शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिर्वचनीय >. शब्दात सांगता येणार नाही, वर्णन जमणार नाही असा अनुभव. अवर्णनीय
भिषग्वर्य >>( बहुतेक) वैद्य,

>>'स्वयंप्रेरित' त्यातल्यात्यात बरा वाटतो आहे. <<
स्वयंप्रेरित = सेल्फ मोटिवेटेड

प्रोअ‍ॅक्टिव हा शब्द मराठी माणसाच्या शब्दकोषात नाहि... कारण तो नेहमीच रिअ‍ॅक्टिव मोड मध्ये असतो... Happy

मेधा +१

तपःपूत (कला) = तपाने परिपूर्ण - म्हणजे केवळ अंगभूत असण्यावर समाधान मानलेलं नाही तर कष्टाने (रियाज इ.) आत्मसात केलेली आहे.

Proactiveसाठी 'अग्रसक्रीय'प्रमाणे 'अग्रकर्मी' असाही एक पर्याय ऐकला.

प्रोअ‍ॅक्टिव = तत्पर हा शब्द चालेल का ?

मख्खी टू मख्खी हवं असेल तर संस्कृतमधून आलेले शब्द येतील. पण ग्रामीण बोलीत देखील असे शब्द आहेत, जे वापरले नाहीत तर नाहीसे होतील. भावार्थासाठी कधी कधी असे शब्द फारच बोलके असतात. लक्षात राहीलं, वेळ आणि नेट मिळालं तर पाहूयात.

ब्र आ,
मी आगाऊ लिहिलंय की.
आणि इतके दिवस हा शब्दं वापरलाही जातो मराठीत.
पण हल्ली या शब्दाला वाईट अर्थं लाभलाय.

ओह
साती... इतक्या गर्दीत उठून दिसली नाहीस.

पण हल्ली या शब्दाला वाईट अर्थं लाभलाय. >> आयडी मात्र भारी आहे तो

पुराव्याने शाबीत करेन.

शासकीय मराठी भाषेत प्रोअ‍ॅक्टिव्हसाठी उत्तरलक्षी हा शब्द वापरलेला मिळाला.
वातावरण बदल संवादात भारत उत्तरलक्षी भूमिका बजावेल- पर्यावरण मंत्र्यांचे फ्रेंच प्रतिनिधी मंडळाला आश्वासन

तीच प्रेस रिलीझ इंग्रजीत
India to play a proactive role on Climate Change and evolve consensus on COP-2015, assures Prakash Javadekar

सुधीर जी, वराहकुलोत्पन्न हा शब्द जिथे वाचलात तिथे अर्थ सांगायची हिंमत दिसत नाही. गर्दभकुलोत्पन्नांच्या नादी लागू नये हेच खरं.

पूर्वलक्षी प्रभाव : retrospective effect
व्होडाफोन प्रकरणानंतर हा शब्द खूपच गाजला. इनक्म टॅक्समध्ये तसे पूप्र. कितीतरी असतात.
ब्र.आ. : इंग्रजी प्रेस रिलीज वाचा.
मराठी प्रेस रिलीज शीर्षकापलीकडे वाचायची आता हिंमत नाही. उद्या मराठी-इंग्रजी दोनी बाजूबाजूला ठेवून वाचेन. तेवढीच शब्दसंपत्तीत(!) भर पडली तर!

मला असे वाटते आहे की पोस्ट फॅक्टो सँक्शन साठी नारायणपेठेतील राजभाषा कार्यालयाकडूनउत्तरलक्षी हा शब्द देण्यात आलेला आहे.

मस्त चर्चा! वाचून माहितीत भर पडली.
Proactive साठी राज यांना +१
एकदा जेव्हा हा शब्द वापरायचा होता तेव्हा संपादकांनी सक्रीय जिज्ञासू असे भाषांतर केले पण माझ्यामते ते १००% योग्य नाही. पुढाकाराने (proactively)/पुढाकारी (proactive) अशी नवीन शब्दरूपे coin (!?) करता येतील का?

साती,

SIM = Subscribers Identification Module

म्हणून, सिमकार्ड = वाक्परिचय

इथे वाक्जोडपरिचय अधिक समर्पक वाटतो. पण जरा जड शब्द आहे.

आ.न.,
-गा.पै.

जिज्ञासा धन्यवाद.
proactiveचा अर्थ आम्हाला स्वतःहून पुढाकार घेउन काम करणारा/री असा सांगितलेला.हे समजण्यासाठी पुलंच्या 'नारायणा'ला समोर ठेवा.आता या मोठ्या फ्रेजसाठी एकच पूरक असा शब्द मिळेना.तो पुढाकाराने असाच असावा.
कदाचीत सिच्यूएशनल अर्थ बघता स्वयंप्रेरीत असा बरोबर अर्थ वाटत होता.पण,पुढाकार हा पटतोय. नुसत्या दूरदर्शी मध्ये अ‍ॅक्शनचा अभाव वाटतो.'दूरदर्शी सोबत कृतीचीही जोड स्वतःहून देणारा असा' म्हणजे पुढारी (ब्र.आ. Happy ) पुढाकाराने/पुढाकार.

तपःपूत मधला 'पूत' चा अर्थ 'पुनित झालेला, शुद्ध झालेला' असा घेतला जातो.
एक श्लोकही आहे -
दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम् | (नीट पाहून पाय पुढे टाकावा, पाणी वस्त्राने गाळून शुद्ध केलेलं प्यावं)
सत्यपूतां वदेत्वाणीं मनःपूतं समाचरेत् || (खरे बोलावे आणि मनाचे ऐकावे (जनाचे नव्हे अशा अर्थाने) )

नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटामुळे आठवले. फरासखाना हे नाव कसे आले? फरास म्हणजे काय? हा शब्द मूळ कुठल्या भाषेतला?

अवांतरः पुण्यातील अनेक जागांची नावे अर्धी मराठी अर्धी इंग्रजी वा अन्य भाषा सरमिसळयुक्त असतात. स्वारगेट, पेरूगेट, डेक्कन जिमखाना, लकडी पूल

Pages