Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
माय गॉश, १९८६ मध्ये
माय गॉश, १९८६ मध्ये पार्ल्याला उत्कर्ष मंडळात आम्ही थरवळ यान्च्या नाटकाच्या क्लास मध्ये भाग घेतला होता, त्यात रसिका जोशी माझ्याबरोबर होती ती आठवीत आणि मी नववीत पण आम्हा सर्वात तीच खुप भाव खात होती आणि चांगले काम पण करत होती. तेन्व्हा राग आलेला तिचा. पण पुढे दहा वर्षानंतर तिला प्रायोगिक रंगमंचावर पाहुन अनपेक्षित धक्का व कौतुक पण!
"नक्षत्रांचे देणे - आता खेळा नाचा" मध्ये पण खुप धमाल केलेली तिने.
खूपच वाईट बातमी. मागे एका
खूपच वाईट बातमी.
मागे एका दिवाळी अंकांत त्यांची मुलाखत वाचली होती.
खूप वाईट वाटल ऐकून. अतिशय
खूप वाईट वाटल ऐकून. अतिशय गुणी अभिनेत्री
रसिका जोशींना श्रद्धांजली
हो राखी, तीच सिडी! माझ्याही
हो राखी, तीच सिडी! माझ्याही डोळ्यासमोर तीच रसिका असते नेहमी!
रसिका जोशी,खरेच खुप खुप वाईट
रसिका जोशी,खरेच खुप खुप वाईट वाटले..खुपते तिथे गुप्ते मधल्या मुलाखतीत अजिबात जाणवले नाही ..इतकी सहज-सुंदर ,प्रभावी पणे बोलत होती..श्रध्दांजली.
रसिका जोशींबद्दल मागे एका
रसिका जोशींबद्दल मागे एका दिवाळी अंकात वाचलं होतं. त्यात त्यांना असलेल्या कॅन्सरबद्दल कळलं होतं. मोठी गुणी अभिनेत्री! श्रध्दांजली!
अर्रर्र... फारच वाईट बातमी...
अर्रर्र... फारच वाईट बातमी...
अरे रे... एका दिवाळी अंकात
अरे रे...
एका दिवाळी अंकात मैत्रिणींनी एकमेकांबद्दल लिहायचे अशा थिममध्ये तिच्याबद्दल लिहिलेले वाचलेले.
तिच्यावर एकामागोमाग एक दु:ख भोगण्याचेच प्रसंग आले हे तिला प्रियदर्शनच्या चित्रपटांमधल्या भुमिकांमध्ये पाहुन खरेच वाटेना... आता खेळा नाचा मध्ये किती धम्माल केलीय तिने. मी वाचलेले तेव्हा तिला दोनदा कँसर झालेला पण तिची उमेद पाहुन अजिबात वाटत नव्हते.
तिला माझी श्रद्धांजली.
रसिका जोशींना श्रद्धांजली
रसिका जोशींना श्रद्धांजली
सुप्रिया मतकरींनी लिहिलं होतं
सुप्रिया मतकरींनी लिहिलं होतं ना दिवाळी अंकात रसिका जोशीबद्दल?
प्रपंच आठवतेय, घडलंय बिघडलंय मध्येही होत्या का त्या?
हिंदी चित्रपटांतही आपली छाप उमटवली होती.
श्रद्धांजली.
फारच वाईट बातमी...
फारच वाईट बातमी...
(मायबोलीवरचा हा एकच धागा असा आहे कि जो कधीही पहिल्या पानावर पहायला आवडत नाही
)
रसिका जोशींना श्रद्धांजली
"व्हाईट लिलि आणि नाईट रायडर" मधली भूमिका अप्रतिम होती. झीच्या "नक्षत्रांचे देणे (ना.धो. महानोर)" या कार्यक्रमाच्यावेळी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता.
रसिका जोशी? ओ बापरे.. फारच
श्रद्धांजली !!!!
रसिका जोशीला श्रद्धांजली. खूप
रसिका जोशीला श्रद्धांजली. खूप शौर्याने झगडली ती आजाराशी.
थोर तमाशा कलावंत 'काळू, यांनाही श्रद्धांजली.
ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शक मणी कौल यांना श्रद्धांजली. फारच वाईट बातम्या आल्या गेल्या २/३ दिवसांत
रसिका जोशी आणि वगसम्राट काळू
रसिका जोशी आणि वगसम्राट काळू यांस श्रद्धांजली.
रसिका जोशी. खूप वाईट बातमी.
रसिका जोशी.
खूप वाईट बातमी. 
आत्ता नीरजेकडून कळली बातमी..
आत्ता नीरजेकडून कळली बातमी.. खूपच धक्का बसला ऐकून

खुपते तिथे गुप्ते मधे तिला पाहिल्यानंतर पुपुवर तिच्या कर्करोगाबरोबरच्या लढ्याबद्दल कळलं होतं.
रसिका जोशी हे नाव समोर आलं की आधी प्रपंच मालिका आठवते आणि मग अगंबाई अरेच्या मधला टैक्सी ड्रायव्हर डोळ्यासमोर उभा राहतो. खूप वाईट वाटलं बातमी ऐकून
रसिका जोशी. खुपच वाईट बातमी
रसिका जोशी. खुपच वाईट बातमी
रसिका जोशी आणि काळू यांस श्रद्धांजली.
अरेरे ... फारच वाईट बातमी
अरेरे ... फारच वाईट बातमी
वाईट बातमी. भावपुर्ण
वाईट बातमी. भावपुर्ण श्रद्धांजली.. अनिल नलवडे यांच्याबरोबर केलेले नाटक ( नव नाही आठवत आता) पण अप्रतिम अभिनय केला होता
अमोल केळकर
रसिका जोशीला श्रद्धांजली
रसिका जोशीला श्रद्धांजली
खुपते तिथे गुप्ते मधे तिची मुलाखत पाहिलेली ,तोच तिचा मोबाईलवर बोलण्याचा प्रसंग सारखा डोळ्यासमोर येतोय.
(No subject)
रसिका जोशी!! अतिशय अतिशय वाईट
रसिका जोशी!! अतिशय अतिशय वाईट बातमी
एक वर्षापूर्वीच व्हाईट लीली बघीतले होते तिचे.
अरेरे...चतुरस्त्र अभिनेत्री
अरेरे...चतुरस्त्र अभिनेत्री गेली!
रसिका जोशी गेली.... ऐकून खुप
रसिका जोशी गेली.... ऐकून खुप वाईट वाटलं. तिच्या खुप आवडलेल्या भुमिका मनात फेर धरून गेल्या. फारच वाईट बातमी
भावपुर्ण श्रद्धांजली.
रसिका जोशीच्या जाण्याची बातमी
रसिका जोशीच्या जाण्याची बातमी अतिशय धक्कादायक

मला प्रचंड आवडायची. कित्येक वर्षापुर्वी अल्फा मराठी सुरू झाले तेव्हा एक छोट्या छोट्या भागांचे नाटक दाखवायचे, त्यातल्या एका भागात सासूचे आणि एका भागात तिने म्हातार्या भटजीच्या बायकोचे काम केले होते ज्यांना फक्त उत्तर क्रियेसाठी बोलवलं जात असतं. त्या दोन्ही भुमिका तिने अप्रतिम केल्या होत्या आणि तेव्हापासून मी तिची फॅन..
प्रचंड वाईट वाटलं वाचून..
तिच्या कॅन्सरबद्दल माहीती नव्हतं. 
तिला मन:पूर्वक श्रद्धांजली.
श्शी!! काहीतरीच अभद्र बातमी.
श्शी!! काहीतरीच अभद्र बातमी. रसिका जोशी पडद्यावर आली (छोटा असो वा मोठा किवा स्टेज) की अख्ख्या वातावरणाचा ताबा घ्यायची. फारच्ग वाईट वाटलं वाचून.
मनःपूर्वक श्रद्धांजली.
फारच धक्कादायक बातमी
फारच धक्कादायक बातमी
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
. श्रद्धांजली.
:-(. श्रद्धांजली.
Rasika Joshi, a brave
Rasika Joshi, a brave fighter, one could never make out she was fighting with cancer for so many years....Rest in Peace
गेला आठवडा फारच वाईट होता, खुप प्रतिभावंत गेले
लहू खाडे, कमल देसाई, मणि कौल, रसिका जोशी ...सगळ्याना भावपूर्ण shardhaanjali
Pages