शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, तुला कृणानुबंध शब्द कोठे दिसला ? वर ऋणानुबंध यावर प्रश्न आहे. >> पहिल्यांदा कृणानुबंध असाच लिहिला होता नंतर बदलल्यासारखा वाटतोय..

आमटी ला संदर्भानुसार करी, ग्रेव्ही असेही म्हणता येईल - माशाची आमटी - फिश करी, फिश इन कोकोनट ग्रेव्ही असे.

खापर फोडणे - ब्लेम पेक्षा स्केपगोट जास्त चपखल नाही का? खापर फोडणे म्हणजे खरी चूक नसताना सुद्धा अपयश कोणाच्या तरी माथी मारणे असा अर्थ आहे ना .

फोडणी ला टेम्परिन्ग असा शब्द पण वापरतात. सीझनिंग हे मीठ -मिरपूड घालण्याबद्दल वापरतात जास्त करून.

वचवच - ब्लॅबरिंग, जिबरिश, गॅबिंग

रुद्रावतार - मॅड अ‍ॅज हेल, थ्रोइंग अ ( हिस्सी) फिट,

डिंग्या हाणणे - म्हणजे बाता मारणे, बढाया मारणे का ? तसे असेल तर फेकिंग, मेकिंग टॉल क्लेम्स, ब्लोईंग स्मोक इत्यादी वापरता येईल.

दीपाकुल : इंग्लिशीतल्या 'Ticket' या शब्दाला मराठीत 'तिकीट' असाच शब्द योजतात (महत्त्वाचे : ति र्‍हस्व = इकारयुक्त; की दीर्घ = ईकारयुक्त).

नात्या, कल्पना चांगली आहे. विचार करायला हवा.. तसं काही डोक्यात मुरलं, तर काहीतरी करता येईल.

ऋग्वेद : मिलिंदा आणि रॉबिनहूडांनी सांगितलेला लिफ्टीचा प्रतिशब्द बरोबर आहे - 'उद्वाहन' ('उत् + वाहन' => संधी होऊन => उद्वाहन. 'उत्' या संस्कृत पूर्वपदाचा अर्थ 'वर, वरच्या दिशेत'; 'वाहन' हे 'वह् - वहति' या '(ओझे) वाहणे' अर्थाच्या संस्कृत 'धातुपासून बनलेले विशेषण आहे - अर्थ = '(ओझे/वस्तू) वाहून नेते ते' = (प्राणी किंवा गाडीसारखे) वाहन.) लिफ्ट हे 'वर वाहून नेणारे यंत्र/वाहन' असल्यामुळे त्याला हा प्रतिशब्द 'उद्वाहन'.

मधुकर७७ : तुम्ही बहुधा 'उद्' म्हणजे काय असा प्रश्न विचारला असावा, असे गृहित धरून - वर लिहिल्याप्रमाणे 'उत्' या संस्कृत पूर्वपदाचा अर्थ 'वर, वरच्या दिशेत'. या 'उत्' प्रत्ययाने आरंभणारी कितीतरी क्रियापदे, नामे, विशेषणे संस्कृतात आहेत व मराठीतही आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो. काही उदाहरणांमधून थोडी झलक दाखवतो :
१. उत्तम : (जात : विशेषण), 'उत् + तम' => उत्तम. '-तम' या प्रत्ययाचा अर्थ इंग्लिशीत '-est'. म्हणजे एखाद्या गुणधर्माची तुलना करताना, त्यातील परिसीमा दाखवणारा इंग्लिशीतल्या '-est' सारखाच हा आपला '-तम' प्रत्यय. इंग्लिशीत उंच-अधिक उंच (अमुकापेक्षा उंच)-सर्वांत उंच अशा तुलनात्मक विशेषणांना जसे High, Higher, Highest अशी चढत्या भाजणीतली विशेषण योजतात तशी आपल्याकडे 'उच्च'-'उच्चतर' (अमुकापेक्षा अधिक उंच)-'उच्चतम' अशी विशेषणे आहेत. इंग्लिशीतल्या '-est' ऐवजी आपण '-तम' जोडतो आणि '-er' ऐवजी '-तर'.
या तुलनात्मक वर्णन करताना '-तर', '-तम' वगैरे प्रत्यय जोडण्याच्या प्रकाराला 'तरतमभाव' किंवा 'तारतम्य' म्हणतात. गमतीची गोष्ट अशी, की मराठीत हा 'तारतम्य' शब्द उणे-अधिक तुलना करण्याचा भाव सांगण्याबरोबरच 'सदसद्विवेकबुद्धी' अशा अर्थाने, म्हणजेच बरे-वाईट/ कमी-जास्त कळण्याच्या अकलेच्या अर्थाने योजला जातो. Happy

