द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, फार खास नसली तरी फाईव्ह पॉईंट समवन टीपी म्हणून ठीक वाटल होत. वन नाईट ऍट कॉल सेंटरही नावीन्य म्हणून ठीक, अर्थात शेवटचा अचाट आणि अतर्क्य भाग सोडला तर..

चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

अमदावादेत क्रीडासाहित्याचे दुकान कम क्रिकेट कोचिंग कम गणित क्लासेस आपल्या ओमी व इश या मित्रांसोबत चालवणारा एक गोविंद पटेल, त्यांचा अली नावाचा पुढे भारतीय क्रिकेटचे भविष्य होउ शकेल असे त्यांना वाटणारा एक बारा तेरा वर्षाचा विद्यार्थी जो सारख्या सिक्स मारत असतो, त्याला क दर्जाच्या हिंदी चित्रपटाला लाजवतील अशा अतर्क्य प्रकारे गोव्यात एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बळंच गळ्यात पडून थेट ऑस्ट्रेलियात नेणे आणि त्याने तिथले नागरिकत्व आणि ऑस्ट्रेलियातर्फे भविष्यात खेळण्याची संधी मी जन्मोजन्मी भारतीयच राहीन असे म्हणत नाकारणे असे हास्यास्पद [त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नाकारल्यावर ऑस्ट्रेलियन निराश होतात] घटनातून पाने भरता भरता, गोविंदने त्या दोनपैकी एका मित्राच्या इशच्या बहीणीला गणित शिकवता शिकवता एकमेकांना प्रेमाचे धडे देणे, आणि तिच्या अठराव्या वाढदिवसालाच तिच्याच घराच्या गच्चीवर खाली घरात तिचे आई वडील भाऊ असतांना ती ऍडल्ट झाल्याचा अधिकार बजावणे आणि मग पुढची चिंता यातही बरीच पाने खर्ची पडल्यावर, ओमीचे मामा जे हिंदुत्ववादी व वाईट्ट असतात आणि अलीचे बाबा जे मुसलमान असल्याने दयाळू, सर्वधर्मसमभाव मानणारे व विचारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते असतात यातही एकदोन लुटुपुटुचे संघर्ष झाल्यावर काही काळाने म्हणजे आपल्याला अजून थोडा कंटाळा आल्यावर मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.

हे तीन मित्र अलीला वाचवायला एकदम रजनीकांतच होतात आणि मामांच्या पन्नास जणांच्या पेटलेल्या सशस्त्र जमावाशी झुंज देतात, त्या जमावावर पेट्रोल ओतून पेटवून काय देतात, गॅस सिलिंडरचा स्फोट काय करतात, हे सगळे अर्थात स्वतःला खरोंच पण येऊ न देता, अशा सर्व मर्कटलीला केल्या पण तरी शेवटी मुख्य व्हिलन मामा व त्याचे पाच साथीदार उरतातच. एवढ्या सगळ्या गडबडीतही इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी !!! कुणाच काय तर कुणाच काय हेच खरे !!] आणि ती खबर इशच वाचतो आणि मुळात तो फोन गोविंदकडून आपण पोलिसांना बोलावण्याकरता घेतला होता हे विसरून गोविंदलाच बदडू लागतो. इकडे मामा पद्धतशीर डोळे मिटून मंत्र वगैरे म्हणून मग अलीला त्रिशूळ भोसकणारच [ येथे आपण हसून गडाबडा लोळू लागतो ] तेवढ्यात ओमी 'नही' वगैरे सुटेबल उद्गार काढत मध्ये येतो आणि त्रिशूळ त्याच्याच पोटात भोसकला जातो. मग त्याचे मामा हाय मैने ये क्या कर दिया इत्यादी. पण इथेच आपला छळ थांबत नाही. मामा एकदम वाईट्ट हिंदुत्ववादी असल्याने ते पुन्हा त्रिशूळ घेउन उठतात आणि अलीला मारतात पण आता इश व गोविंद वाचवतात आणि प्रतिकाराला सज्ज होतात. आता अलीच्या हातात बॅट आणि मामांकडे त्रिशूळ आणि ते आमने सामने आता काय होणार ? अली बॅट सरसावतो, मामा ही पुढे येतात तेवढ्यात... तेवढ्यात इश त्याला बॉल टाकतो आणि अली मामांच्या टकलावर सिक्सर मारतो, अजून एक बॉल आणि अजून एक सिक्सर कपाळावर की मामा मरूनच खाली पडतात.

