एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुष्क्याचा मधाचं बोट घेऊन येण्याचा प्रसंग तर टाळक्यात गेला माझ्या Angry
त्याची बायको घरी गेल्यावर त्याला झोडपत कशी नै? Uhoh

कालचा सुपुचा डान्स भयानक. काय ते कपडे! काय ते डोक्यावर घातलं होत! बया बया!

आता सुपु नसणारैत का ए.पे.ए. मध्ये??? काल शेवटी काय सांगत होते ते मिसलं मी. बाकी स्मिता तांबे चा डान्स सुमार. शेवटचे रडणे वगैरे एकदम इमोशनल ब्लॅकमेलिंग साठी वगैरे ठरवू केलेले वाटले.

दिपाली विचारे बद्दल इथे मागे कुणीतरी गोल्डफिश ची उपमा दिलीये. काल तिला पाहताच गोल्डफिशच आठवत होता. Biggrin

म.वै. चं सगळ्यांना नपुंसकलिंगी बोलणं (ते डान्स, ते आर्टिस्ट) Rofl

ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत सगळ्यांच "तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना" असं झालंय, किंवा सध्या दुसरा कुठलाही करमणूकीचा कार्यक्रम नसल्याने सगळेच हा कार्यक्रम बघताहेत..

>>>>सध्या दुसरा कुठलाही करमणूकीचा कार्यक्रम नसल्याने सगळेच हा कार्यक्रम बघताहेत..
चूक.. खरतर आपल्यालाही इथे काही लिहिता यावं यासाठी सगळे हा कार्यक्रम बघताहेत.. Proud

किरु Happy
स्वप्ना, अगं स्मिता तांबे रडताना अश्रू होते की डोळ्यांत तिच्या. नंतरही ती रडत होती. मलाही हा कार्यक्रम फार ग्रेट वाटत नाही, पण इतकं वाईट दर वेळी लिहायलाच हवं का? इतकी नावं ठेवायलाच हवीत का? इतकं पटत नसूनही कार्यक्रम पहायचा काही कोणी थांबत नाहीये. Happy

पण इतकं वाईट दर वेळी लिहायलाच हवं का? इतकी नावं ठेवायलाच हवीत का? इतकं पटत नसूनही कार्यक्रम पहायचा काही कोणी थांबत नाहीये>>> याला विरोधभक्ती म्हणत्यात!
झदिझत माधुरी आणि सरोज खान एकत्र आल्या तो एपिसोड एकदम खास होता, माधुरी 'चने के खेत में' वर नाचली आणि एवढ्या वर्षांनीही ग्रेस,स्टेप्स, एक्सप्रेशन तस्सच टॉप क्लास होतं

शैलजाला अनुमोदन. कनपटीवर बंदूक ठेवून बघायला लागत असल्यासारखा कशाला बघायचा? दुसरा कार्यक्रम नाहीये त्या वेळेत तर टीव्ही बंद ठेवावा. इतर छंदात वेळ घालवावा. नाहीतर मस्तपैकी बीफोरयु, म्युझिक इंडिया, मस्ती चॅनेल लावून जुनी/नवी गाणी बघावीत. Happy

>>>>>नाहीतर मस्तपैकी बीफोरयु, म्युझिक इंडिया, मस्ती चॅनेल लावून जुनी/नवी गाणी बघावीत
मी चुकून बीफोरयु ऐवजी बेफिकीर असं वाचलं.

दर्जेदार कार्यक्रम हवे असतील तर वाईट दर्जा असणारे कार्यक्रम अजिबात पाहू नये. टिआर्पी कमी झाल्यावर आपोआपच झी मराठि महागुरूला गाशा गुंडाळायला लावेल.

<<<< त्या आरती चा डान्स पाहुन फक्त मलाच खवळायला होते का इतर कोणालाही तसेच वाटते?

हा काय उपेक्षिताना या निमित्ताने चान्स देण्याचा कार्यक्रम आहे का? ती चांगली दिसत नाही/नाचत नाही आणि "अप्सरा" हे नाव असलेल्या कार्यक्रमात ती फिट नाही हे अगदी स्पष्ट आहे. बर दिसणे आणि स्थुलपणा समजा ठीक आहे पण नाचाचे कौशल्य तरी हवे? फु बाई फु मधे नाचणे वेगळे आणि नाचाच्या कर्यक्रमात नाचणे वेगळे. >>>>>>

अनुमोदन!

मुळात कोणीही इथे अगदी कैवार घेऊन लिहायला नकोय.......

