सात्विक संतापाच्या चारोळ्या

Submitted by मंदार-जोशी on 20 September, 2010 - 01:46

गणपतीच्या कार्यक्रमांना
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....

आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...
Light 1 Wink Proud

गुलमोहर: 

गणपतीच्या मिरवणूकीला
ध्वनिप्रदूषणाची जोड आहे
रात्री दहाचा चाप ही
त्यावरची हलकीशी तोड आहे

>> गणपतीच्या मिरवणूकीला
ध्वनिप्रदूषणाची जोड आहे
रात्री दहाचा चाप ही
त्यावरची हलकीशी तोड आहे

आम्ही करतो ते ध्वनीप्रदूषण
'त्यांची' धार्मिक भावना आहे
आम्ही कापली कोंबडी तर अंधश्रद्धा
बोकडा विषयी मात्र सद्भावना आहे

आम्ही करतो ते ध्वनीप्रदूषण
'त्यांची' धार्मिक भावना आहे
आम्ही कापली कोंबडी तर अंधश्रद्धा
बोकडा विषयी मात्र सद्भावना आहे

====

जे बात!

मंदार तुझ्या संतापात सहभागी आहे. खरंच विचारांचा सुंता झालाय (की मुद्दाम केला गेलाय?).

आमच्या गणेशचतुर्थीला
त्यांच्या ईदेच्या "अल्लाहो अकबर" च्या आरोळ्या
सात्विक संतापाला वाट करून द्यायला
आम्ही रचतो चारोळ्या

Proud

दहाचा चाप आणि हलकिशी तोड
आमच्यावर लादणार तुम्ही
सगळी अक्कल आम्हालाच शिकवुन
वेड्यात आम्हालाच काढणार तुम्ही

बाबानु, सिक्सर Happy

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

>>आमच्या गणेशचतुर्थीला
त्यांच्या ईदेच्या "अल्लाहो अकबर" च्या आरोळ्या
सात्विक संतापाला वाट करून द्यायला
आम्ही रचतो चारोळ्या

आमचा वार्षिक सण
करतो म्हणे ध्वनीप्रदूषण
अजानसाठी पुकार रोज होतो
त्या गल्लीतून जाताना कानावर हात,
आणि जीव मुठीत आम्ही रोज ठेवतो

त्यांच्या आरोळ्या गोंजारतात तुम्हाला
आमच्या चारोळ्यांचं खुपणं आहे
आमचेच लोक आमचे नाहीत
हेच तर आमचं दुखणं आहे

...

वा मस्तच मंदार

तुझ्या सात्विक संतापाच्या चारोळ्या अतिशय आवडल्या... आमच्या संतापाला वाट करुन दिल्याबद्दल धन्स. Happy

विशालने दिलेल्या लिंकवरचा लेखही वाचला. अगदी माझ्या मनातला लेख. इतरही सर्वांच्या चारोळ्या आणि बाबानु यांची चारोळी तर फारच आवडली.

ह्या दोन माझ्याकडून:

चोराच्या उलट्या बोंबा मारत
ते अन्यायाचा पाढा वाचतात
सुरुवात कोणी केली काय म्हणता?
मिडियावालेही आपल्यालाच झापतात

सिनेमामधूनही तोच तो मुद्दा
शहाण्यांनाच शहाणपण शिकवणार
सात्विक संतापाच्या आपण करु चारोळ्या
तो मात्र हळूच बाँम्ब फेकणार

अक्षरी, धन्स Happy

- - - - - - - - - - - - - - - -

आम्ही कोर्टाचं ऐकलं नाही
तर तो ठरतो अवमान
कोर्टाला फाट्यावर मारणारे फतवे
हा काय न्यायालयाचा सन्मान?

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे
>>> निषेध..... निषेध.

कारण मी ब्रिगेडचा समर्थक आहे.

चला आता ब्रिगेडवर एक लेख वाचा.

http://www.maayboli.com/node/19873

मस्तच रे मित्रा.......

आणि सुकी, विशलभौ......... नेहमीप्रमाणेच झकास......... !

मंद्या,
आपली ती मुंज आणि त्यांचा तो सुंता
आपल्या अस्मितेला गंज आणि विचारांचा गुंता
आपला भगवा दहशतवाद आणि त्यांचे हिरवे कुरण
मॅडमला बघुन लुंगीवाल्याला चढलंय स्फुरण......... Angry

मंदार,

अतिशय जबरदस्त चारोळ्या आहेत. खूप आवडल्या. यातल्या काही चारोळ्या ढोंगी निधर्मान्धांना अतिशय झोंबलेल्या दिसत आहेत.

जाना देव मास्तुरे, जोपर्यंत स्वतःला झळा लागत नाहीत तोवर आग विझवायला जायचे नाही हि सहज मानसिकता बनलीय आपली Sad

आमच्या देव-देवतांची नग्न चित्रे
हा यांच्या कलेचा मुक्त आविष्कार
कार्टून काढणार्‍यांना मात्र हे
फतवा काढून मारतात ठार

>>> मास्तुरे, 'निधर्मान्ध' हा शब्द आवडला

अहो, जसे धर्मान्ध अतिरेकी असतात, तसे निधर्मान्ध अतिरेकी विचारवंत पण असतात. असे निधर्मान्ध भारतात तर अक्षरशः गल्लीबोळात, कानाकोपर्‍यावर सापडतात.

Pages