गणपतीच्या कार्यक्रमांना
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....
आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...

दादोजीं, रामदास खलनायक
दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे>>> निषेध..... निषेध.
मधुकर च्या या वाक्यात थोडं का होईना तथ्य आहेच ....नक्कीच मतभेद आहेत !
त्यामुळे हे तसं एकतर्फी विधान होऊ शकतं
जबरी जमल्या आहेत मंदार
एकदम भारी!!!
एकदम भारी!!!
चांगल्या आहेत.
चांगल्या आहेत.
मंदार छान ... फक्त तो "सुंता"
मंदार छान ... फक्त तो "सुंता" हा शब्द "सुंथा" असायला हवा.....
sahi..
sahi..
@ गिरीश, धन्यवाद, बदल केला
@ गिरीश, धन्यवाद, बदल केला आहे
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ही आत्ता सुचलेली.....
केंद्र सरकारच्या याचिकेत
रामाचे अस्तित्वच नाकारलेले
'राम'च उरला नाही म्हटल्यावर
मंदिराचे प्रयोजनच सरलेले
इथे आपलेच केंद्र सरकार रामाचे
इथे आपलेच केंद्र सरकार
रामाचे अस्तित्व नाकारतेय
मंदिराचे नाव काढल्यावर
कंडिशन्स अप्लाईड म्हणतेय ...
मंदार!!क्या बात है!!! खूपच
मंदार!!क्या बात है!!! खूपच आवडल्या तुझ्या चारोळ्या आणी त्याचबरोबर विशाल,सुकी, बाबानु.. वाव्वा: वाव्वा:
पहिलीच पसंत नाहि आली.
पहिलीच पसंत नाहि आली. गणपतीतला आवाज एकुन कान किटले आहेत नुकतेच. अर्थात हिन्दु विरुध्द मुसलमान असेच करायचे असल्यामुळे rational विचारांची अपेक्षा नाहिच.
गणूभाऊ तुम्ही चारोळ्या नीट
गणूभाऊ तुम्ही चारोळ्या नीट वाचल्याच नाहीत, समस्या हिंदु विरुद्ध मुसलमान ही नाहीय, समस्या आपल्या सरकारचा दुटप्पीपणा ही आहे.
विशाल अनुमोदन.. अनेकांना या
विशाल अनुमोदन..
अनेकांना या चारोळ्या मुसलमानविरोधी द्वेषाने भरलेल्या वाटतायत. इथे मुसलमानांऐवजी कोणीही असते तरी या चारोळ्या तशाच आल्या असता. इथे मुद्दा आहे निधर्मीच्या नावाखाली कोण्या एकालाच झुकते माप देण्याचा.
इंग्रजांच्या काळातही हेच झाले आणि त्यांच्या (इंग्रजांच्या) दृष्टीने ते त्यांना फायदेशीरच होते. पण आता आपले सरकार येऊनही पवित्रा तोच.
अशा वेळी 'आपले सरकार' म्हणताना जीभ चाचरते
समस्या हिंदु विरुद्ध मुसलमानच
समस्या हिंदु विरुद्ध मुसलमानच आहे. ते नसते तर सरकारचा दुटप्पीपणा असता का ?
मुळ समस्या समजत असण्याइतकी maturity नाहिये हेच तर म्हणायचे होते! तुम्हि लगेचच ते सिध्द केल्याबद्दल आभार!
अगदी बरोबर. maturity नाहीचे
अगदी बरोबर. maturity नाहीचे आहे मुळी. कोणीही कधीही आवाज उठवा कि लगेच आले त्यावर हे बुद्धिवंत.
इथे मी काय बोलतोय आणि तुम्ही काय बोलताय याची साधारण टोटल लागली नाहीये बहुदा.
मंदारने जी लिहीलेय ती वस्तुस्थिती आहे. आणि ती कोणाविरुद्धही असू शकते.
पहिलीच पसंत नाहि आली. गणपतीतला आवाज एकुन कान किटले आहेत नुकतेच. अर्थात हिन्दु विरुध्द मुसलमान असेच करायचे असल्यामुळे rational विचारांची अपेक्षा नाहिच.
