खास दिवाळीसाठी - बेक्ड करंज्या (फोटोसहित)

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 09:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः

डेसिकेटेड कोकोनट,
पिठीसाखर,
काजु, बेदाणे, वेलची पुड इ.

कव्हरः

शॉर्टक्रस्ट पेस्ट्री / स्वीट पेस्ट्री / पफ पेस्ट्री
तांदुळाची पिठी

क्रमवार पाककृती: 

सारणः

१. सारणासाठी लिहीलेल सर्व पदर्थ एका बोल मधे एकत्र करुन घावे.

कव्हरः

२. ओट्यावर थोड तांदळाच पीठ भुरभुरवुन पेस्ट्री शीट ठेवावी.
३. त्यावर बेकिंग पेपेर टाकुन वर पेस्ट्री शीट ठेवुन थोडी लाटुन पेस्ट्री थोडी पातळ करुन घ्यावी.
४. या लाटलेल्या पेस्ट्री शीट चे साधारण ३" x ३" (किंवा आपल्याला हव्या त्या साईज चे) चौकोन कापुन घ्यावे.

करंजी:

५. आता ओट्यावर थोड तांदुळाची पिठी भुरभुरुन एक चौकोन ठेवावा.
६. चौकोनाच्या एका कडेला सारण घालुन दुसरी बाजु त्यावर मुडपावी. त्रिकोण तयार होइल. कडा नीट चिकटण्यासाठी हवे तर थोडे पाणी लावावे.
७. कातणाने कडा गोल कापुन घ्याव्यात. तश्याच त्रिकोणी ठेवल्या तरी हरकत नाही.
८. बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर ठेऊन त्यावर ह्या करंज्या बेक कराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
खाल त्या प्रमाणे :)
अधिक टिपा: 

१. एका पेस्ट्री शीट मधे साधारण ९ करंज्या होतात.
२. सारणात डेसिकेटेड कोकोनट ऐवजी ओले खोबरे वापरता येइल. पण या करंज्य लगेच खव्या लागतात कारण नारळ आणि साखरेला पाणी सुटुन पेस्ट्री मऊ पडते. तरी खायला मस्तच लागतात Happy
३. या सारणात आपल्या आवडीप्रमाणे चारोळ्या वगैरे घालता येतिल. रंगित खोबरे घालता येइल.
४. अश्याच प्रकारे माव्याच्या करंज्या देखिल मस्त होतात.
५. पेस्ट्रीचे चौकोनी तुकडे न करता पेस्ट्री कटर ने गोल कापले तरी चालतिल.
६. बाजुचे उरलेले तुकडे बेक करायचे आणि त्यावर गरम असतानाच पिठी साखर/आयसिंग शुगर किंवा मीठ/ मिरेपुड भुरभुरायची. मस्त क्रंची स्नॅक तयार Happy
७. स्वीट पेस्ट्री शीट्स मिळाल्या तर त्याचेच शंकरपाळ्याच्या आकारात तुकडे करुन, बेक करुन, वरतुन हव तर पीठी साखर भुरभ्रवायची Happy बेक्ड शंकरपाळे तयार Happy

माहितीचा स्रोत: 
तळणं आवडतं नाही आणि बेकिंग आवडतं म्हणुन करुन बघितलेले माझे प्रयोग :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो टाक ना Happy
तळलेलं आणि बेक केलेलं काही वर्ज्य नाहीय,दोन्ही आवडतं ( फक्त दुसर्‍याने करुन घातलेलं ) Proud

छान आहे हा प्रकार. (पफ पेष्ट्री मधे भरपूर फॅट्स असतात, म्हणून मला वर्ज्य. पण करायला नक्कीच आवडेल) या पेष्ट्रीचे तसे अनेक प्रकार करता येतात. जेवढी कल्पनाशक्ती वापराल, तेवढे.

आज करंज्या केल्या :

घरात डेसिकेटेड कोकोनट नव्हते म्हणुन ओल्या नारळाच्या केल्या.

