एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गिर्जा ओक नाचताना एक पिंप उभं ठेवलय आणि त्याला वरती एक मडकं.. बाजुला दोन काड्या आणि खाली दोन काड्या जोडल्यात असंच वाटत होतं...>>>> Lol
पहिल्यांदा वाचण्यात जरा चुक झाली होती, मला वाटल की गिरीजा ओक नाचतेय आणि स्टेजच्या सजावटीसाठी पिंप, मडक आणि काठ्यांचा वापर करून एखाद्या देशी दारूभट्टीचा फिल आणत असतील. असो, तो पुष्कर श्रोत्री का बोलतो, नॉर्मल नाही बोलताना आल तर चाबूक, ई. सारखे शब्द वापर ना, प्रत्येक अप्सरेशी जेव्हा जेव्हा फ्लर्ट केल्यासारख तो गरळतो, तेव्हातर याच्या बायकोला महाग्रूच्या ऐवजी का नाही बसवले असच वाटत ..... त्या नमुन्या सोबत एकच अप्सरा शोभुन दिसेल, मयुर वैद्य

मागच्या पर्वात मला अमृता खानविलकर आवडायची भार्गवी पेक्षा, तिचा डान्स भार्गवी पेक्षा ग्रेसफुल वाटायचा.
अमृता त्या पर्वात एकटीच स्टार दिसायची, बाकी पब्लिक पकाउ होतं , अनिकेत विश्वासराव बरा होता पण डान्स मधे अ‍ॅव्हरेज च !
अंकुश चौधरी तर अजारातून उठल्या सारखा खप्पड झाला होता तेंव्हा !

फुलवाच्या कॉमेंटस आणि अ‍ॅनालिसिस आवडला मला.... निदान आत्तापर्यंत तरी.... या सगळ्या जत्रेत तीच त्यातल्या त्यात सेंन्सिबल वाटतीय!

Lol

मागच्या पर्वात मला अमृता खानविलकर आवडायची भार्गवी पेक्षा, तिचा डान्स भार्गवी पेक्षा ग्रेसफुल वाटायचा.
अमृता त्या पर्वात एकटीच स्टार दिसायची, बाकी पब्लिक पकाउ होतं , अनिकेत विश्वासराव बरा होता पण डान्स मधे अ‍ॅव्हरेज च !अंकुश चौधरी तर अजारातून उठल्या सारखा खप्पड झाला होता तेंव्हा !
>>> अगदी अगदी .पुर्णपणे सहमत.
अमॄता खरंच चांगली नाचते चिरमुल काकुंपेक्षा..

मी थोडा पाहिला हा कारेक्रम, अजिबात झेपलाच नाही.... तुम्ही सर्वे जे हा संपूर्ण कारेक्रम इमानेइतबारे बघता त्यांना शतशः सादर सविनय सप्रेम सालंकॄत सलाम!

>फुलवाच्या कॉमेंटस आणि अ‍ॅनालिसिस आवडला मला.... निदान आत्तापर्यंत तरी.... या सगळ्या जत्रेत तीच >त्यातल्या त्यात सेंन्सिबल वाटतीय!

मला फुलवा आवडते...तिच्या कमेंट्सही सेन्सिबल असतात.
पण तिचं नाव नाही आवडत... उगाचच फुलवणे ह्या क्रियापदाचं आज्ञार्थी रूप Lol

बाकी महाग्रूबद्दल काय बोलणार?
बर्‍याचदा (खरं तर नेहमीच) म्हातारचळ लागल्यासारखा बरळत असतो नॉन-स्टॉप...

तो महागुरु आता स्वताला कुटंबप्रमुख म्हणतो. आणी सर्व काहि कुटंबप्रमुख या नात्यानेच म्हणतो.

