नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेक्स्ट स्टॉप वाडा चिरेबंदी. आणि नंतर 'के दिल अभी भरा नही'. रीमा लागू आणि विक्रम गोखलेंना पहायची इच्छा होती. पण असो. लीना भागवत मला खूप आवडते.

रच्याकने, फुलराणी पहावं का? मध्ये त्यावरून बरीच वादावादी झाली होती. दिनेश ठाकूर म्हणतात त्यात तथ्य आहे का?

सुनील बर्वे हर्बेरियम तर्फे पुन्हा नाटकं घेऊन येणार असल्याचं मध्ये वाचनात आलं होतं. पुढे काही न्यूज निदान लोकसत्तात तरी आल्याचं माझ्या वाचनात नाही. कोणाला काही माहिती?

सुनील बर्वे हर्बेरियम तर्फे पुन्हा नाटकं घेऊन येणार असल्याचं मध्ये वाचनात आलं होतं

>>> त्याची जाहिरात येते आहे सध्या पेप्रात (अमर कॉफी हाऊस किंवा तत्सम काहीतरी नाव आहे) दिल दोस्ती दुनियादारीचे कलाकार आहेत सगळे.

शेखर खोसला बघायचं आहे. पण सध्या त्याचे प्रयोग होत नाहीयेत. जाहिराती तरी दिसत नाहीत.

कोडमंत्रही बघायचं आहेच. पण ते ‘अ फ्यू गूड मेन’वर आधारित असल्याचं नुकतंच वाचलं. त्यानंतर बघावं की नाही असा प्रश्न पडलाय. (कारण तो सिनेमा खूप आवडला होता.)

येस्स.... सुनील बर्वेने हर्बेरियम तर्फे अमर फोटो स्टुडिओ हे दिल दोस्ती दुनियादारीचे कलाकार असलेलं नाटक आणलं आहे. शुभारंभाचे प्रयोग पुण्यात झालेत. १४ ला बोरिवलीत आहे.

>>त्याची जाहिरात येते आहे सध्या पेप्रात (अमर कॉफी हाऊस किंवा तत्सम काहीतरी नाव आहे) दिल दोस्ती दुनियादारीचे कलाकार आहेत सगळे

हे नवं नाटक आहे. पण ह्यानंतर तो जुनी नाटकं आणणार आहे असं वाचलं होतं.

>>कोडमंत्रही बघायचं आहेच. पण ते ‘अ फ्यू गूड मेन’वर आधारित असल्याचं नुकतंच वाचलं. त्यानंतर बघावं की नाही असा प्रश्न पडलाय

मी ‘अ फ्यू गूड मेन’ पूर्ण पाहिलेला नाही. पण एक नाट्यानुभव म्हणून कोडमंत्र जरुर बघा असं सुचवेन.

>>शेखर खोसला बघायचं आहे. पण सध्या त्याचे प्रयोग होत नाहीयेत. जाहिराती तरी दिसत नाहीत.

उद्या वाशी आणि परवा शिवाजीपार्कच्या सावरकर स्मारकात आहे प्रयोग.

वाडा चिरेबंदी पाहिलं. अ प्र ति म!! मग्न तळ्याकाठी मध्ये फार रडारड आहे का?

फुलराणी पाहिलं आहे का कोणी?

वर अधांतर - जयंत पवार बद्दल कुणीतरी लिहिलंय... हे नाटक तसे व्ही सी डी वर पाहिले परंतू किती वेळा पाहिले त्याचा हिशेब नाही.

लक्ष्मी कॉटेज, गौरीशंकर छित्तरमल हे उल्लेख थेट त्या भागात घेऊन जातात आपल्याला.

हे नाटक म्हणजे 'सलग दोन तास आपण कसलीतरी धग अनुभवत आहोत असे वाटत राहते. कलावंत एकदम चपखल

आई - ज्योती सुभाष
बाबा - राजन भिसे
मोहन - भरत जाधव
मंजू - लीना भागवत
राणे - अनिल गवस
सावर्डेकरीन - सविता मालपेकर

आणि

नरू - संजय नार्वेकर....

