एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा!!... धमाल आहे हा धागा..
मी काही नियमित प्रेक्षक नाहीये या पर्वाची पण काही डांस पाहिले.. एनर्जी, कोरीयोग्राफी,पर्फोरमन्स सगळंच सुमार..
गेल्या लि'ल चॅम्प पर्वाचा प्रभाव अजुनही कायम असल्यामुळे असेल कदाचीत पण हे पर्व अजिबात पकड घेत नाहिये..

एक प्रश्न.. र.च्या.क.ने. म्हणजे?

श्रद्धा, रच्याकने म्हणजे रस्त्याच्या कडे कडेने (इंग्रजी बाय दि वे चे मराठी स्वैर भाषांतर)

माझं भाग्य थोर त्यामुळे मला कोरिओग्राफर नाचल्याचा एपिसोड बघावा नाही लागला.....
पण काल आरती सोळंकीने केलेली "बैठकीची लावणी" ही अखंड "बसकण" मारून सादर केली तेंव्हा त्या नव्या नृत्यप्रकाराला "बसकणीची लावणी" असं म्हणायचा मोह आवरला नाही...... Proud

अर्थात, आरतीचे एफर्ट्स आणि तिचे मनापासून नाचणं लाजवाब........ बाकी न बोललेलचं बरं.....

नेहा जोशी काल जे काही नाचलिये तिला आम्ही शाळेतल्या गॅदरिंगमधे प्रॅक्टिसला पण घेतलं नसतं..... Angry

वीकांताला ह्याचे रिप्ले येतील ना तेच बघेन. मला करेक्ट ९.२५ ला घोर ( पण न घोरता) झोपच येते. Happy
धागा लै मस्त चालला आहे.

कालच्या कार्यक्रमापेक्षा केजीच्या मुलांचे स्नेहसंमेलनाला जास्त चांगले डान्स आणि ड्रेस असतात. फार फार बोर मारलं काल.सुपु आणि पुक्याचे संवाद जरा आवरा रे.

"बसकणीची लावणी" >> Lol

त्या पुष्क्याला निवेदन कशाशी खातात ते माहित तरी आहे का? Angry
आणि तो मयुर पण नेहमीपेक्षा फारंच लाडे लाडे बोलत होता काल Angry
तद्दन भिकार, फालतू, टूकार, नासका, भंकस तमाशा, एकूण त्या प्रकाराला कार्यक्रम म्हणणं जीवावर येतं..

दक्षीला अनुमोदन..
कालच्या कार्यक्रमापेक्षा केजीच्या मुलांचे स्नेहसंमेलनाला जास्त चांगले डान्स आणि ड्रेस असतात. >>> अगदी अगदी..
सुपु आणि पुक्याचे संवाद जरा आवरा रे. >> मगकाय्तर.. भयंकर बकवास प्रकार आहे तो ओढूनताणून केलेला.. Angry
भुंग्या.. Lol

दक्षिणा अनुमोदन...!!:राग:
काल रात्री मी परवा चा ए पे ए पाहिलं...बापरे..!!!अरे त्या गिर्जाबाईंना कंबरेत आजिबातच काही लवचीकपणा नाहीये का?..किती बोजड दिसते!!
उर्मिलाचे एक्स्प्रेशन्स चांगले वाटले देवीच्या रूपांचे..बाकी सगळ्या अगदीच सुमार...! आरतीबद्दल च्या प्रतिक्रिया सुद्धा पटल्या..पण त्या कॉस्च्युम्स्चं कहीतरी केलं पाहीजे रे!
र च्या क ने, दिपाली विचारे नी 'भोर भई' ची तान माईम करताना गोल्ड्फीश सारखं तोंड का केलंय?

आता आज >>बसकणीची लावणी<< Lol पाहिलाच हवी.. Proud

कार्यक्रमाचे नाव 'एका पेक्षा एक - अप्सरा पर्व' पेक्षा 'एका पेक्षा एक - हिडींबा पर्व' असे असायला हवे होते असे इथले वाचुन आणि थोडेफार बघुन वाटले.......

की उगीच हिंडीबेला वाईट वाटेल म्हणुन अप्सरा म्हटले??

बसकणीची लावणी... Proud
किंवा फतकली ची लावणी म्हणा...! Proud
कालच्या एपिसोड मध्ये अप्सरांच्या नृत्यांपेक्षा 'महागुरू' सचिन च्या चेहर्‍यावरचे भावच जास्त प्रेक्षणीय होते...! बिच्चारे महागुरू !

माझी फेवरीट अप्सरा - मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)! बरीच बरी नाचते ती! आरती झी च्याच फू बाई फू मध्ये कधक्ध्धी छान नाचायची...त्याच्याच फिनाले मधे सचीन ने तिला ऑफर दिलेली..म्हणून बहुतेक ती अप्सरा म्हणून नाचायला आलीए..! स्मीता तांबे 'जोगवा' त होती. सोनाली खरे, खरेच चक्क वयस्क दिसते! सुरेखा पूणेकर ला ईकडे नाcअवून तीच डिग्रेडेशन च केलय झी वाल्याMनी...! नेहा पेन्डसे इथेही 'काशी'च करणार बहुतेक! Lol गिरिजा ओक...बरी आहे...! ऊर्मिला ही ठीक नाचते... नेहा जोशीच काही खर नाही...सगळ्यात पहिले तीच एलीमिनेट होणार बहुदा...!

