रागावर आधारित गाणी

Submitted by girishmusic on 9 June, 2008 - 21:31

खालील गाणी कुठल्या रागान्वर आधारित आहेत?
१. पवन दिवानी न माने, उडावे मोरा घुन्गटा, आली..
२. छोटासा बालमा, अखियन नीन्द उडाय ले गयो, रतियन नीन्द न आए..
३. न तुम बेवफ़ा हो, न हम बेवफ़ा है, मगर क्या करे, अपनी राहे जुदा है...
४. सीने मे सुलगते है अर्मा...
५. ना, जिया लागे ना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादच्या मैफीलीचे रेकॉर्डींग करून ( चहा, चिवडा वगळून ) यू ट्यूबवर अपलोड करण्याची व्यवस्था आतापासूनच करावी बरं.

मध्य्मातील गाणी म्हणजे मध्यमाला शद्ज मानुन त्या पट्टीत गाणे... शांत, संथ भक्तीगीते उदा. पराडकरांची दत्तगीते त्या पट्टीत चांगली वाटतात ... ( कन्फर्म करावे.) ती गाणी गाऊन वाजवून पाहिल्यास समजेल.

उद्दाम, thanx पण मला famous गाणी सांगीतलीत तर जास्त चांगल्या प्रकारे कळेल.

आणि दाद यांच्या मैफिलीला यायला माबो करांना नक्कीच आवडेल. (मैफिलीला दाद द्यायला अर्थात सर्वांना बोलाविले असेल तर)

मध्यमातील गाणं. कधी कधी गाण्याची चाल अशी असते की ती बर्‍यापैकी खर्जाच्या सुरांत जाते तसच फारशी तार सप्तकात जात नाही. थोडक्यात चाल एकाच सप्तकात अन त्यातही खर्जाच्या सुरांत जास्तं आहे. अशावेळी गाणार्‍याच्या पट्टीचा मध्यम हा "सा" किंवा षड्जं धरून गायलं जातं.
त्यानं होतं काय की, गाणं अधिक खड्या आवाजात गाता येतं.
उदा. नाट्यगीत - अजुनी खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना.
अख्तरी बाईंच्या अनेक गझला मध्यमात आहेत. - दर्द मिन्नत्-कशे-दवा ना हुआ, फिर मुझे दीद्-ए-तर याद आया.
मध्यमातल्या ह्या अनेल गझलांना तार सप्तकात आवाजाला ती परतिम पत्ती पडलेली ऐकावी...

अभिजीत, <<धुमाळीमधले भजन http://www.youtube.com/watch?v=SIGd9aMSZg>>
हो हो तर... कसं विसरले हे मी?
अप्रतिम. क्लिप ऐकली नाहीये... पण मी पंडितजींच्या राधाधर मधु मिलिंदला दोन्ही... आधी धुमाळी अन भजनी लावलेला ऐकलाय.
किती बरं केलत... ह्या क्लिप्स देऊन. (आयत्यावेळी मेलं आठवलं काय ते... तर ते माझं डोकं कसं म्हणता येईल?)

वा वा... मस्तं जाणार उरलेला दिवस. काहीही करायला नकोच... डोक्यात चालूच.. काही केलं तरी किंवा नाही केलं तरी.

भारतात आले की, जमवूयाच मैफिल.

दाद thanx
काय सुन्दर शब्दात मध्यमातील गाण्यांचा अर्थ सोप्पा करून सांगीतलात. वा!!
आपली मैफल पुण्यात होणार असेल तर माझी entry आत्ताच कायम करते.

दाद यांच्यासाठी एक प्रश्नः माइरी मैं कासे कहूं पीर अपने जियाकी [दस्तक] याचा ताल कोणता?
बहुदा केहेरवा असावा पण elongated असल्यामुळे असेल कदाचित, नेमका लक्षात येत नाही. चलन कसे आहे?
-प्रभाकर [बापू] करंदीकर

नमस्ते!

हेचि दान देगा देवा हे रागावर आधारित आहे काय. कुठला राग आहे तो? शुद्ध भैरवी आहे कि मिश्र आहे कि दुसरा कुठला राग आहे?

धन्यवाद

लक्ष्मी गोडबोले,
ते गाणे मोस्ट्ली गोरख कल्याणात वाटतेय.
पुन्हा नीट ऐकले तर कदाचित बागेश्रीचा भासही होईलसे वाटतेय खरे.
पण रिषभ फोकस होतोय असे वाटत आहे त्यामुळेच गोरख कल्याण असावा मोस्ट्ली.

