Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
धन्यवाद
धन्यवाद फारएन्ड...
इंग्लिशमधून लिहीताना Deepali बरोबर वाटतं, पण मराठी मधून लिहीताना 'दीपाली' वेगळं वाटतं.
आणि खूप ठिकाणी मी 'दिपाली' असचं बघितलय.......
फारेंड म्हणतो तसं 'दीपाली'
फारेंड म्हणतो तसं 'दीपाली' हेच बरोबर आहे.
असुदे, अब्र शब्द माहित
असुदे,
अब्र शब्द माहित नव्हता. या 'अब्र'चं `अभ्र'शी नतं वाटतं आहे. अभ्र म्हणजे पण ढग. उदा. `निरभ्र आकाश' - अभ्र (ढग) नसणारे आकाश.
`अब्द' हा वेगळा शब्द. त्याचाही अर्थ ढग असाच. (संस्कृत `आप' (पाणी) वरून.) अब्द म्हणजे खूप हा वर बी ने सांगितलेला अर्थ मला नवीन आहे.
"कोंदटलेल्या काही क्शणात किती
"कोंदटलेल्या काही क्शणात किती अब्द अब्द फिरुन गेल आम्हादोघांभोवती "अस ते वाक्य आहे..युगन्धर..
द्विरुक्ती या शब्दाचा अर्थ
द्विरुक्ती या शब्दाचा अर्थ उदा. सहीत मला हवा आहे. शब्दरत्नाकर मधे पुनरुच्चार असा दिला आहे. मला काही कळला नाही. शोनूला विचारले पण तिने अनुल्लेखानी मारले. (मायबोलीवर हा कसला प्रकार रुळत चालला आहे. काहीही कारण बिरण नसताना भली माणसे चुकीच्या गोष्टींचे अवलंबन करतात. असो.. )
मदतीबद्दल मदत करणार्याचे आभार.
तो संधी द्वि+ उक्ती असा आहे.
तो संधी द्वि+ उक्ती असा आहे. अर्थ स्पष्ट आहे. द्वि म्हणजे दोन आणि उक्ती म्हणजे म्हटलेले.. पुनरुचार हा मला वाटते अनेक वेळा होऊ शकतो. द्विरुक्ती त दोन वेळा म्हणणे अपेक्षित आहे.
वन्दे मातरम
वन्दे मातरम. याला द्विरुक्ती म्हणता येईल. उक्ती शब्दावरून केवळ बोलण्याशी संबधीत आहे असे दिसते पण प्रत्यक्षात लेखनात झालेल्या पुनरावृत्तीस द्विरुक्ती म्हणण्याचा प्रघात आहे....
'द्विरुक्तीचा दोष पत्करूनही , मला पुन्हा सांगावेसे वाटते ..'अशा स्वरूपाचा भाषावापर होऊ शकतो/होतोही....
हे आपलं मपलं मत्त हां...
अब्र (पर्शियन) म्हनजे
अब्र (पर्शियन) म्हनजे ढग.
गालिब छूटी शराब , पर अब भी कभी कभी....
पीता हूं रोज्-ए-अब्र-ओ- शब -ए-माहताबमे...
गालिबने दारू कधीच सोडलीय, हो पण ढगाळ रात्री आणि स्वच्छ चांदण्या रात्री मात्र तो ही शपथ तोडतोच. (म्हणजे रोजच! :फिदी:)
वन्दे मातरम. याला द्विरुक्ती
वन्दे मातरम. याला द्विरुक्ती म्हणता येईल>> रॉबीन, काही कळले नाही.. वन्दे मातरम मधे काय दोनदा म्हंटलेले आहे? वन्दे म्हणजे वंदन आणि मातरम म्हणजे माता. मातेला वंदन असा अर्थ. त्यात दोनदा काय म्हंटले गेले आहे.
धन्यवाद!
बी, "वंदे मातरम्, वंदे
बी, "वंदे मातरम्, वंदे मातरम्" अशी द्विरुक्ती म्हणताहेत ते (बहुतेक).
बरोबर का हो हूड?
"वंदे मातरम्, वंदे मातरम्"
"वंदे मातरम्, वंदे मातरम्" अशी द्विरुक्ती म्हणताहेत ते (बहुतेक).>>> आर्फी, सुरवातीला मलाही तसेचं वाटले अगदी. पण मग विचार केला तसे नसावे.. कारण गाताना दोन काय तीन चार वेळा देखील आपण तेच तेच शब्द म्हणू शकतो. हुड नीट सांग अजून.