आणि तो मयूर .... Proud तो..'तो' आहे की 'ती' आहे? म्हण्जे पुरुषा सदृष्य स्त्री आहे, की स्त्री सदृष्य पुरुष ??? कित्ती लाडिक लाडिक बोल्तो मेला. (मेली !) खाडकन एक मुस्कटात द्यावी अस वाटतं...!

या नाचतात तेव्हा माझ्या मुलिला एकच गोष्ट दिसते आणि ती सारखे म्हणत राह्ते.. ' प्वोट. प्वोट'...

कायच्या काय निंदा चाललिये इकडे.. हिडिंबा काय शूर्पणखा काय.. तरी बरं, अप्सरांना कोणी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही आणि हिडिंबा-शूर्पणखेलाही नाही.

काल कोणी आऊट नाही झालं... नुसतीच हूल दिली.

का रे हिडींबेला नाव ठेवता तेंचेसारख्या लोकांना वैट वाटत ना तुमाला बै मानसाच्या मनाची कदरच नै

अरे इथे हिडिंबा, शुर्पणखा सगळे "मयुरेशला" म्हणतायत ना..... Proud
मग ठीक आहे....... Lol

हिडिंबा आणि शुर्पणखा फिट होत्या... नाचताना त्यांची सुटलेली पोटं नाचायची नाहीत..... Proud
(पुष्करच्या स्वप्नात आल्या होत्या त्या)

(पुष्करच्या स्वप्नात आल्या होत्या त्या)

नुसत्या येऊन का थांबल्या????????? त्याचा खिमा का नाही केला??


का रे हिडींबेला नाव ठेवता तेंचेसारख्या लोकांना वैट वाटत ना तुमाला बै मानसाच्या मनाची कदरच नै

कदर आहे म्हणुन तर अप्सरा म्हटलेय.. Happy

माझं भाग्य थोर त्यामुळे मला कोरिओग्राफर नाचल्याचा एपिसोड बघावा नाही लागला.....
पण काल आरती सोळंकीने केलेली "बैठकीची लावणी" ही अखंड "बसकण" मारून सादर केली तेंव्हा त्या नव्या नृत्यप्रकाराला "बसकणीची लावणी" असं म्हणायचा मोह आवरला नाही......

अर्थात, आरतीचे एफर्ट्स आणि तिचे मनापासून नाचणं लाजवाब........ बाकी न बोललेलचं बरं.....

नेहा जोशी काल जे काही नाचलिये तिला आम्ही शाळेतल्या गॅदरिंगमधे प्रॅक्टिसला पण घेतलं नसतं.....
>>>>>> भुंग्या, Proud Proud Proud
कारेक्रम बघनार्‍या सर्व्या भगिणींना पुण्हा एकदा साश्रु णयणांनी प्रनाम!!!!!! आपली जिद्द, हिंमत, निरिक्षण शक्ती वाखाणण्यासारखी आहे. पण सर्वांत महत्त्वाचा म्हणजे आपला पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्युड ... निदान पुढचा एपिसोड तरी नक्कीच चांगला असेल या समजुतीवर तुम्ही हा कारेक्रम बघत असणार ... किती ती चिकाटी. असेच बघत रहा आणि निरिक्षणे नोंदवत रहा बुवा. हेच वाचायला मजा येते.

काल कोणी आऊट नाही झालं... नुसतीच हूल दिली.>>>
अहो कुटंबप्रमुख या नात्याने केले त्यांनी तसे. असे काय म्हणताय. केवढी जबाबदारी आहे त्याच्यावर कुटंबप्रमुख या नात्याने. Wink

पुष्करच्या स्वप्नात आल्या होत्या त्या)

नुसत्या येऊन का थांबल्या????????? त्याचा खिमा का नाही केला?? >> Rofl बेबे लईच हासले बै... Rofl

ये खरच अप्सरेपेक्षा डीआयडी मस्त आहे पण तिथले महाग्रु पण लैभारी सारख क्या बात, क्या बात , क्या बात करत असतात.
एभाप्र- सगळ्या नाचाच्या कार्यक्रमांना असे अवली महाग्रुच का लाभतात???

टीएल्सी वर एक शिमी म्हणून बेलीडान्स चे क्लासेस घेतात त्यातील नर्तिका केवळ अप्रतीम आहेत. तरी त्या चेहर्‍याचे विभ्रम किंवा त्यांची पर्सनॅलिटि नाचात दाखवीतच नाहेत. अतिशय न्युट्रल राहून नाच करतात त्या खर्‍या अप्सरा वाट्तात. ते संगीत व त्यांचे शेव्टी बेलीडान्सचा कॉश्च्यूम घालून एक सेगमेंट करतात तो ही अगदी सुरेख दिसतो. ग्रेट अ‍ॅब्ज.

हा कारेक्रम कुठे आणि किती वाजता दाखवतात म्हणे??? >>>
>>>>>>>>>>>मलाही हाच प्रश्न होता. पण नंतर कधी तरी पाहण्यात आला. ती स्मिता तांबे...तिचं नामकरण आमच्या घरी " महाराष्टाची नामांकित कबड्डी प्लेअर " असं झालं आहे. नाच की कबड्डी ? कळत नाही.
बाकी तर जास्त पाहू शकले नाही. आपणा सर्वांच्या पोष्टी वाचून "कारेक्रम" पाहिल्याचे समाधान मिळते.

Pages