न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी: कांदा भजी, बटाटावडा,>>> मराठी माणसाची गाडी कांदा भज्यांपुढे जातच नाही की काय?

वृंदा ताई येत नाहीयेत का यावेळी?सिम आणि एबाबा दिसले यादीत.

>>मग श्रीखंड कोण करतय असं वाटलं? मी?

पण त्या येणार आहेत का? की तुम्ही श्रीखंड घेऊन येणार?
(एवढं श्रीखंड करायला भाग पाडलंच की! जाऊदे, मी येणार नाहीच आहे.)

अरे वो 'V' बोले तो वृंदातै तर नाहीत ना?. Happy
असतील तर अपुनको वो तिखा पुरी मंगताय पेचानेके वास्ते. Happy

पेचाने के वास्ते की पचाने के वास्ते? त्या तिखट आणि गोड पुर्‍या पाचक होत्या हे माका म्हायती नवता हां भाई. Proud

भाई, एकतर परवा मंजूडीच्या रेसिपीने केलेली तुरिया पात्रा वाटाणा करेन किंवा मेथी मटर मलई वगैरे...

सजेशन्स वेलकम.

एखाद्या भाजीत किंवा पुलाव मधे कंदमुळ(कांदा, लसुण, आलं वै.) नाही वापरलात तर मला खाता येइल. मी सद्या कंदमुळ खात नाहिए. कोणीतरी.....

सुमंगलताई, मसालेभातात कांदालसूण काही नसेल. गाजर घालणार नाही. फ्लॉवर, मटार तर चालतील ना?
कोशिंबीर/रायतं यांपैकी कोण आणतंय? तेही चालायला हवं.

कांदापोहे यांना भेटायला काही अडचण नाही ना? Happy रागावू नका हं, उगाच गंमत आपली. Happy

तुरिया पात्रा वाटाणा.

बटाटे पण नाही चालणार ? मी वांगी आणून ठेवायला सांगते मग आमच्या देसी दुकानदाराला.

हो, हो फ्लॉवर, मटार चालतील. कांदापोहे यांना भेटायला नक्किच चालेल. मी कंदमुळ खात नाही, हाताळायला म्हणजे चिरायला, सोलायला बंदी नाही. Wink Wink

सिंडरेला वांग्यात लसणाचा मसाला नाही का टाकत? माझ्यामुळे सगळ्यांचा विरस नको. मला एक वस्तु देखिल पुरेशी आहे. मी खुप उत्सुक आहे सगळ्यांना भेटायला.

Pages