रागावर आधारित गाणी

Submitted by girishmusic on 9 June, 2008 - 21:31

खालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत?
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...
४. सीने मे सुलगते है अर्मा...
५. ना, जिया लागे ना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंदिशीचे शब्द श्रोत्याना कळत्यास त्याह्गायकाला दर्जेदार गायक मानले जात नाही आणि बिदागी दिली जात नाही>>
हे जुन्या काळात खरंच होतं. सहसा गायक आपापल्या घराण्यांच्या बंदिशींशिवाय दुसर्‍या घराण्याची बंदिश गात नसत.
आणि त्यामुळे आपल्या घराण्याची बंदिश दुसर्‍यास कळू नये म्हणून शब्दांची ओढाताण करीत. आणि 'गायकी स्वरप्रधान' हे सबळ कारणही त्यांना मिळाल्याने श्रोत्यांनीही विशेष जोर दिला नसावा बंदिशीचे शब्द ऐकण्याबाबत.
पंडित भातखंडे, विष्णु दिगंबर पलुस्कर अशासारख्यांनी भारतभर फिरून अनेक घराण्यांच्या बंदिशी जमवल्या आणि खुल्या मनाने शिष्यांना दिल्या.
आज अर्थातच इतका संकुचित दृष्टिकोण राहिला नसल्याने गायनातही बराच बदल घडला आहे.
अनेक गायक बंदिशींचे शब्दही (अर्थासह) पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

राग - हमिर , ताल - तिनताल
स्थायी,
सुर जन तो मिला दे मै को
प्यारे तोरे परु हु पैया
पिया है आगे जतन दे हो बताये

अंतरा,
बिन देखे रहियो न जाये
मेहरबान तु चित चढे
सुरत श्याम सदारंग
मन हर ले हो बलैया

ले हो बलैया म्हणजे म्हातार्‍या कानशिला वर बोट मोडुन दृश्ट काढतात त्याला म्हणतात. (असे वाटते. :))

अजुन एक प्रश्न! गगना गंध आला हे श्रीधर फडक्यांनी सुंदर संगीत दिलेले गाणे आरती अंकलीकरंनी गायिले आहे. त्याचा राग अडाणा आहे की जौनपुरी?
गाणे इथे ऐका_

http://www.aathavanitli-gani.com/Swaravishkar

गगना गंध आला..हे गाणं तर प्रभाकर कारेकरांनी गायलंय....
मला रागातलं फारसं काही कळत नाही...पण तरीही जौनपुरी आणि अडाण्याचा...असा दोन्हीचाही भास होतोय खरा.

प्रमोदजी, हो ते गाणे कारेकरांनी पण गायिले आहे. गाण्याच्य सुरुवातील अगदी पक्का जौनपुरी वाटतोय पण नंतर कंन्फ्युजन झालं राव! Sad

होय, मल्हारातलंच वाटतंय.
मल्हारातली म प नि(कोमल) ध नी (तीव्र) सा... ही संगती जाणवतेय.

चैतन्यजी म आणि प हे स्वर कधी कोमल होत नाहीत.. आणि ध आणि नी कधी तीव्र होत नाहीत...

स्वर कोमल होणे अथवा लावणे म्हणजे तो स्वर आपल्या मुळ स्थानापासुन किंचित खाली गाणे, स्वर तीव्र होणे अथवा लवणे म्हनजे तो स्वर आपल्या मूळ स्थानापासुन किंचित वर गाणे...

सा, रे, ग, म, प, ध, नी या स्वरांमध्ये 'रे, ग, ध, आणि नी' हे चारच स्वर कोमल होतात 'सा आणि प' हे अचल स्वर आहेत आणि 'म' फक्त तीव्र होतो..

मुग्धटली,
बरोबर!
मला वरच्या स्वरावलीत, दोन्ही निषाद दाखवायचे होते, जे की मल्हार रागात येतात. शुद्ध निषादाला काही जण 'तीव्र' निषादही म्हणतात.

म(शुद्ध), प, नी(कोमल), ध (शुद्ध) नी (शुद्ध/ तीव्र) सा=> ही मल्हार रागाची सिग्नेचर म्हणता येईल अशी आहे.
आनंदाचे धाम त्याचे- ह्या ओळीतल्या 'आनंदाचे धाम ' या शब्दांवर 'मपनीधनीसा' हे स्वर येतायत.

कुलू,
अजून नीट ऐकलं तर हा गौड मल्हार वाटतोय.
मान न करो री गोरी (गौड मल्हार)- या चिजेची खूप आठवण येतेय 'विश्वाचा विश्राम रे' ऐकताना.

