एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते त्याचे आई वडील मराठी आहेत आणि त्याचे वडिल तर मराठी चित्रपट निर्माते होते.
>>>>>>>>>>>>>>< हो ना,म्हणुनच जास्त राग येतो असं कोणी बोललं तर. आणी हिंदी मध्ये सुपरस्टार असल्यासारखं बोलत होता. Proud त्याच्या म्हणन्यानुसार त्याने ज्या भुमिका केल्यात त्या भल्या छोट्या असतील पण अतिशय महत्वाच्या होत्या. Happy त्यांच्याशिवाय चित्रपट पुर्ण झालाच नसता.

>>त्याच्या म्हणन्यानुसार त्याने ज्या भुमिका केल्यात त्या भल्या छोट्या असतील पण अतिशय महत्वाच्या होत्या. स्मित त्यांच्याशिवाय चित्रपट पुर्ण झालाच नसता.

हो ना, त्याला शोलेमधे गब्बर सिंगने मारलं नसतं तर "जानते हो दुनियामे सबसे बडा कौनसा बोझ है?" असा जबरदस्त ड्वायलॉग एके हंगलला कसा मारता आला असता? आता गब्बरने त्याला प्रत्यक्ष मारलेलं दाखवलं नाहिये तर माशीच्या मारण्यातून सूचित केलंय हे सोडून द्या. उगाच बायाबापड्यांना का रडवा हा सूज्ञ विचार सिप्पीने केला असेल. पण त्यामुळे महाग्रूंची व्यक्तिरेखा कमी महान ठरत नाही Happy

सत्ते पे सत्ता मध्ये तर त्याचा ७ भावातल्या एका भावाचा रोल होता....प्रत्यक्ष बिग बीबरोबर हा छोटा "पी" (- फॉर पिळगावकर). आहात कुठे? Happy

झालंच तर, बालिकाबधू आणि अखियोंके झरोकोसे मध्ये हिरवीणी तोंडी लावायला होत्या. हाच नसता तर बालिकाबधू कोणाची बरं बधू झाली असती? आणि रंजिताने अखियोंके झरोकोसे कोणाला पाहिलं असतं?

विसू. त्याचे बाकीचे पिक्चर्स मला खरोखर माहित नाहीत.

ह्या रविवारी एका वाहिनी´वरील मुलाखतीत सचिनने सांगितले कि लग्न होईपर्यंत त्याचे मराठी नीट नव्हते,का तर तो हिंदी चित्रपटस्रुष्टीत होता म्हणून

ह्म्म्म्म....... बाबा आदमच्या जमान्यात तो हिंदी चि.सृ. मध्ये होता हे आजच्या जनतेला कसे कळणार???? म्हणुन असली वाक्ये.....

सई परांजपेची एक सिरीयल होती. त्यातल्या एका ७-८ मुले आणि आईबाबा असलेल्या कुटूंबात कोणालाही नवेकोरे काही मिळायचे नाही. एकदा एका मुलाला नशिबाने पायातले मोजे नवे मिळतात. तो ते घालुन शेजारी जातो आणि शेजा-यांचे लक्ष पायाकडे वेधण्यासाठी पायांचा हातासारखा उपयोग करतो...... म्हाग्रुवर ही वेळ यावी :आश्चर्याने थक्क झालेली बाहुली:

म्हाग्रु त्यांच्या न्हानपणी न्हान मुलाणचे वाटोळे (role चा मर्‍हाटी सबुद) करावयाचे. तेवा ते बरे वाटायचे. पण झाले काय की त्याण्च्या त्याच वाटोळ्याणला सर्व्याणनी डोक्यावर घेतल्यावर ते मोठेपणी सुध्दा जास्ती करून न्हान मुलाणचे रोल करू लागले आणि आपलं पाप उभं राहिलं.

असो. कालचा कारेक्रम ५ मिनिटे धीर करून पाहिला. त्यानंतर डोळ्यावरचे अत्याचार सहन न होऊन मन बंड करून उठलं आणि मी टिव्ही बंड केला. Proud

युट्युबचा हा एक फायदा.. फक्त आणि फक्त डान्सचा भागच बघते मी.. महाग्रु, पुक्या, मवै वगैरे हस्ती दिसल्या की फॉरवर्ड.

स्वप्ना ... Lol

सत्ते पे सत्ता मध्ये तर त्याचा ७ भावातल्या एका भावाचा रोल होता....प्रत्यक्ष बिग बीबरोबर हा छोटा "पी" (- फॉर पिळगावकर). आहात कुठे? <<<< आणि नुस्ता एक भाऊ नाही, सगळ्यांत लाडका भाऊ.