मला मोहनचे काम करणारा भरत जाधव आणि बाबाचे काम करणारा राजन भिसे सगळ्यात जास्त प्रभावी वाटले. ज्योती सुभाष, लीना भागवत - क्लास अपार्ट..

हे नाटक म्हणजे 'सलग दोन तास आपण कसलीतरी धग अनुभवत आहोत असे वाटत राहते.>>>>+११११११

याच कलाकार संचात हे नाटक ३-४ वेळा पाहिलंय..... एकदम क्लास!

अधांतर हे नाटक मी याच संचात प्रत्यक्ष पाहिलेय. खरे तर तो प्रयोग काही कालावधीनंतर झाला होता आणि सर्व कलाकार बिझी झाले होते. तरी पण त्या प्रयोगासाठी मूळ संच एकत्र आला होता.. नाटकात जी धग आहे त्यातली शतांशानेही लालबाग परळ चित्रपटात आली नाही !!

लालबाग परळ पूर्ण फसलेला आहे.

मी लाल्बाग परळ एरीयात ५ वर्षे राहिलेलो आहे त्यामुळे नाटक फार को रीलेट होते दिनेश.

नुकतंच 'काटकोन त्रिकोण' नाटक पाहिलं. (डॉ. मोहन आगाशे, केतकी थत्ते, ओंकार गोवर्धन) बर्‍याच दिवसांनी त्याचे प्रयोग पुन्हा सुरू झालेत. पूर्वी संदेश कुलकर्णी काम करायचा ती भूमिका आता ओंकार गोवर्धन करतोय.

नाटक झकास आहे. संवादांमधले शब्दखेळ अप्रतिम. संवाद हीच या नाटकाची खरी ताकद आहे. (२-३ संवाद इथे देण्याचा मोह होतोय. पण कुणी नाटक पाहणार असेल तर ते संवाद आधीच कळल्यामुळे मजा जाऊ शकते. म्हणून मोह आवरलाय.)

तिघांची कामंही झकास झाली आहेत. नाटककलाकार ओंकार गोवर्धन मला टीव्हीवरच्या ओंकार गोवर्धनपेक्षा अधिक आवडलाय. (त्याचं लव्हबर्ड्स हे नाटकही पाहिलंय.) स्टेजवरचा त्याचा वावर फार छान आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वी काही मायबोलीकर मित्रमंडळींसमवेतच या नाटकाचा बेत आखला होता. पण ठाण्यातल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी पार्ल्यातल्या प्रयोगादरम्यान मोहन आगाशेंची तब्ब्येत बिघडली आणि ठाण्यातला प्रयोग रद्द झाला. त्यानंतर काही दिवसांत नाटकाचे प्रयोगही बंद पडले होते. पण गेल्या आठवड्यात अखेर नाटक पाहायला मिळालं.

'एक शून्य तीन' पाहीले. मस्त. रहस्यनाटक.
सुमीत राघवन, स्वानंदी टिकेकर, गुरुराज अवधानी यांचा अभिनय छान.
नेपथ्य व प्रकाशयोजना खास.
'महिलांचे सलग खून करणार्‍याचा शोध' हा विषय.
नाटकाच्या शेवटी सुमीत प्रेक्षकांना '१०३' चे स्पष्टीकरण देतात. हा फोन नं. महिला व बाल अत्याचार होत अस्ल्यास पोलिसांना करायचा आहे. पोलिस घटनास्थळी ७-८ मिनिटात पोचतात.
प्रयोग आवडला. रु. ३०० वसूल ! Bw

पाहिल्या नाटकांबद्दल प्लीज सविस्तर लिहा ना, आजकाल परिक्षणे पण वाचायला मिळत नाहीत. मी बघायची बघायची असा ध्यास घेऊन बसतो, पण नाही बघता येत.

मला अमर फोटो स्टुडीओ बघायचे होते, पण भारतातील वास्तव्यात प्रयोगच नव्हते. ही छान छान नाटके येतात पण दीर्घकाळ सादर होत रहात नाहीत. कारणे काय ती कळत नाहीत . कलाकार मालिकांत बिझी होतात ? कि प्रेक्षक कमी पडतात ?

