दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवाच सिंगापुरात मिफ्टा अ‍ॅवार्ड सोहळयाला आशाताई उपस्थित होत्या त्यावेळी त्या किती आनंदी होत्या, वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. खुप दिलखुलासपणे त्यांनी गप्पा मारल्या. आज त्यांच्या कन्येच्या आत्महत्येची बातमी वाचली, खुपच वाईट वाटले Sad ईश्वर त्यांना हे दु:ख सोसायची शक्ती प्रदान करो, हिच प्रार्थना......

अथक यांच्या वडीलांना श्रद्धांजली Sad
वर्षा भोसले यांना श्रद्धांजली. Sad

अथक यांच्या तीर्थरूपांना श्रद्धांजली.
आशा भोसलेंच्या सहनशिलतेची परमेश्वर जणू परिक्षाच बघतोय ! त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो !

१. अथक यांच्या वडिलांना श्रद्धांजली !
२. आशा भोसले यांना दु:खातुन सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना !

अथक यांच्या वडिलाना श्रद्धांजली. Sad

आशा भोसलेंच्या मुलीला श्रद्धांजली. Sad

वर्षा भोसले यांचा परिचय केवळ आशा भोसलेंची कन्या इतकाच नव्हता. त्या रेडिफवर उत्तम लिहीतही असत.
( http://m.rediff.com/news/varsha.htm )
पण असं स्वतःचा जीव देणं म्हणजे..
वाईट झालं.

वर्षा भोसले ची न्यूज फारच शॉकिंग होती..
आशा भोसले जीं ना पुन्हा एका मोठ्ठ्या धक्क्याला सामोरं जायचं बळ मिळो.!!!

अशोक तुझ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तुझ्या वडिलांना विनम्र श्रद्धांजली !!

Sad

आशा भोसले.. इतक्या रसरशीत जिगिषेच्या वाट्याला अगणित दु;खं..
हे सोसायचं बळ त्यांना ईश्वर देवो..

मी आता वर्षा भोसले आणि आशा भोसले यांचे जैत रे जैत चित्रपटातील "कोण्या राजान्...राजान" गाणं ऐकत होतो. काय कमी होती वर्षा भोसले यांच्या आवाजात? अजुन संधी मिळाली असती तर सोनं केलं असत वर्षा भोसलेने. Sad Sad

श्रद्धांजली Sad

मंगेशकर घराण्यातील पुढच्या पिढीत गाणं अगदी निष्प्रभ झालंय पण वर्षा भोसले त्याला अपवाद होत्या. त्यांची अगदी एक-दोनच गाणी ऐकली आहेत. त्यांनी अजून गाणी का गायली नाहीत / मिळाली नाहीत हा प्रश्न कायमच पडत आलाय. हे अजून एक गाणं ऐका.

वर्षा भोसले या नैराश्याने आजारी होत्या अशी काही दिवसांपुर्वी बातमी वाचल्याचं पण आठवतंय. आशाताई - खरंच, किती सहन करायचं त्यांनी?? Sad देव सुध्दा परीक्षा बघतो.
श्रद्धांजली.

ओह! Sad

Sad

शिफॉन मधल्या टिपिकल भारतीय सुंदर्‍या, सुंदर स्वेटर्स घातलेले रोमॅन्टिक नायक, स्वित्झर्लंड दर्शन, शिव हरीचे संगीत ..!यश चोप्रा हे बॉलिवुड मधलं एक स्वतंत्र जॉनरच! त्यांच्या चित्रपटांच्या उल्लेखाशिवाय बॉलिवुडची ओळखच अपुरी राहील.
यश चोप्रांना श्रद्धांजली !

Pages