'नदिया के पार'मध्ये होता ना आणि तो. आता जर तो नसल्याने 'नदिया के पार' आला नसता, तर राजश्रीवाल्यांनी 'हम आपके है कौन?' कसा काढला असता? (आता महागुरू एखाद्या एपिसोडमध्ये 'सलमानने हम आपके..च्या वेळेस माझ्याकडून टिप्स घेतल्या' असंही सांगतील.) Proud

ह्यातली पहिली बाद फेरी कधी आहे? तीच बघेन म्हणते. तेव्हढीच एखाद-दुसरी अप्सरा कमी पाहिल्याचा आनंद. ह्यात प्रेक्षकांचे एसएमएस व्होटिंग नाहीये का?

काल महागुरूने स्वतःला "इंद्र" म्हणवून घेतले आणि मग सगळ्या अप्सरा इंद्राच्याच घरी असतात असा काहीतरी टुकार मराठी शेर टाकला...... त्यावर पुक्याने "अबब..... केवढामोठा हत्ती" अश्या आविर्भावात चेहरा फिरवला....

काय चाललय काय??????? Sad

काल नेहा पेंडसे नाचल्यावर बाजुला सुप्रिया ताई होती म्हणून नाहीतर महागुरू उठणारच होते............ नोट फिरवायला.... Proud

अरे हो प्रसन्न......

फिल्मी मंडळी सर्रास असेच करतात...... कालच्या कार्यक्रमात फुलवाने "ते परफॉर्मन्स" असाच उल्लेख केला......... मी आपला उगाच, नक्की "तो" परफॉरम्न्स की "ते" परफॉरमन्स असा विचार करत बसलो.. Proud

हे म्हणजे कोल्हापूरकडची मंडळी आठवली..... "अरे ते सचिन बघ की कसं रना करतय भारी" Rofl

वर लिहिलेल्या वाक्यातला सचिन म्हणजे "महागुरू" नव्हे, महागुरू फक्त कॉमेंट्री करू शकतात, रना नाही Proud

त्या आरती चा डान्स पाहुन फक्त मलाच खवळायला होते का इतर कोणालाही तसेच वाटते?

हा काय उपेक्षिताना या निमित्ताने चान्स देण्याचा कार्यक्रम आहे का? ती चांगली दिसत नाही/नाचत नाही आणि "अप्सरा" हे नाव असलेल्या कार्यक्रमात ती फिट नाही हे अगदी स्पष्ट आहे. बर दिसणे आणि स्थुलपणा समजा ठीक आहे पण नाचाचे कौशल्य तरी हवे? फु बाई फु मधे नाचणे वेगळे आणि नाचाच्या कर्यक्रमात नाचणे वेगळे.

>>>> सगळ्यांना पायताण काढून हाणल पाहिजे =)) <<<<<
>>> प्रोग्राम आवडला नाही म्हणून प्रतिक्रिया काहीही द्यायच्या का? त्या सगळ्या चांगल्या नाचत नसल्या तरी पायताणाने हाणण्याजोगं काय केलंय त्यांनी?
अनुमोदन!
ही अस्ली ब्रिगेडी आणी मनसे आणी शिवसेनेसारखी दळभद्री भाषा इथे शोभत नाही, चालत नाही.
तुम्ही पायताणाने मारायला (वा त्यान्यावर नोटा उधळायला) त्या काय जत्रेतल्या तमाशाचा फडावर किन्वा दारुच्या अड्ड्यावर नाचायला उभ्या नाहीयेत, बघवत नसेल तर गुमानं टीव्ही बन्द करा!

अजुन एक मजा, आताच कालच्या भागातला नेहाचा डान्स (सतरंगी रे) पहाताना लक्षात आलं की तिचा ड्रेस तिच्या पहिल्या पर्फोर्मन्स (शीला की जवानी) मधलाच आहे.. टॉप बदललाय फक्त! कॉस्च्युमसाठी असलेल्या तुटपुंज्या बजेटचा बोर्‍या वाजलाय की काय आतापासुनच! Proud

@ गणू

तो प्रतिसाद उडवून बरेच तास झालेले आहेत, शिवाय मी जाहीर माफी सुद्धा माफी मागितलेली आहे.
आणि तो प्रतिसाद "आवतण आणि पायताण" ह्याचं यमक जुळवण्यासाठी दिलेला होता...
बाकी माझं काही वैर नाहीये त्या अप्सरांबरोबर

आणि आता तरी सुद्धा कोणाला प्रोब्लेम असेल , तर त्यांनी तीच पायताण घालावीत आणि धाग्याबाहेर चालू लागावं

खुलासा संपला

<<<< त्या आरती चा डान्स पाहुन फक्त मलाच खवळायला होते का इतर कोणालाही तसेच वाटते?