सगळ्या मस्त नाचतात. एक पुणेकरीण सोड्ली तर.
अगदी आरती आणि गिरिजा या जाड्या पण.
रच्याकाने गिरिजा ही गिरिश ओक ची मुलगी काय?
तीच लग्न ठरलय. श्रीरन्ग गोड्बोलेच्या मुलाशी. सुरुध शी

माहाग्रू?? नुसता अश्चर्याचार्य आहे, कोणतीही बया कसेही पाय आपटून जावो, प्रत्येक पर्फॉमन्स नंतर या माणसाला काहितरी साक्षात्कार व्हायलाच पाहिजे angry_0.gif

काल खुपते तिथे गुप्तेचा एक भाग पाहिला, त्यात महागुरु आपल्या पत्नी समवेत अवतरले होते.
रॅपिड फायर सुरु होईल असं अवधुतने म्हटल्याबरोबर सुप्रिया मॅडम महागुरुनां म्हणाल्या एका शब्दात घ्यायची असतात ह्याची उत्तरं. Biggrin
मला बर्‍याचदा सुप्रियाच जास्त सेन्सिबल वाटते सचिनपेक्षा.

मला बर्‍याचदा सुप्रियाच जास्त सेन्सिबल वाटते सचिनपेक्षा.

आहेच ती तशी....ईटीव्ही वर "मानाचा मुजरा" की असाच काहीतरी कार्यक्रम लागत असे, त्यात हे जोडपं आलं होतं. सुप्रियाने खुप मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. अगदी नैसर्गिक वाटलं होतं ते. सचिन पण त्या वेळी डोक्यात इतका हवा गेल्यासारखा नव्हता वाटला, पण सुप्रिया तेव्हाही जास्त छान वाटली होती.

मला बर्‍याचदा सुप्रियाच जास्त सेन्सिबल वाटते सचिनपेक्षा.>>>मला पण .
"महाराष्ट्राचा सुपरस्टार " ह्यात ती जज होती. छान कमेंटस द्यायची Happy

बाकी ह्या कार्यक्रमात उर्मिला आणि मृण्मयी छान नाचतात आणि हो, मला आरती सोलंकी आवडते, जाड असलीतरी चांगली नाचते ती. Happy

सुप्रिया सचिनपेक्षा जास्त सेन्सिबल आहेच... Happy मलाही सचिनचा फार राग यायचा आधी, पण खुपते तिथे गुप्ते मधे दोघांचा जोडीचा इन्टरव्ह्यू पाहिला. खुप आवडला. सचिनचे वेगळे, सच्चे रुप दिसले त्यात. दोघांचे एकमेकांवरचे प्रेम अगदी स्पष्ट जाणवत होते. सचिनने बालिशपणे बोलणे आणि स्वतःला महागुरू, कुटुंबप्रमुख वगैरे म्हणणे बंद करावे, असे मनापासून वाटते.

मलाही आरती सोळंकी आवडते. फू बाई फू मधे तिचा नाच हे मुख्य आकर्षण असायचे तिच्या स्किट्सचे. इतकी जाड असूनही छान नाचते. तसा जाडीचा आणि नृत्यकौशल्याचा काहीच संबंध नाही म्हणा... जाडी वेगळी आणि स्थूलता वेगळी... नाहीतर सरोज खान कशी काय कोरिओग्राफर झाली असती बरं? असो, आरतीला अप्सरा बनवून जरा वेगळा विचार केलेला दिसला.

सुरेखा पुणेकर मात्र अगदीच ऑड वाटल्या... त्यांच्या तोंडी दिलेले चीप संवाद डोक्यात गेले. त्यांच्यामुळे टीआरपी खरंच वाढेल का? अशी शंका येतेय आता. शिवाय अतिपरिचयात अवज्ञा असा प्रकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

कालचा एपिसोड बघवलाच नाही Sad
जेवढ बघितल त्यात -
मृण्मयी ओके होती.
जुंबालिका जुंबालिका - अगदी ठरवुन दिल्यासारख गाण वाटल आरतीला. तिच्या बर्‍याचश्या स्टेप्स फूबाईफू मधल्या रिपिट केल्यासारख्या वाटल्या.
गिरिजा ओक - मला काही केल्या डोळ्यात पाणी आणणारा परफॉर्मन्स वाटला नाही. महाग्रुंच्या डोळ्यात हल्ली कश्यानेही पाणी येते म्हणजे मोतीबिंदुसाठी त्यांनी डोळे चेक करायची वेळ आली आहे.
गिरीजाला बघताना मला का कुणास ठाऊक पण पिंपावर मडके आणि चार काड्या आठवत राहिल्या.

पहिल एलिमिनिशन कोण असेल तर सोनाली खरे - सन्नी देओल ला तफ कॉम्पीटिशन आहे ती.

