शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अ‍ॅग्रिकल्चर/animal husbandry-livestock या विषयातील शब्दकोष/terminology/glossary (इंग्रजी > मराठी) पाहिजे आहे. कुठे मिळू शकेल हे कळल्यास आभारी राहीन.
तसेच प्राण्यांना (cattle, farm animals) होणार्‍या रोगांचीही इंग्रजी-मराठी glossary असली तर पाहिजे आहे.

'गद्धागाढव' हा मजेशीर शब्द वाचनात आला. तो 'गडधू' चा अपभ्रंश असून त्याचा अर्थ 'गावाची सीमा दाखवणारा दगड' असा आहे.

मला कुणी मुंबईतल्या भाषा संचालनालयाचा दूरध्वनी क्रमांक देऊ शकेल का?
मला इंटरनेटवर नाही सापडला.
बीबी चुकला आहे पण कुठे टाकावा हा प्रश्न कळलं नाही म्हणून इथे टाकला.

वर्षा, तुझे काम एकूण कठीणच दिस्तेय...

भाषा संचालनालय उरले अनुवादापुरते!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 04, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: mumbai, maharashtra, marathi, launguage directorate, translation, governance
मुंबई - राज्याच्या भाषाविषयक यंत्रणेचे मुख्य अंग असलेले भाषा संचालनालय केवळ अनुवादापुरते उरले असून, ते पूर्णपणे नोकरशहांच्या हाती गेले आहे. त्यावर खर्च होणाऱ्या 3 कोटी 25 लाख रुपयांपैकी फक्त पाच लाखांचा खर्च ग्रंथ प्रकाशन व अनुशंगिक बाबींवर खर्च होतो. इतर सारी रक्कम केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारांवर खर्च होत असते. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने लेखक-पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने आज प्रभारी संचालकांची भेट घेतली. या भेटीत ही आणि यासारख्या इतरही अनेक बाबी स्पष्ट झाल्या.

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राजभाषा मराठीविषयक सरकारचे धोरण राबविण्यासाठी व मराठीच्या विकासासाठी भाषा संचालनालयाची स्थापना करण्यात आली होती. मात्र अशा महत्त्वपूर्ण संचालनालयाकडे सरकारचे दुर्लक्षच होते आहे. कारण त्यासाठी योजनेत काहीही तरतूद केली जात नाही. इतक्‍या वर्षानंतरही त्यासाठीचा खर्च योजनाबाह्य खर्च म्हणूनच मंजूर करून घ्यावा लागतो.

सरकारी पातळीवरील अनास्थेचे केवळ हेच एक उदाहरण नाही. मराठी भाषेच्या विकासासाठी विविध विषयांचे परिभाषा कोश तयार करणे, अमराठी अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण, सरकारी कार्यालयांमधल्या मराठीच्या वापराचे परीक्षण या सारखी कामे संचालनालयामार्फत केली जातात. प्रत्यक्षात या संचालनालयातल्या कर्मचाऱ्यांना फक्त अनुवादकाचेच काम करावे लागतेय. मात्र तरीही भाषा संचालनालयातील अनुवादकांच्या जागा गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यासाठी 2004 मध्ये त्यासाठी कार्यवाही सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पण ती 2010 मध्येही पूर्ण झालेली नाही. परिभाषा कोष अद्ययावत करण्यासाठी आवश्‍यक असणारी भाषा सल्लागार मंडळाची नेमणूक गेल्या नऊ वर्षापासून रखडली आहे. संचालनालयाने 2005 मध्ये अर्थशास्त्र, स्थापत्य, वाणिज्य, शासन व्यवहार, शरीर आणि विद्युत या विषयांवरील सहा परिभाषा कोश पुनर्मुद्रणासाठी पाठवले आहेत आणि आता पाच वर्षें उलटून गेली तरी त्यांचे पुनर्मुद्रण सुरूच आहे. हे परिभाषा कोश किमान संकेतस्थळावर उपलब्ध व्हावेत यासाठी गेली काही वर्षे मागणी केली जात आहे. पण मुळात संचालनालयाचे संकेतस्थळ निर्माण होण्यासाठीही गेली अनेक वर्षे "कार्यवाही सुरू आहे'!

प्रभारी संचालक गो. ग. आल्हाट यांच्याकडे दीड महिन्यापूर्वीच संचालनालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर मांडलेल्या या साऱ्या समस्या त्यांच्यासाठी "नव्या' होत्या. साऱ्या मागण्यांचा मी पाठपुरावा करतो, प्रस्ताव पाठवतो किंवा पाठवलेले आहेत, असे सांगण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीच नव्हते. मराठी अभ्यास केंद्राने मात्र पूर्णवेळ भाषा संचालक, भाषा सल्लागार मंडळाची नेमणूक, संगणकीकरणाचा अभाव, ठप्प झालेली परिभाषाकोषांची कामे या साऱ्या बाबींचा पाठपुरावा करायचे ठरविले असून, त्यासाठी गरज भासल्यास लवकरच मंत्रालयावरही धडक देण्यात येईल, असे केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.

