खास दिवाळीसाठी - बेक्ड करंज्या (फोटोसहित)

Submitted by लाजो on 16 October, 2010 - 09:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः

डेसिकेटेड कोकोनट,
पिठीसाखर,
काजु, बेदाणे, वेलची पुड इ.

कव्हरः

शॉर्टक्रस्ट पेस्ट्री / स्वीट पेस्ट्री / पफ पेस्ट्री
तांदुळाची पिठी

क्रमवार पाककृती: 

सारणः

१. सारणासाठी लिहीलेल सर्व पदर्थ एका बोल मधे एकत्र करुन घावे.

कव्हरः

२. ओट्यावर थोड तांदळाच पीठ भुरभुरवुन पेस्ट्री शीट ठेवावी.
३. त्यावर बेकिंग पेपेर टाकुन वर पेस्ट्री शीट ठेवुन थोडी लाटुन पेस्ट्री थोडी पातळ करुन घ्यावी.
४. या लाटलेल्या पेस्ट्री शीट चे साधारण ३" x ३" (किंवा आपल्याला हव्या त्या साईज चे) चौकोन कापुन घ्यावे.

करंजी:

५. आता ओट्यावर थोड तांदुळाची पिठी भुरभुरुन एक चौकोन ठेवावा.
६. चौकोनाच्या एका कडेला सारण घालुन दुसरी बाजु त्यावर मुडपावी. त्रिकोण तयार होइल. कडा नीट चिकटण्यासाठी हवे तर थोडे पाणी लावावे.
७. कातणाने कडा गोल कापुन घ्याव्यात. तश्याच त्रिकोणी ठेवल्या तरी हरकत नाही.
८. बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर ठेऊन त्यावर ह्या करंज्या बेक कराव्यात.

वाढणी/प्रमाण: 
खाल त्या प्रमाणे :)
अधिक टिपा: 

१. एका पेस्ट्री शीट मधे साधारण ९ करंज्या होतात.
२. सारणात डेसिकेटेड कोकोनट ऐवजी ओले खोबरे वापरता येइल. पण या करंज्य लगेच खव्या लागतात कारण नारळ आणि साखरेला पाणी सुटुन पेस्ट्री मऊ पडते. तरी खायला मस्तच लागतात Happy
३. या सारणात आपल्या आवडीप्रमाणे चारोळ्या वगैरे घालता येतिल. रंगित खोबरे घालता येइल.
४. अश्याच प्रकारे माव्याच्या करंज्या देखिल मस्त होतात.
५. पेस्ट्रीचे चौकोनी तुकडे न करता पेस्ट्री कटर ने गोल कापले तरी चालतिल.
६. बाजुचे उरलेले तुकडे बेक करायचे आणि त्यावर गरम असतानाच पिठी साखर/आयसिंग शुगर किंवा मीठ/ मिरेपुड भुरभुरायची. मस्त क्रंची स्नॅक तयार Happy
७. स्वीट पेस्ट्री शीट्स मिळाल्या तर त्याचेच शंकरपाळ्याच्या आकारात तुकडे करुन, बेक करुन, वरतुन हव तर पीठी साखर भुरभ्रवायची Happy बेक्ड शंकरपाळे तयार Happy

माहितीचा स्रोत: 
तळणं आवडतं नाही आणि बेकिंग आवडतं म्हणुन करुन बघितलेले माझे प्रयोग :)
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्याही पातळ नाही करायच्या. चपातीपेक्षा किंचीत जाड्(आता परत पंजाबी लोकं किंवा इतर लोकं चपाती बनवतात तसे नाही, त्यांच्या जाडच असतात.

@ रचना,

ओव्हनचे टेंपरेचर कमी असेल. किंवा पेस्ट्री खुप जाड लातली असेल.
पेस्ट्री साधरण समोश्याच्या पारीला करतो तितपत पातळ असावी.

@ रचु,

मुरड घातलेली पेस्ट्री नीट बेक झाली नाही म्हणुन मऊ पडली. या करंज्या मुरड न घालताच करायच्या, कातणाने कापुन Happy

@ आश, धन्यवाद Happy करुन बघितल्यास आनि इथे येउन सांगितलस, छान वाटलं Happy

रचना, ३५० डि फॅरनहाईट का?