इथे त्या कार्यक्क्रमावर लिहिणारे बहुतांश तो कार्यक्रम बहुधा येताजाताच बघतात...... अगदी घड्याळाकडे डोळे लावून सुरू झाला की टीव्हीसमोर नक्कीच बसत नाहीत....... तेवढा त्याचा दर्जाही नाही. इथे वाचताना आणि निरिक्षण लिहिताना तेवढाच टीपी होतो जितका इतर बर्‍याच ठिकाणी "सोकॉल्ड कैवारी" मंडळी इतरांवर टिकाटिप्पणी करत फिरत असतात.... Proud

सो लक्स ..... लगे रहो.... Happy

भुंग्याशी सहमत. मी इथेच काय ते बघते. आणि आधीही जे काही बघुन लिहित होते ते टिवीसमोर पक्की मांड ठोकुन बघत नव्हते..... (गेले ते दिन गेले.. जेव्हा हमलोग सुरू व्हायच्या आधी आम्ही धडपडत अभ्यास वगैरे चटकन आटपुन आईकडुन जेवण वाढुन घेऊन फटाफट जेवायचो आणि एकदाचे टिवीसमोर गुळाच्या गणपतीसारखे बसायचो... एकही मिनिट वाया जावू नये यासाठी सगळी धडपड असायची )

भुंगा, लिहिण्याबद्दल कोणाचाच आक्षेप नाहीये. कैवारही घेतलेला नाही कोणाचा. सतत नावं न ठेवता आणि बकाल भाषा न वापरताही, आपल्याला काय आवडत नाही हे सांगता येते. आणि एखादा कार्यक्रम इतका बेकार वाटत असला तर त्याच्या वाटेला कशाला जायचं?

आमच्याघरी कस आहे माहिती आहे का? साबा आणि साबु ठाण मांडुन बसलेले असतात झी मराठीसमोर. तेव्हा मला काही पर्याय नसतो बघण्यावाचुन. पण स्वयंपाक, जेवण चालु असताना बघत असल्याने सलग बघितलाच जात नाही. पण जे बघायला मिळत ते नेमक पटत नाही आणि तिथ काही मत प्रदर्शित करता येत नाही म्हणुन इथ बोलायच Lol

आणि एखादा कार्यक्रम इतका बेकार वाटत असला तर त्याच्या वाटेला कशाला जायचं?

अगं काही घरात चॉईस नसतो.. आपल्याला पाहायचे नसले तरी कानांवर आणि घर लहान असेल तर डोळ्यांवर आदळत राहतात मालिका. माझ्या घरात माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर इंग्रजी चित्रपट आदळतात, संध्याकाळच्या वेळेस भयाण दृष्ये असलेले चित्रपट घरात चालु असण्याला माझा विरोध आहे, पण बघणा-यांच्या कानांवर माझा विरोध पडतच नाही इतके ते गर्क झालेले असतात पाहताना. Sad

आता स्वप्ना संचायामा वर इतके भरभरुन लिहिते ते केवळ ती पॅसिव प्रेक्षक आहे म्हणुन. तीला जर अ‍ॅक्टीव प्रेक्षक बनायचा चान्स मिळाला तर ती सगळ्यात आधी टिवीचे बटन बंद करेल.. Happy

अगं बोला की शुकु, साधना Happy कोणी नको म्हटलंय? Happy
पण सतत त्या कलाकारांच्या नावांची मोडतोड करायची, त्यांच्या जाडपणाबद्दल, ज्या प्रकारे एखादा कलाकार बोलतो, त्याची टिंगल, दिसण्यावरुन टिंगल, हे काय कार्यक्रमाबद्दलची मतं आहेत का?

नाही नाही शैलजा कुणाच्याही व्यंगावर बोलण कधीच आवडणार नाही. Sad विषयांतर होत असेल चुकुन तर क्षमस्व.
नाच हा एकच क्रायटेरिया ठेवुन मत व्यक्त केली जावीत तर आम्ही (मी तरी) काही तज्ञ नाही. पण जे उघड्या डोळ्यांना पटत नाही त्याला हे तज्ञ लोक वाह, छान, अप्रतिम म्हणतात तेव्हा चीड येते ग.

हो, ते बरोबरच आहे शुकु. कार्यक्रमातल्या बर्‍याच गोष्टी खटकतात, हे तर खरंच, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. असो. चालूदेत. Happy

आणि एखादा कार्यक्रम इतका बेकार वाटत असला तर त्याच्या वाटेला कशाला जायचं? >>>>>> शैलजा, अनुमोदन.

