Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाय द वे, कर्जमध्ये मॉन्टी
बाय द वे, कर्जमध्ये मॉन्टी गिटार, पियानो, व्हायलीन, सॅक्सोफोन सगळं वाजवतो
>>
ॲट लीस्ट ते त्याचं प्रोफेशन घेतलं आहे.
राघव सच्चर, अदनान सामी वगैरे बरेच प्रोफेशनल वाजवतात बरीचशी वाद्य.
नाहीतर बऱ्याच सिनेमांमध्ये कुणीही उठतो अन् कुठलं ही वाद्य वाजवायला लागतो.
पियानो खाजवायाला येणं ही तर बेसिक रीक्वायारमेंट असावी...
ओम शांती ओम गाणं संपतं,
ओम शांती ओम गाणं संपतं, प्रेक्षक 'मॉन्टी मॉन्टी' करायला लागतात, म्हणून तो पुन्हा गिटार वाजवायला लागतो, तेव्हा स्टेजवरची ती फिरणारी काळी रेकॉर्ड प्लेट गायब असते.
पियानो खाजवायाला येणं ही तर बेसिक रीक्वायारमेंट असावी... >>>
जिंदगी हरीकदम एकनयी जंगीहै
जॅक गौड सीन >> https://youtu
जॅक गौड सीन >> https://youtu.be/rvILTZ29yrc?t=684
_/\_ धन्यवाद. कशी हुडकता अशी रत्ने ? आता त्या बिचार्या सिनेमाला आणखी काही व्ह्यूज मिळतील.
>> जिंदगी हरीकदम एकनयी जंगीहै
>> जिंदगी हरीकदम एकनयी जंगीहै
हा मुव्ही तर टॉर्चर आहे. अतिइंटेन्स. किती सहन करून कष्टात दिवस काढले आपण 

हीरकिदम इक निई जिंग ही
आताचे जनरेशन तर दहा मिनिटात तडफडू लागेल.
मागची पानं वाचताना ( पान नं
मागची पानं वाचताना ( पान नं ६२) हे वाक्य वाचलं.

द बर्निंग ट्रेन मधे सुध्दा आशा सचदेव अंगावरचा कपडा फाडून देईपर्यंत......
ते...
आशा सचदेव अंगावरचा कपडा फेडून देईपर्यंत ...
असेही चालले असते ना ?
जॅक गौड सीन >>> सर
जॅक गौड सीन >>>
सर ज्युडाचा ग्लास परवडला…
आशा सचदेवला त्यागाच्या
आशा सचदेवला त्यागाच्या नावाखाली उघडे करण्याचे दिग्दर्शकी क्लुप्त्या. अगदी लालच हवे होते तर तिथे सर्व मुलांच्या अंगात लाल स्वेटर्स असतातच. एखादा सिग्नल म्हणुन वापरता आला असता. फारतर त्या मुलाला अगदीच थंडी वाजत असेल तर बॅगेतली शाल द्यायची.
अहो प्राणांवर बेतलंय
अहो प्राणांवर बेतलंय सर्वांच्या, तुम्ही संस्कृती बुडाली म्हणून अडलात.

संकट इतकं जीवघेणं आहे कि लाजलज्जा खुंटीला गुंडाळून सर्वांचे प्राण वाचवायचेत असा संदेश दिग्दर्शकाने दिलाय.
दुसर्या महायुद्धामुळेच युरोप अमेरिका बोल्ड झाले बघा.
'हमको तुमसे प्यार है' हा
'हमको तुमसे प्यार है' हा अमिषा, बॉबी देओल आणि अर्जुन रामपालचा सिनेमा बघितला आहे का कोणी?

