शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खालील शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते हवे आहे.
निबंधक
अधिनियम
उपबंध (उदा. नियम ३-अ चा उपबंध)

ओके मिळाले मलाच वरील शब्दांचे इंग्रजी शब्द.
निबंधक:Registrar आधिनियम: Act उपबंध:Provision
पण मला अजून एक शब्द अडलाय.
’यथास्थिती’
वाक्य असं आहे:’अधिनियम पाचवा याच्या कलम ५ (३) अनुसार किंवा यथास्थिती या नियमापैकी नियम ३-अ च्या उपबंधानुसार रक्कम नमूद करणे.

इथे यथास्थितीचा अर्थ काय? कोणी सांगू शकेल काय?

सारस्वत म्हण्जे सरस्वती लुप्त होण्यापूर्वीचे तिच्या तीरावर राहणारे ब्राम्हण. सरस्वती लुप्त झाल्यावर ते सर्वत्र पांगले. आपल्याकडे कोकनागोव्यात असणारे सारस्वत हे गौड सारस्वत ब्राम्हन. त्यांचे चित्रापूर सारस्वत,शेणवी, बारदेशकर असे मठानुसार प्रकार पडतात... मला वाटते गोव्यात कवळ्याला त्यांचा गौडपादाचार्यांचा मूळ आश्रम किंवा मठ आहे...

मला कोणी एखादा चांगला इंग्रजी-मराठी/मराठी-इंग्रजी शब्दकोष सुचवेल का? शक्यतो कोणी प्रत्यक्ष वापरला असल्याचा अनुभव असल्यास उत्तम. देशातून मागवायचा विचार आहे.
तसंच महाजालावरील संकेतस्थळेही सुचवा.
मला सध्या ही ठाऊक आहेतः
http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
http://www.websters-online-dictionary.org/translation/Marathi/
http://dsal.uchicago.edu/dictionaries/vaze/
http://vishwakosh.org.in/

चिनूक्स , मध्यांतर कसे बरोबर ? म्हणजे काही नियम आहे का ( अ + अ = आ म्हणून ) की शब्दकोषात तसे आहे ? मला मध्यंतरच बरोबर वाटतेय .

स्पाँडिलॉसिस म्हणजे मणक्यांचा संधिवात (arthritis). त्याला अगदी एक शब्द तयार करायचा झालाच तर करता येईल Happy
मध्य + अंतर असे असेल तर 'अ + अ = आ' नियम लागू होतो. चिनूक्साचे बरोबर आहे.

अष्टावधानी म्हणजे आठही दिशाना एकाच वेळी ज्याचे अवधान म्हणजे जागरूक लक्श आहे असा तो. म्हैसूरचा हैदर अली असा होता म्हणतात. म्हण्जे असे की, तो सकाळी तोंड धुताना आठही दिशाचे हेर त्याला एकाच वेळी आठ दिशांच्या बातम्या सांगत. आणि मग त्यावर तो मंत्र्याना आदेश देत असे. क.खो. अल्ला/देव जाणे Happy

विजीगिषु असण्याकरता अष्टावधानी असणे पण गरजेचे आहे तर <<< अष्टावधानी नसतानाही विजयी होण्याची तीव्र इच्छा असू शकते की. :p

कोणी मला खालील दोन नावांचा अर्थ सांगू शकेल का?
१] अर्चिस
२] शर्विन
ही दोन्ही नावे मला खूप आवडली आहेत. मला माझ्या मुलाचे नाव ठेवायचे आहे.
पण अर्थ माहित नाही.

ग्रामसेवकला इंग्रजी प्रतिशब्द नाही. पण मोठ्या गावच्या ग्रामसेवकाना 'ग्राम विकास अधिकारी ' म्हणतात त्याला मात्र व्हिलेज डेव्हलप्मेन्ट ऑफिसर असे नाव आहे...

अर्चिस् = प्रकाश किरण, तेज, अग्नी. अर्चिस हे नाव सूर्याला समानार्थी म्हणूनही वापरतात - विष्णुसहस्त्रनामामध्ये सहस्त्रार्चि: असे विष्णुचे नाव आहे.
खरंच खूप सुंदर नाव..

शर्विन - असा शब्द माझ्या माहितीनुसार नाही. खरंतर पाश्चात्यांत शर्विन नाव ऐकलंय.
संस्कृत शब्द "शर्व" हे शिवाचे आणि विष्णुचे नाव आहे. त्याचा अर्थ आहे मारणारा, निर्दाळण करणारा.

Pages