रागावर आधारित गाणी

Submitted by girishmusic on 9 June, 2008 - 21:31

खालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत?
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...
४. सीने मे सुलगते है अर्मा...
५. ना, जिया लागे ना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राग झिझोटी (ध स रे म ग, स रे नि(कोमल) ध प स) मधील काही गाणी:
१. बदली बदली दुनिया है मेरी...
२. कोई हम दम न रहा...
३. घुन्गरू की तरह बजता ही रहा हू मै...
४. एक चतुर नार...

काही नवीन गाणी आणि राग...

१. ख्वाजा मेरे ख्वाजा... राग व्रुन्दावनी सारन्ग .. ( काही इतर स्वर आहेत. पण ' बेकसो की तकदीर तूने है सवारी' ही ओळ मात्र वृन्दावनीचे स्वर दाखवते.)

२. तुमको पाया है तो जैसे खोया हु... पिलू

३. इन लम्हो के दामन मे पाकिजा से रिश्ते है....... मांड ( विशेषत्: दुसरा अन्तरा.. समय ने ये क्या किया बदल दी है काया...)

४. आँखो मे तेरी अजब सी अजबी अदाए है............. पहाडी.

कोणता राग कोणत्या वेळी म्हणावा असेही काही नियम आहेत ना?

..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

हो मेघना..
कुठ्ल्याही रागामधे जे स्वर येतात त्या स्वररचनेमुळे तो, तो राग काही विशिष्ट वेळी गायला गेला तर प्रभावी ठरतो, परिणामकारक होतो... उदा: राग भीमपलास, दुपारी गावा...

किशोरी ( किंवा इतर जाणकार ),
ह्या वर अधिक माहिती द्याल का?
ज्या वाद्यांत राग वाजवत नाहीत ( जसे की तबला ) त्यात ही असे काही असते का?

..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

पिया बावरी - हे "खुब सूरत" मधील गाणे कोणत्या रागावर आधारीत आहे?

धन्यवाद

मेघना१
शंका नीट कळली नाही.
तबला हे फक्त तालवाद्य आहे. एकतर ते साथीसाठी वापरतात नाहीतर एकल वादनासाठी(सोलो).
राग कोणताही असला तरी ज्या तालात ती बंदिश बांधलेली आहे तो ताल तबल्यावर वाजवला जातो. तालवाद्ये - तबला डग्गा, मृदुंग, पखवाज वगैरे.

मेघना१
शंका नीट कळली नाही.
तबला हे फक्त तालवाद्य आहे. एकतर ते साथीसाठी वापरतात नाहीतर एकल वादनासाठी(सोलो).
राग कोणताही असला तरी ज्या तालात ती बंदिश बांधलेली आहे तो ताल तबल्यावर वाजवला जातो. तालवाद्ये - तबला डग्गा, मृदुंग, पखवाज वगैरे.

म्हणजे, राग गायच्या काही खास वेळा असतात, त्याच प्रमाणे तालवाद्ये वाजवायच्या ही काही खास वेळा असतात का? (असे विचारायचे होते)
कोणते राग कधी गातात प्लिज कोणी सांगेल का?
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मेघना,
सर्वसाधारणपणे 'पूर्वी' राग दुपारी १२ ते मध्यरात्री १२ पर्यंत गातात. 'उत्तर' राग मध्यरात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत. या रागांतील वादी स्वर तो राग कधी गायचा, हे आपल्याला सांगतो.
अगदी सकाळी, सूर्योदयापूर्वी, किंवा सूर्यास्ताच्या वेळी - 'रे', 'ध' हे वादी स्वर. उदा: मारवा, पूर्वी.
मध्यान्ही, मध्यरात्री -'ग', 'नी' (कोमल)
उदा: सारंग, मालकंस, अडाणा
दिवसा व रात्री पहिल्या प्रहरी -'रे', 'ग', 'ध','नी'
उदा: रामकली, यमन
दुपारी व उत्तररात्री - 'सा', 'म', 'प'
उदा: मुल्तानी, सोहिनी.