मुक्ता बर्वेने सखाराम बाईंडरचे मोजकेच ७/८ प्रयोग केले मध्यंतरी. ते कुणी पाहिलेत का? कुठे विडिओ पहायला मिळेल का? युट्युब वर काही सापडले नाही.

मुक्ता बर्वेने सखाराम बाईंडरचे मोजकेच ७/८ प्रयोग केले मध्यंतरी>>> ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी केले होते ते. त्यांच्या करिअरच्या सुरूवातील केले याला काहीतरी ठराविक वर्षं झाली म्हणून त्या गोष्टीचं औचित्य साधून केलेल्या मोजक्या नाटकांच्या प्रयोगांत 'सखाराम...' पण होतं. बहुतेक व्यावसायिक म्हणून नाही केले हे प्रयोग. हे सगळं पेपरात वाचून मला समजलं.

'मित्र' नाटक मस्त आहे. श्रीराम लागू व फैय्याज यांच्या अभिनयाची जुगल्बंदी लाजवाब ! लेखन ( डॉ. आठवले ) व दिग्दर्शन ( वि. केंकरे) हेही छान.

नाटकाची सुरवात लागूंवर दलित तरूण हल्ला करतात त्याने होते. रुग्णालयात लागूंना 'स्ट्रोक' होतो व त्यामुळे शरीराची उजवी बाजू लुळी पडते. त्यांना घरी आणल्यावर त्यांच्या देखभालीसाठी एका प्रशिक्षित नर्सची (फैय्याज) नेमणूक होते. या बाई दलित आहेत. रुग्ण कडवा ब्राह्मण.
सुरवातीस हे दोघे अगदी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. नाटकाच्या शेवटी 'मित्र' झालेले असतात.
दोघांच्याही अभिनयास हजार सलाम !

नाटकात राखीव जागांच्या सामाजिक प्रश्नास हात घातला आहे पण अतिशय हळूवारपणे. किंबहुना ही दरी मिटावी असाच संदेश दिला जातो.
जरूर पाहावे असे नाटक.

होनाजी बाळा, ( रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, माया जाधव ) या नाटकाचे यू ट्यूब वरील व्हर्जन भयाण आहे ( तिच सिडी बाजारात आली होती ) माया जाधव ने ते जेव्हा पुन्हा रंगमंचावर आणले होते, तेव्हा बघितले होते. खुप देखणा प्रयोग होत असे तो.
बाकिच्या संगीत नाटकांची ( यू ट्यूबवरील ) गत पण फारशी वेगळी नाही.

‘नातीगोती’ नाटक छान आहे. दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब.
एका मध्यमवर्गीय पांढरपेशा जोडप्याचा मंदमती मुलगा ही मध्यवर्ती कल्पना. त्या मुलाला सांभाळण्यासाठी बायको दिवसा व नवरा रात्री नोकरी करतात.

बायकोचा बॉस आणि त्या दोघांचे तरल संबंध हे एक उप-कथानक. परंतु हे संबंध अगदी निखळ मैत्रीचे राहतात हे वैशिष्ट्य.
तो मुलगा वयात येताना त्याच्या आईशीच लगट करायला बघतो हा प्रसंगही सुरेख व संयमित दाखवला आहे.

नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय हे सर्व रसायन झकास जमल्याने नाटक एक वेगळीच उंची गाठते.

‘अशी पाखरे येती “ हे विजय तें लिखित नाटक पाहिले. एकदम मस्त !

संजय नार्वेकर, लीना भागवत, ज्योती सुभाष आणि हेमू अधिकारी या सर्वांचा अभिनय एकदम खास.