असो. तर 'उत् + तम' = 'सर्वांत वर' (इंग्लिशीत Toppest)

२. उत्कर्ष : (जात : नाम, विशेषण), 'उत् + कर्ष'. यातील 'कर्ष' हे शब्दांग 'कृष् - कर्षति' (= खेचणे, ओढणे) या संस्कृत क्रियापदापासून बनलेले साधित नाम आहे; थोडक्यात अर्थ 'खेच'/'ओढ'. त्यामुळे 'वरच्या दिशेतली खेच/ओढ' => वरच्या दिशेने झालेली प्रगती => उत्कर्ष.

३. उपटणे : (जात : क्रियापद), 'उपटणे' हे आपल्याकडचं क्रियापद 'उत्पट् - उत्पाटयति' या मूळ संस्कृत धातूचं अपभ्रष्ट रूप (उत्पट => उप्पट => उपट अशा क्रमाने बदललेलं). 'पट् - पाटयति' म्हणजे 'खुडणे'; त्यामुळे 'उत् + पट्' म्हणजे 'वरून खुडणे', उपटणे.

रामदासांनी रचलेल्या मारुतीस्तोत्रात संस्कृत 'उत्पाटयति' आणि आजच्या मराठीतले 'उपटणे' या क्रियापदांच्या दोन पिढ्यांमधल्या पिढीतले मराठी क्रियापद आढळते - 'मंदराद्रिसारिखा द्रोणु क्रोधें उत्पाटिला बळें'.

४. उन्मळणे : (जात : क्रियापद), 'उन्मळणे' हे आपल्याकडचं क्रियापद 'उत् + मूल' => 'उन्मूल् - उन्मूलयति' या 'मुळे वर (ओढून) काढणे', अर्थात 'मुळासकट उपटणे' या अर्थाच्या संस्कृत धातूवरून आलं आहे.

तिकीटाला प्रवेशपत्रिका शब्द चपखल वाटत नाही. कारण तिकीटात पैसे देउन विकत घेण्याचीही प्रक्रिया अन्तर्भूत आहे. (राजकारणातले तिकीटही आता तसेच झाले आहे :फिदी:). प्रवेश्पत्रिकेत तो 'फील' नाही वाटत. कारण परिक्षेची प्रवेशपत्रिका , फ्री पासातील प्रवेशपत्रिका या ति़कीटासारख्या वाटत नाहीत. अर्थात तिकीटाला चपखल शब्द आत्ता मलाही आठवत नाही आहे. Happy

कदाचित तिकीट ही संकल्पना 'तिकडून ' घेतली असल्याने तशीच मूळ शब्दात वापरावी लागेल का? अन्यथा त्याचे काहीतरी 'लोहपट अग्निरथ आवक जावक नियंत्रण लोहपट्टीका' असे काही तरी बेंग्रूळ भाषान्तर करावे लागेल.....

bill of exchange = विनिमय विपत्र
यावरुन अंदाज बांधायचा म्हणजे
bill= विपत्र (असा अंदाज आहे )

>>तसेच bill ला मराठी शब्द ?
'बिल' असा मराठी शब्दही वापरतात. लिंग : नपुंसकलिंग; एकवचन : '(ते) बिल'; अनेकवचन : '(ती) बिले'.

इंटरनेटवरील उत्तम व परीपूर्ण मराठी-मराठी शब्दकोष कोणता? मला 'खंडबहाले' व 'शब्दबंध' माहित आहेत पण ते अपुरे वाटतात.

कोणत्या बिलाबाबत चालू आहे? 'कंपनीज बिल' जे संसदेत वाळत पडलंय ते? की वस्तू विकत घेतल्यानंतर जे मिळतं ते? बिल म्हणजे पावती नाही, तर 'रीसीट (ऑफ मनी)' म्हणजे (तरी) पावती का?