एखाद्या रागातून व्यक्त होणारा भाव व आपली मनस्थिती यांची सांगड घालणं, एवढाच यामागील उद्देश.
कर्नाटक संगीतात वेळेचं हे बंधन नाही. मात्र कर्नाटक संगीतातून हिंदुस्थानी संगीतात आलेले राग, उदा: हंसध्वनी, विशिष्ट वेळीच गायले जातात. ते का?

गौड मल्हार रागावर आधारीत मराठी भजन आहे का एखादे?

साधना

धन्यवाद, हा दुवा माहित आहे मला. शोधले तेथेही आणि इतरत्र. पण गौड मल्हार वर भजन सापडले नाही एकही.....
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

मुलांना शांत झोप लागावी तसेच अभ्यासात मन एकाग्र व्हावे म्हणून काही रागांचा उपयोग होउ शकतो का?
तसच एखाद्या घरगुती समारंभाला संध्याकाळ च्या वेळी background music म्हणून एखाद्या रागाची केसेट (लिहीता येत नाहीये ) लावता येईल का? पारंपारीक, लग्नाच्या वेळी लावली जाणारी सनई ची केसेट ( मला तरी ) खूप बोअर वाटते/
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मेघना, बासरी किंवा संतुर किंवा व्हायोलिनची एखादी कॅसेट लावायला काहीच हरकत नाही.. घरच्या कार्यक्रमासाठी.. व्हायोलिनच्या पं.प्रभाकर जोगांच्या कॅसेटचा संच आहे फार सुरेख आहे तो..
कॅसेट = kEseT
आशु, तुझ्या भजनाच्या संदर्भात जरा चौकशी करुन सांगतो.
==================
डिंग डाँग डिंग

जरा लवकर सांगितले तर बरे होईल.. गुरुपोर्णिमेला गौड मल्हार वर छोटे ख्याल गाणार आहे आमचा ग्रूप, शेवटी एखादे मराठी भजन असल्यास छान होईल.. पण आमच्या गुरु नॉर्थ इंडीयन आहेत, त्यामुळे भजन शोधण्याची जबाब्दारी विद्यार्थ्याची आहे.

साधना
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

पं. प्रभाकर जोगांचे ' गाणारे व्हायोलीन' खरच खूप मस्त आहे. good idea. धन्यवाद.
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मला माहीत असलेले राग आणि गायनाच्या वेळा,

यात दिवसाचे १२ भाग केलेले आहेत.

  Early Morning (6 am to 8 am)
 • Bhairav
 • Ramkali
 • Jogia
 • Vibhas
  Morning( 8 to 10 am )
 • Ahir Bhairav
 • Bilaskhani Todi
 • Komal Rishabh Asavari
 • Todi
 • Hindol
  Late Morning( 10 to 12 noon )
 • Bhairavi
 • Deskar
 • Jaunpuri
 • Alhaiya Bilawal
  Afternoon( 12 noon to 2 pm )
 • Brindavani Sarang
 • Shuddha Sarang
 • Gaud Sarang
  Late Afternoon( 2 pm to 4 pm )
 • Bhimpalas
 • Multani
  Dusk( 4 pm to 6 pm )
 • Purvi
 • Shree
 • Patadeep
 • Barwa
 • Dhaani
  Evening( 6 pm to 8 pm )
 • Yaman
 • Puria
 • Shuddha Kalyan
 • Megh
 • Malhar
 • Hameer
 • Shyam Kalyan
 • Yaman Kalyan
 • Piloo
  Late Evening(8 pm to 10 pm )
 • Jayjayvanti
 • Kedar
 • Durga
 • Desh
 • Bhupali
 • Kamod
 • Chhayanat
 • Nand
 • Kedar
 • Chandni Kedar
 • Khamaj
 • Rageshri
 • Gaud Malhar
 • Tilak Kamod
 • Jayjaiwanti
 • Jog
 • Jhinjhoti
 • Tilang
 • Gorakh Kalyan
 • Sorat
 • Mian Malhar
 • Surdasi Malhar
 • Kafi
 • Ramdasi Malhar
 • Bahar
 • Gara
  Night( 10 pm to 12 midnight )
 • Bihag
 • Bageshri
 • Shankara
 • Chandrakauns
 • Abhogi
 • Nayaki Kanhada
  Mid Night( 12 midnight to 2 am )
 • Malkauns
 • Darbari Kanada
 • Shahana
 • Adana
  Pre Dawn( 2 am to 4 am )
 • Sohoni
 • Paraj
  Dawn( 4 am to 6 am)
 • Lalit
 • Bhatiyar

