दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही नाही, रखवालदार जरी ठेवला तरी तो किती पुरेसा पडणार आहे ? आपल्याकडे लोक कायदे, नियम तोडून फुशारकी मिरवितात. अर्थात जे गेले त्यांनी असे केले असेल असे नाही, पण निदान जिथे जिवाशी खेळ आहे, तिथे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आणि सर्वात शेवटी आहे नशिब.

डॉ. अशोक रानडे ~ सर्वार्थाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. "मला भावलेले संगीतकार" या अतिशय सर्वार्थाने देखण्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यानी लिहिले आहे "पथप्रदर्शक कलाकारांच्या कामिगिरील हिंदुस्थानी संगीताच्या विकासाच्या व्यापक संदर्भात आणून ठेवणे म्हणजे मला व्यक्तिगत कृतज्ञता व्यक्त करणेचे वाटते...." आणि मग त्यानी अशी काही कृतज्ञता व्यक्त केली आहे की ते पुस्तक अखेरपर्यंत हातातून पूर्ण होईपर्यंत खाली ठेवण्याची मनी भावनाच येत नाही.

विनम्रता तर अंगी इतकी भिनली होती त्यांच्या अंगी की, इतके ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व असून आणि वयाची ७५ आली असतानाही पत्रव्यवहार करताना मजकुरात उत्तरास काहीसा वेळ झाला म्हणून प्रथम मनःपूर्वक माफी मागूनच ते पत्रातील पुढील मजकूर लिहित.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !!

डॉ. रानड्यांची वाणी रसाळ होती, आणि कुठेही गर्व जाणवायचा नाही. ते स्वतःही गायन करत. देवगाणी कार्यक्रमात, कमळाचे स्कंधी ही रचना गात असत. त्यांनी दूरदर्शनवर सादर केलेले अनेक कार्यक्रम अजून आठवणीत आहेत.
त्यांना श्रद्धांजली.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांचं आज चेन्नईत वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मद्रास मेडिकल मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सभार--------------- महाराष्ट्र टाईम्स ........

( Sad Sad

Sad

तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हे बनाया
त्यानेच तुला आता परत नेले
आमची तरुण वर्षे रमवण्यात तुमचा खूप मोठा हात आहे शम्मीजी !!

Sad

सच मे वोह बदन पे सितारे लपेटे चला गया
और हम देखकर आसू ढाते रहे!

माझ्या फेव्हरेट हिरोला मनःपूर्वक श्रद्धान्जली!

Pages