एवढे सगळे झाल्यावर लेखकाचे जाउ द्या हो, पण आपल्यासारखे वाचकही एवढे निर्लज्ज की पुढे वाचत रहातात. आता भांडणामुळे इश आणि गोविंदच्या दुकानाचा बटवारा होतो, अलीच्या ऑपरेशनसाठी इश दो लाख रुपये जमवतो तर गोविंद तीन, पण इश गोविंदचे पैसे घेणे नाकारतो एवढेच नव्हे तर त्या पैशाला गोविंदचा स्पर्श आहे म्हणून ते परत देतांना स्वतः हँड्ग्लोव्हज घालून मग ते पैसे परत देतो. आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते. तर हा धक्का सहन न झाल्याने गोविंद आत्महत्या करायचा प्रयत्न करतो, पण तेंव्हाही तो लेखकाचा फॅन असल्याने लेखकाला ईमेल पाठवून गोची करून ठेवतो. मग लेखक सिंगापूरहून अमदावाद आणि विद्या, इश आणि गोविंदचे परस्परांशी त्या त्या नात्याला सुटेबल असे मिलन करून हा छळवाद संपतो.

केवळ मार्केटिंगच्या आधारे एखादी तद्दन फालतू गोष्टही कशी खपवता येते हे असली पुस्तक वाचली आणि त्यांच्या खपाचे आकडे पाहिले की कळते.
मग आता शेवटपर्यंत वाचायच कशाला ? भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे....मग भोगा आपल्या कर्माची फळं......

---- ता. क. चौथी चूक : टू स्टेट्स

थ्री मिस्टेक्स हे पुस्तक वाचलं तेंव्हा याहून भिकार आणि टाकाऊ लेखन करणे शक्य नाही असे माझे मत झाले होते. ते किती चुकीचे होते हे आता चेतन भगतचेच २ स्टेट्स वाचल्यावर कळले.

प्रस्तावनेत चेतन भगतने तो भारतातला सर्वात लोकप्रिय लेखक आहे असे जाहीर करून त्याबद्दल वाचकांचे आभार मानले आहेत. हे जर खरे असेल तर आपली वाचनसंस्कॄती अजूनही मानवी उत्क्रांतीच्या किती खालच्या पातळीला आहे याची भिती वाटू लागते.

पुस्तकाचे चार भाग आहेत. पहिल्या भागात लेखक आणि त्याची होणारी बायको एकेमेकांना आयआयएममध्ये भेटून मागच्या सर्व पुस्तकातल्याप्रमाणेच फक्त नाव बदलून प्रेमात पडतात. भाग दोन मध्ये लेखक मद्रदेशात जाउन तिच्या आई, वडील व भावाला कंटाळा आणून पटवतो. तीन मध्ये मुलगी दिल्लीला येउन लेखकच्या आई व नातेवाइकांना पसंत पडू पहाते. भाग चार मध्ये हे मद्रदेशीय व जमनापार पालक भांडतात, भांडणे मिटवतात व एक्दचे लग्न पार पडते. परिशिष्टात दांपत्याला जुळी अप्त्यप्राप्ती झाली असून ती कुठल्या राज्याची असे विचारल्यावर भारताची असे बाणेदार उत्तर दांपत्य देते व तीन ओळींची ही कहाणी दोनशे पाने खाऊन संपते.

