Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
अन्तरालीय देवताविषयी काही
अन्तरालीय देवताविषयी काही फुटकळ वाचन करीत असताना इन्द्राबाबत (विशेषतः त्याचे रूप) असे वाचले की तो सोनेरी, स्वेच्छेने अत्यंत सुंदर रूपे तसेच सूर्याचे लाल तेज धारण करू शकतो. 'तो सुशिप्र व शिप्री' असा आहे; असे वर्णन येते. ही दोन्ही विशेषणे त्याच्या रूपाबाबतच आहेत हे नि:संशय. पण 'सुशिप्र व शिप्री' हे नेमके कशाचे वर्णन असावे?
समीक्षा व समालोचन यात काय फरक
समीक्षा व समालोचन यात काय फरक आहे ? परिक्षण अन समीक्षा यात काय फरक आहे ?
'शिप्री'बद्दल गूगलबाबा बघा
'शिप्री'बद्दल गूगलबाबा बघा काय म्हणतो.
शोनू, समालोचन हे 'आँखो देखा हाल' वर्णन करण्याला म्हणतात ना? (क्रिकेटचे धावते समालोचन = running commentary?)
(पण हिंदीत टीकेला आलोचना म्हणतात.)
मोल्सवर्थच्या मते परीक्षण म्हणजे फक्त इन्व्हेस्टिगेशन. समीक्षेत 'जजमेन्ट'ही अंतर्भूत असेल का?
कुरुंदकरांनी त्यांच्या
कुरुंदकरांनी त्यांच्या प्रकाशकांना लिहिलेल्या पत्रात इतर समिक्षकांच्या पुस्तकांमधे समिक्षा असलेला भाग कमी अन समालोचन असलेला भाग जास्त आहे असा सूर आहे. त्या संदर्भात समालोचन चा रनिंग कॉमेंटरी असा अर्थ मला पटला नाही. पुस्तकांविषयी लिहिताना कदाचित समालोचन चा अर्थ वेगळा असू शकेल का ? काय असेल ? असे प्रश्न पडले. त्यातच परिक्षणाविषयीच्या अलिकडिल चर्चेच्या अनुषंगाने परिक्षण अन समीक्षा यातसुद्धा नेमका फरक काय असेल ? हा अजुन एक प्रश्न.
मग हे आधी नाही सांगायचे? मग
मग हे आधी नाही सांगायचे?
मग आलोचना (टीका) याच अर्थी म्हणत असतील का ते? समीक्षेत बर्यावाईट दोन्ही गुणांचा परामर्ष घेणं अपेक्षित असेल का?
समालोचन = आँखो देखा
समालोचन = आँखो देखा हाल
पुस्तकाच्या बाबतीत समालोचन म्हणजे डोळ्यांनी जे काही वाचले त्याचा धावता आढावा. थोडक्यात इतरांना पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी दिलेला गोषवारा. यात समालोचन करणारा आपल्या पदरचे काहीच घालत नाही.
समिक्षा म्हणजे पुस्तकाच्या काठावरच राहून पुस्तकातले गुणदोष दाखवून देणे. (सम + इक्षा = संतुलीत दृष्टी).
पुस्तकाच्या प्रेमात पडून आपल्याला आवडलेल्या त्यातल्या गोष्टी इतरांना उलगडून दाखवणे म्हणजे रसग्रहण.
ह्म्म्, समालोचन म्हणजे पुस्तक
ह्म्म्, समालोचन म्हणजे पुस्तक परिचय म्हणायला हरकत नाही मग .
धन्यवाद माधव
>>>तर जे लोक मुलाचं नाव
>>>तर जे लोक मुलाचं नाव विप्लव ठेवतात ते कशावरून ?
काय वाट्टेल ती नावं ठेवतात लोक्स. केवळ ऐकायला छान वाटते म्हणून. गौरव च्या चालीवर रौरव ऐकलं परवा. कृतान्त असच अजून एक. पूर्वी मूल जगावे म्हणून घाण नाव ठेवत. उदा. शेणपडु, सुपडू इ. तसं असेल कदाचित.
तपःपूत म्हणजे काय? पुलंनी
तपःपूत म्हणजे काय?
पुलंनी केसरबाईंवर लिहिलेल्या लेखात हे वाक्य आहे - 'त्या वाड्याच्या वास्तुपुरूषालाही असल्या तपःपूत सुरांनी बांधलेली आपली उत्तरपूजा आवडली असेल.'
तपाने पावन झालेले ? मनःपूत
तपाने पावन झालेले ?
