एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निंबूडा, कदाचित ठरवून घेतही असतील कोणाला कोण अप्सरा मिळणार ते. पण दाखवण्यासाठी प्रत्येक कोरिओग्राफरच्या नावाच्या तीनच चिठ्ठ्या असतात. तेवढं समजतं त्यांना Happy प्रेक्षकांना त्यांच्यापेक्षा जास्त समजतं ते त्यांना नाही समजत, हा भाग वेगळा Proud

शैलजा, मृण्मयीचा आज असेल नाच. काल चार झाले, आज उरेलेले.

प्रत्येक कोरिओग्राफरच्या नावाच्या तीनच चिठ्ठ्या असतात.

हेच टायपायला घेतल होतं. असो. निंबे, लैच सरदार हाइस तु.

इथले वाचुन काल इथे दिलेला गिरीजाचा इंट्रो आणि नंतरचा नाच पाहिला.. धन्य झाले..... आता पुढचे काही पाहायला नको.

गिरीजाने स्वतःचा इंट्रो पाहुन योग्य तो बोध घ्यावा नाहीतर लवकरच सविता प्रभुणे सारखी तीही हिंदी मालिकांमध्ये भरजरी पट्ट्यांच्या साड्या नेसुन आई बनलेली दिसेल.

प्रत्येक कोरिओग्राफरच्या नावाच्या तीनच चिठ्ठ्या असतात.
>>>
अरे, मला तर त्या काचेच्या बोल मध्ये तीनच चिठ्ठ्या दिसल्या ना एकुण. Uhoh म्हणून प्रश्नच पडला मला.

असो.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वतःच्याच कोरीओग्राफर्स ची लाला करण्याचा खटाटोप कशाकरीता होता??? Uhoh

चिठ्ठ्या कोर्‍याच नसतील कशावरून? Proud

मी उर्मिला आणि मृण्मयीसाठी बघणार तो कार्यक्रम...... त्यासाठी डोळ्यांवर बाकीच्यांची नृत्य बघण्याचे अत्याचार झेलायला तयार आहे. आणि हो, मला आरती सोलंकी आवडते आणि तिचा नाचही आवडतोय. Happy

मस्त कमेंट्स..नेहा जोशी अशी गरागरा डोळे फीरवत होती अजून फिरवले असते तर खाली पडले असते.. अरे सर्वजण इंट्रो विसरले का मेंटॉर्सची... मयुरच्या इंट्रोमधे निवेदक सांगत होता की तो एक अनुभवी रशीयन बॅले आणि बेली डान्सर आहे..बेली डान्सर..ही ही ही... पुणेकर बाईंचा पण तो फेवरिट आहे म्हणजे असे त्याच म्हणाल्या..सर्वच डॅन्स एकदम भंगार..

मलाही पुणेकरबाई काय भारी वगैरे वाटल्या नाहीत. पण लावणी सोडून इतर काही करत आहेत, ते स्वागतार्ह. त्यांना स्वतःला त्या बाजातून बाहेर पडायचं असं म्हणतात, तर ते पुष्करबरोबरचे चीप संवाद कशासाठी?
<<< अगदी अगदी , अतिशय चीप !!

पूनम,
ती ना मानोंगे आणि रस्तेमे वो खडा था वाली बया सेम च का Biggrin ??
डान्सर म्हणून तरी अजिबात नाही आवडली, बाकी कोणत्याच सिरिअल्स ब्घत नाही म्हणून कोणीच माहिती नाहीये.
उर्मिला कानिटकर फक्त माहितेय, चांगली डान्सर आहे ती, इथे कोरिओग्राफर चांगला मिळो फक्त तिला !

काल त्या पिवळ्या बाईला तो ड्रेस फार चीप दिसत होता , उगीच दीपिकानी पोटिमा ड्र्स घातला म्हणून हिने पण का Proud
कुठे ती , कुठे ही ..आणि नुसत्या उड्या मारत होती डान्स्च्या नावा खाली !
बाकी प्रोग्रॅम मराठी असून मधे सगळे हिन्दी गाण्यांवरच नाचतात का नेहेमी ?
मराठी केलच तर मग फक्त लावणी !

डिजेतै... थांबा थांबा जरा... आज आहेत ना मराठी गाणी..
गिर्जा ओक नाचताना एक पिंप उभं ठेवलय आणि त्याला वरती एक मडकं.. बाजुला दोन काड्या आणि खाली दोन काड्या जोडल्यात असंच वाटत होतं... काल दाखवलेल्या प्रोमोत...

>>बाकी प्रोग्रॅम मराठी असून मधे सगळे हिन्दी गाण्यांवरच नाचतात का नेहेमी ?

नेहमी पडणारा प्रश्न. सगळ्या मराठी रजन्या/ गौरव वगैरे दाखवतात त्यातही हिंदीच गाणी! Uhoh

लावणी सोडून कुठल्या मराठी गाण्यांवर नाचता येईल..?
इथं विचार करणारी बाहुली कल्पावी

१. सूर तेच छेडिता
२. अखेरचा हा तुला दंडवत
३. शूर आम्ही सरदार..
४. आज चांदणे उन्हात पडले
५. रात्रीस खेळ चाले
६. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
७. घर थकलेले संन्यासी
८. केव्हातरी पहाटे
९. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
१०. ढगाला लागली कळ...