पुण्यातील कोणाला हवे असल्यास माझ्याकडे २ स्टेट्स हे पुस्तक मला परत न देण्याच्या अटीवर उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 

हे पुस्तक पहीले मी एकटीने वाचले, मग माझ्या नवर्‍याने वाचले आणि नंतर आम्ही त्यातिल अनेक पाने एकत्र वाचली आणि मनसोक्त आनंद लुटला. दोघं मिळुन दिलखुलास हासलो. किती तरी गोष्टी वाचतांना वाटले अरे हि तर आपलीच गोष्ट आहे.
नंतर मी हे पुस्तक माझ्या अनेक मित्र- मैत्रींणींना वाचायला दिले सर्वांनी खुप एन्जॉय केले. मुख्य गोष्ट म्हणजे त्यातिल कित्येक जणं हे काही पुस्तक वाचणार्‍या category तले नाहीत. त्यांनी शाळा कॉलेजातील पुस्तके सोडुन कधी कुठले पुस्तक वाचले नाही. पण त्या सर्वांनी हे पुस्तक अगदी 1 go मधे वाचुन काढले, आणि thoroughly enjoy केले and I think this is a success of this book.

casting मी असे करेन,

क्रीश -> रणबीर कपुर
अनन्या -> विद्या बालन अथवा करीना
क्रिशची आई -> किरण खेर (there is no alternative or option for this casting, फक्त तीच हा रोल justify करु शकेल.)

बाकी अनन्याचे आई-वडिल कुठल्याही साउथच्या स्टार्सना घेउन चालेल. Wink

२ स्टेट्स मला पण आवडले. काही पंचेस जबरी आहेत. टाईम पास पुस्तक आहे, मूड एकदम फ्रेश होतो वाचून.

वर्षा नायर तुमच्या दोन्ही पोस्ट्स ला भरपूर अनुमोदन! [:)]

Happy मी पण शून्य अपेक्षा ठेवून टू स्टेट्स वचलं इतक्यातच. लाइट करमणूक , टाइमपास ला ओके वाटलं. अगदी हिंदी सिनेमासाठी लिहिलेले वाटते मात्र! क्रिश च्या बापाचे अचानक परिवर्तन ,अनन्याने त्या पंजबी लग्नात वरपक्षाची खोड मोडून इम्प्रेशन मारण्याचा सीन इ . अ. अ . प्रकार आहेतच.
ए पण वर कास्टिंग बरोबर वाटत नाहिये. कुणीतरी चक्क रणबीर - करीना काय लिहिलंय , बहीण भाऊ आहेत की ते Happy
जरा हुषार दिसणारे लोक हवेत. रणबीर , करीना, दीपिका, प्रियांका कुणीही आय आय एम टाइप हुषार वाटणे म्हणजे मुष्किल ही नही नामुमकिन वाटते! Happy विद्या हुषार वाटेल पण मोठी वाटते वयाने.
त्यातल्या त्यात इम्रान खान , असिन ही जोडी बरी वाटेल! क्रिश ची आई हिमानी शिवपुरी. वडील दिलिप ताहिल .
अनन्याचे वडील तेजाब मधले अनिल कपूर चे म्हणजेच रंगीला मधले उर्मिलाचे वडील आहेत ना ते. आणि तिची आई रोहिणी हट्टंगडी Happy

बहीण भाऊ आहेत की ते >>>> असू देत की मै.. की फरक पैंदा.. नाहितरी हिंदी चित्रपटच.. Proud

अन्यना साठी हुशार, स्टूडीयस, सिन्सिअर चेहेरा असं हवं असेल तर कोंकणा सेन पाहिजे खरं तर.. पण ती पण मोठी वाटेल.. Happy
असिन नाही प्लीज !!!!

पण पुस्तकात ती खुप सुंदर आणि बिन्धास्त अशी दाखविली आहे. माधुरी आता खुपच मोठी (म्हातारी Proud :दिवा:) झाली आहे नाहीतर माधुरी आणि अक्षय खन्ना चालला असता. जर जुन्या कलाकारांबरोबर घेउन काढायचा झाला तर.

कोंकना सेन चालली असती पण ती दिसायला सुंदर नाही (पुस्तकातील वर्णनाप्रमाणे ती दिसायला सुरेख हवी)
विद्या बालन चालेल आणि फरहान अख्तर कशी वाटते जोडी. (विद्या आणि शाहीद ह्यांची किस्मत कनेक्शन मधे होती कि जोडी.)