गणपतीच्या मिरवणूकीला
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे
यात आपल्याला काय मुसलमानविरोधी दिसले ते कळू शकलेले नाही. पण जाऊ दे आपल्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. आपण मूळ समस्येच्या तळाची पोहोचलेले आहात आणि तिथून सगळीकडे तत्वनिष्ठ दृष्टीने पहात आहात. आणि आम्ही अगदीच उथळ पाण्यात पोहणारे. त्यामुळे तुम्हीही उगाच आमच्यासमोर डोकेफोड करू नका.
अफलातून.................
अफलातून.................
आशुचँप... सोडुन द्या.
आशुचँप... सोडुन द्या. सांगायचे काम आपण केले, पटो न पटो तो त्यांचा प्रश्न आहे.
)
गणू. एकच सांगतो, इथे हिंदु-मुस्लिम उल्लेख होताहेत कारण भारतात तेच परस्परांना त्रासदायक ठरताहेत. विशेषतः मुस्लिम हिंदुंना जास्त. (% वाईज पाहिलं तर) आणि जे सरकार हिंदुंच्या बाबतीत निधर्मवादी भुमिका घेतं तेच मुस्लिमांच्याबाबतीत मात्र सहिष्णु (?) होतं. यालाच दुटप्पीपणा म्हणतात. तुमच्यासारखे तथाकथित बुद्धीवादी डोळ्यांवर निधर्मीपणाची फसवी (स्वतःचीच फसवणुक करणारी) पट्टी घालुन बसतात हिच या देशाची खरी खंत आहे.
याही पलिकडे जावून जर मुस्लिमांच्या जागी ख्रिश्चन असते, किंवा ज्यु असते किंवा पारशी असते किवा कोणीही असते तरी याच प्रतिक्रिया आणि हिच परिस्थिती असली असती. पण बाकीच्या वोट बँक्स मुस्लिमांच्या तुलनेत कमजोर आहे म्हणुन सरकार त्यांच्या तुलनेत मुस्लिमांना चढते माप देते याला दुटप्पीपणा म्हणतात. (रच्याकने एका मुस्लीम कुटूंबात १० ते १५ तरी निश्चित मिळतातच
@ गणू बाकीचं आशुचँप आणि विशाल
@ गणू
बाकीचं आशुचँप आणि विशाल बोललेच आहेत, मी फक्त एकच बोलतो.
>> पहिलीच पसंत नाहि आली. गणपतीतला आवाज एकुन कान किटले आहेत नुकतेच.
गणपतीच्या मिरवणूकीमध्ये अनेक कार्यकर्ते स्वतः लेझीम, ढोल, इत्यादी वाजवतात, त्यात तरी वीज खर्च होत नाही. तूलनेने गणपतीत कमीच वीज खर्च होते. मात्र बहुतेक आय.पी.एल सामने कृत्रीम प्रकाशात रात्री बारानंतरही बराच वेळ खेळवले जात असल्याने प्रचंड प्रमाणात वीज खर्च होते - मैदानातले अत्यंत प्रखर दिवे, पेव्हेलियन मधले दिवे, तसेच हे सामने बघण्यासाठी कोट्यावधी टि.व्ही.संच देशभरात सुरु राहतात ते वेगळेच - या मार्गाने प्रचंड वीज वाया जाते. सरकार मात्र मिरवणूकीला दहा नंतर आवाजाची बंधने घालते, मात्र आय.पी.एल. सामन्यांना नाही.
आता या तूलनेत तुम्हाला मुसलमानविरोधी काय दिसले?
हाच प्रश्न आशुचँप ने तुम्हाला विचारला होता, पण ते मोठ्यांसाठी लिहीतात, मी नाही. त्यामुळे
आता हे बाळबोध (म्हणजे बालगोपाळ मंडळींनाही बोध होईल असे) स्पष्टीकरण ऐकल्यावर तुम्हीच स्वतःलाच उत्तर द्या (इथे द्यायची गरज नाही), आता या तूलनेत तुम्हाला मुसलमानविरोधी काय दिसले?
समस्या हिंदु विरुद्ध मुसलमानच
समस्या हिंदु विरुद्ध मुसलमानच आहे. ते नसते तर सरकारचा दुटप्पीपणा असता का ?