>>"संचालनालयाने 2005 मध्ये अर्थशास्त्र, स्थापत्य, वाणिज्य, शासन व्यवहार, शरीर आणि विद्युत या विषयांवरील सहा परिभाषा कोश पुनर्मुद्रणासाठी पाठवले आहेत आणि आता पाच वर्षें उलटून गेली तरी त्यांचे पुनर्मुद्रण सुरूच आहे. हे परिभाषा कोश किमान संकेतस्थळावर उपलब्ध व्हावेत यासाठी गेली काही वर्षे मागणी केली जात आहे. पण मुळात संचालनालयाचे संकेतस्थळ निर्माण होण्यासाठीही गेली अनेक वर्षे "कार्यवाही सुरू आहे'!"

वा वा छान!
मी परिभाषा शब्दकोषांची चौकशी करण्यासाठीच फोन करणार होते.

मराठी शब्द सुचवा
Browse = ’चाळणे’ शब्द कसा वाटतो?
Buyer = ग्राहक? (मी कुठेतरी ’खरेदीदार’ असा शब्द वाचला. असा शब्द आहे का मराठीत?)
Real estate = ?
Disclaimer = ?
Post = (उदा. आपण माबोवर टाकतो त्या पोस्ट्स...त्याला काही मराठी शब्द आहे का?)

चाळणे, ग्राहक बरोबर आहेत माझ्या माहितीनुसार.
रिअल इस्टेटला स्थावर मालमत्ता म्हणता येईल.
डिस्क्लेमरला एक असा शब्द सुचत नाही. तो सहसा लिखाणाबद्दल (आवाका इ.) विशेष सूचना देण्यासाठी वापरतात, बरोबर? मग 'विशेष सूचना'च म्हणायला हरकत नसावी.

विधान म्हणजे कायदा ना? मग वैधानिक इशारा म्हणजे कायद्याने देणं बंधनकारक आहे अशी धोक्याची सूचना - असं असावं. (Statuary warning?)
(सिगरेट्सवर असते तशी)
(मला नेहमी ते 'वैज्ञानिक इशारा' लिहायला चुकलं आहे असं वाटतं मात्र.) Happy

वैधानिक इशारा म्हणजे legal/statutory warning

मलाही रीअल इस्टेट = स्थावर मालमत्ता वाटतं आहे.

अरे हो मीपण वाचला आहे ’न्याहाळक’ शब्द. मग आपण ’वरवर चाळणे’ म्हणतो तसं ’वरवर न्याहाळणे” म्हणता येईल

अगं हो तो एक शब्द आहेच. माझ्याकडच्या शब्दकोषात असं आहे:
Post: (book keeping) to enter an item in ledger (रोजकीर्दीतून खातेवहीत नोंद करणे)

पण माझ्याकडच्या संदर्भात खातेवही नाही संकेतस्थळ आहे. म्हणून प्रश्न पडला.

बायरला खरेदीदार योग्य आहे. ग्राहक म्हणजे स्वीकारणारा घेणारा. सन्देश ग्राहक, गुणग्राहक असाही वापर असू शकतो त्यातून खरेदी व्यक्त होत नाही....

रीअल इस्टेट हा काही तांत्रिक शब्द नाही. गुणविशेषण आहे. स्थावर मालमत्ता म्हणजे इम्मोव्हेबल प्रॉपर्टी.

डिस्क्लेमर ला वैधानिक इशारा म्हणता येणार नाही. स्टॅटुटरी वार्निंग बरोबर. डिस्क्लेमर बन्धनकारक नसते.

धन्यवाद टोणगा.
मी डिस्क्लेमर शब्द तसाच घेणार आहे.
बाकी खरेदीदार पेक्षाही 'ग्राहक' हाच शब्द वापरेन कारण संदर्भानुसार 'ग्राहक' म्हणणेच योग्य वाटत आहे.
'खरेदीदार' हिंदी 'खरीददार' वरुन ओढून आणलाय असं वाटतं.

Terms & conditionsम्हणजे 'अटी'च ना? असे एकाच अर्थाचे दोन शब्द कशाला वापरतात..? मराठीत त्यासाठी 'नियम व अटी' लिहिलेलं दिसतं ते बरोबर आहे का?

तसंच 'log in' & 'sign in' मध्ये काय फरक आहे? दोन्हीचा अर्थ 'प्रवेश करणे'च होतो ना?

कीवर्ड (Keyword) = ?
अल्फान्युमरीक (Alphanumeric) = ?

डिस्क्लेमर हे सामान्यतः पुढील संभाव्य हानीची जबाबदारी टाळण्यासाठी वापरतात.
(ह्याला बेजबाबदारी म्हणावे काय :)) श्रेयअव्हेर हा शब्द मी ऐकला आहे. तो शब्दशः बरोबर आहे.
पण त्याचा किंवा डिसक्लेमर ह्या शब्दातूनही अभिप्रेत असलेला अर्थ त्यातुन निघत नाही. असो.

टपली म्हणायला हरकत नसावी <<
मला जाम आवडला हा शब्द........

आता यापुढे "अमुक लेखावर मी पोस्ट टाकून आल्ये" असं म्हणण्याऐवजी मी "अमुक लेखावर मी टपली मारून आल्ये" असं म्हणेन........ Happy

Pages