शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद chinoox आणि ksha!!
विष्णुसहस्त्रनाम मी वाचले होते... पण त्यात 'अर्चिष्मान् अर्चित्' असे आहे. म्हणुन जरा शंका वाटली की अर्चिस असा शब्द आहे का...
मी पुन्हा एकदा ते वाचतो.. अर्थ खूपच छान आहे..

'शर्विन'चा मी पण शोध घेतला... शर्व असाच शब्द सापडला ज्याचा अर्थ शिव असा आहे.
पण इराणी मूळ असलेला शर्विन नावाचा शब्द आहे ज्याचा अर्थ होता 'युद्धभूमीवर शत्रूला नामोहरम करणारा'.
आता तुम्ही सांगितलेला अर्थ आणि मला सापडलेला इराणी मूळ असलेला अर्थ ह्यात जरा साधर्म्य दिसतय..

विष्णुसहस्त्रनामात अर्चिस असा शब्द नाही. सहस्त्रार्चि: म्हणजे सहस्त्र किरणांप्रमाणे तेजस्वी अशा अर्थाचे नाव आहे. (अर्चिस् हे विशेषनाम)
अर्चिष्मानचा अर्थही तेजस्वी, देदिप्यमान असा होतो. (हे बंगाली लोकांत बरंच ऐकायला मिळतं - क्लीष्ट नावं देण्यात त्यांचा हात धरणं अवघड :))
विष्णुसहस्त्रनामामध्येच विष्णुचे शर्व असेही नाव सांगितले आहे.

मी दोन-तीन शब्दकोश बघितले. त्यात 'शर्विन' असा शब्द दिसला नाही.

शर्मन असा शब्द आहे. अर्थ - सुख किंवा रक्षणकर्ता

हे बंगाली लोकांत बरंच ऐकायला मिळतं - क्लीष्ट नावं देण्यात त्यांचा हात धरणं अवघड )

>>>
विशेषतः पुरुषान्ची.
धृतिमान चतर्जी हा त्यांचा एक नट. माझ्या एका साहेबाच्या मुलाचे नाव त्याने ठेवले होते 'द्युतिमान' हे द्युतिमान काही माझ्या लक्षात रहायचे नाही . मी सारखा धृतिमान म्हणत असे. मात्र मुलींची नावे नादमधुर आणि लयबद्ध असतात. त्यावरून मी माझ्या मुलीचे नाव' रिमझिम' असे ठेवले आहे. त्या नावाला मात्र अनेक वर्षे कॉम्प्लिमेन्ट मिळत आहेत...:)

विकि आन्सर्स मधे खूप वेळा लोक चुकीची किंवा ऐकीव माहिती घुसडतात. मराठी/ संस्कृत नावांबद्दल तर फार कमी वेळा अचूक माहिती आढळते. "स्विनी" बद्दल चे लॉजिक फार विनोदी आहे Happy
स्विनी असा स्वतंत्र शब्द मराठी मधे / संस्कृत मधे नाही असे मला वाटते, कुणाला काही अधिक माहिती आहे का ?

.

नमस्कार लोकहो,
सध्या करत असलेल्या भाषांतरात खालील शब्द अडले आहेत.
punch bag
bubble wrap
stress ball
soft toy
Creative
journal/Diary- रोजनिशी?
Crocheting- क्रोशाचे विणकाम?
Constructive- भरीव?
child line/help line
recycling
internet- महाजाल? की आंतरजाल?
download
glamorous
make up - रंगभूषा?
play dough
bedlam cube, geomag, tangle

यापैकी मुख्यत्त्वे punch bag, bubble wrap, stress ball, bedlam cube, geomag, tangle यांना मराठीत काय म्हणणार हा प्रश्न पडला आहे. नाहीतर ते तसेच लिहिन. पण तुम्हाला शब्द सुचत असल्यास जरुर सांगा. शिवाय इतर उरलेल्या शब्दांचेही प्रतिशब्द माहित असल्यास सांगा.
आभारी आहे.

क्रिअ‍ॅटिव्ह = सृजनशील , निर्माण क्षम
सॉफ्ट टॉय =मऊ खेळणी.
कन्स्ट्रक्टिव्ह्=रचनात्मक
आंतरजाल रूढ होऊ लागलाय.
रोजनिशी ,क्रोशाचे विणकाम,
रिसायकल= पुनर्निमीती
रंगभूषा.
बाल मदत केन्द्र.
बाकी ओरिजिनल परकीय संकल्पना असल्याने त्याचे भाषान्तर कठीण आहे. केल्यास ते कृत्रीम आणि विचित्र होईल.

play dough: खेळासाठीची माती?

download: उतरवून घेणे. उदा: मी आंतरजालावरुन मुक्त-उगमप्रणाली माझ्या संगणकावर मोफत उतरवून घेतली.

help line: मदतीसाठी दूरध्वनी सेवा

bubble wrap: हवा भरलेल्या बुडबुड्यांचे आवरण Proud

milindaa, tanyabedekar धन्यवाद. गुंता शब्द योग्य वाटतोय.