मी १७५ डि सेंटीला १५-२० मिनीटं ठेवल्या. मधे एकदा पलटल्या.

३५० फॅ म्हणजे जवळ जवळ १७५ सें च Happy

जाउदे झाल. मी व्यवस्थीत दिलेल्या रेसिपीज आणि लोकं वाचून उत्तम पदार्थ करतात, ते सगळे पदार्थ बिघडवू शकते Sad

अग अशी हिरमुसली नको होऊस. पहिल्यांदाच केल्यास ना? नेक्स्ट टाईम मस्त होतिल बघ Happy

पुरण कुठलं केल होतस?

हमम्म्म्म... ओल्या नारळाच्या लग्गेच खायला लागतात नाहीतर पेस्ट्री नरम/चिवट होते आतल्या नारळ्+साखरेच्या रसामुळे.... म्हनुन त्यात थोडी मिल्क पावडर मिसळायची किंवा

नेक्स्ट टाईम ओल्या नारळाच्या करणार असशील तर खोबर तव्यावर/ मावे मधे थोड गरम करुन खुटखुटीत करुन घे. बघ फरक पडतोय का ते Happy

लाजो धंन्स गं. उद्या परत करणार आहे तेंव्हा मुरड न घालताच करुन बघते.
बाकी करंज्या एकदम सह्ही Happy

मला तळणीच्या ओल्या नारळाच्या करन्ज्या करायच्यात , त्याच्या पारी साठी मैद्या बरोबर रवा न घेता कॉर्न्फ्लोअर वापरावे का? (बारीक रवा नाहीये माझ्याकडे ) का नुसत्या मैद्याच्या पण करता येतील? पारी मउ नको पडायला म्हणून विचारतेय.
मी नेट वर एका ठिकाणी मायक्रोवेव्ह मधील क्रुती पाहीली त्यात कॉर्न्फ्लोअर (म्हणजेच कॉर्न स्टार्च का??) घालायच अस दिलय.... हे फक्त मायक्रोवेव्ह करन्जी साठी असेल का?

माझा १ अडाणी प्रश्न
वेळ वाचावा म्हणुन विकतच्या पेस्ट्री शीट आणुन तळुन केल्या तर कीतपत योग्य आहे?
आणि त्या किती दिवस टिकतील?

निर्मयी, विकतच्या शिट्स चालतिल. पण तळू नकोस, बेक कर.
सारण कोरड असेल तर हवाबंद ड्ब्यात ३-४ दिवस रहायला काहिच हरकत नही. मात्र पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भर.

मी तळणीच्या करंज्या करायचे ठरवले होते पण तळणाचा आता कंटाळा आला आहे कारण आजच लाडु आणि चिवडा असे दोन पदार्थ केल्याने माझा पेशन्स संपला आहे!
तर लाजो, मला असं विचारायचे आहे की पेस्ट्री शीटस ऐवजी मी मघाशीच भिजवुन ठेवलेले मैदा+रवा असे पीठ (?) वापरुन बेक केल्या तर चालतील का?

तुझे/आणखी कोणाचे पुढच्या १० मिनीटांत उत्तर न आल्यास मी तुला फोन करते! Biggrin

वरच्या पोस्टच्या अनुषंघाने, लाजोशी फोनवरुन सल्लामसलत केली. त्याप्रमाणे दोन करंज्या बेक करुन पाहिल्या पण कडक झाल्याने शेवटी तळणीच्याच केल्या!

वत्सला... जमेल असं वाटलं नव्हतं..म्हणूनच २-४ च करुन बघ म्हणाले होते Happy

रव्यामुळे कडक झाल्या असतिल का? किंवा पारीची कणिक घट्ट भिजवलेली असते म्हणून???

श्री Proud यालाच मल्टीटास्किंग असे म्हणतात आणि ते फक्त स्त्रीयांनाच जमते Happy

रिया तु काय करत्येय्स अत्ता??? जागी कशी???

यालाच मल्टीटास्किंग असे म्हणतात आणि ते फक्त स्त्रीयांनाच जमते>> Uhoh मला अजिब्बात मल्टिटास्किंग जमत नाही...याचा अर्थ तरी काय....परमेश्वरा.... Happy

Pages