संजय हा प्रेक्षकांना त्याची जीवनकहाणी सांगतोय या पार्श्वभूमीवर नाटक पुढे सरकते. प्रेक्षकांकडे बघून केलेली त्याची स्वगते तर लाजवाब आहेत. किंबहुना त्याने संपूर्ण नाटक आपल्या करंगळीवर तोलले आहे.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे कौटुंबिक वातावरण. मुलगी उपवर आहे. तिचा बाप स्थळासाठी ‘जोडे झिजवतोय’. तेव्हा फक्त मुलाचा होकार म्हणजे अंतिम उत्तर असायचे. मग मुलीने फक्त मान डोलवयाची. मुलीचे लग्न जमत नसल्यास आईवडिलांच्या जीवाला काय तो घोर. अशा कुचंबणा झालेल्या मुलीची भूमिका लीनाने समर्थपणे पेललीय.

नाटकातील शेवटचा अर्धा तास तर अगदी उत्कंठापूर्ण. शेवट काय होईल याचा प्रेक्षकांचा अंदाज सतत चुकत राहतो. पण एक गोष्ट मनात येत की शेवटी हे ‘’तें’’ चे नाटक असल्याने अगदी गोग्गोड शेवट नक्कीच होणार नाही. जर आपण मनात ‘अशी पाखरे येती...’ या गाण्याची संपूर्ण ओळ म्हटली तर मग शेवटाचा अंदाज येतो.

नाटक संपल्यावर सध्याच्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची आठवण लगेचच येते !
एकूणच काय तर सुखद अनुभव. तू-नळीवर आहे. जरूर बघा......

'डोण्ट वरी, बी हॅप्पी' पाहिले काल. चांगले आहे, आवडले. उमेश कामत, स्पृहा जोशी आणि आशुतोष गोखले यांनी पूर्ण नाटकभर बेअरिंग भारी सांभाळलंय.

अमर फोटो स्टुडियो
एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ.
(खालील लिंकवर क्लिकून माझे मत बघता येईल
http://sameerhappygolucky.blogspot.com/2017/09/blog-post.htmlAmar Photo Studio.jpg

अशीही शामची आई बघितले. विनोदी असेल असे वाटले होते पण नाटक करूण रसाने भरलेले आहे, एक दोनवेळा डोळे भरून येतात. गोष्ट सांगत नाही कारण नाटक नविन आहे. सर्व कलाकारांचा अतिशय उत्तम अभिनय. अतिशा नाईक अर्थातच सगळ्यांना खाऊन टाकते पण ओमप्रकाश शिंदे, पूर्णिमा अहिरे-केंडे, मानबामधला रघू यांची अतिशय उत्तम साथ. पूर्णिमाने आत्तापर्यंत सगळ्या भूमिका अतिशय उत्तम वठवल्या आहेत आणि ती ओमप्रकाशपेक्षा नक्कीच जास्त अनुभवी आहे पण नाटकाच्या पेपरमधल्या जाहीरातीत ओमचे नाव बोल्डमध्ये आणि आणि अतिशा नाईक. का बुवा, झीच्या मालिकेत हिरोचा रोल केला म्हणून फक्त. हा पूर्णिमावर अन्याय आहे असे मला वाटले.
साखर खाल्लेला माणूस मला तद्दन फाल्तू वाटले. फक्त प्रशांत दामलेच्या जीवावर खेचताहेत. एवढी हाईप का झाली आहे ते कळत नाही. शूभांगीची भूमिका मला कळलीच नाही. मोठ्याने बोलणं आणि ईकडून तिकडे धावणं एवढंच.
नसिरच्या फादर या नाटकाबद्दल मटामध्ये बरेच लिहून आले आहे. बघायला पाहिजे.
अमर फोटो चांगले वाटले पण खूप मोठे आहे, नंतर नंतर कंटाळा आला. सखीची एनर्जी लेवल भारी.

वाडा बघितल. फार फार फार आवडल. सर्वांनीच चांगल काम केलय. विशेषतः तो दागिन्यांचा प्रवेश फारच मस्त जमलाय.

गालबोट म्हणजे लोकांनी ३-४ वर्षांच्या मुलांना आणल होत. नाटक शेवटाकडे असताना जोशी बाईंनी एकदम रडून (हो, रडून) विनंती केली प्रेक्षकांना की मुलांना बाहेर न्या, लक्ष विचलीत होत आहे. खूपदा रसभंग झाला ईतका गोंधळ चालू होता लहान मुलांचा.. Sad

Pages