एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीनही मेन्टॉर्सचा नाच मस्त झाला. प्रत्येकाची स्टाईल निराळी आहे. आवडले त्यांचे परफॉर्मन्सेस.
अप्सरा मात्र फारच प्राथमिक लेव्हलच्या आहेत Sad

काल मयुरवैद्यचा नाच ती मयुर म्हणुन बघितला तर एकदम झकास Happy अप्रतिम नाचला तो. आणि त्याची कोरिओग्राफीही उत्तम. गिरिजा ओक भरत नाट्यम करताना स्वतःचा 'ढ'पणा लपवु शकली नाही पण प्रयत्न उत्तम.
नेहा पेंडसे तर कथ्थक शिकलिये त्यामुळे नो वंडर की तिने छान केले.
एभाप्र - शेवटी महाग्रुंना सुपुंबरोबर नाचायची काय गरज होती का?? प्रत्येकवेळी स्वतःचा महाग्रुपणा सिद्ध करायची एकही संधी सोडत नाही तो माणुस Lol

गुरुलोकांचे डॅन्स भारी झाले. ती दिपाली त्या अप्सरांना (????????)स्वतःच्या मुली का म्हणते कळत नाही??

रच्याकने काल आजच्या सोलो परफॉर्मन्स्चे प्रोमोज दाखवले. गिरीजा ओक - भयानक दिसते आणि नाचलिये. Sad
मृण्मयीने आता काहीतरी नविन करायला पाहिजे.
सुपु तर हुकमी एक्का - पाडाला पिकलाय आंबा (लावणी सोडुन दुसर काय करणार नाहीत का त्या??)

त्या दिपाली ला नाचता तरी येत का?

आमच्या ऑफिसच्या कार्यक्रमासाठी दिपालीला कोरिओग्राफी करायाला सांगितली होती. ती आणि तिचा असिस्टंट तो विश्वास नाटेकर वैताग आहेत नुसते. डान्स शिकवण बाजूलाच नुसते ओरड्त बसायचे आमच्यावर.......:( आणि डान्सही काही चांगला बसवला नाहि.

मला तर मृण्मयीची दया येते, चांगली डांन्सर वाया जाणार.......

अरे किती सतत रडतात हे लोक, वैताग आला नुसता.
मी मयूरनृत्य पाहिले आणि ठार झोपलो. आयबीएन लोकमतला म्हाग्रू आले होते 'ग्रेट भेट' मधे, तिथे नीट बोल्ले, बाष्कळ बडबड फक्त इथेच का करतात?

फुलवाच्या ग्रूपने छान परफॉर्म केलं . नेहा पेंडसे , सोनाली खरे आणि उर्मिला कानेटकर ह्यांनी अतिशय फास्ट असं लोकनृत्य अप्रतिम सादर केलं .

मयूर वैद्य ची मेरे ढोलना सून ह्या गाण्यावर आधरित कोरियोग्राफी मला आवडली , कथ्थक , भरतनाट्यम आणि लावणी मस्त काँबो होतं . बघायला छान वाटलं . Happy मला स्वतःला सुरेखा पुणेकर आवडते आणि नेहा जोशी सुद्धा . गिरिजा मात्र नाचाच्या अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे . Sad

दीपालीचा ग्रूप मात्र फार ऑड आहे , मला तरी त्यांचा साल्सा अजिबात आवडला नाही . Sad

सर्व मेंटॉर्सच्या परफॉर्मंसबद्दल न बोललेलंच बरं . Sad

मयूरचा डान्स मलासुद्धा आवडला. त्याचे विचारसुद्धा खरोखर पटले. मी आणि नाच एवढच मला ठाऊक आहे....आणि तो नाचत पण तसाच होता. बंदे मे दम है (कॉरिओग्राफर म्हणून तरी) आणि बाकी त्याच्याबद्दल बोलायच झालं तर कदाचित कायम बायकी एक्सप्रेशन देऊन होत असेल असं..:अओ: ?
फुलवाचा डान्स मिसला...
आज आरती उडणार बहुतेक Uhoh

पहिल्या भागात नेहा पेंडसेला "शीला कि जवानी" या आयटम सोन्ग्वर पायभर "स्ल्याक्स" घालून नाचताना बघून साफ फुटलो, मेलो, वारलो, महानिर्वान्लो

आता माझे ही अपडेट्सः

काल मेंटॉर्स चे सोलो परफॉर्मन्सेस + त्यांच्या प्रत्येकी तीन अशा शिष्यांचे ग्रूप परफॉर्मन्सेस झाले.