चैतन्यजी परत घोळ केलात

प, नी(कोमल) >>>> यात फक्त नी कोमल होईल, प अचल आहे

नी (शुद्ध/ तीव्र) >>>>> यात नी शुद्ध अथवा कोमल होईल तीव्र नाही

मुग्धटली,
अहो म्हणून तर प नंतर स्वल्पविराम दिलाय, तो वेगळा स्वर दाखवण्यासाठी Happy
शुद्ध निषादालाच काही जण तीव्र निषादही म्हणतात म्हणून शुद्ध/ तीव्र असे लिहिले आहे Happy

शुद्ध निषादालाच काही जण तीव्र निषादही म्हणतात >>> अशक्य.

अहो म्हणून तर प नंतर स्वल्पविराम दिलाय, तो वेगळा स्वर दाखवण्यासाठी >>>> नी च्या पुढे कोमल लिहुन मग प लिहीलात तर तुम्हाला काय म्हणायच आहे ते लक्षात येईल नाहीतर घोळ कायम राहील आणि मग माझ्यासारखे शिक्षक बाह्या सरसावुन पुढे येतील Wink Lol

असो Happy

चैतन्य , हो गौड मल्हारच आहे. मी शौनकजीना विचारलं! मान न कर री गोरी...बरोब्बर अगदी!
बुवांचच पुलं नी संगीत दिलेलं शब्दावचुन कळले सारे काफी वाटतय. मला तो काफीतला टप्पा आठ्वला!

काचंनगंगा या लता मंगेशकर निर्मित चित्रपटात... दोन दिसांची ओळख सजणा.. कसा धरू मी भरवसा..
असे लताचेच फार सुंदर गाणे आहे, अगदी २ मिनिटाचेच आहे पण तिने ते फारच सुंदर गायलेय. ( संगीत : वसंत देसाई )
त्यातले सूर दिवसभर मनात घोळत होते... आणि आता अचानक जाणवले कि ते सूर.. एकच प्याला मधल्या
प्रभु मजवरी कोपला.. या नाट्यपदाचे आहेत.. कुणी कनफर्म करेल का ?

धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा या रामायणातील गाण्याचा राग शाम कल्याण आहे का? मला सारंग सारखा पण वाटतो.. नक्की कुठला राग आहे?

प्रभू मजवरी कोपला... हे पण तन मन धन वारी जाऊ.. या ठुमरीवर आधारीत आहे असे छोटा गंधर्व यांनी सादर केलेल्या एका कार्यक्रमात ऐकले होते. ते स्वतः, आशा खाडीलकर आणि मधुवंती दांडेकर हा कार्यक्रम सादर करत असत.

त्यातली आठवताहेत ती गाणी ( आणि ठुमरीचे बोल ) असे.

१) संशय का मनी आला ( किस गये बावरी बनाये )
२) लपविला लाल ( मोहे लिनो देख नजरीया ने )
३) मधुकर वनवन फिरत ( पिया कर धर देखो )
४) दूती नसे ही माला ( मोरे सैंया किवडीया खोलो )
५) सूजन कसा मन चोरी ( फूलन सेज सवारू )
६) स्वकुल तारक सूता ( तेंडेरे नाल वसैया पिया वै )
७) रुपबली तो नरशार्दूल ( कौन तरहा से तूम खेलत )
८) मधुमधुरा तव गिरा ( छब दिख लाजा रे )

श्रीयू,
धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा या रामायणातील गाण्याचा राग शाम कल्याण आहे का? मला सारंग सारखा पण वाटतो.. >>>
सारंगच वाटतो आहे.
आश्रमा- इथे रे म रे सा (मध्यम शुद्ध) ही स्वरावली वाटते आहे. जे की सारंगाचे लक्षण आहे.

शुद्ध सारंग आणि श्याम कल्याण हे फार सारखे वाटणारे राग आहेत.
दोन्ही रागांत दोन्ही मध्यम येतात, हा अजून गोंधळाचा भाग.
तरी रे म रे सा किंवा रे म रे नी रे सा (मध्यम आणि निषाद दोन्ही शुद्ध) ही संगती शुद्ध सारंगात येते.

दिनेशदा,
ते वर लिहिलंत ते 'दोन दिसांची ओळख सजणा' हे कुठे ऐकता येईल?
'आठवणीतली गाणी' वर नाहीये.
यूट्यूबवरही नाहीये. तुमच्याजवळ असेल तर पाठवाल का?

Pages