शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या बेखुदी उर्दू शब्द आहे. स्वतःचीच जाणीव नसण्याची स्थिती असा त्याचा अर्थ आहे. तंद्री, समाधीअवस्था हे मराठी शब्द या अर्थाच्या जवळ जातात.

झपूर्झा हा शब्द "जा पोरी जा " यावरून आला आहे. जा पोरी जा असं सलग म्हटल्यानंतर त्याचा झपूर्झा होतो.
या शब्दाची व्याप्ती मात्र खूप मोठी आहे. ही एक अवस्था आहे झपाटलेपणाची..जे काम हाती घेतलं त्यात झोकून देऊन समर्पणाने त्या कामाची पूर्तता करताना एखाद्याची जी अवस्था होते तीच ही अवस्था.
या अवस्थेवर एक कविताही आहे:
हर्ष खेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले
कंटक शल्ये बोथटली मखमालीची लव वठली
प्रकाश गेला तिमिर हरपला
काय म्हणावे या स्थितीला? झपूर्झा गडे झपूर्झा Happy

रिश्वत म्हणजे लाच, रिश्वतखोर म्हणजे लाच खाणारा, त्याला चटावलेला
तसेच आदमी- माणूस, आदमखोर - माणसाच्या रक्ताला चटावलेला प्राणी

तिश्नगी म्हणजे तहान >>
मला वाटलं होतं की passion असा काहीतरी अर्थ असेल या शब्दाचा. Uhoh धन्यवाद, स्वाती.

बालकविंच्या 'श्रावणमासी' मध्ये 'पुरोपकण्ठी' असा शब्द आहे. त्याचा नक्की अर्थ काय? इथे काही चर्चा आहे. नक्की कुठला अर्थ बरोबर आहे?

बागुलबुवा त्याला पंचगव्य का म्हणतात? त्यात तर तीनच पदार्थ असतात गायीपासून प्राप्त होणारे - गोमूत्र, शेण आणि दूध. म्हणजे मी तरी पुजा इ. प्रसंगी हे तीन पदार्थ वापरूनच पंचगव्य करताना बघितलय भटजींना Happy

ह्म्म.. पण मग स्वतःच्या मुलाचं नाव कसं बरं ठेवलं असेल "गव्य"..??? म्हणजे काय अभिप्रेत असावं?

माधव, तुम्ही जो दुवा दिला आहे, त्या फोरमवरच्या दुसर्‍या पानावर एक स्कॅन केलेले पत्र आहे ते वाचल्यावर मला पुरोपकण्ठी = गावाची शीव हा अर्थ पटतोय.

(त्या दुव्यासाठी धन्यवाद.)

'पारस्परिक' (उदा. कर्मचार्‍यांसमवेतच्या पारस्परिक क्रिया)
आणि 'आश्वस्त' (उदा. अमुक अमुक बाबतीत आम्ही आश्वस्त होऊ शकतो)

असे शब्द मराठीत आहेत का?

पारस्पारिक नाही. परस्परच.
आश्वस्त योग्य आहे.

विप्लव शब्दरत्नाकरात सापडला नाही. ऑनलाइन शोधलं तर 'परिवर्तन','क्रांती' असे अर्थ सापडले.

वामन शिवराम आपटे यांच्या संस्कृत इंग्रजी कोषात विप्लु हे आत्मनेपदी क्रियापद असून त्याचा अर्थ निरुद्देश तरंगणे, झोके घेणे, संभ्रमित अवस्था ( टु बी कंफ्यूजड ) इत्यादी दिलाय.

1. To float about, swing to and fro, fluctuate,
2. to drift, to be scattered
3. to be confused,
4. to be ruined or destroyed
5. to fail,

to cause to float or swim
to divulge, spread about
to teach (unworthy persons )
to cause to spoil , to confound, bewilder

विप्लवः चे १४ अर्थ आहेत
floating or drifting, sin, terrifying an enemy by gestures and shouts, , absence of reasoning, transgression, violation , evil, calamity, sin, sinful

तर जे लोक मुलाचं नाव विप्लव ठेवतात ते कशावरून ?

physics मधील escape velocity ला मराठीत नेमका काय शब्द आहे? डिक्शनरीत सुटकेचा वेग असे आहे पण भौतिक शास्त्राच्या परिभाषेत काय म्हणतात?

Pages