शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुष्टुभ् छंदाचा उल्लेख अथर्वशीर्षात पण येतो..>> पूनम, तो असे म्हणत आहे. म्हणून मी त्याला अथर्वशीर्षातील ओळी विचारत आहे.

माझी चूक.. अनुष्टुभ् नाहिये अथर्वशीर्षात... गायत्री छंदः आहे का मग?

नाही "निचृद्गायत्रीच्छंदः" असा शब्द आहे तो.

अथर्वशीर्षाचा विषय निघाला म्हणून विचारतो, आवर्तन करताना आपण "त्वमवस्थात्रयातीतः" का नाही म्हणत? त्वं गणुत्रयातीतः नंतर लगेच त्वं देहत्रयातीतः ||त्वं कालत्रयातीतः || ही ओळ म्हंटली जाते.

ओळी अशा आहेतः

त्वं गणुत्रयातीतः|| त्वमवस्थात्रयातीतः ||
त्वं देहत्रयातीतः ||त्वं कालत्रयातीतः ||

मी इथे एक संकेतस्थळ देतो आहे:
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b96883&lang=marathi

यात एक वाक्य आहे:
"१९७२ सालचा महाराष्ट्रतला भीषण दुष्काळ ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. "

उंटाच्या पाठीवरचे शेवटची काडी या वाक्प्रचाराचा अर्थ मला उमगला नाही म्हणून इथे विचारत आहे.

उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. >>>
वाईट परिस्थितीची परमावधी किंवा शेवटची वाईट घटना..

"विश्वंभर" या शब्दाचा नक्की अर्थ काय?

उंटाच्या पाठीवर शेवटची काडी हा मूळ मराठी/भारतीय वाक् प्रचार आहे का इन्ग्रजीतून आलेला आहे ते माहिती नाही. पण ह्याचा शब्दशः अर्थ थोडासा कावळा बसायला आणि फांदी तुटायला सारखा आहे.. म्हणजे एखादी गोष्ट (बरेचदा वाइट) घडायला फारच कमी वेळ उरलेला असतो, अनेक कारणांमुळे ती घडणे हे अपरिहार्य झालेले असते.. पण ती घडण्यासाठी एखादी क्षुल्लक गोष्ट ही तत्कालीन कारण ठरते..
म्हणजे उंटाच्या पाठीवर एव्हडे ओझे लादलेले आहे की तो जवळपास कोलमडायला आलेला आहे.. मग एक गवताची काडी त्याच्या पाठीवर ठेवल्यावर तो बसतो, तर त्याच्या बसण्याचे तात्कालीक कारण ती गवताची काडी ठरते..

चूभूदेघे..

--------------------------
बहोतसे आधे बुझे हुए दिन पडे है इसमें
बहोतसी आधी जली हुइ राते गिर पडी है
ये ऍशट्रे भरती जा रही है

मीरे, टण्या, गजानन - धन्यवाद! तुमच्यामुळे म्हणीचा अर्थ उमगला.

गजानन, ती लिंक छान आहे रे..

एकच म्हण अनेक भाषांमधे अनुवादीत न होताही असू शकते. अगदी तंतोतंत अनुवाद नसेलही पण अर्थ मात्र तोच असतो.

जसे की - jack of all trades and master of none. म्हणजे एक ना धड, भारंभार चिंध्या.

मराठी भाषा अनेक म्हणींनी समृद्ध आहे. पण पुर्वीचे जुने लोक जसे म्हणींचा वापर आपल्या रोजच्या बोलीभाषेत करत असत, त्याच्या १ टक्केही म्हणींचा वापर आजच्या मराठी बोलीभाषेत राहिला नाही. तिच गत वाक्प्रचारांची आहे. म्हणी छोट्याशाच असतात पण खूप काही व्यक्त करायला फार मोठ्या समर्थ असतात.

'पुराणातील वांगी' हा चुकीचा शब्दप्रयोग वापरात आहे. मुळात तो 'पुराणातील वानगी' असा आहे. (उच्चारातील चुकीने 'वांग्याच्या' भाजीला उगाचच पुराणात स्थान मिळून बसले! )

टण्या
the straw that broke the camels back अन काकतालीय न्याय या मधे फरक आहे रे.
पहिल्या म्हणीत त्या उंटावर इतकं ओझं झालं होतं आधीच की एक वाळक्या काडीने सुद्धा तो कोलमडून पडला असा अर्थ आहे.

काकतालीय न्याय मधे फक्त योगायोगाने ती फांदी पडली तर त्यात कावळ्याला दोष मिळतो ( बोलाफुलाची गाठ म्हणतात ना मराठीत , तसंच) . कावळ्याच्या वजनाने, त्याने बसण्याने ती फांदी पडणार नसते कधीच.

हो, शोनूला अनुमोदन.