क्रिशची आई.. किरण खेरच हं, दुसरा पर्यायच नाही.
आणि वडील (क्रिपलानी, ३ idiots मधे शेवटी शर्मन जोशी चा जॉब interview घेणारा)

अनन्याचे वडील .. सेम... हम है राही मधिल जुहीचे वडील आणि आई -- मधु किंवा तत्सम जुन्या साउथ च्या actresses.

पुस्तकातील वर्णनाप्रमाणे ती दिसायला सुरेख हवी> हो हो सुरेख हवीच कतरिनाला Proud आपण साऊथची पण ब्रिटनमध्ये वाढलेली अस कास्ट करू

माझ्या मते अनन्यासाठी रेड्डी भगिनींपैकी सगळ्यात धाकटी (मेघना आणि सुषमा सोडून) मस्त दिसेल... आणि क्रिश अर्थातच हृतिक... बाकी किरण खेरला अजिबात पर्याय नाहीये, दुसरे कोणी ते काम करुच शकणार नाही.

'टू स्टेटस' कुणाला कितीही आवडू दे किंवा बेकार वाटू दे, http://www.maayboli.com/node/13159 हा धागा मात्र त्यावरच्या चर्चेतूनच स्फुरला एवढे क्रेडीट मी त्याला नक्कीच देईन. Proud

अर्रे मायबोलीवर सगळे चेतन भगत चे शत्रु दिसताय Sad मला आवडतो तो कारण त्याच्या कथांतुन भेट्णारी अगदी आजकालची, आजुबाजुला असल्यसारखी वाटणारी टिपिकल पात्रे आणि सहज सोपी भाषा. मुख्य म्हणज्जे "मी कुणीतरी महान विचारवंत लेखक" आहे असा त्याचा कधीही आव नसतो.
मला चेतनचे थ्री मिस्टेक्स सोडून बाकी तिन्ही पुस्तकं फार आवडली..सगळ्यात जास्त २ स्टेट्स!!
1 night @call center मध्ल्या बॉस सारखाच बॉस होता त्यावेळी माझा..भयंकर स्वार्थी आणि हाताखालच्या लोकांचे अहित करायला अजिबात न कचरणारा..शिवाय कॉल सेंटरचे वातावरण आणि तिथले टिपिकल पात्र ही छान रंगवले होते.
२ स्टेट्स विषयी माझेही मत अगदी वर्षा नायर यांच्यासरखेच. आंतरप्रांतीय विवाहातील मजा/सजा आणि IIM चे वातावरण अत्यंत सुरेख केले आहे. अगदी प्रत्येक ओळीशी रिलेट करु शकले Happy पंजाबी आणि तामिळींच्या वागण्याविषयी भारी निरिक्षणे आहेत, ह्सून हसून पुरेवाट झाली..
बाकी "फक्त" "विचारप्रवर्तकच" वाचणार्यांनी चेतन च्या वाट्याला जाऊ नये हे मात्र खरेच.
जाताजाता: कुणाच्या लक्षात आले का की चेतन च्या पुस्तकांच्य्या नावात नेहमी कुठला तरी अंक असतो?

बाकी "फक्त" "विचारप्रवर्तकच" वाचणार्यांनी चेतन च्या वाट्याला जाऊ नये हे मात्र खरेच.>>
अगदी अगदी, केवळ सरधोपट, क्लीशे, डोक्याला ताप न देणारे, कसल्याही प्रकारे विचार करायला भाग न पाडणारे, कूठल्याही प्रकारे जाणिवा समृद्ध न करणारे, वाचनाला केवळ मनोरंजनाचे पॉपकॉर्न मूल्य असले पाहिजे असे मानणार्‍यांनीच चेतन भगत वाचावा! पूर्ण अनुमोदन!

अगदी अगदी, केवळ सरधोपट, क्लीशे, डोक्याला ताप न देणारे, कसल्याही प्रकारे विचार करायला भाग न पाडणारे, कूठल्याही प्रकारे जाणिवा समृद्ध न करणारे, वाचनाला केवळ मनोरंजनाचे पॉपकॉर्न मूल्य असले पाहिजे असे मानणार्‍यांनीच चेतन भगत वाचावा!अशा लोकांनी अजुन काय काय वाचावे तेही सांगा जाता जाता...