१. ढिपाडी ढिपांग
२. मल्हार वारी
२. झुलतो बाई रासझुला
४. गोमू संगतीनं
५. मी रात टाकली
६. एक लाजरा न साजरा मुखडा
७. ही नवरी असली
८. ही चाल तुरुतुरु
९. कोळी गीतं?
१०. दादा कोंडकेंची गाणी?
११. शारद सुंदर चंदेरी राती
१२. येऊ कशी प्रिया
१३. ऋतू हिरवा (शास्त्रीय बाज ठेवून)

अ़जूनही असतील..

४. आज चांदणे उन्हात पडले
>>

आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे , अस आहे ते.

Kaalchyaa bhaagaat, Surekha Punekar yaanchyaashee tyaanchyaa performance vishayee boltaanaa aani Mahaguru aaple mat denyaachyaa madheel kaalavadheet
bichhaaryaa Pushkar chi avastaa

SAHAN HOT NAAHI AANI SAANGATA HI YET NAAHI

ashi jhaali hoti.... Happy

अरे खरच की निंबे, अग ती इतकी बकवास हावभाव करत होती (अप्रतिम एक्सप्रेशन्स - मेंटॉर्सच्या मते) की गाणे पण लक्षात नाही राहिले.
सगळ्यांना कार्यक्रमाआधी १ तास पळायला लावायला पाहिजे म्हणजे पुढच्या दोन तीन एपिसोडनंतर भोपळ्या मिरच्यांच्या लवंगी मिरच्या होतील.

मी कालच हा कार्यक्रम पहिल्यांदा बघितला ..बंडल तद्दन बकवास वाटला...

स्मितागद्रे | 31 December, 2010 - 13:32 नवीन
मला सगळ्यात सुरेखा पुणेकरची अदाकारी आवडली, तिच्या सारकीए ग्रेस कुणालाच नाहीये

>>> ती तर सगळ्यात बोअर मारत होती..

>>अरे सर्वजण इंट्रो विसरले का मेंटॉर्सची

मी फक्त ही इन्ट्रो पाहिली आणि चॅनेल बदललं. Proud निंबुडाची पुरीची पोस्ट (फॉफ फॉफ फॉफ) वाचून पुष्कर श्रोत्रीला बोलताना ऐकायची फार इच्छा होती. पण "नगार्‍याच्या घाईपुढे टिमकीचं काय" ह्या न्यायाने महागुरुंच्या वाकसामर्थ्यापुढे त्याला बोलायची संधी मिळेतो थांबण्याचा पेशन्स मला नव्हता.

गिर्जा ओक नाचताना एक पिंप उभं ठेवलय आणि त्याला वरती एक मडकं.. बाजुला दोन काड्या आणि खाली दोन काड्या जोडल्यात असंच वाटत होतं... काल दाखवलेल्या प्रोमोत...<<< अशक्य हसले मी...

गिर्जा ओक नाचताना एक पिंप उभं ठेवलय आणि त्याला वरती एक मडकं.. बाजुला दोन काड्या आणि खाली दोन काड्या जोडल्यात असंच वाटत होतं... काल दाखवलेल्या प्रोमोत...<<< अशक्य हसले मी...

लावणी सोडून कुठल्या मराठी गाण्यांवर नाचता येईल..?
>>>
मागच्या सेलेब्रिटी पर्वात भार्गवी चिरमुले ने "लवलव करी पातं...." वर किती छान डान्स केला होता. Happy

आताच्या पर्वात पहिल्या आठवड्यात आणि याही आठवड्यात उर्मिला ने मराठीच गाण्यांवर डान्स केलाय Happy

इंद्रा Biggrin
स्मिता तांबे आणि तिचा नाच पाहून, अंतरा माळी नामक भयानक खप्पड प्रकार आठवला.
बोबडा पुष्कर आणि महाबोअर म्हाग्रू परवडले असा तो मयूर आहे. तरी बरे या एपिसोडला त्याला कडेला बसवला, नायतर अगदीच 'मधला' वाटत होता Proud
सुरेखा पुणेकरला व्होट्ससाठी चॅनल लई पुढे नेणार.

अंतरा माळी नामक भयानक खप्पड प्रकार आठवला. >>> Biggrin

बोबडा पुष्कर आणि महाबोअर म्हाग्रू परवडले असा तो मयूर आहे. तरी बरे या एपिसोडला त्याला कडेला बसवला, नायतर अगदीच 'मधला' वाटत होता >>>:हहगलो:

आगावा तु बेस्ट आहेस रे...

परवा कोणत्या तरी एका कार्यक्रमामध्ये भार्गवीने लाल निळी साडी भयाण रीत्या नेसून, भयाण नाच केला होता.

<<पण "नगार्‍याच्या घाईपुढे टिमकीचं काय" ह्या न्यायाने महागुरुंच्या वाकसामर्थ्यापुढे त्याला बोलायची संधी मिळेतो थांबण्याचा पेशन्स मला नव्हता>>.................... Proud

Pages