१. पेस्ट्री शीट लाटुन, पातळ करुन त्याचे ९ भाग केले:

IMG_1768.JPG

२. सारण एका कोपर्‍यावर ठेवले:

IMG_1769.JPG

३. कातणाने कापलेली करंजी आणि त्रिकोणी करंजी :

IMG_1772.JPG

४. तयार करंज्या:

IMG_1774.JPG

क्या बात है लाजो...खुप खुप टेम्प्टींग दिसतायत..अगदी तोपांसु Happy ..
पण पेस्ट्री शीट ला काही प्रयाय?>>>मी पण हेच विचारणार होते. मला वाटतं मैदा वापरता येईल ना लाजो?

मी अजुन एक पर्याय सांगते लाजो... तुझ्याइथे बनवुन ह्या करंज्या भारतात पोहोचवायच्या,अजुन छान लागतील Proud

बाप रे.. सहीच दिसतंय हे.. Happy
लाजो कसली इनोव्हेटीव्ह आहेस गं तु,..
बादवे चव कशी झालिये?

धन्यवाद लोक्स Happy

http://www.maayboli.com/node/20496 इथे पफ पेस्ट्री कशी बनवायची त्याची कृती लिहीली आहे.

दक्षे, चव छानच Happy लेकीने आवडीने खल्ल्या Happy नवर्‍यासाठी अंबाबर्फी (अष्टमीला प्रसादाला केली होती )कुस्करुन त्याचा मावा भरुन करंज्या केल्या. त्या नवर्‍याने हादडल्या Happy

आता पेस्ट्रीची रेसिपी पण मिळाली म्हटल्यावर करुन पाहायलाच हव्यात.

आपण मैद्याच्या करतो तेव्हा तळायची वाट पाहात असलेल्या करंज्यांवर ओले कापड घालुन ठेवतो त्या फुटू नयेत म्हणुन. ह्यांना असे काही करायची गरज आहे का?

बेकींगला साधारण किती वेळ लागतो? माझ्या ओवनमध्ये एका वेळेस सहा-सात करंज्या राहतील. किती फास्ट होतात यावर किती करेन हे अवलंबुन आहे Happy माझा दिवाळीचा फराळ खाण्यापेक्षा वाटण्यातच जास्त जातो, त्यामुळे भरपुर करावा लागतो.... Happy

मी सुके खोबरे वापरुन करेन. ओल्या खोब-याच्या प्रसाद म्हणुन पाचसहा करेन Happy ओल्या खोब-याच्या जास्त चांगल्या लागतील.

साधना, जास्त करंज्या करायच्या असतिल तर लॉट्स मधेच कर. एका वेळेला खुप करुन ठेऊन त्यावर ओला कपडा ठेऊन पेस्ट्री चे टेक्श्चर खराब होईल अस मला वाटतं. मी एका वेळेस एका शीट च्या करते. त्या बेक होईपर्यंत दुसर्‍या शीट च्या.. अस करते. मी खुप मोठ्या प्रमाणावर कधी केल्या नाहीत. एका वेळेस २-३ शीट्स च्या करते. ओल्या नारळाच्याच छान लागतात. पण टिकायला करायच्या असतिल तर सुक्या खोबर्‍याच्या करव्या लागतिल.

रेसिपी छानच आहे, पण मला एक भाप्र पडलाय. आपण तळून करण्याऐवजी पदार्थ बेक करतो कारण तळण्यामुळे भरपुर तेल त्यामुळे भरपुर कॅलरीज आणि फॅट्स पोटात जातात. पण या पफ पेस्ट्री मधे पण भरपूर फॅट्स असतातच ना? Blush का त्या तळण्यापेक्षा तरीही कमीच असतात?