आता जे पुस्तक वाचायला घेतलेय ते वर नमुद केलेल्या प्रकारात बसणार आहे की नाही, हे पुस्तक वाचल्याशिवाय कसे कळणार? की १० जणांनी केलेली समिक्षा वाचायची आणि त्यावरुन ठरवायचे वरच्या प्रकारात बसतेय की नाही? पुन्हा ती समिक्षा त्या लोकांच्या दृष्टीकोनातुन केलेली असणार. आपली आणि त्यांची मते जुळतील की नाही हे कसे समजायचे?

मी तरी लेखकांची वर्गवारी करत नाही. जे पुस्तक हाती सापडते ते वाचते. चेतनची आधीची पुस्तके अर्धवट सोडुन दिलेली. वाचवली नव्हती म्हणुन. हे लागले हाती, तेव्हा कोणताही पुर्वग्रह न ठेवता हेही वाचायला घेतले आणि आवडले. मधुन मधुन तर जाम हसलेही.

अशा लोकांनी अजुन काय काय वाचावे तेही सांगा जाता जाता... >>>
जरुर सांगतो आणी मी हे सर्व वाचलेले आहे हे ही सांगतो.
बाबा कदम, सुहास शिरवळकर,जेम्स हॅडली चेस, सिडने शेल्डन,इ.इ.इ.
पूर्वग्रह ठेउन वाचू नये हे खरेच पण आपल्या आवडत्या वाचनाच्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडणेही तितकेच महत्वाचे आहे. माझ्या मते सतत वाचा, सगळे वाचा, काहीही वाचा पण शेवटी त्यातून आपली टेस्ट डेव्हलप होउद्या.ग्रो अप विथ द बुक्स बट ऑलसो ग्रो आउट ऑफ द बुक्स.

बापरे! आगाऊ, तुम्ही फारच मनाला लाऊन घेतलेलं दिसतंय हं माझं वाक्य Happy
कुणी काय वाचावे ही ज्याची त्याची आवड. मात्र ज्याला चेतन भगत आवड्तो त्यला शोभा डे/ प्रिया तेंडूलकर्/खालेद होसेनी/आएन रँड आवडत नसतील असे मात्र नाही हं ( म्हणजे मला तरी आवड्तात सगळेच)!!
शिवाय दिवसभर बेक्कार काम करुन आल्यानंतर/परीक्षेनंतर/घरच्या कटकटीनंतर जर मनाला आनंद म्हणून वाचाय्चे असेल तर कोणी कविता महाजनांचे "भिन्न" वाचेल काय? डोके भिन् होते Sad अर्थात भिन्न मला आवडले नाही असे नाही, पण कधीही मजा म्हणून नाही वाचु शकत ना? त्यावेळी चेतन नक्कीच मनाला (माझ्या तरी) तजेला आणतो.

बाकी पुर्वग्रह न ठेवता वाचणे हे सगळ्यात उत्तम. पुर्वग्रह असल्यामुळे मी शोभा डे ल अतिशय frivolous समजाय्चे पण तिचे speedpost आणि spouse वाचल्यावर कळले की ती किती संवेदनशील लिहिते ते.

आणि मारे बुकर प्राइज विनर म्हणून आणलेले God of small things, Fasting Feasting, White tiger आणि ते किरण देसाईचे कुठ्लेसे अजिबात आवडले नाहीत. रटाळ, कसलीही कहाणी/विचार नसलेले, एमलेस रायटिंग म्हणतात तसले होते. तर ते अगम्य, कुणालाच कळत नसल्याने आणि तसे कबूल करावे तरी कसे म्हणून त्यांचा गवगवा आणी त्यांना साहित्यीक मुल्य, मात्र चेतनची साधी सरळ कहाणी म्हणजे पॉपकॉर्न वाचन का म्हणे? मग मायबोलीवर्ची ललितं आणी कथा ही त्याच किमतीच्या का? मला नाही पट्त रे बाबा!!
आणि भारतीय इंग्लिश लेखकांमधील झुंपा लाहिरी, अरुंधती रॉय, किरण देसाई, अनिता देसाई हे उगाच डोक्यावर घेतलेले (over-hyped) वाटतात (माझे मत, अजुन कुणाचे Happy )

