खास दिवाळीसाठी - बेक्ड करंज्या (फोटोसहित)

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 09:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः

डेसिकेटेड कोकोनट,
पिठीसाखर,
काजु, बेदाणे, वेलची पुड इ.

कव्हरः

शॉर्टक्रस्ट पेस्ट्री / स्वीट पेस्ट्री / पफ पेस्ट्री
तांदुळाची पिठी

क्रमवार पाककृती: 

सारणः

१. सारणासाठी लिहीलेल सर्व पदर्थ एका बोल मधे एकत्र करुन घावे.

कव्हरः

२. ओट्यावर थोड तांदळाच पीठ भुरभुरवुन पेस्ट्री शीट ठेवावी.
३. त्यावर बेकिंग पेपेर टाकुन वर पेस्ट्री शीट ठेवुन थोडी लाटुन पेस्ट्री थोडी पातळ करुन घ्यावी.
४. या लाटलेल्या पेस्ट्री शीट चे साधारण ३" x ३" (किंवा आपल्याला हव्या त्या साईज चे) चौकोन कापुन घ्यावे.

करंजी:

५. आता ओट्यावर थोड तांदुळाची पिठी भुरभुरुन एक चौकोन ठेवावा.
६. चौकोनाच्या एका कडेला सारण घालुन दुसरी बाजु त्यावर मुडपावी. त्रिकोण तयार होइल. कडा नीट चिकटण्यासाठी हवे तर थोडे पाणी लावावे.
७. कातणाने कडा गोल कापुन घ्याव्यात. तश्याच त्रिकोणी ठेवल्या तरी हरकत नाही.
८. बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर ठेऊन त्यावर ह्या करंज्या बेक कराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
खाल त्या प्रमाणे :)
अधिक टिपा: 

१. एका पेस्ट्री शीट मधे साधारण ९ करंज्या होतात.
२. सारणात डेसिकेटेड कोकोनट ऐवजी ओले खोबरे वापरता येइल. पण या करंज्य लगेच खव्या लागतात कारण नारळ आणि साखरेला पाणी सुटुन पेस्ट्री मऊ पडते. तरी खायला मस्तच लागतात Happy
३. या सारणात आपल्या आवडीप्रमाणे चारोळ्या वगैरे घालता येतिल. रंगित खोबरे घालता येइल.
४. अश्याच प्रकारे माव्याच्या करंज्या देखिल मस्त होतात.
५. पेस्ट्रीचे चौकोनी तुकडे न करता पेस्ट्री कटर ने गोल कापले तरी चालतिल.
६. बाजुचे उरलेले तुकडे बेक करायचे आणि त्यावर गरम असतानाच पिठी साखर/आयसिंग शुगर किंवा मीठ/ मिरेपुड भुरभुरायची. मस्त क्रंची स्नॅक तयार Happy
७. स्वीट पेस्ट्री शीट्स मिळाल्या तर त्याचेच शंकरपाळ्याच्या आकारात तुकडे करुन, बेक करुन, वरतुन हव तर पीठी साखर भुरभ्रवायची Happy बेक्ड शंकरपाळे तयार Happy

माहितीचा स्रोत: 
तळणं आवडतं नाही आणि बेकिंग आवडतं म्हणुन करुन बघितलेले माझे प्रयोग :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज वाशी च्या इनॉर्बिट(हायपर सिटी) मधे 'फ्रेश' या ब्रॅण्ड च्या स्प्रिन्ग ऱोल्स शीट्स बघितल्या , त्या करंज्या करायला वापरता येतील का. पेस्ट्री शीट तश्याच असतात का?

पेस्ट्री शीट च पाहिजेत का?

नेहमीच्या साराच्या ( चिरोट्यासारख्या) पात्याच्या नाहि होनार का?

कुणीतरी सांगितले म्हणून माटुंग्याच्या छेडा मधे पण पेस्ट्री शीटस मिळतात का बघून आले. मुंबईत कुठे मिळतील कुणी सान्गू शकेल का?

सामी, Piggy N Wiggy या supermarket chain मधे मिळतात असं वाचलं होतं. आपल्या जवळ आहे का ते गुगलुन बघा. Good luck....

थॅन्क्स मस्तानी, लाजो.
काल मी बेक्ड करंज्या बनवून बघितल्या. कव्हर खाली लिहिल्याप्रमाणे बनवले. मस्तच खुस्खुशीत बनले. पण आतील पुरण घट्ट आणि कडक झाले. काय चुकले ते कळत नाही. Sad
२ कप मैदा, अर्धा कप पातळ डालडा आणि भिजवण्यासाठी गार पाणी वापरले.
३ पातळ चपात्या साट लावून एकावर एक ठेवून , गुंडाळी केली आणि मग त्या कापून पाती लाटली.
सुके सारण भरून ,२० मिनिटे बेक केल्या.
कव्हर खरोखर मस्त झाले. पण आतले सारण कसे काय कडक झाले कळले नाही. जास्त बेक केल्यामुळे असेल का?

लाजो, माझ्या कडून तुला एक मोठी जादूची झप्पी (मुन्नाभाई style ). मी baked करंजी केले वरील प्रमाणे. खूप खूप आवडली सगळ्यांना.

Pages