एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कमल हसनला पाहील आहे का भरतनाट्यम करताना ?

नेमका मुद्दा
कमल हसनकडे नृय्त्यप्रवीणता आहे. त्याने ते शिकून घेतलंय. त्याचबरोबर तो तेव्हढ्यावरच थांबलेला नाही. ...

गिर्जा ओक नाचताना एक पिंप उभं ठेवलय आणि त्याला वरती एक मडकं.. बाजुला दोन काड्या आणि खाली दोन काड्या जोडल्यात असंच वाटत होतं...>>>>
पहिल्यांदा वाचण्यात जरा चुक झाली होती, मला वाटल की गिरीजा ओक नाचतेय आणि स्टेजच्या सजावटीसाठी पिंप, मडक आणि काठ्यांचा वापर करून एखाद्या देशी दारूभट्टीचा फिल आणत असतील. >>>

अगदी अगदी.... मलाही प्रसिक यांच्याप्रमाणेच वाटलं होतं. Proud

बादवे, काल पुक्याने व्हॅसलिनचा उच्चार बरोबर केला बहुतेक.

गिरिजा ओक च्या लाईफ मध्ये काही ट्रॅजिडी होती काय??? काल काय रोना धोना चालू होता?? Uhoh

सोनाली खरेचा नवरा कोण आहे तो???? मला तरी "प्यार तो होनाही था" मधला काजोलच्या बॉयफ्रेंडचे काम करणारा नट वाटला.

कालच्या भागात मृण्मयी काय जाडी दिसत होती.. एक्स्प्रेशन्स मस्त होती ..पण जरा जाडी कडे लक्ष द्यायला पाहिजे.....

मला तरी "प्यार तो होनाही था" मधला काजोलच्या बॉयफ्रेंडचे काम करणारा नट वाटला. >> हो तोच आहे तो, बिजय आनंद !

सगळ्यांनीच ५ आणि ६ तारखेला भाग पाहून अनुक्रमे ६ आणि ७ तारखेला लिहिले आहे! Uhoh

बाकी नाचाचे प्रोग्राम्स तर जाऊचदे, पण गेलाबाजार 'झलक दिखला जा'मधले सेलिब्रिटीसुद्धा बरे नाचतात ह्या बायकांपेक्षा! ह्या वेळात दुसर्‍या कोणत्या चॅनेलवर ह्यापेक्षा बरा कार्यक्रम लागतो हे कळवा प्लीज Proud

हा, हा, कळाले. मला वाटले कि गुरु-शुक्र आहे ,तसे नाहि, बुध्-गुरु आहे होय?
पाहिले, इकडची वर्णने वाचुन करमणुक जास्त होते.

>>>> ह्या वेळात दुसर्‍या कोणत्या चॅनेलवर >> डिस्कव्हरी / सीएनएन / बीबीसी Lol
मी यावेळेत सीआयडी अन झलकदिखलाजा अशा दोन्हीमधे दया ला नाचताना(?) बघतो Proud
बाकी सर्व वाहिन्यान्वर दर मिनिटागणिक पुतळेच पुतळे दाखवतात. त्या येड्या ब्रिगेड्यान्नी दादोजीच्या ऐवजी या सेरियल मधल्या पुतळ्यान्ना हात घातला अस्ता तर? Wink

निंबुडा (लिंबु) आणी पोहे पिवळे असतात म्हणुन अनुक्रमे म्रुणमइ आणि गिरीजाने पिवळे कपडे घातलेले कि काय?

मागे एकदा कुठल्यातरी पेपरमधे वाचलं होतं, की उर्मिला आणि आदिनाथ कोठारे लग्न करतायत म्हणे. आदिनाथ म्हणजे महेश कोठारेंचे सुपुत्र...
बहुतेक "जोडी जमली रे" असं कहीतरी सदर होतं ते पेपरातलं. खरंच मला बरोबर आठवतंय की चुकीचं?

अवांतर..
नेहा पेंडसेचा लावणी डान्स बघितला. एकूणातच हल्ली नऊवारी साडी अतिशय सुंदर पद्धतीने नेसता येत नाही का? किंवा जी काही शिवलेली साडी असते, ती तरी छान असू शकत नाही का? एकतर हल्ली मुली फिगर राखून असतात (अप्सरा सणसणीत अपवाद आहेत), आणि नऊवारी अगदी बारीक मुलीला चांगली नाही दिसत. पण कमरेपासून पायापर्यंत साडीला ज्या थोड्या, आणि किंचित सैल चुण्या असायला हव्यात त्याच गायब असतात. आणि खांद्यावर घेताना पदराचा दुसरा काठ जो उजव्या ढोपराजवळून घेतात तो जास्त ओढून वर घेतला की डावा पाय अगदी साडीत असूनही जीन्स मधल्यासारखा दिसतो. कधी कधी फार विचित्र दिसतं ते!
जुन्या काळातले लावणीप्रधान चित्रपट बघितले की हा फरक नीट कळतो.
हे असं...
http://www.youtube.com/watch?v=v8o6qWF8gxs&feature=channel

हल्ली साडी सांभाळणं वगैरे सवयीचं नाही म्हणून अपेक्षितही नसेल, पण जे आहे ते तरी चांगलं दिसावं. (हे आपलं माझं मत)

<<नेहा पेंडसेचा लावणी डान्स बघितला. एकूणातच हल्ली नऊवारी साडी अतिशय सुंदर पद्धतीने नेसता येत नाही का? किंवा जी काही शिवलेली साडी असते, ती तरी छान असू शकत नाही का? एकतर हल्ली मुली फिगर राखून असतात (अप्सरा सणसणीत अपवाद आहेत), आणि नऊवारी अगदी बारीक मुलीला चांगली नाही दिसत. पण कमरेपासून पायापर्यंत साडीला ज्या थोड्या, आणि किंचित सैल चुण्या असायला हव्यात त्याच गायब असतात. आणि खांद्यावर घेताना पदराचा दुसरा काठ जो उजव्या ढोपराजवळून घेतात तो जास्त ओढून वर घेतला की डावा पाय अगदी साडीत असूनही जीन्स मधल्यासारखा दिसतो. कधी कधी फार विचित्र दिसतं ते!
जुन्या काळातले लावणीप्रधान चित्रपट बघितले की हा फरक नीट कळतो.>>> अगदी अगदी प्रज्ञा. मला पण हेच म्ह्णायच होत. धड जीन्स नाही आणि धड साडी नाही.