नाही हो मनाला वगैरे अजिबात लाउन घेतलेले नाही, अगम्य ते ग्रेट आणि मनोरंजक ते सामान्य असा दावा तर अजिबात नाही. फक्त अगम्य असो वा मनोरंजक अभिजात ते अभिजात एवढेच म्हणणे! मुळात अगम्य असेल ते मनोरंजक नसेलच हे गृहितक तरी किती बरोबर आहे?

अगम्य म्हणजे न समजणारे/ न झेपणारे! आणि न समजणारे वाचन मनोरंजक कसे असणार? Lol पुलं ही अनेकांना विनोदी लिहित म्हणून सामान्य वाट्तात, तिथे चेतन म्हणजे बिचारा किस झाड की पत्ती? जाऊ द्या लोकहो..मात्र २ स्टेट्स ला भिकार नका म्हणू, त्यापेक्षा वाईट पुस्तकांची यादी दिलिय वर, वाचले नसेल तर नक्की वाचा आणि ठरवा Happy
( जणू काय मला चेतन ने त्याची marketing manager च ठेवली आहे, असा प्रचार करतेय मी त्याचा Happy )

अगम्य हा पण अनेकांच्या मनोरंजनाचा क्रायटेरिया असू शकतो. आणि एखाद्याला अगम्य वाटलेलं दुसर्‍याला खिळवून ठेवणारंही वाटू शकतं.
प्रत्येकाची मनोरंजनाची व्याख्या वेगळी असते.

शोभा डे आणि प्रिया तेंडुलकर एकाच क्याटेगरीत.. हे भगवान!

सुशि मलाही फावल्या वेळात आवडलेला आहे पूर्वी.
हल्ली फावल्या वेळात नेटपंथी लागलेली आहे मी त्यामुळे फावले वाचन होत नाही.

बाकी कुठलंही पुस्तक वाचायला चालू केल्यावर त्याने पकड घेतली तर डाव्या हाताला पुस्तक फुटल्यासारखं ते पुस्तक संपेपर्यंत हातात घेऊन बसायला अजूनही आवडेल. काश... ये हो पाता...

अगम्य म्हणजे न समजणारे/ न झेपणारे! आणि न समजणारे वाचन मनोरंजक कसे असणार?>>>>> त्यासाठी शाम मनोहरांचे 'कळ' वाचा!

शोभा डे आणि प्रिया तेंडुलकर एकाच क्याटेगरीत.. हे भगवान!

>>मी एका कॅटेगरीत कुठे टाकलेय त्यांना? Uhoh बाकीचे लेखकही लिहले आहेत त्या "ऑर" मध्ये..मुद्दामच एकमेकांच्या शैलीशी साम्य नसलेले लेखक एकत्र लिहलेत. माझा मुद्दा एवढाच होता की एकाच व्यक्तीला शोभा डे, प्रिया तेंडूलकर्, खालेद होसेनी, आएन रँड आणि चेतन भगत आवडु शकतात. उदाहरण मीच आहे Happy

उत्खननपटू प्रज्ञा, धन्यवाद Happy

वरचा ता. क. मी टू स्टेटस वाचल्यावर लगेच लिहिला होता, पण काही काळाने, म्हणजे पैसे आणि वेळ वाया गेल्याचा राग जरा शांत झाल्यावर मला असे वाटले की थ्री मिस्टेक नक्कीच जास्त भिकार आहे टू स्टेट्सपेक्षा.

थ्री मिस्टेक्समधल्या आचरटपणाला तोड नाही. असले काही लिहून लेखक बा़जारात खपवू पहातो, आणि खपवतो ही खरच कमाल आहे.

I like Chetan Bagat writting skills, he is gd writer.
Stories r filmy type but timepass one . I like 5 point someone, 2 states. other two r not ok

Pages