संस्कृत छंदोबद्ध साहित्यात, एखाद्या बाबीकडे विशेष लक्ष वेधायचे असेल तर तेवढाच मुद्दा निराळ्या छंदात वा वृत्तात रचायची पद्धत होती. भगवद्गीतेतही याची उदाहरणं सापडतात.

'वेल्हाळ' या शब्दाचा अर्थ काय आहे?

'उहापोह' या शब्दाचा उगम कुठला? हा शब्द अरबी भाषेतुन आला आहे का?

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

"विश्रब्ध शारदा" असा काहीवेळा उल्लेख केला जातो. "विश्रब्ध" या शब्दाचा अर्थ काय आहे?

जुन्या हितगुजवर बरीच चर्चा झाली होती विश्रब्ध बद्दल. विखुरलेली /ला असा काहीसा अर्थ होतो विश्रब्ध चा.

विट्ठलाचे वर्णन ' सा॑वळे परब्रह्म ' असे केले जाते, त्याची मूर्तीही काळ्या पाषाणातच घडवलेली आहे, मग तरीही तो "पा॑डुर॑ग" का? कारण पा॑डु म्हणजे पा॑ढरा कि॑वा फिकुटलेला असा आहे ना! का ' पा॑डुर॑ग ' ची फोड ' पा॑डुर+अ॑ग ' अशी आहे? मग त्याचा अर्थ काय?

वैश्वानर म्हणजे काय???
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

वैश्वानर म्हणजे काय??? >> नररूपातला आत्मा किंवा आत्मारुपी माणूस असे काहीसे असावे.

माझ्या माहितीप्रंमाणे वैश्वानर हा अग्नी चा समानार्थी शब्द आहे.

त्या छ्न्दाचे नाव अनुष्टुप आहे (अनुष्टुभ नाही)

शोनू,

`विश्रब्ध' विषयीच्या जुन्या चर्चेची लिंक मिळेल? 'विश्रब्ध' म्हणजे विसावलेली असा माझा समज होता.

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

धन्यवाद
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

चित्कला...या शब्दाचा नक्की अर्थ काय?
शब्दरत्नाकरमधे चित्कळा असा शब्द आहे त्याचा अर्थ ज्ञान-शक्ती असा आहे.
चित्कलीका असा एक शब्द सापडला आणि त्याचा अर्थ ज्ञानज्योती किंवा चैतन्य असा आहे.

याच्या जवळपास असलेले सगळे शब्ददेखील ज्ञान अश्या अर्थीच आहेत.

शब्द फारच मस्त वाटला म्हणून ही शोधाशोधी.

कुस्तीमध्ये पुढच्याचा वीक-पॉईंट शोधुन त्याला लोळवायच्या पुरातन ज्ञानशक्तिबद्दल असावे बहुदा Happy
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

Happy @ aschig

चित्कला - चित् कला
चित् - शुद्ध, विषयनिरपेक्ष ज्ञानाची कला किंवा आविष्कार म्हणजे चित्कला. शक्तीचे, जगदंबेचे नाव आहे.

यावरुन आठवली ती विठोबा या शब्दाची एक सुरेख फोड
विठोबा - विद् + ठोबा
ठोबा/ठोंबा म्हणजे पुतळा (आपण म्हणतो ना, काय ठोंब्यासारखा उभा आहेस, म्हणजे पुतळयासारखा)

तसा विद्येचा, शुद्ध ज्ञानाचा, जो पुतळा, ठोबा, तो विठोबा
(याला तसा काही शास्त्रीय आधार नाही आणि हे विठ्ठल - विठू - विठोबा असे नाव आहे हे मान्य. फक्त गमतीशीर आणि छान फोड आहे म्हणून इथे दिलंय)

>>>> जुन्या हितगुजवर बरीच चर्चा झाली होती विश्रब्ध बद्दल. विखुरलेली /ला असा काहीसा अर्थ होतो विश्रब्ध चा.
>>>>>`विश्रब्ध' विषयीच्या जुन्या चर्चेची लिंक मिळेल? 'विश्रब्ध' म्हणजे विसावलेली असा माझा समज होता.
"विमनस्क अवस्थेत नि:शब्द/स्तब्ध झालेली व्यक्ती" असा काहीसा अर्थ मला गमतो आहे! Happy चू. भू. दे. घे.

बर, "मेषपात्र" याचा नेमका अर्थ काय? फोड काय? याचा मेष राशीशी काही सम्बन्ध आहे की काय?

...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

"आबादानी" याचा अर्थ काय? सगळी कडे आबादी आबाद का?

"घररिघी झाले पट्टराणी बळे"

यात घररिघी म्हणजे काय?

घररिघी चा अर्थ क्ष ने सांगितला होता पूर्वी... बहुतेक मीच विचारलं होतं... घररिघी म्हणजे घरात घुसुन... घरात घुसुन बळजबरीने पट्टराणी झाले असा त्याचा अर्थ आहे... क्ष, चुकलं असेल तर दुरूस्त कर रे.. Happy

Pages