दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीचे सदस्य्,गझलकार श्री.निशिकांत देशपांडे यांच्या मातोश्रींचे आज नागपुरात दु:खद निधन झालं.
त्यांस भावपूर्ण श्रद्धांजली.

कमल देसाई, प्रा. जयंत तारे, तसेच श्री.निशिकांत देशपांडे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी.

कर्करोग.
तिनं अनेक वर्षं कर्करोगाशी सामना केला. त्यातून ती बाहेरही पडली होती. यावेळी बहुतेक तिसर्‍यांदा रिलॅप्स झाला होता कॅन्सर.
अतिशय वाईट बातमी... Sad Sad

काळू-बाळू या जोडीतील सुप्रसिद्ध तमाशा कलाकार काळू म्हणजे लहू खाडे यांचं निधन. Sad

रसिका जोशी!! अतिशय अतिशय वाईट बातमी Sad हल्लीच तिची खुपते तिथे गुप्ते मध्ये मुलाखत पाहिली होती.. खूप वाईट झाले. Sad

खरच खुप मोठ्ठा धक्का बसलाय तिच्या जाण्याने!
तिची आणि अतुलची एक लहान मुलांच्या (सारेगम?) कार्यक्रमाची एक सिडी आहे. ती सिडी आमच्याकडे सतत सुरु असायची. ते दोघे घरातलेच वाटायचे.
रसिकाला श्रद्धांजली.

बापरे!! रसिका जोशी. Sad
>>>धक्का बसला वाचून! प्रपंचमधे तिने किती छान काम केलं होतं...
हो मला तीच सिरियल आठवली आता. खूप चांगली कलाकार होती ती. खुपते तिथे गुप्ते मधील सगळ्या फोन राउंडमधे तिचा फोन फार जबरी होता. वेळीअवेळी मोबाईल वर बोलणार्‍यांवर तिने मस्त जोडे मारले होते. Happy
विश्वासच बसत नाहीये.

वत्सला, हो आमच्याकडेपण ती सिडी कायम सुरू असायची पूर्वी. ती लहान मुलांच्या "नक्षत्रांचे देणे - आता खेळा नाचा" ची सिडी होती. मला ती त्यातली झोपायचे कपडे घातलेली, झोपतानाची लांब-मोठी टोपी घतलेली, डोळे मिटलेली रसिका जोशीच येतेय डोळ्यासमोर Sad
फारच वाईट बातमी. खूप धक्का बसला वाचून. श्रध्दांजली.

Pages