पण जे उघड्या डोळ्यांना पटत नाही त्याला हे तज्ञ लोक वाह, छान, अप्रतिम म्हणतात तेव्हा चीड येते ग....>> शुभान्गीजी अनुमोदन..

हिन्दी प्रमाणे मराठी कार्यक्रमान्चा दर्जा सुधारावा अस मनापासून वाटते म्हणून बोलले..! Sad

>>आता स्वप्ना संचायामा वर इतके भरभरुन लिहिते ते केवळ ती पॅसिव प्रेक्षक आहे म्हणुन. तीला जर अ‍ॅक्टीव प्रेक्षक बनायचा चान्स मिळाला तर ती सगळ्यात आधी टिवीचे बटन बंद करेल

अग मी तर विचार करतेय की प्रत्येक पोस्टीच्या खाली "मी हे प्रोग्राम्स स्वत:हून पहात नाही" अशी तळटीप द्यावी का काय? Happy मागे मला बर्‍याचदा लोकांनी "इतक्या मालिका पहायला वेळ कसा मिळतो" असं विचारून जखमेवर मीठ चोळलं होतं. Sad असो. मी ह्या प्रोग्रामच्या पुन्हा कधी वाटेला जाणार नाही आणि त्यामुळे ह्या बीबीवर फक्त "रोमात" असणार आहे. मला वाटतं तेच बरं आहे.

रच्याकने, २९ जानेवारी हा हिंदुस्तान टाईम्सने "नो टीव्ही" दिवस म्हणून जाहिर केलाय.

स्वरा खर की काय?? ये बयो अस काय करु नकोस ग. लिही तू छान लिहितेस. मार्मिक टिप्पण्या सुद्धा व्हायला हव्यात. सगळ गुडी गुडी कस चालेल Wink
बाकी २९ जाने "नो टीव्ही" असेल तर मी लगेच निबंध लिहिन लहान्पणीसारखा "एक दिवस टी व्ही शिवाय"
विषयांतराबद्दल क्षमस्व

इथे प्रतिक्रिया देणारे चर्चा करण्याच्या हेतुने प्रतिक्रिया देत आहेत.(मला वाटते हा बाफ त्यासाठीच आहे) त्याना कशाला कार्यक्रम बघता वगैरे फुकटचे सल्ले देणे मला शहाजोगपणाचे सल्ले वाटतात.
इथे कोणीही कार्यक्रम डेस्परेट होउन बघत नसावेत आणि एखादा कार्यक्रम आवडत नसेल तर तो न बघणे हा पर्याय न कळ्ण्याइतके इग्नरंट ही नसावेत .
आणि जे कार्यक्रम बघतात त्यानीही कोणाला एक्स्प्लेनेशन द्यायची गरज नाही.
ज्याना इथली चर्चा वाचुन त्रास होत असेल त्यानी इथे येणे बंद करावे. उगाच कशाला बघता इ. लिहुन स्वतःचे शहाणपण सिद्ध करायची गरज नाही.

मागे मला बर्‍याचदा लोकांनी "इतक्या मालिका पहायला वेळ कसा मिळतो" असं विचारून जखमेवर मीठ चोळलं होतं.
>>>>>>>

स्वप्ना, मीच मिठाची बरणी घेऊन बसलेला असायचो तेंव्हा.... Proud पण तू लिहित जा गं...... तुला इथे फक्त रोमात शोधावं लागलं तर आत्मा तळमळेल आमचा.... Proud Lol

इथे प्रतिक्रिया देणारे चर्चा करण्याच्या हेतुने प्रतिक्रिया देत आहेत.(मला वाटते हा बाफ त्यासाठीच आहे) त्याना कशाला कार्यक्रम बघता वगैरे फुकटचे सल्ले देणे मला शहाजोगपणाचे सल्ले वाटतात.
इथे कोणीही कार्यक्रम डेस्परेट होउन बघत नसावेत आणि एखादा कार्यक्रम आवडत नसेल तर तो न बघणे हा पर्याय न कळ्ण्याइतके इग्नरंट ही नसावेत .
आणि जे कार्यक्रम बघतात त्यानीही कोणाला एक्स्प्लेनेशन द्यायची गरज नाही.
ज्याना इथली चर्चा वाचुन त्रास होत असेल त्यानी इथे येणे बंद करावे. उगाच कशाला बघता इ. लिहुन स्वतःचे शहाणपण सिद्ध करायची गरज नाही.

>>>>>>>>>>

mansmi18,
आज अनायसे संकष्टी आहेच...... तुला १००१ मोदकांचे ताट........ गणपती बाप्पा मोरया......!!! Happy

Pages