सानुली,

तुझा अगदी रास्त आहे. आपले जवळजवळ सगळेच गोडाचे / मिठाईचे पदार्थ भरपुर फॅटी असतात.
दोन्ही प्रकारच्या करंज्यांमधे तितकीच फॅट पोटात जात असेल कदाचित Proud

मला स्वतःला तळणं, त्याचा वास आवडत नाही म्हणुन मी जास्तीत जास्त पदार्थ बेक करुन., स्लो कुकर मधे किंवा मायक्रोवेव्ह मधे करते. त्यात एकतर वेळ वाचतो आणि दुसरे म्हणजे, टेम्प सेट केले, टायमर लावला की तयार होईपर्यंत बघायची पण गरज नसते. तसेच एका वेळेस बर्‍याच करंज्या करता येतात.

शिवाय, तळणीसाठी वापरलेले तेल फेकुन द्यावे लागते. ते देखिल अवॉईड होते.

तळणे आणि बेक करणे याच्या चवीत डेफिनेटली फरक पडतो. आपली आपली आवड Happy

पफ पेस्ट्री मधे नक्कीच कॅलरीज आहेत. तळणे व पफ पेस्ट्री वापरून करणे मध्ये सहसा काहीच फरक नाही फक्त.

हाय टेंप वर तेल व तूप trans fat मध्ये convert होते. तर बटर वापरून केलेल्या पदार्थाचे सुद्ध तेच होते अवन मध्ये हाय टेंप वर म्हणून पुर्वी जे टोस्ट, चहाखारीक विकतचे बेक केलेले असले तरी वाईटच.

जरासाच फरक की नंतर नंतर तळलेले पदार्थ ज्यास्त trans fat शोषून घेतात पण बेकींग मध्ये सर्व एकत्र एकदाच बेक करतो त्यामुळे तसे होत नाही. म्हणजे सगळ्यात शेवटचा करंजीचा घाणा जर सुरुवातीपासून तेल्/तूप न बदलता काढला(घाणा/round) तर तो ज्यास्त वाईट तेल शोषून घेतलेला असतो. तेल एका विशिष्ट तापमानानंतर व वेळेनंतर tran fat मध्ये बदलते. तेव्हा बेक करून धोका जरासा कमी आहे. मग त्यापेक्षा मैदा वापरु नका, फॅट एवजी तेल वापरा बेक करत असालच तर.
घरगुती तेल(कुठचे वापरता ह्यावर सुद्धा अवलंबून आहे) जर १-२ तास वापरले व त्याला जरासा जरी ब्रॉउन रंग आला तर तेल बदला. तेल/तूप लगेच फेकून द्या एका पेक्षा ज्यास्त तळणी व ज्यास्त वेळ केलेले/वापरलेले.

पुर्वी शेवटचा पदार्थ ह्याच साठी खात नसावेत बहुधा( गमतीने लिहिलेय).
१-२ इथे तिथे कमी ज्यास्त पण आरोग्याच्या दृष्टीने विशेष काही फरक नाही जर "आरोग्य" विषयक फरक केला तर.

हा पण वेळ, आवड ह्या मुद्द्यावर बरेच फरक आहेत. पसंद अपनी आपनी म्हणी प्रमाणे.

लाजो, सॉरी तुझ्या रेसीपी खाली हे लिहिलेय पण मुद्दा आलाच आहे म्हणून, पसंद नसेल तर काढते.

मनु चांगली माहिती आहे गं. आरोग्य आपली टॉप प्रायोरिटी राहिली पाहिजे कायम.
मी खास तळण्यासाठी म्हणुन छोटीशीच कढई घेतलीय, म्हणजे तेल कायम कमीच वापरले जाते आणि दरवेळी न चुकता तेल टाकुन देते. अर्थात दिवाळीत मात्र ती कढई वापरता येत नाही Happy पण तेल मात्र टाकुन देते.

धन्स मंडळी, मला वाटलं मी काही मिस करतेय की काय! बाकी वेळ, तेल न फेकावं लागणे हे मुद्दे बरोबरच आहेत. आणि आपली 'नाविन्याची हौस' हाही मुद्दा आहेच की Happy धन्स परत एकदा!

Pages