मनःपूत म्हणजे मनसोक्त, त्यावरुन तपःपूत म्हणजे भरपूर तप (करुन 'सिद्ध') झालेले म्हणता येईल ?
या लेखात 'असीजीवी आणि
या लेखात 'असीजीवी आणि मसीजीवी' असे शब्दप्रयोग वाचले. मसी = शाई, तेव्हां कारकुनांना मसीजीवी (खर्डेघाशाप्रमाणे) म्हणतात हे ऐकिवात आहे. असीजीवी म्हणजे काय?
असी = तलवार / शस्त्र ?
असी = तलवार / शस्त्र ? (असिधारा व्रतातील असि प्रमाणे)
- तलवारीवर जगणारे?
सर्किट यानी दिलेला अर्थ अगदी
सर्किट यानी दिलेला अर्थ अगदी अचूक आहे.
असी/मसी समावेश असलेले संस्कृतीबद्दलचे एक वाक्य आपल्या भाषेत आहेच.
'असी, मसी, कृषी, विद्या, वाणिज्य' ही आपली संस्कृती आहे
बागुलबुवा धन्यवाद! हो मला पण
बागुलबुवा धन्यवाद! हो मला पण तसाच काहिसा अर्थ वाटला संदर्भावरून. मला तो शब्द खूप आवडला म्हणून नक्की अर्थ जाणून घ्यायचा होता. 'तपाने पावन झालेले' असा जाणकार सूत्रांकडून मला कळलेला अर्थ.
सर्किट, अशोक, धन्यवाद.
सर्किट, अशोक, धन्यवाद.
"परिप्रेक्ष" या शब्दाचा नक्की
"परिप्रेक्ष" या शब्दाचा नक्की अर्थ काय?
परिप्रेक्ष = नव्या ढंगात
परिप्रेक्ष = नव्या ढंगात केलेले सादरीकरण.
उदा. : फलंदाजांना मिळत असलेले झुकते माप पाहून आयसीसीने खेळाच्या नियमांचे परिप्रेक्ष करण्याचा निर्णय घेतला.
मराठीपेक्षा हिंदीत याचा वापर सढळ होतो. नुकतीच एक बातमी वाचली तीत "ऐतिहासिक दस्तावेज विद्रोह की इस गाथा को एक नए परिप्रेक्ष में प्रस्तुत करता है जो 1857 की घटनाओं को ताजा कर देता है" ~ इथे एका ऐतिहासिक घटनेवर नव्या रितीने प्रकाश टाकला आहे, या अर्थाने 'परिप्रेक्ष' चा उपयोग केलेला दिसतो.
अशोक, धन्यवाद! हा शब्द व
अशोक,
धन्यवाद! हा शब्द व अर्थ मला माहित नव्हता. शब्द आणि अर्थ दोन्ही छान आहेत.
मला 'परिप्रेक्ष'चा अर्थ point
मला 'परिप्रेक्ष'चा अर्थ point of view , दृष्टिकोन असा वाटतो. प्रेक्ष यातही दृष्टी आहेच.
Point of View is equal to =
Point of View is equal to = परिप्रेक्ष/दृष्टिकोन असे मान्य केले [तसा भास होतोही] तरीदेखील तरी परिप्रेक्षकरीता ते 'प्रथम मत/विचार' या अर्थाने येऊ शकणार नाही असे मला वाटते.
एक उदाहरण घेऊ या ~ मर्ढेकरांच्या 'पिपांत मेले ओल्या उंदीर' या कवितेवर म.वा.धोंड यानी सत्यकथेमध्ये तीन लेख लिहिले आणि मर्ढेकरांवरील त्यांच्या Point of View चे सर्वांनी स्वागत केले. इथे 'परिप्रेक्ष' ला प्रवेश नाही. मात्र काही वर्षांनी त्या तीन लेखांच्या आधारे विजया राजाध्यक्ष यानी वेगळे मत [किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वेगळा दृष्टिकोन] पुढे आणले तर मात्र त्यांचे मत हे 'परिप्रेक्ष' गटात येऊ शकते.
View चा Review असा ट्वीस्ट करणारा तो शब्द आहे.
अशोक, दृष्टिकोण नसेल बहुधा.
अशोक, दृष्टिकोण नसेल बहुधा.
तुम्ही दिलेल्या परिप्रेक्ष = नव्या ढंगात केलेले सादरीकरण या व्याख्येवरून परिप्रेक्षचा अर्थ जुनी दारू नव्या बाटलीत असा अर्थ भासतो.