'वन्दे मातरम्| वन्दे मातरम्|'
'वन्दे मातरम्| वन्दे मातरम्|' हे उदाहरण 'द्विरुक्ती' संज्ञेच्या रूढ वापरासाठी तितकंसं चपखल नाही. 'पिवळं पीतांबर', 'वटवृक्षाच्या झाडाखाली' वगैरे उदाहरणे द्विरुक्तीची नमुनेदार उदाहरणे म्हणता येतील.
संकल्प म्हणतो ते अधिक बरोबर
संकल्प म्हणतो ते अधिक बरोबर आहे. वन्दे मातरम दोनदा म्हणण्यालाच मी द्विरुक्ती म्हणालो होतो
याचा अर्थ असा की एकाच वाक्यात
याचा अर्थ असा की एकाच वाक्यात दोन समान अर्थी शब्द आले की त्या वाक्यात द्विरुक्ती निर्माण होते. उदा. वीर सावरकरांच्या ह्या ओळी पहा:
'परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी' -- अर्थात, परवशतेच्या म्हणजे पारतंत्र्याच्या नभात म्हणजे आकाशात तूच आकाशी असतेस.
याबद्दल इथे काही माहिती आहे, ती खरी आहे का? http://mr.upakram.org/node/1053
फ, हुड, आर्फी - आभारी आहे.
बी, 'परवशतेच्या नभात तूची
बी, 'परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी' या ओळीबद्दल उपक्रमावरील दुव्यावर नोंदवलेली शक्यता ('नभात' ऐवजी 'तमात' असायची) असू शकते.
पण दुसरीही एक शक्यता असू शकते : 'नभस्' या संस्कृत नामाचे अर्थ खालीलप्रमाणे होऊ शकतात (संदर्भ : वामन शिवराम आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशातील ही नोंद, तसेच आर्थर मॅक्डोनेलाच्या संस्कृत शब्दकोशातील हे पान) :
१. आकाश / वातावरण
२. अभ्राच्छादन ; धुक्याचे/ढगांचे आवरण
३. श्रावण (महिना)
यातील क्र. २ अर्थानुसार 'जयोस्तु ते' गीतातील ओळीचा अर्थ असाही होऊ शकतो : 'परवशतेच्या ढगांनी आसमंत व्यापले असताना, आकाशात तूच एकमेव (लखलखती चांदणी) होतीस'.
अर्थात, ही दुसरी शक्यता मांडली आहे. सावरकरांना असेच अभिप्रेत असेल असे नाही.
वा फ! छानचं आहे तू लावलेला
वा फ! छानचं आहे तू लावलेला अर्थ.
-----
काल मला प्रसाद शुभप्रभात म्हणाला आणि परवाच्या रात्री एक मित्र सुरात्री म्हणाला. कानाला हे दोन्ही शब्द वेगळे वाटले. आपण सुप्रभात आणि शुभरात्री असे म्हणतो. 'सु' काय आणि 'शुभ' काय दोन्हीचे अर्थ तसे एकचं होतात इथे. मग प्रभातला 'सु' आणि रात्रीला 'शुभ' का लावतात?
अरे वा! छान फलक! विमानतळावर
अरे वा! छान फलक!
विमानतळावर उत्प्रवास जाँच असा संस्कृत्मिश्रीत हिंदी शब्द Immigration Check ला वापरतात. त्यातील उत्प्रवास ह्या शब्दाची फोड काय? उत् = वरच्या दिशेने आणि प्रवास म्हणजे विमानप्रवास असे म्हणायचे असेल का? पण मग हे immigration चे भाषांतर नाही. तसेच बोटीने प्रवास केल्यास काय शब्द असेल?
मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास केला असेल तर वाटेत जी विद्युत उपकेन्द्रे असतात त्यावर "कर्षण" असा शब्द वापरलेला असतो त्याचा अर्थ काय? English मध्ये त्यांस traction लिहिलेले असते. ह्यावर मला एका इसमाने असा खुलासा केला की attraction म्हणजे आकर्षण म्हणून Traction म्हणजे कर्षण
कोणी जाणकार माहिती देतील काय?