त्यात अमिषा आंधळी असते आणि तरीही कपडे, दागिने सगळे एकदम matching घालून असते. चेहराही फुल मेकप केलेला
त्यात मग पुढे तिच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं. ते हॉस्पिटलही एकदम जबरी. त्यात तिच्या खोलीत मेपलची वार्यावर उडणारी पाने, झाडांच्या फांद्या, फुले, भारी डेकॉर, पाण्याची तळी, मेणबत्या असा सगळा सरंजाम असतो. कुठल्या पेशंटची खोली अशी असते
तिने तरी तो पाणी आणायला पाठ
तिने तरी तो पाणी आणायला पाठ वळवून जात असताना स्पीड अप करून का नाही उडवले? रिवर्स घ्यायची गरज नसती पडली.>>> माझेमन
पायस नी दिलेली लिंक ऑफिसात उघडायची रिस्क घेत नाही.
नुकताच पाहिलेला पठान अ & अ च्या ही पलिकडे आहे..ट्रेन च्या टपाला पडलेलं भोक..त्या भोकातून अवतरणारा तो सल्लू..
ट्रेन च्या टपावर ट्रेन खड्ड्यात पडत असताना मारलेल्या शिळोप्याच्या गप्पा आणि हेलिकॉप्टर दोन्ही बाहूंच्या जोरा वर थोपवणारा जॉन अ.
संकट इतकं जीवघेणं आहे कि
संकट इतकं जीवघेणं आहे कि लाजलज्जा खुंटीला गुंडाळून सर्वांचे प्राण वाचवायचेत असा संदेश दिग्दर्शकाने दिलाय. >>>
त्यात तिच्या खोलीत मेपलची वार्यावर उडणारी पाने, झाडांच्या फांद्या, फुले, भारी डेकॉर, पाण्याची तळी >>>>
इकडे मुंबईत साधे मोतीबिंदूचे ऑपेरेशनसुद्धा पावसाळ्यात अव्हॉइड करायला सांगतात डॉक्टर शक्य असेल तर.
पाण्याची तळी
जिंदगी हरीकदम एकनयी जंगीहै
जिंदगी हरीकदम एकनयी जंगीहै
हीरकिदम इक निई जिंग ही
हे वाचूनच इतके हसायला येतेय..
म्हणजे मी इतके दिवस हे सेम असेच ऐकत होते...नी आश्चर्य करत होते..की असे कसे उच्चार ! ते असे परफेक्ट शब्दात वाचून फार हसायला आले.
तुम्ही लोक जिनियास आहात !!
पठाण हा वॉर पेक्षापण अ आणि अ
पठाण हा वॉर पेक्षापण अ आणि अ आहे.(किंवा == असेल) तुटणारा पूल काय, त्यावरून टॉम अँड जेरी सारखं गुरुत्वाकर्षणा च्या उलट दिशेला धावत पुलाला लटकून आपलं संपूर्ण बॉडी वेट तोलत वर येणं काय, हेलिकॉप्टर च्या नाकाला दोरी अडकून नायक नायिका एका दोरावर येणे काय, तिथून कौलारू उतरत्या बिल्डिंग वर वटवाघूळ स्टाईल उलटी उडी मारणे काय..एक से एक काहीहीत्व आहे.
फक्त जॉन अब्राहम साठी सर्व अन्याय सहन करायचे झालं.
"जंगल BUT" पिक्चर बघितला.
"जंगल BUT" पिक्चर बघितला. नावच कायच्या काही आहे.
शब्दशः अचाट आणि अतर्क्य
शब्दशः अचाट आणि अतर्क्य
एक से एक काहीहीत्व आहे>> मस्त
एक से एक काहीहीत्व आहे>> मस्त शब्द
"काहीहीत्व" >> आवडेश!
"काहीहीत्व" >> आवडेश!
एक से एक काहीहीत्व >>> मस्त!!
एक से एक काहीहीत्व >>> मस्त!!
कुणी हा 'मेरी जंग' चा सीन
कुणी हा 'मेरी जंग' चा सीन पाहिला नाही का अजून?
लै च इंटेंस मुव्ही आहे हा
वकील कोर्टात विष पितो. त्याच्यावर उलट कारवाई व्हायला हवी होती. ते राहिलं बाजूला नी न्यायाधीश सुद्धा "पट्कन निकाल देऊन कोर्ट बंद करुया ब्वा, खरंच विष असलं आणि हा मेलाबिला थोड्यावेळात तर डोक्याला ताप नको" अशा स्टाईल मध्ये निकाल वाचतो
चांद्रयान ३ च्या यशस्वी
चांद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाणानिमित्त जंगी आकर्षण
१. https://www.youtube.com/watch?v=pigiupcUh50
२. पतंग उडी
https://www.youtube.com/watch?v=JR-iD_8qo08
हे पचवले तर बोनस पाणीपुरी मिळेल.
https://www.youtube.com/shorts/nETqmIBqLFY
बाप रे!
बाप रे!
समांतर विश्वातले लोक आहेत हे
समांतर विश्वातले लोक आहेत हे

(No subject)
हे काय्ये?
हे काय्ये?
रघु तुम्ही चुकलात. गेल्या चांद्रयान मोहिमेनंतर सांगायचं ना हो इस्रोवाल्यांना.
बिचारे इतक्या मेहनतीने आणि डोकं, पैसे वापरून चंद्रावर चाललेत! या बाईला विश्वासात घ्यायचे ना! तिने घातली असती स्वयंवरासाठी चंद्रावर जाण्याची अट.
किंवा ती स्कुटीवाली चाललीच होती. काय तो पेट्रोलचा खर्च देऊन टाकायचा....
त्या पतंगवालीला तातडीने, कुठलीही टेस्ट न करता अग्निवीर/शिखा काय ते बनवून टाका. पॅराजम्पिंगची गरजच काय!
(No subject)
अ आणि अ धागा वाचून शेवटी
इथली पोस्ट नवीन धाग्यावर हलवली आहे.
function at() { [native code]
function at() { [native code] }तुल
माझे मन __/\__ आभार.
न्यूटन
न्यूटन
अचाट सीन्स आणि अतर्क्य लॉजिक
अचाट सीन्स आणि अतर्क्य लॉजिक लिहीण्यासाठी इथून पुढे नवीन धाग्याचा उपयोग करावा.
अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक - २
https://www.maayboli.com/node/2242
Pages