रॉहू, नुस्ती संक्षिप्त उत्तरं देऊ नका हो.. विस्ताराने सांगा की

पावती म्हणजे रिसीट . घेऊन पावलो. त्या 'पावण्याचा' कागद म्हन्जे 'पाव'ती -- रीसीट. ही आपल्या कडे पूर्वीपासून आहे. बिल म्हणजे पैसे अथवा 'कन्सिडरेशन' मिळाल्याचा दस्त ऐवज. अशा स्वरूपात बिलिंग करण्याची पद्धत आपल्या संसकृतीत दिसत नाही. शब्दावर अथवा विश्वासावर आपले व्यवहार चालत. पाश्चिमात्याना पहिल्यापासून डॉक्युमेन्टेशनची परम्परा आहे. त्यामुळे बिलाचा कन्सेप्ट तोथे आला असावा. आता बिल हा कन्सेप्टच परकीय असल्याने मराठीत त्याला मूळ प्रतिशब्द नसावा. आता त्याच्या अर्थावरून ध्वनित होणारा पारिभषिक शब्द जर काढला तर बाब वेगळी. पण तो तसाही दिसत नाही. या विषयावर इथे फ, कुमार, चिनूक्स इत्यादी अभ्यासू मंडळी आहेत. त्यानी त्यांच्या ज्ञानाची पखाल इथे रिती करावी.

(वि.सू. वरील इत्यादी मध्ये झक्की येत नाहीत कारण त्याना कशातच काही कळत नाही. उगीच काहीतरी संस्कृत सदृष्य डुप्लिकेट भाषा वापरून ते इथे काहीतरी पांडित्यपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करतील . त्याकडे लक्ष देऊ नये. ते इकडे फिरताना दिसले तर मला सांगावे म्हणजे मी त्यांचा बन्दोबस्त करीन.)

बी,

बेंगरूळ म्हणजे गबाळा, अव्यवस्थित. त्याचा आणि बेंगळुराचा संबंध नाही. बेंगळूर (बेंगळुरू) हे नाव 'बेंद काळू उरू' (उकडलेल्या दाण्यांचे गाव) यावरून आलेलं आहे.

होयसळांचा एक राजा शिकारीसाठी रानात गेला असताना वाट चुकला. तेव्हा त्याला भेटलेल्या एका म्हातारीने त्याला उकडलेले दाणे दिले खायला. ती भेटली त्या जागी त्याने शहर वसवलं तेव्हा कृतज्ञता म्हणून त्याने वरचं नाव दिलं शहराला.
इथे विकिपीडियावर अधिक माहिती मिळेल.

'बिल' संबंधी:
शब्दरत्नाकरातील अर्थः विकलेल्या जिंनगीची किंवा केलेल्या कामाबद्दलची यादी व त्याबद्दलच्या पैशाची मागणी.
'बिल' हा इंग्रजी शब्द असेच नमूद करून वरील अर्थ दिलेला आहे.

Translation context:
We can find value of one object from many objects and then from that value we can find values of many objects. This method is called as the Unitary Method.

मला Unitary Methodसाठी मराठी शब्द हवा आहे. Unit=एकक, पण युनिटरीला काय म्हणणार?

प्लीज कुणीतरी लवकरात लवकर सांगा Happy

धन्यवाद

मला नक्की उत्तर माहित नाही सायुरी,
बीजगणितातला कंसेप्ट आहे हा - चार टॉमेटोंना दोन रुपये तर पाच टॉमेटो कितीला पडतील ? या प्रश्नाचं उत्तर काढायला एका टॉमेटो ची किंमत आधी काढायची. २००/४ = ५० पैसे, म्हणुन पाच टॉमेटोंना २५० पैसे = अडिच रुपये. यात पहिल्यांदा 'एका टॉमेटॉ' ची किमत काढली अन मग त्यावरून पाचांची. याला युनिटरी मेथड म्हणतात.
मराठीतून बीजगणित शिकलेल्यांनी सांगा याला काय म्हणतात!

आम्ही अशा गणितांना 'काळ-काम-वेगाची गणितं' म्हणायचो असं आठवतंय. (एक काम ७ माणसं ५ दिवसांत करतात तर तेच काम १० माणसं किती दिवसांत करतील.) 'नाव' असं नाही आठवत वापरल्याचं.