१) फुलवा खामकरः
सोलो : हिने केलेला नृत्यप्रकार काय म्हणायचा??? किती वेळा ती याच प्रकारच्या नृत्याचा आविष्कार दाखवत राहणार?? फार जाडी वाटली. कुणीतरी वर पहिलवान म्हटलंय. अगदी तश्शीच दिसली मला पण ती.

ग्रूपः उर्मिला + नेहा पेंडसे + सोनाली
उत्तम डान्स
कसल्या भन्नाट नाचल्यात तिघी. देवींची ३ रुपे मस्त दाखवली.

२) दिपाली विचारे:
सोलो : भोर भये पनघट पे चे रीमिक्स.
गाणे सुंदर आहे पण दिपालीचा नाच अगदीच सुमार. टिपीकल कथ्थकच्या त्या स्त्रीच्या शृंगार करण्याच्या स्टेप्स Sad शिवाय तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव बघवत नव्हते इतके बेक्कार होते. आणि स्वतःचा तो प्लस पॉइंट म्हणे की हावभावांना कोरीओग्राफित महत्त्व देते.) चेहरा इतका वेडा वाकडा करत होती की बास रे बास!

ग्रूपः स्मिता + मृण्मयी + आरती
रद्दड डान्स
साल्सा फॉर्म नीट जमला नाहीये. Sad स्मिता जरा तरी बरी वाटत होती नाचताना. मृण्मयी कळपातून चुकलेल्या कोकरागत वाटत होती. कुणाचीच नीट प्रॅक्टीस झाली असल्याचे वाटत नव्हते एकुणच!
सचिन ने त्या तिघींच्या डान्स वर ज्या कमेंट्स दिल्या त्यावर मात्र पोट धरून हसायला आलं. Wink

३) मयुर वैद्यः
सोलो : तांडव नृत्य
बरे होते. खूप नाही आवडले. जुनाच नृत्यप्रकार आहे. वेगळेपणा नाही वाटला काही. हालचालींत आणि हावभावांत ग्रेस आहे हे मात्र नक्की.

ग्रूपः गिरिजा + सुपु + नेहा जोशी
'मेरे ढोलना सुन' गाण्यावर ग्रूप डान्स
डान्स ठिकठाक
एकाच गाण्यावर तीन वेगळे नृत्यप्रकार यात आता काही नावीन्य नाही. बुगी वुगी मध्ये टिल्ल्या टिल्ल्या पोरांनीही असे फॉर्म्स मस्त परफॉर्म केलेत.

कुणी नीट लक्ष देऊन ऐकलं का म. वै. च्या तोंडचं हे वाक्य???
"जे आर्टिस्ट असतं..........."

म्हणजे आता आर्टिस्ट ला ही हा नपुसकलिंगीच बोलतो का??? Rofl

पुक्या ने जुनाच शिळा झालेला "ढोलना" चा जोक खपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. Wink

अरे त्या दिपालीने स्पायडरमॅनचे कपडे का घातले होते?
अ‍ॅट लीस्ट तिचा तो लाल टॉप तसाच वाटत होता.
फुलवा चांगली नाचली तिच्यापेक्षा खूप.
म.वै. ला नाचताना बघून मला जोगवा मधला किशोर कदम आठवला का कुणास ठाऊक...
पण म.वै. पूर्ण क्लासिकल नाचायचा प्रयत्न करत होता.

