रागावर आधारित गाणी

Submitted by girishmusic on 9 June, 2008 - 21:31

खालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत?
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...
४. सीने मे सुलगते है अर्मा...
५. ना, जिया लागे ना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्वरुप मधील सुरुवातीचं गाणं जयजयवंतीत आहे का?

----------------------------------------------------------------------------------------

मेरे ढोलना सुन हा मिश्र गारा आहे असेही वाचल्याचे आठवते.
मला जयजयवंती कुठेच जाणवला नाही. उलट बागेश्री जास्त जाणवला त्यात.>>
जयजयवन्ती मधे गारा आणी बगेश्री या दोघान्चा भास होणे स्वभविक आहे

................... अहो, म्हणजेच तो जयजयवंती आहे.

पशुपत,
मी बागेश्री आणि देस अंगाने गायलेला जयजयवंती ऐकला आहे.
गारा आणि देस अंग एकच काय?
गारा अंगाने गायलेला एखादा जयजयवंती यूट्यूबवर वगैरे असेल तर लिंक देऊ शकाल काय?

चैतन्य....

मला जी अल्पशी अशी माहिती आहे त्याआधारे लिहू इच्छितो की, गारा रागदेखील जयजयवंतीप्रमाणेच देस्, बागेश्री आणि नट अंगाने सादर केला जात असल्याने बर्‍याचवेळी गाराला जयजयवंतीच्या पंक्तीत बसविले जाते....किंवा जात असावे.

अमीर खुस्रोच्या काळात रस्त्यावरून गात हिंडणार्‍या कव्वाली गायकांमध्ये 'गारा' लोकप्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळेच की काय अभिजात संगीत उस्तादांनी गारापेक्षा 'जयजयवंती' ला वेगळे मानण्याची प्रथा सुरू केली असावी.

मुघले आझम मधील "जब रात है ऐसी मतवाली तो सुबह का आलम क्या होगा..." हे लताचे गाणे जयजयवंतीचा भास करून देत असले तरी ते प्रत्यक्षात गारा अंगाने गुंफलेले आहे, नौशाद यानी.

अशोक पाटील

आठवणीतली गाणी या साईटवर बहुतेक तालाचीही माहिती आहे. नक्की आठवत नाही.
गूगलून बघा.

मधुरीता, गाणी आणि ताल अशी संकलित माहिती मिळणं कठीण वाटतं आहे.
तुम्हाला काही विशिष्ट गाण्यांचे ताल हवे असतील, तर ते नक्कीच सांगता/मिळवता येतील.

ठिक आहे. मला काहि मराठी आणि काही हिन्दि गाण्यांचा ताल ह्वा आहे.
१) ना जिया लागे ना
२) रैना बिती जाये
३) कहा से आये बदरा
४) बाबुजी धीरे चलना
५) पिया बीना पिया बीना, बासिया

१) असा बेभान हा वारा
२) मी रात टाकली
३)तिन्ही सांजा सखे मिळाल्या
४)रुतु हिरवा ई.

सुगम संगीतात बहुतांशी गाणी केहरवा आणि दादरा या तालांमध्ये बांधलेली असतात.
१) ना जिया लागे ना : केहरवा
२) रैना बिती जाये : केहरवा
३) कहा से आये बदरा : केहरवा
४) बाबुजी धीरे चलना : केहरवा
५) पिया बीना पिया बीना, बासिया : केहरवा

१) असा बेभान हा वारा : दादरा
२) मी रात टाकली : केहरवा
३)तिन्ही सांजा सखे मिळाल्या : दादरा
४)रुतु हिरवा : द्रूत एकताल

Happy

मधुरिता : धन्यवाद Happy (खात्री झाली Happy )

युगंधर : केहरवा ताल मात्र जसाच्या तसा वापरला जात नसावा, वेगवेगळी वेरिएशन्स वापरून आठ मात्रा पूर्ण केल्या असतात असं मला वाटलं. बरोबर ना?

thanx युगंधर
खुपच उपयोगी माहिती मिळाली. काही नवीन गाण्यांचा ताल किंवा तुम्हाला माहिती असलेल्या गाण्यांचा ताल दिलात तर मला नक्की आवडेल. किंवा वेगवेगळ्या तालातली गाणी मिळतील का?

युगंधर,
माझ्या मते 'ना जिया लागे ना, तेरे बिना मेरा कही जिया लागे ना' हे गाणं दादर्‍यात आहे केहरव्यात नाही.