या पर्वात नक्की सुरेखा पुणेकर जिंकणार.- झी वाल्यांचे निकाल नेहमी ठरवुन दिलेले धक्केच असतात नेहमी Lol
कार्तिकी गायकवाड जेव्हा लिटिल चॅम्प जिंकली तेव्हाच झीची निर्णयप्रक्रिया चव्हाट्यावर आलेली. अर्थात निर्नयासाठी कोण बघतय म्हणा असले कार्यक्रम?

अपेक्षेप्रमाणेच कार्यक्रम आणि प्रतिक्रियाही. Wink Proud
फक्त ऊर्मिला आणि मृण्मयीसाठी नेटाने बघण्याचा प्रयत्न करणारे. शिवाय एंटरटेन्मेंट व्हॅल्यू आहेच! Lol
नवरा, मुलं सेटवर आली की डोळ्यात पाणी, ते कष्टी संगीत याचा उबग आलाय आता. एवढा त्रास होतो तर सांगितलंय कुणी नसत्या उठाठेवी करायला? मुलांना दूर ठेवून काम करणार्‍या जणू या जगातल्या पहिल्याच! धन्य.
गिरिजा ओक एक भयानक प्रकार आहे.एक्स्प्रेशन्स शून्य किंवा तेच. दीपाली विचारेची तिच्या नाचावरची प्रतिक्रिया म्हणजे बळंच.
मृण्मयी एक्स्प्रेशन्समध्ये सरस. ऊर्मिलाही.
मयूर वैद्यच्या त्रिकोणी डोंगराकृती ताणलेल्या भुवया पाहून रामदास पाध्येंच्या अर्धवटरावांची आठवण येते. बोलून झाले तरी भुवया तिथेच! Proud

>>>महाग्रुंच्या डोळ्यात हल्ली कश्यानेही पाणी येते म्हणजे मोतीबिंदुसाठी त्यांनी डोळे चेक करायची वेळ आली आहे. Biggrin

ऊर्मिला आणि मृण्मयीसाठी >> + जोश्यांच्या नेहेसाठी बघावा हा कार्यक्रम !

का व काय बघू नये >

बाकीच काहीच बघायची गरज नाही Proud

डुआया तुला का रे बाबा ती नेहा जोशी अ‍ॅड करावीशी वाटली???:हाहा:
स्टेजला खड्डे पडलेत बघ, ती रस्तेमे वो खडा थाला पाय दाणदाण आपटत होती तेव्हापासुन.

मयूर वैद्यच्या त्रिकोणी डोंगराकृती ताणलेल्या भुवया पाहून रामदास पाध्येंच्या अर्धवटरावांची आठवण येते. बोलून झाले तरी भुवया तिथेच! >> अरारा! Lol

<<पण तेव्हाही एक भा.प्र. होताच, की कथ्थक करणार्‍या पुरुषाने स्त्रीसारखं लाडेलाडे बोललंच पहिजे का...किंवा नॉर्मल पुरुषासारखं बोलता येत नाही का मग?<<

हो ना....टीवीवर, सिनेमात तरी आतापर्यंत असच दाखवलय!
थोडसं विषयांतरः कथ्थकच नव्हे तर सालसा करणारा 'संदीप सोपारकर' पण मला कधी कधी तसाच दिसतो! कदाचीत नृत्याने शरीरात येणा-या लवचिकतेमुळे असेल, पण मला कधीच संदीप सोपारकरचा सालसा खुप ग्रेट वगैरे वाटला नाही.

ओके. काल नेमका हा कार्यक्रम पहायला मिळाला नाही तेह्वा जरा चुकचुकायला झालं होतं की मृण्मयीच नाच पहायला मिळाला नाही म्हणून, पण एकूणातच फारसं वाईट वाटून घ्यायची गरज आहे असं दिसत नाहीये. Happy

<<पण तेव्हाही एक भा.प्र. होताच, की कथ्थक करणार्‍या पुरुषाने स्त्रीसारखं लाडेलाडे बोललंच पहिजे का...किंवा नॉर्मल पुरुषासारखं बोलता येत नाही का मग?<< पुरुषाच अस वागण खुप चीप वाट्त..

कधी कमल हसनला पाहील आहे का भरतनाट्यम करताना ? एखाद्या स्त्रिला लाजवेल असा ग्रेस आहे त्याच्याकडे...

Pages