कुठलाही ताल वाजवायची काही ठरलेली वेळ नाही मात्र तालवाद्य वाजवताना वेळ बघून वाजवलेलं बरं म्हणजे उगीच कोणाची झोपमोड नको :).

कुठलाही ताल वाजवायची काही ठरलेली वेळ नाही मात्र तालवाद्य वाजवताना वेळ बघून वाजवलेलं बरं म्हणजे उगीच कोणाची झोपमोड नको Happy

मी ऑफिस्मधून घरी गेल्यावर रात्री ११.३० ते १२.०० पेटी वाजवतो....

पेटी हे तालवाद्य नाही... त्यामुळे तुमच्या सुचनेचा विचार मी करण्याचे काही कारण नाही.... Happy Happy

..............................................................................................

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
अहं त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||

Sometime back I read Hitaguj about the awkward wordings of old Marathi Natyasangeet.I tried to save,but could not.Can I get it again?

मित्रहो,

काही दिवसान्पूर्वी एक ब्लोग सुरु केला होता. शास्त्रीय सन्गीतावर काही लिहायचा प्रयत्न केला आहे. वाचून प्रतिक्रिया जरूर द्याव्या, लिन्क पुढीलप्रमाणे - http://music-fundaaz.blogspot.com

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत...

राजा

रागांवर आधारित गाणी -
हटा सावन की घटा - शिवरंजनी
तू चीज बडी है मस्त मस्त - भीमपलास Wink

मी खुप दिवसापुवई ईथे आलाओ हाऑ
jaude, jamechna lihayala.....
tar mi khup divsapurvi ithen alo hoto, madhyantari sampark tutla, pan aaj alo ani masta vatale. tablyala vel asato ka ha prashna ani mi ratri 12 la tabla vajvato vaigaire farach chan ahe.(aso aso.)
Regards to all
Paankaj

मला माहीत असलेली काही info टाकतेय इथे:

मेरे हमसफर मेरे हमसफर, मेरे पास आ, मेरे पास आ - "रेफ्युजी" सिनेमा - राग यमन - ताल रुपक

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली - "निवडुंग" सिनेमा - राग दुर्गा

नैनों मे बदरा छाये बिजली सी चमके हाये - "मेरा साया" सिनेमा - राग भीमपलास

वरिल यादित नसलेले गाणे :

जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्या (बहुधा तोहफा) सिनेमातील
"मिलन मिलन मौजो से मौजो का, संगम बादल से बादल का, सदियों का प्यार पलभर में कर लो, पता नही कल का..."

हे गाणं कोणत्या रागात आहे?

गूगल वर "हिंदी साँग्स बेस्ड ऑन रागा" सर्च केलं आणि हे मिळालं. यात रागाची माहिती आहे.

पण ही नुसती माहिती आहे. या गाण्यांचे MP3/ Audio / video आता युट्यूब, धिंगाणा, एस्निप्स वगैरेंवर शोधले पाहिजेत.

http://www.swarganga.org/hindisongs.php

Pages