अभ्यंग शब्दाचा मी घेतलेला अर्थ असा की जे भंग करू नये असे ते. बरोबर आहे का?
दुसरा शब्द, अभिष्ट म्हणजे चांगले, शुभ. बरोबर आहे का?

दोन्ही शब्दाचे योग्य अर्थ हवे आहेत.

आभारी आहे.

>>अभ्यंग शब्दाचा मी घेतलेला अर्थ असा की जे भंग करू नये असे ते. बरोबर आहे का?<<

१. 'भंग' शब्दाबद्दल : 'भंग' (मूळ संस्कृत लेखन 'भङ्ग') हा शब्द 'भञ्ज्' या संस्कृत धातूपासून (भञ्ज् = मराठीत 'भंगणे') बनलेले साधित नाम आहे. त्याचा अर्थ 'तडा'. या नामापासून 'अभंग' असं विरुद्धार्थी विशेषण तयार होतं.. ओघानेच, त्याचा अर्थ 'तडा न गेलेले', 'न भंगलेले' असा होतो.
२. 'अभ्यंग' शब्दाबद्दल : अभ्यंग (मूळ संस्कृत लेखन 'अभ्यङ्ग') हा शब्द 'अभि + अञ्ज्' या संस्कृत धातूपासून बनलेले साधित नाम आहे. 'अञ्ज्' धातूचा अर्थ 'चोपडणे', '(काहीतरी) चोळणे' असा आहे. 'अभि + अञ्ज्' धातूचा अर्थ 'तेल किंवा तत्सम जिन्नसाने चोपडणे/मर्दणे/मसाज देणे'. या धातूपासून बनलेले साधित नाम 'अभि + अञ्ज्' => 'अभि + अङ्गः' => 'अभ्यङ्गः'. अर्थातच, त्याचा अर्थ 'तेल किंवा तत्सम जिन्नसाने केलेले मर्दन/मसाज'.

>>दुसरा शब्द, अभिष्ट म्हणजे चांगले, शुभ. बरोबर आहे का?<<

मुळात 'अभिष्ट' हे लेखन योग्य नसून 'अभीष्ट' (अभि + इष्ट => संधी होऊन => अभीष्ट) हे लेखन योग्य आहे. 'अभीष्ट' हा शब्द 'अभि + इष्' य संस्कृत धातूपासून ('इष्' = इच्छिणे. 'अभि + इष्' = 'चांगले इच्छिणे'.) बनलेले धातुसाधित विशेषण (नेमकं सांगायचं तर कर्मणि भूतकालवाचक धा. वि.) म्हणजे 'अभीष्ट'; ओघाने, त्याचा अर्थ 'चांगले इच्छिलेले/ शुभ इच्छिलेले'.

..

ईमारतितील लिफ्ट ला मराठीत काय म्हणायचं
फोडनी (भाजीची) = इंग्रजीत काय?
विसावा= इंग्रजीत काय?
आमटी = इंग्रजीत काय?
भामटा= इंग्रजीत काय?
गधड्या= इंग्रजीत काय?
रुणानुबंध= इंग्रजीत काय?
हेलपटा= इंग्रजीत काय?
वचवच= इंग्रजीत काय?
डिंग्या हाणने= इंग्रजीत काय?
खापर फोडणे= इंग्रजीत काय?
रुद्रावतार= इंग्रजीत काय?
आज एवढे पुरे.

अध्यात्मिक की आध्यात्मिक की आध्यत्मिक की अजून काही वेगळे? बरोबर कुठला?

कृणानुबंध मी पहिल्यांदाच ऐकतो आहे.

फोळनी (भाजीची) = फोडणी आहे ते फोळनी नाही = seasoning

विसावा= इंग्रजीत काय? = rest

आमटी = इंग्रजीत काय? = lentil soup

भामटा= इंग्रजीत काय? = loafer

गधड्या= इंग्रजीत काय? = morron/stupid/donkey???

कृणानुबंध= इंग्रजीत काय?

हेलपटा= इंग्रजीत काय?

वचवच= इंग्रजीत काय? = blah blah

डिंग्या हाणने= इंग्रजीत काय?

खापर फोडणे= इंग्रजीत काय? = to blame

रुद्रावतार= इंग्रजीत काय? Rudra's incarnation

कृणानुबंध मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. <<<
बी, तुला कृणानुबंध शब्द कोठे दिसला ? वर ऋणानुबंध यावर प्रश्न आहे.

लिफ्ट ला उद्वाहन म्हटलेलं ऐकलं होतं, पण उद् चा अर्थ वर च्या दिशेला जाणारा असा होतो का ? हे नीट आठवत नाही. फ ?

रुद्रावतार= इंग्रजीत काय? Rudra's incarnation <<< बी, शब्दशः भाषांतर नको आहे रे. रुद्रावतार धारण करणे म्हणजे अतिशय क्रोधित होणे.

भामटा = loafer हे बरोबर वाटत नाही. loafer = मवाली (good for nothing)
भामटा सहसा फसवणूक करणार्‍याला किंवा लुबाडणार्‍याला म्हणतात, त्या अर्थी crook किंवा swindler असं म्हणता येईल

Pages