बाकी गिरीजाचा नाच तथाकथीतच होता पण गाण जे तीने निवडल होत ते मात्र छान होत.
रच्याकाने ह्या एवढ्या लवकर जाड कशा होतात ? का ह्या स्वःताला मेंन्टेन नाही करत ?

>>मयूर वैद्यच्या त्रिकोणी डोंगराकृती ताणलेल्या भुवया पाहून रामदास पाध्येंच्या अर्धवटरावांची आठवण येते. बोलून झाले तरी भुवया तिथेच!
अगदी अगदी Happy

मयुरेश वैद्य हा ६० किलो "करण जोहर", २५ किलो "बॉबी डार्लिंग" आणि ५ किलो मयुरेश या मिश्रणाचा बनलेला वाटतोय........ Proud

तद्दन फालतू नाचाला पण स्टँडिग ओव्हेशन काय आणि स्तुतीसुमने काय......... धन्य ते महागुरू.... :रागः

मवै बद्दलची टिपण्णी अगदी अगदी Proud

ऑफिस मधे विदाऊट आवाज चार एपि उडत उडत पाहिले.
सलग पाहिल्यामुळे दरवेळी सुपु यायच्या आधी 'पुक्या' (ह्या शब्दाबद्दल निंबुडा ना १०० मार्क..) श्रो(तो)त्री
असं काय क्यामेर्यात २ सेकंद मद्दडपणे बघतो म्हणून पुन्हा मागे जाऊन पाहिलं तर तो तिच्यासारख्या भुवया उडवायचा प्रयत्न करतोय ते दिसलं! धन्य आहे रे बाबा!!! Angry

रच्याकने...मला डायलॉग कळले नाहित त्यामुळे इथलं वाचून जाम मजा आली.. Lol

उर्मिला चा पहिला सिनेमा "शुभमंगल सावधान" हा महेश कोठारे यांचाच होता आ?? म्हणजे उर्मिला ही महेश कोठारेंची फाईंड का??

आदिनाथ कोठारे "माझा छकुला" मधला बालकलाकार ना??? आता सिनेमात काम करतो का तो?

धन्य झालो! "त्या/ती" चे न्रुत्य पाहुन. आणी "त्या/ती" ची आणी "पुश कर" चा नंतरचा संवाद पाहुन.

आदिनाथ आता निर्माता आहे. म.उ. वा. त्यचिच निर्मिती.
र.च्या. क.ने. काल गुरु नाचणार आसे पु.श्रो. नि जाहिर केल्यावरच खात्रि पटली की आज लै करमनुक व्हनार.
तुमच्या ट्टिपणी मुळे त्या म्.वै. ला बघुनच हसु येते.
महाग्रु जे पैसे देतात त्याचा उद्देश काय असावा? आता ती फुलवा (लालबागच्या खामकर मसालेवाल्यांची सुन ) त्यांची लाडकी,तिला दिले पैसे की झक मारत सगळ्यांना द्यावे लागले.
र्.च्या.क. ने. ति दिपाली विचारे थोडी चकणी आहे का? उजवा डोळा?

आदिनाथ आता निर्माता आहे. म.उ. वा. त्यचिच निर्मिती.
र.च्या. क.ने. काल गुरु नाचणार आसे पु.श्रो. नि जाहिर केल्यावरच खात्रि पटली की आज लै करमनुक व्हनार.
तुमच्या ट्टिपणी मुळे त्या म्.वै. ला बघुनच हसु येते.
महाग्रु जे पैसे देतात त्याचा उद्देश काय असावा? आता ती फुलवा (लालबागच्या खामकर मसालेवाल्यांची सुन ) त्यांची लाडकी,तिला दिले पैसे की झक मारत सगळ्यांना द्यावे लागले.
र्.च्या.क. ने. ति दिपाली विचारे थोडी चकणी आहे का? उजवा डोळा?

काल फुलवा व तिच्या तीन देव्या काय नाचल्यात. फुलवा पहिलवानासारखी दिसत होती. पुढचे नाच बघवले नाहेत कसे झाले.? मयुरबाळा कशी नाचली?

मयूरची कोरिओग्राफी मला आवडली काल. छान होती कल्पना.
फुलवाचा नास मिसला.
पण ह्या कार्यक्रमात आता एवढ्यातच डोळ्यांतून पाणी का काढत आहेत? तेही महागुरुच्या वक्तव्यांवर? की त्यामुळेच? Proud

मयूर वैद्य सोडून सगळ्यांचे नाच मला आवडले काल... तो चक्क मधे नुसताच उभा राहत होता दम खायला. तोडा (चुभूदेघे) पूर्ण व्हायच्या आधी पुन्हा नाच आणि मधेच पुन्हा दम खायला उभा...

आरतीबद्दल दिपालीची कमेंट ऐकून भन्नाट हसले.

तो रडारड प्रकार तद्दन फालतू.

Pages