हा काय उपेक्षिताना या निमित्ताने चान्स देण्याचा कार्यक्रम आहे का? ती चांगली दिसत नाही/नाचत नाही आणि "अप्सरा" हे नाव असलेल्या कार्यक्रमात ती फिट नाही हे अगदी स्पष्ट आहे. बर दिसणे आणि स्थुलपणा समजा ठीक आहे पण नाचाचे कौशल्य तरी हवे? फु बाई फु मधे नाचणे वेगळे आणि नाचाच्या कर्यक्रमात नाचणे वेगळे. >>>>>>

मनस्मी , १०० % अनुमोदन . मला सुद्धा बघवत नाही . Sad

आरती स्वतःचं हसं करून घेतेय असं मला मनापासून वाटतंय Sad . मागे एकदा सचिन म्हणाला होता की तुम्ही मनापासून ह्या स्टेजवर असता की तुमचा अ‍ॅटिट्यूड परफेक्ट होता अशा अर्थाचं काहीतरी .... अजिबात पटलं नाही मला .

ती सुपु फारच बेताची नाचतेय.
नाच कमी आणि नखरेच जास्त.
तरी बर आज तिच कोणीही कौतुक केल नाही.
नाहीतर नाच कमी आणि कौतुक च कौतुक असच चालल होत आत्ता पर्यत.

महाग्रून्ची वटवट ऐकुन एक थोबाडीत ठेवुन द्यावीशी वाटते........

स्वतःच्या , हा कारेक्रम बघितला म्हणून!!

महाग्रून्ची वटवट ऐकुन एक थोबाडीत ठेवुन द्यावीशी वाटते........

स्वतःच्या , हा कारेक्रम बघितला म्हणून!!

हॅ हॅहॅहॅहॅहॅहॅहॅहॅहॅहॅहॅहॅ

झी मराठी पेड चॅनल आहे कि फुक्कट ?

फुक्कट असेल तर त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमातल्या कुठल्याही हालचालीवर ( पक्षी : ण्रुत्य) किंवा भाषणांवर ( पक्षी : संवाद - उदा. महागुरूंचे ) नावं ठेवायचा कुणालाच अधिकार नाही. कवी जसा स्वान्तसुखाय लिहीत जातो तसा हा कार्यक्रम असावा.

आरती सोळंकी परफॉर्मर ऑफ द वीक!

हे पर्व सारेगमप च्या मागच्या पर्वासारखे होणार आहे हे स्पष्ट झाले. (टॅलंट वगळुन सर्वकाही विचारात घेतले जाणार आहे विजेती ठरवताना)

माफ करा थोडा विषय सोडून बोलते आहे, पण परवा झदिझा पाहिलं..त्यात माधुरीच्या एक..दो..तीन ह्या गाण्यामधल्या ड्रेसची हुबेहुब प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला होता...

आता एक भा.प्र.:
रिन/ vaseline सारख्या जुन्या मोठ्या कंपनीज जो कारेक्रम प्रायोजित करतात त्या मराठी ए.पे.ए. चे कॉस्च्युम्स एवढे सुमार का असावेत?

वि.सू.: माझं कुठल्याही कंपनीशी वयक्तीक वैर नाही. असं खरंच मनापासून वाटलं म्हणून लिहिलं.
विषयांतर केल्याबद्दल क्षमा.. Sad

खुपते तिथे गुप्ते ह्या कार्यक्रमात नेहा पेंड से ने हेच सांगितले होते. ती म्हणाली द. भारतातील चित्रपटात अशी कंजुषी करत नाहीत पण मराठी चित्रपटात अगदी मॉडर्न मुलगी दाखवायची असली तरी आहे तेच कपडे वापरायला सांगतात

मी जे दोन दिवसात जाता येता पाहिल त्यात मला वाटलेल :