पण तुम्ही दिलेल्या "फलंदाजांना मिळत असलेले झुकते माप पाहून आयसीसीने खेळाच्या नियमांचे परिप्रेक्ष करण्याचा निर्णय घेतला." या उदाहरणाशी तो अर्थ मेळ खात नाही. उदाहरणात 'परिप्रेक्ष'च्या जागी पुनर्विचार हा शब्द व्यवस्थित बसतोय.
हिंदीतले "ऐतिहासिक दस्तावेज विद्रोह की इस गाथा को एक नए परिप्रेक्ष में प्रस्तुत करता है जो 1857 की घटनाओं को ताजा कर देता है" हे उदाहरण वाचताना 'संदर्भ' असा अर्थ डोक्यात येतोय.
(पुन्हा मराठीतला आणि हिंदीतला शब्दप्रयोग वेगवेगळा वाटतोय. परिप्रेक्ष में आणि परिपप्रेक्ष करणे)
इथे परिप्रेक्षचा अर्थ perspective असा मिळाला (जो जास्त योग्य वाटतोय). शब्दकोषात याला समानार्थी मराठी शब्द : यथार्थ देखावा, दृश्य असे मिळाले. हे दोन्ही शब्द संदर्भ या शब्दाच्या जवळ जातात.
भरत ~~ "यथार्थ देखावा" चा मग
भरत ~~
"यथार्थ देखावा" चा मग असाही अर्थ होऊ शकेल की, पहिल्यांदा जो देखावा दर्शकाच्या समोर आला त्यात काहीतरी त्रुटी होत्या, मग संयोजकांनी मांडणीचे 'परिप्रेक्ष' केले व मग नव्याने झालेल्या सादरीकरणाचे 'यथार्थ' दर्शन झाले.
हिंदीतील 'परिप्रेक्ष' जास्त स्पष्ट आहे. 'ऐतिहासिक दस्तावेज विद्रोह की गाथा' कुणीतरी या अगोदर प्रतिपादीत केलेली आहेच, पण आता त्यावर थेट 'गाथे'वर नसून त्यावरील मतांचे वा टीकेचे परिप्रेक्ष करण्यात आले आहे. [असे मला वाटते]. मर्ढेकरांच्या कवितेपेक्षा धोंडांच्या लेखांचे परिप्रेक्ष विजयाबाईंनी केले असे मला म्हणायचे आहे.
क्रिकेटचे उदाहरण त्याच जात्यातील आहे. म्हणजे नियमांचा 'पुनर्विचार' नव्हे, तर जे काही नियम या क्षणी आहेत, ते तर असतीलच, त्यांच्या व्हॅलिडीटीबाबत पुनर्विचार न करता, नव्याने त्यात अॅडिशन करणे कालपरत्वे आवश्यक झाले आहे. म्हणून मग एकूणच सर्व नियमपुस्तिकेचे 'परिप्रेक्ष' करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला.
"ऋषि" बरोबर की "ऋषी"?
"ऋषि" बरोबर की "ऋषी"? "महर्षि" बरोबर की "महर्षी"?
परिप्रेक्ष्य म्हनजे purview
परिप्रेक्ष्य म्हनजे purview
किंकर म्हणजे दास, किंवा सेवक.
किंकर म्हणजे दास, किंवा सेवक.
वोथंबा या शब्दाचा अर्थ काय?
वोथंबा या शब्दाचा अर्थ काय?
वोथंबा हा बहुधा ओथंबाचा
वोथंबा हा बहुधा ओथंबाचा अपभ्रंश असावा. ओथंबा म्हणजे आधारकाठी.
हिंदीत माहीत नाही पण औपचारिक
हिंदीत माहीत नाही पण औपचारिक मराठीत परिप्रेक्ष्य हा शब्द सहसा इंग्लिश परस्पेक्टिव या शब्दाचा समानार्थ म्हणून वापरला जातो.
'लिप्ताळा' हा एक मस्त शब्द
'लिप्ताळा' हा एक मस्त शब्द आहे. त्याचा अर्थ 'गोवलेला'. (भाषेच्या बन्धामधून निर्माण होणारा लि.)
घन ओथंबून येती मधे ओथंबून चा
घन ओथंबून येती मधे ओथंबून चा अर्थ काय मग ?
काही सीकेपी मत्स्याहारी पाककृतींमधे लिप्ती वापरतात - लिप्ती कोलंबी वगैरे. फारसा वाहता रस्सा नसलेला प्रकार असतो. त्यात लिप्ती हे लेपन वरून आलेलं असावं असं मी समजत होते. लिप्ताळा म्हणजे जर गोवलेला असेल तर लिप्ती कोळंबी इत्यादीचा उगम कशावरून असेल ?
Pages