अहो मंदार, गणपती आणी आयपीएल याचा काय संबध ? तरिहि तुम्हि तुलना केलेली पाहुन गंमत वाटली.
या मार्गाने प्रचंड वीज वाया जाते. सरकार मात्र मिरवणूकीला दहा नंतर आवाजाची बंधने घालते, मात्र आय.पी.एल. सामन्यांना नाही.
थोडे समजाउन सांगतो - मिरवणूकीला दहा नंतर आवाजाची बंधने घालते कारण ते सार्वजनिक जागी चालते.
मिरवणूकीला बारा पर्यत परवानगी मिळते पण सवाइला मिळत नाहि - हे तुम्हि का नाहि लिहिले ? सवाइची तुलना केलि नमाजाशी - शाब्बास! सर्व ठीकाणी हिंदु विरुद्ध मुसलमान सुर आहेच की. आता "हिंदु विरुद्ध मुसलमान" हे शब्दच आले पाहिजेत असे नसते.
असो. सात्विक संतापाच्या चारोळ्या आहेत. त्यातुन फुसकेच निघणार.
गणू, तुमच्या आय.क्यु. बद्दल
गणू, तुमच्या आय.क्यु. बद्दल शंका फिटली
(No subject)
जमल्यात
जमल्यात
त्यातील सगळ्याच विचारांशी
त्यातील सगळ्याच विचारांशी सहमत आहेच असे नाही पण चारोळ्या मस्त.>>> सेम पिंच
<< त्यांनी लुटली अब्रू, अहो
<< त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे
>>
इथेच प्रतिसादांमध्येही दिसून येत आहे ही वस्तुस्थिती!
सर्व विचारांशी सहमत नसले तरी हा उद्रेक मस्त जमलाय!
गणू, तुमच्या आय.क्यु. बद्दल
गणू, तुमच्या आय.क्यु. बद्दल शंका फिटली
मस्त. तुमच्या आय.क्यु. बद्दल मला कधीच शंका नव्ह्ती
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे
इथेच प्रतिसादांमध्येही दिसून येत आहे ही वस्तुस्थिती
अहो वैचारिक सुंथा असु दे. तो परवडतो. वैचारिकताच नसेल तर आज जे चाललय तेच होणार.
इथे हिंदु विरुद्ध मुसलमान लिहिणारेच मधुकरच्या बाफवर ब्राह्मण विरुद्ध मराथि म्हणुन धिंगाणा घालत आहेत. जमेल तसा, जमेल तिथे कंपु करुन मायबोली वर असु दे नाहितर प्रत्यक्ष बाहेर रस्त्यावर - मारामार्या करणे हा फक्त उद्देश. कधी आसामी , कधी तमिळी, कधि हिंदु, कधि मुसलमान, कधी साउथ इंडियन, कधी दलित, कधी गुर्जर म्हणुन. असली चारोळी लिहिण्यापेक्षा हिम्म्त असेल तर एखाद्याचे घर नाहितर जीव वाचवुन दाखवा. द्वेष पसरवणे फारच सोपे आहे. शांतता पसरवुन दाखवा.
द्वेष पसरवणे फारच सोपे आहे.
द्वेष पसरवणे फारच सोपे आहे. शांतता पसरवुन दाखवा.
---- हा विचार मला आवडला. त्याचे पालन सर्वांनीच करायला हवे...
ह्या चारोळ्या आहेत, रोजच्या जिवनात भासलेला विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न आहे. खुप गांभीर्याने बघायची अवशक्ता नाही आहे.
अतिशय सुंदर चारोळ्या... अगदी
अतिशय सुंदर चारोळ्या... अगदी सत्यपरिस्थिती दर्शवणार्या
सगळ्यांच्याच चारोळ्या एका पेक्षा एक
त्यातील सगळ्याच विचारांशी
त्यातील सगळ्याच विचारांशी सहमत आहेच असे नाही पण चारोळ्या मस्त.>>> सेम पिंच
बाकी आयपीएल आणि गणपती ह्यांची तुलना मलाही खटकली कारण गणपतीला १० नंतर बंदी हि sound polution शी निगडीत आहे, त्याचा वीज विनिमयाशी काहीही संबंध नाही.
