शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला टोणगा चे म्हणणे पटले. शोध घेतला आणि शोध लावला, हे सोपे पर्याय वाटताहेत. शोधून काढली/ले पण काही बाबतीत योग्य वाटते.

किरण इन्वेंशन म्हणजे पूर्ण नवनिर्मिती तर इनोव्हेशन म्हणजे वर्षाने लिहल्यासारखे नवपरिवर्तन किंवा नवरचना / नवरिती इ म्हणजे असलेल्या गोष्टी नविन पद्धतीने करने.

टोणग्याचा पर्याय नुतनीकरण हा रिनोव्हेट ह्या इंग्रजी शब्दाला मराठी पर्याय वाटतो.

'नुतनीकरण' करताना नवीन पद्धत वापरली असेल, अथवा बदल केले असतीलच असं नव्हे. innovate या शब्दात 'पद्धतीत बदल करणे/सुधारणा करणे' हा अर्थ अपेक्षित आहे. त्यामुळे 'नुतनीकरण' हा शब्द योग्य नाही.

innovation म्हणजे नावीन्यपूर्ण सुधारणा (ज्यात कल्पकता असते)
invention म्हणजे शोध (ज्यात संशोधन असते)
हे योग्य वाटते का?

Weightage व Weighted Average या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द आहेत का?

'गव्हर्नंस' ला मराठी शब्द काय आहे?

गुरुजी..
Weightage तौलानिक/तुलनात्मक वजन
Weighted Average तौलानिक/तुलनात्मक वजनाची सरासरी

चंपक, हे संख्याशास्त्रातले शब्द ना. तिथे तसले (म्हणजे किलो वगैरे ) वजन अपेक्षित नाही.
इथे महत्व अश्या अर्थाने वेट हा शब्द येतो. काहितरी वेगळा शब्द असेल.

Weightage तौलानिक/तुलनात्मक महत्व/ गुण/ गुणसंख्या/ गुणवत्ता
Weighted Average तौलानिक/तुलनात्मक गुणांची सरासरी

असे होऊ शकेल का?

गव्हर्नंस ला मराठी शब्द काय?

रॉबीन, परट्या म्हणजे काय? 'परट्यांची भोकं' अशी उपमा जीएंनी काही ठिकाणी डोळ्यांकरता वापरलीय.

धन्यावाद!

पण मग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ला प्रशासन हा शब्द योग्य आहे का?

अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅन्ड गव्हर्नंस मध्ये फरक काय?

उदा. यशदा - विकास प्रशासन प्रबोधिनी. अन गुड गव्हर्नंस म्हणजे पण सु-प्रशासन का?

>>पण मग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ला प्रशासन हा शब्द योग्य आहे का?

अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ला व्यवस्थापन हा शब्द जास्त योग्य वाटतोय आणि गव्हर्नंस ला प्रशासन!

नाही. व्यवस्थापन म्हणजे management.
मला वाटते प्रशासन व संचालन असे शब्द वापरावेत. (संचालन मला फारसा रुचला नाहीये, अजून कोणास चांगला पर्याय सुचल्यास लिहावे)

'घरकाम' ला योग्य english प्रतिशब्द काय? ( गमतीने आपण homework म्हणू शकतो! )

Mala "Shivakalyan Raja" madhil eka ooli cha aartha hava aahe .....

"Savadh pane Nrupavar Tuchha kele" .......

Koni madat karu shakel kay ?

वर innovation आणि invention वर चर्चा वाचली.
innovation ला नवोन्मेष हा शब्द कसा वाटतोय? आणि invention ला.. थांबा विचार करून सांगते.

मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे

Pages