देवकाका,
कदाचित प्रारंभिक अभ्यास म्हणून ती राग-ताल कॉम्बिनेशनची लिंक ठीक आहे, पण कोणताही राग कोणत्याही तालात वाजवता/गाता येऊ शकतो.

खरंय तुझं चैतन्य! संगीतसागरात सहजपणे पोहता येणार्‍या तुझ्यासारख्यासाठी ती माहिती अगदीच प्राथमिक स्वरूपाची वाटेल.. मी स्वत: मात्र अजून किनार्‍यावर चाचपडतोच आहे...त्यामुळे माझ्यासारख्यासाठी अशी माहितीही
खूप मोलाची असते. Happy

देव काका,नो ऑफेन्स मेन्ट...
मी फक्त अशासाठी लिहिलं... की अमुक राग हा अमुक तालातच गावा/ वाजवावा असा समज होऊ नये कुणाचाही.

अवांतर- सध्या कुमार गंधर्वांचं 'मुक्काम वाशी' नावाचं पुस्तक वाचतोय. त्यांचे संगीतविषयक आणि रागसंगीतविषयक विचार इतके तेजस्वी आहेत... की भल्या भल्यांना घाम येईल.
त्यामुळे मी "संगीतसागरात सहजपणे पोहता येणारा" नक्कीच नाहिये. अजून चाचपडतोच आहे मीही Happy

१.आयो कहा से घनश्याम (बुड्ढा मिल गया)
२.बीती ना बीतायी रैना..(परिचय)
३. बोले मीठे बैन..(परिचय)
ही गाणी कुठल्या रागावर आधारीत आहेत?

आयो कहा से घनश्याम- खमाज राग
बीती ना बितायी रैना - बिलावल रागाचा कोणता तरी प्रकार आहे हा.
बोले मीठे बैन- ह्यात सुरुवातीला थोडा केदार राग आणि भिन्न षड्जही जाणवतोय. पण केदारच जास्त जाणवला मला.
पुढच्या कडव्यात वेगळा राग असावा. सबंध गाणे एकाच रागात नसावे.

यू ट्यूबवर कुणि एकाच रागातील दहा बारा तरी गाणी प्लेलिस्ट करून टाकतील का?
म्हणजे बिलावल मधली १०-१२, भरव मधली १०-१२, तोडी मधली, मग भीमपलास, मुलतानी मग केदार, यमन, हंसध्वनी, शंकरा ते मालंकस, भैरवी पर्यंत. मज्जा येईल ऐकायला. पैसे देऊन डाऊन लोडपण करून घेईन, माझ्या आय ट्यूनमधे.

दाद, ऑगस्ट्मधे कधी? मैफिल १०/११ ऑगस्ट ला ठेवायची का?.
अनिलभाई, मी नक्की येईन. हुषार नि गुणी लोकांना भेटायला मी नेहेमीच उत्सुक असतो हे बारा च्या ए वे ए ठि ला अनेकदा येऊन मी सिद्ध केलेच आहे.

मी गायलेली चालतील का?
गाण्यापूर्वी कुठल्या रागातले गाणे आहे हे सांगण्याची हिंमत असेल तर मी जरूर ऐकीन.

झक्की काका... ते गेल्या वर्षीचं असणार. आणि नाही जमलं भेटायला कुणालाच.
ह्या वर्षी जमवूया. भारतात येतेय नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान.
(आणि हुषार आणि गुणी माणसं जमवायला लागतिल आपल्याला... Happy )

दाद,
नक्की कळवा तुमचं यायचं पक्कं झालं की.
गेल्या खेपेस जमलं नाही पण ह्या वेळी नक्की भेटूया...

http://www.youtube.com/watch?v=arRjJP1O2Yg

हे सावली मधील गाणे म्हणजे बहुतेक हमीर मधली बंदिश आहे. शब्द सगळे कुणाला कळलेत का?
सुरजन सो मिला अशी काहीशी सुरुवात आणि अंतरा "बिन देखे रहियो ना जाये" एव्हढच कळल मला!

खालच्या कॉमेन्तवरून सुरुवातीस भूप आणि नन्तर हमीर आहे असं कळतं...
आणि बंदिशीचे शब्द श्रोत्याना कळत्यास त्याह्गायकाला दर्जेदार गायक मानले जात नाही आणि बिदागी दिली जात नाही ::फिदी:

Pages