अरे त्या दिपालीने स्पायडरमॅनचे कपडे का घातले होते?
>>>>>

चैतन्य, अरे दिपालीने "सुपरमॅनचे" कपडे घालणे कार्र्यक्रमात प्रशस्त वाटलं नसतं रे Proud म्हणून मग स्पायडर्मॅन....... Lol

मयुरेश वैद्यला बघून मला "हम है राही प्यार के" मधे जुहीशी लग्न करायला निघालेला तो कथ्थक डान्सर आठवतो....... "थोडा डाऊट्ट होता है" :हाहगलो:

कालचं ए.पे.ए पाहीलं आणि असा संताप आला ना.... आपण आपल मराठी मराठी म्हणुन आवर्जुन पहायचा कार्यक्रम... त्या सो कॉल्ड अप्सरा त्यांना डान्स तर येत नाहिच पण कॉस्चुम पण इतके घाणेरडे देतात
(कदाचित डिझायनरला या ओबड्धोबड बायका अप्सरा दिसत असतील)
ती गिरीजा ओक, म्रुण्मयी, आरती यांच पोट त्याच्या अंगापेक्षा जास्त हलत होत. निदान ते कॉस्चुमने तरी कंट्रोल करायच....
पण नाही स्वःताला अप्सरा समजत नाचल्या सगळ्या (नाचतात कुठे म्हणा त्या)......
सुरेखा पुणेकर लावणीच करणार का?????????
पुष्कर आणि सुरेखा बाईंना आवरा रे कोणीतरी...!!!! मागे झी मराठी च्या फीड्बॅक मधे लिहिल होत.... या अशा कार्यक्रमांमुळे मराठी प्रेक्षक कमी होतो......

>>> आपण आपल मराठी मराठी म्हणुन आवर्जुन पहायचा कार्यक्रम <<

काही गरज नाही पहायची. प्रेक्षकसंख्या कमी झाल्यावर आपोआप गुंडाळले जातात असे कार्यक्रम.

म्हाग्रूंचे एक वैशिष्ठ्य आहे, ते कारेक्रमाला बहुतेक ठरवूनच येतात की आज बेफाम कौतूक करायचे किंवा आज सगळ्यांच्या चुका काढायच्या. ते नाचातले बारकावे सांगतात तेंव्हा बरे असतात पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांना 'कुठे थांबावे' हे कळत नाही 'आणि मग ते जे बोलतात त्याच्याबद्दल मी काय बोलू!'
(अवतरण चिन्हातील वाक्य म्हाग्रूंच्या स्टाईलने वाचावे!)

काल बाहेर गेल्याने एपिसोड मिसला. शेवटचा डांस पाडाला पिकलाय आंबा बघितला - सुपुंचा.
बाकी दिवसभरात इथे कळेलच म्हणा कोण काय कस नाचल ते? Wink

सुरेखा पुणेकर लावणी करतात पण नाच करत नाहीत, सगळी लावणी डोळ्यांचे हावभाव, ओठांची हालचाल, हातांची बोटं यावर निभावून नेतात...
भाषा जरा बदलायला हवी त्यांची.. Sad
बाकी सगळ्या बाया बेक्कार नाचल्या एकदम.. बकवास प्रोग्रॅम...
सोनाली खरे बरी वाटली... पण काहीही म्हणा आरती सोळंकी सारखं मनाने तिथे प्रेझेंट होऊन कोणिच नाचत नाही... सुरेखा पुणेकर पैशासाठी स्टेजवर नाचते तशीच इथे कॉम्पिटिशन ला... आरती एन्जॉय करते.. बाकी सगळ्या, गळ्यात घेतलंय काम म्हणून पाटी टाकायला येतात....

आणि फुलवा सोडून हे कोण कोरिओग्राफर पकडून आणलेत?
काळी जिन्स घालून नाचणारी कोण ती Angry जराही स्टाईल नव्हती त्यात... बॉटम ३ मध्ये गेली ते उत्तम झालं...

<<पण काहीही म्हणा आरती सोळंकी सारखं मनाने तिथे प्रेझेंट होऊन कोणिच नाचत नाही.>>> अनुमोदन.... ती फु बाई फु पासुनच आवडते मला.... दिलखुलास व्यक्तीमत्त्व......

Pages