सगळे शुद्ध) हे एक चलन असते, ते अंतर्‍याची दुसरी ओळ-- जिंदगी मेरी तो कुछ ना अब तेरे बिन.. या ओळीत मिळेल.

मधले आलाप मात्र रागेश्री सारखे वाटतात.. सां - कोमल नि -शुद्ध ध - शुद्ध म - शुद्ध ग.... बागेश्रीत ग कोमल असतो.... इथे सगळीकडे शुद्ध आहे. फक्त मुखड्यात संपतानाच्या आलापीत कोमल ग लागतो.

दोन निषदामुळे मला खमाज वाटत होता. पण आता जयजय वाटत असल्याने ही सगळी वकिली त्याच्या बाजुने करत आहे.. Proud अन्यथा, मला अजुन तो खमाज + मधली आलापी अर्धवट रागेश्री असाच वाटतो.

सुहास्य तूझे मनास मोही बिलावल आहे ना?
हे आणि 'मी मज हरपुन बसले गं' बरीच समान चालीतली गाणी आहेत.
मेरे ढोलना वाजवून बघतो आता एकदा Happy (ढोल नाही, बासरी Happy )

बरोबर... मला देखील ते गाणे ऐकताना मी मज हरपून आठवले.. माझ्या मते ते तिलककामोद असल्याने मी हे गाणेही त्यात धरले. कदाचित दोन्ही बिलावलही असतील.

चित्रपटातील अनेक गाणी रागदारीवर आधारित असली तरी त्यामधे वर्जित स्वर लावण्याचे स्वातंत्र्य घेतले जाते, त्यामुळे राग ओळखताना जरा गोंधळायला होते.

बित्तुबंगा
पवन दिवानी न माने... नक्की बहारमधे आहे का?
रेडिओ वर तर हे गीत भीमपलास रागात आहे असे सांगतात...:अओ:

चैतन्य दीक्षित आणि जागो मोहन प्यारे,
'सुहास्य तूझे मनास मोही' हे दीनानाथांनी गायलेले मूळ नाट्यगीत होते
यावरच ह्रदयनाथांनी 'मी मज हरपून बसले गं' ची चाल बांधली असे आशा भोसलेंनी एका कार्यक्रमात सांगितल्याचे आठवते.

जागो मोहन प्यारे,
'रागचे चलन' ही concept जरा समजावून सांगाल का?
मला रागासंबंधी मेल किंवा थाट, वादी संवादी, राग प्रहर इ. महिती आहे पण चलन ही संकल्पना अजून कळली नाही. 'रागाची पकड म्हणजे रागातील लहानात लहान असा स्वरसमुदाय ज्यामुळे रागाची चटकन ओळख होते', मग चलन म्हणजे काय?

मी चलन हा शब्द पकड याच अर्थाने वापरला आहे. ( तसा तो खरोखरच वापरतात का ठाउक नाही. नसेल तर तुम्ही पकड हाच त्याचा अर्थ घ्या.)

मला ते जोग रागातले वाटते आहे.

वंश मधले मै तो दिवानी हुयी हे शंकरा किंवा हंसध्वनीत आहे का?

हा बिलावल ऐकला, तो मला हमीरसारखा का वाटत आहे?>>>
जामोप्या, ऐकला बिलावल. बिलावलच गायलाय!! हमीर सारखा गायलेला नाही.
पपधनीसां, पपधनीसांरेंसां हे स्वर समुह दोन्हीत येतात! बाकी खूपच फरक आहे!

पकड म्हणजे रागाचे मुख्य स्वरसमुह! ज्यांवरून तो राग स्पष्ट होतो.
उदा. सां प, ध म ग. -----तिलककामोद.
चलन म्हणजे रागातील स्वरांचे जाणे येणे. चाल चलन. रागाचे आरोह अवरोह म्हणजे त्या रागाची
मुळाक्षरे. आणि चलन म्हणजे रागाची भाषा!
आरोह-अवरोहात रागदर्शन होत नाही ते चलनात [नियमबद्ध आलाप] स्पष्ट होते.

वंश सिनेमातलं मै तो दिवानी हुई हे बहुतेक शंकरा रागात असावं.
(किंवा हंसध्वनी आणि शंकरा मिक्स :))
पहेली चित्रपटातलं 'खाली है तेरे बिना मेरी अखिया' हे गाणं बहुतेक जोग रागातलं असावं.
फार सुंदर आहे ते गाणं .

अवचिता परिमळु, झुळकला अळु-माळु या गाण्याचा राग कोणता आहे?
किंबहुना, यात कोणकोणते राग वापरले आहेत?

http://www.youtube.com/watch?v=j5iJ9Ql_eJ0

कही दूर ..( दो अन्जाने)
हा बागेश्री आहे की गोरख कल्याण? की आणखी कोणता तिसराच राग आहे? गाणे छान आहे.

[१] Rajap यांचा ब्लॉग फरच आवडला.
[२] माईरी मैं कासे कहूं पीर [मदन मोहन + लता] दस्तक
हे गाणं कोणत्या रागात आणि तालात बांधलेलं आहे हे कुणी सांगू शकेल का?
बापू.

[१] Rajap यांचा ब्लॉग फरच आवडला.
[२] माईरी मैं कासे कहूं पीर [मदन मोहन + लता] दस्तक
हे गाणं कोणत्या रागात आणि तालात बांधलेलं आहे हे कुणी सांगू शकेल का?
बापू.

माईरी मै कासे कहू पीर अपने पिया से- हे गाणं बागेश्री रागात आहे.
http://www.youtube.com/watch?v=pX6ASs5h36g
इथे रोणू मजूमदारांनी त्याचा मुखडा वाजवला आहे.

चैतन्य
<<मेरे ढोलना सुन हा मिश्र गारा आहे असेही वाचल्याचे आठवते.
मला जयजयवंती कुठेच जाणवला नाही. उलट बागेश्री जास्त जाणवला त्यात.>>
जयजयवन्ती मधे गारा आणी बगेश्री या दोघान्चा भास होणे स्वभविक आहे कारण जयजयवन्ती हा राग गारा आणी बागेश्री या दोन्ही अन्गानी गाइला जातो

Pages