द्वेष पसरवणे फारच सोपे आहे. शांतता पसरवुन दाखवा. >> हा विचार खरंच योग्य आहे.
त.टि : बरं हे झाले माझे वैयक्तीक, वैचारिक मत. हि कुणाच्याही विरुद्ध अथवा बाजुने केलेली comment नाही.
गणु, तुमचे विचार ऐकून चांगलीच
गणु, तुमचे विचार ऐकून चांगलीच करमणूक होत्ये, चालुद्या
>>द्वेष पसरवणे फारच सोपे आहे.
बादवे, यात कसला द्वेष दिसला? फक्त सत्यपरिस्थिती दर्शवणारी तूलना आहे. वरती अनेकांनी सांगूनही तुमच्या पालथ्या घड्यात फरक पडला नाहीच्चे, तरी पुन्हा एकदा वाचणे. विशेषकरून विशाल, आशूचँप यांच्या कमेंट्स. जर का बालवाडीतून बाहेर पडला असाल तर अर्थात.
>>शांतता पसरवुन दाखवा.
आणि एकाने उगाच एका गालावर थोबाडित मारली तर दुसरा गाल पुढे करणार्या भेकडांपैकी मी नाही.
मला पुन्हा विनाकारण मारता येऊ नये म्हणून मारणार्याचे दोन्ही हात कापण्याच्या पक्षातला मी आहे.
या देशाला शांतता हवी आहे ही गोष्ट जगाला सांगायला ३-४ युद्ध करावी लागली होती हे विसरलात का?
तेव्हा उगाच वादावादी न करता तुम्हीही काहीतरी करुन दाखवा. आम्ही करतो पण बोलत नाही.
बालवाडीतून बाहेर पडला असाल तर
बालवाडीतून बाहेर पडला असाल तर अर्थात.
मी अजुन बालवाडितच आहे आणी तसाच राहिन.
मला पुन्हा विनाकारण मारता येऊ नये म्हणून मारणार्याचे दोन्ही हात कापण्याच्या पक्षातला मी आहे.
आणि एकाने उगाच एका गालावर थोबाडित मारली तर दुसरा गाल पुढे करणार्या भेकडांपैकी मी नाही. आम्ही करतो पण बोलत नाही.
अहो पुण्यात अडकलेले मुंबईकर - मायबोली वरच चालु द्या तुमचा सात्विक संताप. पुणे, मुंबइ सोडुन बाहेर पडा जरा. आणी हातबित कापण्याच्या गोष्टी सोडुन द्या. लिहिताना बरे आहे. बरे, तुम्हि काहिहि करायच्या आधीच तुमचे दोन्हि हात कापले तर काय कराल तुम्हि ? पुसताना सुद्धा वांदे होतिल मग!
तेव्हा उगाच वादावादी न करता तुम्हीही काहीतरी करुन दाखवा. आम्ही करतो पण बोलत नाही.
अहो मग चारोळ्या लिहिण्यात का वेळ घालवलात ? करा की कॄती!
@उदय
( झालेला असल्यामुळे त्यांना समजत नाहिये
ह्या चारोळ्या आहेत, रोजच्या जिवनात भासलेला विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न आहे. खुप गांभीर्याने बघायची अवशक्ता नाही आहे.
साहित्य असेच असते. विशेष वाटत नाहि आधी. कुराण किती धुमा़कुळ घालते ते पाहात नाहि का तुम्हि ? मुद्दा हा आहे कि constructive लिहा नकारात्मक नको. पण मंदार साहेबांचा वैचारिक सुंथा
बाकी आयपीएल आणि गणपती ह्यांची तुलना मलाही खटकली कारण गणपतीला १० नंतर बंदी हि sound polution शी निगडीत आहे, त्याचा वीज विनिमयाशी काहीही संबंध नाही.
बरोबर आहे.
टुक्कार भिक्कार
टुक्कार भिक्कार कवितांचा
गुलमोहरावर सडा आहे
कितीही करा टिका-टीपणी
कवी पालथा घडा आहे
Pages