धन्यवाद चैतन्य!!'ना जिया लागे ना, तेरे बिना मेरा कही जिया लागे ना' हे गाणं दादर्‍यातच आहे. मी ती सगळी गाणी गुणगुणून पहात ताल लिहीले. जरा गडबड झाली खरी. Uhoh

लता मंगेशकरांनी गायलेल्या माउलींच्या अभंगांचे ताल आणि काही अभंगांचे राग.
इतर अभंगांच्या रागांबद्दल माहिती असल्यास कळवा.

१) मोगरा फुलला- केहेरवा, राग- गोरख कल्याण
२) अरे अरे ज्ञाना झालासी पावन- भजनी धुमाळी
३) ओम नमोजी आद्या- मूळ ताल दादरा, पखवाज वापरला असल्याने बोल वेगळे वाटतात.
(जाणकारांनी अधिक माहिती द्यावी)
४) विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले- भजनी धुमाळी,
५) आजी सोनियाचा दिनू- भजनी धुमाळी, राग (बहुतेक) भैरवी
६) अवचिता परिमळू- केहेरवा- राग जयजयवंती
७) घनु वाजे घुणाघुणा- केहेरवा, राग बागेश्री
८) पैल तो गे काऊ कोकताहेबागेश्री,, राग बैरागी भैरव

चैतन्य तुम्ही दिलेली माहिती खरच खुप छान आहे.
तुम्ही दिलेल्या माहितीत मी थोडी भर घातली आहे.

मी काही गाण्यांची रागांची माहिती माझ्या माहिती प्रमाणे खाली ADD केली आहे. फक्त तालांची माहिती जाणकारांनी द्यावी.

१) मोगरा फुलला- केहेरवा, राग- गोरख कल्याण
२) अरे अरे ज्ञाना झालासी पावन- भजनी धुमाळी, राग:-मियां की तोडी
३) ओम नमोजी आद्या- मूळ ताल दादरा, पखवाज वापरला असल्याने बोल वेगळे वाटतात.
(जाणकारांनी अधिक माहिती द्यावी)
४) विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले- भजनी धुमाळी,
५) आजी सोनियाचा दिनू- भजनी धुमाळी, राग भैरवी
६) अवचिता परिमळू- केहेरवा- राग जयजयवंती
७) घनु वाजे घुणाघुणा- केहेरवा, राग बागेश्री
८) पैल तो गे काऊ कोकताहे बागेश्री,, राग बैरागी भैरव-हा राग बरोबर आहे.
९) विठ्ठल आवडी प्रेमभाव- राग –मालकंस
१०) अबीर गुलाल- राग-भूप ताल-भजनी
११) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल राग-अहीर भैरव ताल-बहुदा भजनी
१२)बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल आणि धागा धागा अखंड विणूया राग-भटियार
१३) इम्द्रायांनी काठी आणि अमृताहुनी गोड- राग-भीमपलास
याशिवाय अजून रागामधली गाणी www.swarganga.org इथे मिळतील.

भजनी - (८ मात्रा) - धिन धा धिन्धिन धा धिन धा तिन्तिन ता
धुमाळी - (८ मात्रा) - धिन धिन धा तिन त्रके धिन धा त्रके

मात्रा सारख्याच असल्या तरी वजन अगदी वेगळं. मध्यलयीत अभंगांना क्वचित धुमाळी लावलेला ऐकलाय.

१) मोगरा फुलला- केहेरवा, राग- गोरख कल्याण
२) अरे अरे ज्ञाना झालासी पावन- राग:-मियां की तोडी - भजनी
३) ओम नमोजी आद्या- पखवाज वापरला असल्याने बोल वेगळे वाटतात.
(जाणकारांनी अधिक माहिती द्यावी) - चौतालाचा ठेका (१२ मात्रा) त्यामुळे दादरा वाटणं साहजिक आहे
४) विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले- - भजनी
५) आजी सोनियाचा दिनू-राग भैरवी - भजनी
६) अवचिता परिमळू- राग जयजयवंती - भजनी
७) घनु वाजे घुणाघुणा- राग बागेश्री - भजनी
८) पैल तो गे काऊ कोकताहे बागेश्री,, राग बैरागी भैरव-हा राग बरोबर आहे. - केहरवा
९) विठ्ठल आवडी प्रेमभाव- राग –मालकंस - भजनी
१०) अबीर गुलाल- राग-भूप ताल-भजनी
११) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल राग-अहीर भैरव ताल- नक्की भजनी
१२)बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल आणि धागा धागा अखंड विणूया राग-भटियार - भजनी
१३) इम्द्रायांनी काठी आणि अमृताहुनी गोड- राग-भीमपलास - भजनी

चटकन धुमाळीचं गाणं आठवत नाहीये.
पण कीर्तनात धीम्या लयीत गजर चालतो तो धुमाळीत. लय वाढली की धुमाळीच्या वजनाला बाधा येते. म्हणून भजनी लावायचा. मी जाणकार वगैरे नाही. अनेक वर्षं तबला वाजवल्यानं इतकं माहीत आहे.

