दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे... Sad प्रचंड वाईट बातमी.. Sad
आमटे कुटुंबियांच्या दु:खात सर्वच सहभागी आहोत...

माबोवर 'अनिकेत आमटे' आहेत ना?

का म्हणून अशा बातम्या येतात??

साधनाताईना श्रद्धांजली. त्याच्या एक दशांश तरी कार्य करण्याचं बळ आम्हाला मिळू दे ही देवाकडे प्रार्थना.

बाबा आमटेंसारख्या फकीराचा अमर्याद संसार सांभाळणाऱ्या साधनाताई आमटे यांचे काल निधन झाले. कॅन्सरमुळे त्यांचे किडनी वगैरे अनेक अवयव निकामी झाले होते.बाबांना अशी सहचारिणी मिळाली नसती,तर कदाचित बाबांनी आयुष्यात जे काही केले ते शक्य झाले असते का,सांगणे अवघड आहे.डॉ.प्रकाश व डॉ.विकास आमटे यांची आई आणि कुष्ठरोग्यांची,दलितांची,पतीतांची माय आपल्या मुलांना पोरकं करून अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहे.समाजकार्याच्या बाबांच्या यज्ञात स्वतःच्या आयुष्याच्या समिधा वाहणाऱ्या साधनाताईंना विनम्र आदरांजली...!

का म्हणून अशा बातम्या येतात?? Sad

साधनाताईना श्रद्धांजली. त्याच्या एक दशांश तरी कार्य करण्याचं बळ आम्हाला मिळू दे ही देवाकडे प्रार्थना.>> अगदी अगदी.

इंदूरच्या पातालपानी धबधब्यातल्या दुर्घटनेची बातमी वाचली का?
http://72.78.249.107/esakal/20110719/4909254087822861964.htm
या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे फिरत आहे.
फार भयंकर आहे. निसर्गाचा आनंद लुटण्याच्या नादात मर्यादा ओलांडली की संपलंच!

सुयोग,व्हिडियो बघितल्यावर काही सुचतच नाहीये..............:(
एका क्षणात होत्याच न्ह्वत झालय शब्दशः

गझलकार सुरेश नाडकर्णी यांचे निधन

http://www.esakal.com/esakal/20110722/5703883193936611405.htm

गझलकार सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
Friday, July 22, 2011 AT 01:53 PM (IST)
Tags: dr. suresh nadkarni, gazal, pune
पुणे - उर्दू आणि मराठी गझलचे ज्येष्ठ अभ्यासक, गझलकार आणि लेखक सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे आज (शुक्रवार) पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.

"सकाळ'मध्ये त्यांनी "पृथ्वीवर माणूस उपराच' ही लेखमाला चालविली होती. कालांतराने या मालिकेचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. "अज्ञाताचे विज्ञान' ही त्यांची लेखमाला 1995 मध्ये गाजली होती. शिवाय, त्यांनी लिहीलेल्या "उंबराचं फूल' हे पुस्तकही प्रकाशित झाले होते.

नाडकर्णी हे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक, गझल शायरीचे जाणकार, कवी आणि संगीततज्ज्ञ होते. विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त क्रीडासमीक्षक होते. वैज्ञानिक गूढांचे व्यासंगी विश्‍लेषक, साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात पन्नास वर्षांहून अधिक काळ ते क्रियाशील होते.

Sad

आयला तो इंदूरचा व्हिडिओ खरच डेंजर आहे.. धरणातून पाणी सोडले की असच भसकन येतं... परवा पुण्यात सुद्धा खडकवासला धरणातून पाणी सोडल्यावर नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली होती..

नाही ती पहाडी नदी आहे. तिच्यावर धरण नाहिये. तिच्या केचमेंट एरिया मधे कुठे १० मिनिट जरी पाऊस झाला तरी तिला असंच अचानक पाणी येतं. तास भरात तोच धब्धबा दिसेनासा ही होतो.

तिथे खूप बोर्ड्स आहेत, गार्ड्स,गावकरीही विनवून सांगत असतात पात्रात उतरू नका अचानक पाणी येइल, लोकल पेपर्स मधे सतत तिथे झालेल्या अपघातांच्या बातम्या असतात, पण लोक ऐकत नाहित.

परवा तर हद्द होती. इथले लोक ते लोक कसे गेले, कुठून गेले हे पहायला गेले होते. पेपर मधे फोटो होते लोकांचे त्या धबधब्याच्या तोंडावरून खाली वाकून पहाणार्या मूर्खांचे.

>>पण लोक ऐकत नाहित.

हीच मुख्य समस्या आहे. मिडीआवाल्यांची चीड आली ही बातमी ज्या पद्धतीने देत होते त्यावरुन.
"प्रशासनाने इशारा देणारा बोर्ड लावण्याखेरीज काहीही केलेलं नाही" अशी बिनडोक विधाने करत होते ते.
अरे लोकांना अक्कल नको? बोर्ड वाचायला नको? आणि साधा तर्क आहे. पावसाळ्यात धबधब्याच्या काठाशी उभं रहायचं? कमाल आहे. हे म्हणजे वीज गेल्यावर सॉकेटमधे हात घालायचा आणि अचानक वीज आली की शॉक बसला म्हणून वीज मंडळाच्या नावाने शंख करायचा त्यातला प्रकार आहे.

ओह गॉड. नाडकर्णी. कालच पेपरात काहीतरी वाचलेले त्यांच्या नव्या गझलसंग्रहाबद्दल. Sad

त्यांचे अज्ञाताचे विज्ञान पण हल्लीच वाचलेले. त्यांचे एकमेकांशी सुतराम संबंध नसलेल्या विषयांमधले माहितीपुर्ण लेख वाचुन सुरवातीला तर मला एक सोडून दोन-तीन एकाच नावाचे नाडकर्णी असावेत असे वाटायचे. माझी श्रद्धांजली Sad

तिथे खूप बोर्ड्स आहेत, गार्ड्स,गावकरीही विनवून सांगत असतात पात्रात उतरू नका अचानक पाणी येइल, लोकल पेपर्स मधे सतत तिथे झालेल्या अपघातांच्या बातम्या असतात, पण लोक ऐकत नाहित.>>>> अनुमोदन. आम्ही गेलो होतो तेव्हा तिकडे धबधब्याच्या बर्‍याच अलीकडे असलेल्या तिकीट काउंटरवर आम्हांला सुचना दिल्या होत्या, बोर्ड नीट वाचा, सुचना पाळा म्हणून सांगितले होते. पण त्याबरोबरच धबधब्याजवळही एखादा रखवालदार ठेवणे आवश्यक आहे. कारण, लिहीलेल्या सुचना लोक पाळत नाहीत हे न टाळता येणारे सत्य आहे. Sad असो, जे झाले ते फार वाईट झाले.

Pages