१)परवाचा उर्मिला कानेटकरचा नाच कुणी बघितला का? मला आवडला अतिषय सुंदर नाचली ती. अर्थात हस्तक मुद्रा थोड्या उठावदार किंवा संपुर्ण नव्हत्या ही त्यावर दिलेली परिक्षकांची कमेंट अतिषय प्रामाणिक वाटली.
२)आरती सोळंकी -तिच्या काही स्टेप्स अगदी रिपिटेटीव आहेत कुठलाही डांस फॉर्म असो ती त्या स्टेप्स करतेच. तिचा कॉस्च्युम आणि तो भयंकर वीग याबद्दल जास्त बोलणे नलगे.
३)नेहा जोशी - मला खुप स्लो आणि आतातायी वाटली. (कौन मधला उर्मिलाचा मातोंडकरचा एक भताचा डांस बघितला की खरच अंगावर काटा येतो) इथ माझ्या डोळयात काटे खुपले.
४)ताड माड तीन ताड - सोनाली खरे - मला लागलाय खोकला ही लावणी आधुनिक ढंगात केल्याने नक्की काय प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात.
५)सुपु - ह्या आता ए पे ए मधे नसणार - बर वाटल. त्यांच कालच कैसी पहेली है ये जिंदगानी अगदीच सुमार होत.
६)नेहा पेंडसे - मला तरी सतरंगी आणि शीला मधे काहीच फरक दिसला नाही. तोच बेली डांसचा अयशस्वी प्रयत्न आणि त्यावर महागुरुंचे तेच यशस्वी कमेंट
७) स्मिता तांबे - नाचापेक्षा मुद्राभिनय खरच अप्रतिम झाला पण हा नाचाचा कार्यक्रम आहे हे त्या विसरलेल्या वाटल्या. शेवटच रडगाण गरज नसलेले होत.
८)मृण्मयीच तिनका तिनका जरा जरा माझं अतिषय आवडत गाणं पण त्यावर नाच करता येतो हे मला कालच कळल.
या सगळ्यात सुप्रियाच दर्शन सुखावह. तिचे कमेंटस पण सेन्सिबल वाटले.
बाकी परिक्षकांच्या आणि महाग्रुंच्या कमेंटचा आणि प्रत्यक्ष नाचाचा अर्थाअर्थी काही संबंध असावा अस वाटत नाही.

>>मृण्मयीच तिनका तिनका जरा जरा माझं अतिषय आवडत गाणं पण त्यावर नाच करता येतो हे मला कालच कळल

अगदी अगदी. मला नाचातलं काहीही कळत नाही हे आधीच सांगते. पण नाचताना निदान चेहेर्‍यावर काही एक्सप्रेशन्स तरी असावेत. काल मृण्मयीचा चेहेरा एकदम मख्ख होता. वर ह्या गाण्याला तो कसरती केल्यासारखा नाच? धन्य आहे! आता दुर्दैवाने हे गाणं ऐकलं की हा नाच आठवेल. :--( कालचा सुरेखा पुणेकरांचा नाच आणि पोशाख दोन्ही आवडले नाहीत. पुष्कर श्रोत्रीने देव आणि माणूस ह्यांच्यातल्या संवादाचा चावून चोथा झालेला जोक ऐकवला आणि त्यावर मजबूरी म्हणून जनता हसली. कशाला हा प्रोग्राम पहायच्या फंदात पडलो म्हणून ट्रॅलिवर "Everyday Exotic" हा कुकिंग शो पहात बसले त्यामुळे स्मिता तांबेने कुठल्या गाण्यावर डान्स केला ते कळलं नाही. त्याआधी दाखवलेल्या तुकड्यांत ती रडताना वगैरे दाखवली. कुठलं गाणं होतं ते?

रच्याकने, महाग्रू Psychic आहेत काय? सोनाली खरेच्या नाचानंतर 'ऑडियन्सलाही असंच वाटतंय' असं ठामपणे म्हणाले. त्यांना कसं कळलं? Psychic असतील तर बरंय, आपण इथे ह्या प्रोग्रामबद्दल काय लिहितोय हे पण त्यांना कळेल. Proud

स्मिता तांबे काल रडली का? Uhoh मिसलं मी.. मृण्मयीचा डांस पाहिला...
पण जाम बोर झाले मी. सोनाली खरेचा तोच स्टिफनेस.. Sad
मला डांसमधलं ओ का ठो कळत नाही तरि मला जर का इतकं कळू शकतं की सोनाली खरे फार स्टिफ आहे तर तिच्या कोरिओग्राफरला का कळू नये? Uhoh
की ते लोक्स पण फक्त पाट्या टाकायला येतात?

हे म्हणजे असं झालं, की शाळेत विद्यार्जन करायला श्रीमंत बापाचं पोर आलं की शिक्षक त्याला चुचकारतात, आणि जितकं शिकायचं तितकंच शिक म्हणतात..

>>स्मिता तांबे काल रडली का?

मला वाटतं त्या गाण्यानंतर ती "भावविवश" का काय म्हणतात तसं होऊन रडली. अश्या स्थितीत डोळ्यात अश्रू येत नाहीत वाटतं, निदान मला तरी दिसले नाहीत. पण व्यक्ती रडतेय हे आपण समजून घ्यायचं Proud

Pages