दाद तुम्ही खुपच छान माहीती दिली आहे. विशेषता ओम नमोजी आद्या हे चौताला मध्ये आहे हे नवीन कळले. तरीच तो कानाला वेगळा वाटतो.

मला केहरवा वेगवेगळ्या पद्धतीने कसा वाजवितात आणि त्याचे बोल बदलतात का? याची माहिती हवी आहे.

ताल आणि ठेका हे एक सुंदर विवेचन आहे.
ताल म्हणजे मात्रांची संख्या अन वजन ह्याची व्याख्या. ठेका म्हणजे ती व्याख्या एक गायडन्स मानून केलेले माफक बदल.
केहरवा (८ मात्रा)- धा गे न ती न क धि न
हा मध्य-द्रुत लयीतच छान वाटतो. लय कमी असेल तर ... कधीच केलेलं नसताना कमरेवर कळशी (भरलेली) घेऊन चालायचा प्रयत्नं केला की कसं दिसेल (किंवा वाटेल).. तितकं विचित्रं Happy

ठेके खूप आहेत -
धा धिन धागे त्रके धा तिन तागे त्रके - किंचित धिम्या लयीला सुरेख. गझल, स्लो भावगीत वगैरेत जरूर वाजतो. घननीळा लडिवाळा (आहाहा)
धिन धिन धिन ता _ धिन धिन ता - मध्य लयीत अनेक हिन्दी गाण्यांना ढोलकवर ऐकला असेल. तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी... (मुकेशचं गाणं आठवतय... म्हणजे मला भूक लागलीये)
धिन ता तित ता तित ता धिन ता - स्लो... सुहानी रात ढल चुकी फेम Happy

वगैरे वगैरे...

समोर बसून, तबला घेऊन गप्पा हाणीत (मधे मधे येणारा चहा, चिवडा सहीत Happy ) सजवायची मैफिल पाहिजे...

दाद, कधी येणार आम्हाला तुमच्या मैफलीचा योग?
तुम्ही भारतात येणार असाल तेव्हा कळवा. एक छान मैफिल आयोजित करूया घरगुती सगळ्या माबोकरांना घेऊन.

मला 'दरशन दो घनश्याम नाथ' ह्या गाण्याचे सरगम (नोटेशन) हवे होते. कोणी सांगेल का कुठे मिळेल ते.

दाद, धन्यवाद. तुम्ही खुप छान प्रकारे ताल आणि ठेक्यांची माहिती दिली आहे. तबल्याविषयी थोडेफार कळले. आणि गाणे ऐकताना अजुन बारकाईने ऐकायला पाहिजे हेही जाणवले.

सुमंगल, तुम्हाला गाण्याचे नोटेशन कशाप्रकारे हवे आहे ते स्पष्ट झाले नाही. म्हणजे मराठी की इंग्लिश? कारण पियानो आणि हार्मोनिउम चे नोटेशन विवीध प्रकारे दिले जाते. तुम्हाला गुगलवरती टाईप केले की अनेक sites मिळतील. त्यात तयार नोटेशनही मिळेल.

सुमंगल, 'दरशन दो घनश्याम नाथ' या गाण्याच्या नोटेशन च्या खाली दोन लिंक्स दिल्या आहेत. बहुदा त्याचा उपयोग होइल.

www.desibits.com › ... › Piano Corner › Hindi Piano Notes
www.veengle.com/s/Darshan%2Bdo%2BGhanshyam/2.html

दाद, मी पण तेव्हा भारतात असेन. आजवर तुमचं शब्दब्रह्म डोळ्यांत साठवलंय, आता नादब्रह्म सुद्धा कानांसाठी मिळालं तर बहारच येईल!

मध्यमातील गाणे म्हणजे नेमके काय? पुस्तकी पढविलेले समजते पण अशी गाणी उदाहरणासाठी मिळाली तर जास्त चांगल्या रितीने कळेल.

Pages