दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

Sad

मराठी सन्गीतातील एका युगाचा अन्त. त्यांनी मराठी सन्गीताला नवीन उंची दिली.
श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Sad Sad Sad

खळेकाका गेले. श्री समर्थां चे ' मरावे परी कीर्ती रुपे ऊरावे ' हे वचन सिद्ध करुन गेले. त्यांची "संगीतकीर्ती " अखंड राहील. गेल्या ४ वर्षात झी मराठी ने खळेकाकांच्या कर्तृत्वाला खूप चांगला मान दिला.त्यामुळे संगीतबरोबरच खळेकाका ही व्यक्ती देखील मराठी माणसाच्या मनात चिरंतन राहील.

जयावि, तुमच्या आईला श्रद्धांजली.

खळेसाहेबांना आदरांजली!

Sad गणपतीच्या दिवसात किती वाईट बातम्या ऐकायला मिळाल्या. उत्साह अगदी ओसरल्यासारखा वाटला मला. Sad काल आणि आज खळ्यांची गाणी ऐकत बसले Sad किती ताजी वाटतात आणि प्रत्येक वेळी ऐकता ऐकता काहीतरी नवीनच लागते हाती..... खळे इथुन गेले तरी कायम गुंजत राहतील मनात आणि कानात.

उत्साह अगदी ओसरल्यासारखा वाटला मला. काल आणि आज खळ्यांची गाणी ऐकत बसले>>>>अगदी अगदी. मी पण काल कितीतरी वेळ "बगळ्यांची माळ फुले" आणि "अभंग तुक्याचे" पुन्हा पुन्हा ऐकत होतो. Sad

महाराष्ट्रातील डाव्या चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते शांताराम गरुड यांचे शनिवारी इचलकरंजी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. समाजप्रबोधिनीमाध्यमाद्वारे त्यानी केलेले सामाजिक कार्य महत्वाचे मानले जाते.

आणिबाणीच्या कालखंडात त्याना मिसाखाली अटक होऊन दोन वर्षाची सक्तमजुरीही झाली होती.

कॉम्रेड शांताराम गरूड याना भावपूर्ण श्रद्धांजली.

गौतम राजाध्यक्ष यांचं निधन?????

बाप रे!

आदरपुर्वक श्रद्धांजली!

(असे म्हणायचे की डिम्पलचे छायाचित्र घ्यावे तर गौतम राजाध्यक्ष यांनीच)

Sad

Pages