>>मला Unitary Methodसाठी मराठी शब्द हवा आहे. Unit=एकक, पण युनिटरीला काय म्हणणार?<<
तुम्ही मांडलेली युनिटरी मेथडसंबंधित संकल्पना मराठीत 'त्रैराशिक' या नावाने ओळखली जाते. त्रैराशिक म्हणजे 'अमुक एका जिनसाची किंमत डझनाला (समजा) ४८ रूपये आहे, तर त्या जिनसाचे ८ नग किती किमतीला पडतील?' अशा स्वरूपाची समीकरणे. असाम्याने नोंदवलेले "त्रैराशिक म्हणजे trinomial." हे मत मला तितकेसे बरोबर वाटत नाही. कारण, त्रिपदीच्या - अर्थात ट्रायनॉमियलाच्या - व्याख्येनुसार ती ३ व्यय राशींची (व्यय राशी = व्हेरिएबल/ इन्डिटर्मिनंट) बहुपदी (पॉलिनॉमियल) आहे. त्रैराशिकात केवळ एकच पद व्यय/ अज्ञात असते, बाकी दोन्ही पदे 'अव्यय' (कॉन्स्टंट) स्वरूपाचे असून ज्ञात असतात. नेमके, असेच वर्णन सायुरीने वर्णिलेल्या युनिटरी मेथडीस लागू होताना दिसते. त्यामुळे 'त्रैराशिक' हीच संकल्पना त्यातल्या त्यात चपखल असावी.

>>'कंपनीज बिल' जे संसदेत वाळत पडलंय ते?<<
या संदर्भात इंग्लिशीतील 'बिल' या नामाला आपल्याकडे 'विधेयक' असं म्हणतात. विधिमंडळासमोर एखादे विधेयक (बिल) चर्चेसाठी मांडले जाते. त्यावर चर्चा होऊन विधिमंडळाने विधेयक बहुमताने मान्य केल्यास ते पुढे राष्ट्राध्यक्ष/राष्ट्रपती किंवा तत्सम दर्जाच्या घटनात्मक शासनप्रमुखाकडे मंजुरीसाठी पाठवले जाते. त्यांची स्वाक्षरी झाल्यावर विधेयकाचे 'कायद्यात' (अ‍ॅक्ट) रूपांतर होते.
बाकी, 'पावती'संदर्भात रॉबिनहुडाने लिहिलेले स्पष्टीकरण बरोबर वाटते.

>>इंटरनेटवरील उत्तम व परीपूर्ण मराठी-मराठी शब्दकोष कोणता? <<
सध्यातरी ऑनलाइन माध्यमांत मराठी-मराठी स्वरूपाचा परिपूर्ण कोश उपलब्ध दिसत नाही. परंतु, विकितत्त्वावर 'मराठी विक्शनरी'चा प्रकल्प सध्या राबवला जातोय. यात सर्वजण सहभागी होऊन आपापल्या माहितीची भर घालू शकतात. सध्या बाल्यावस्थेत असलेल्या या प्रकल्पात १२००+ नोंदी आहेत. आपल्यासारख्या लोकांनी सहभाग घेऊन भर घातल्यास हा मराठी-मराठी शब्दकोश नक्कीच विस्तारेल.
याच प्रकल्पाचा मित्रप्रकल्प असलेला 'मराठी विकिपीडिया' ज्ञानकोश सार्वजनिक सहभागासाठी खुला आहे. मराठीत सहजगत्या उपलब्ध असणारा ज्ञानकोश बनवण्याच्या उद्देशाने आरंभलेला हा प्रकल्प आज २५,६००+ नोंदींपर्यंत पोचला आहे. लोकांकडून सक्रिय सहभाग मिळाल्यास हा प्रकल्पदेखील जोमाने फोफावेल.

खेरीज, ऑनलाइन मराठी-इंग्लिश शब्दकोश येथे बघता येतील.

अवांतर :
>>(वि.सू. वरील इत्यादी मध्ये झक्की येत नाहीत कारण त्याना कशातच काही कळत नाही. उगीच काहीतरी संस्कृत सदृष्य डुप्लिकेट भाषा वापरून ते इथे काहीतरी पांडित्यपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करतील . त्याकडे लक्ष देऊ नये. ते इकडे फिरताना दिसले तर मला सांगावे म्हणजे मी त्यांचा बन्दोबस्त करीन.)<<
रॉबिनहूडहो, तुम्ही वरील विधाने टाइमपासार्थ बकवास / विनोद करण्यासाठी केली असावीत, असे मी गृहित धरतो. तसे नसल्यास, तुमच्या 'म्हणजे मी त्यांचा बन्दोबस्त करीन' या विधानाची व्याप्ती काय असेल, बंदोबस्त करणार म्हणजे कुठल्या मार्गाने करणार, वगैरे प्रश्न उद्भवतात.

Pages