मागच्या पोष्टी वाचल्या! त्रैराशिकापेक्शा 'गुणोत्तर' बरे वाटतेय का? म्ह्णजे ते उदाहरण त्रैरशिक मान्डुनच सोडवता येइल पण Unitary असा काहीतरी शब्द दिसला म्हणून... असो आता बहुधा ते वाचणारे कोणी नसेल.
मध्यंतरी एका हिंदी फॉर्मवर
मध्यंतरी एका हिंदी फॉर्मवर चेक नंबर चे 'चेक संख्या' असे भाषांतर केलेले वाचले आणी ते खटकले. चेक नंबर करता 'चेक संख्या' पेक्षा 'चेक क्रमांक' हा शब्द जास्त योग्य नाही का वाटत?
मराठीत हो. क्रमांकच
मराठीत हो. क्रमांकच पाहिजे.
हिंदीमध्ये 'संख्या'ला काही वेगळा अर्थ नाही आहे ना?
तसेच चेक ला धनादेश असे
तसेच चेक ला धनादेश असे म्हणतात
मी नुकतीच होनाजी बाळा ची एक
मी नुकतीच होनाजी बाळा ची एक रचना - सांगा मुकुंद कुणि हा पाहिला - ऐकत होतो. माझी ऐकण्यात चूक झाली असेल, पण मी खालील ओळी ऐकल्या:
" बोलावुनि सुद्धा प्रतिनंद जिच्या
प्रेमपदी अन पुळटिळकाच्या
म्हणे होनाजी देव...."
याचा अर्थ काय? प्रतिनंद कोण? पुळटिळकाच्या म्हणजे काय?
धन्यवाद.
एका संस्कृतमधील शैक्षणिक
एका संस्कृतमधील शैक्षणिक सर्टीफिकेट (मार्क लिस्ट)मध्ये 'उत्तरमध्यमा' व 'पूर्वमध्यमा' परीक्षा' असं लिहिलं आहे.
त्याचा अर्थ काय?
द्वंद असा शब्द आहे का? त्याचा
द्वंद असा शब्द आहे का? त्याचा अर्थ काय? वाक्यात उपयोग कसा?
द्वंद्व आणि द्वंद यांचा काही संबंध आहे का?
`अब्द' म्हणजे साल/ वर्ष ना??
`अब्द' म्हणजे साल/ वर्ष ना?? बहुदा तोच आहे अर्थ.. जसे की शताब्दी, षष्ट्यब्दी..
झक्की, गोपी आळविती , हे
झक्की,
गोपी आळविती , हे ब्रजभूषणा हे,
वियोग अम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनी सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी देह हा वाहिला.
http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1076.htm
भरत मयेकर, धन्यवाद. ऐकण्यात
भरत मयेकर, धन्यवाद. ऐकण्यात चूक झाली होती. विचारपूस मधे पण तुमचे पत्र पाहिले. धन्यवाद.
वर्षा, उत्तरमध्यमा म्हणजे
वर्षा,
उत्तरमध्यमा म्हणजे नऊमाही परिक्षा आणि पूर्वमध्यमा म्हणजे तिमाही परिक्षा असेल... कारण मध्यमा म्हणजे सहामाही बहुतेक..
फचिन परिक्षा नाही...परीक्षा
फचिन परिक्षा नाही...परीक्षा
यात्रा, जत्रा, उत्सव, उरुस
यात्रा, जत्रा, उत्सव, उरुस ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत की एकच??
फचिन, धन्यवाद. मलाही तसंच
फचिन, धन्यवाद. मलाही तसंच वाटलं होतं. परंतु मी ते शब्द आहेत तसेच वापरले. (क्लायंटच्या सांगण्यावरुन)
>>> यात्रा, जत्रा, उत्सव,
>>> यात्रा, जत्रा, उत्सव, उरुस ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत की एकच??
यात्रा - देवस्थान / तीर्थस्थान ला जाऊन देवदर्शन घेणे.
जत्रा - एखाद्या गावातील लोकांचा सामूहिक उत्सव किंवा संमेलन. जत्रा एखाद्या देवस्थानाशी सुद्धा निगडीत असू शकते. परंतु जत्रा एखाद्या देवस्थानाशी किंवा धार्मिक उत्सवाशी निगडीत असणे आवश्यक नाही.
उत्सव - सामूहिक कार्यक्रम (धार्मिक किंवा सामाजिक)
उरुस - सर्वसाधारणपणे ऊरूस हा एखाद्या मुस्लिम पीराची जत्रा / उत्सव असतो.
Pages