सात्विक संतापाच्या चारोळ्या

Submitted by मंदार-जोशी on 20 September, 2010 - 01:46

गणपतीच्या कार्यक्रमांना
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....

आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...
Light 1 Wink Proud

गुलमोहर: 

मंद्या सॉलिड जमून गेलंय...
बादवे सुंता विचारांची.. विचारांचा नाही बहुतेक.

>>बादवे सुंता विचारांची.. विचारांचा नाही बहुतेक.

आधी तेच लिहिलं होतं, डॉ.कैलासांचं मार्गदर्शन घेतलं तेव्हा ते म्हणाले तो शब्द पुल्लिंगी आहे.

नंदनवनात हिंसाचाराचा
नेहमीच नंगानाच आहे...
लढणार्‍या जवानाला मात्र
मानवाधिकाराचा जाच आहे !

********************************************

त्यांच्या हातात हँडग्रेनेड...
आमच्या...., निषेधाचा खलिता आहे
त्यांच्या रक्ताला नेहमीच भुतदया
आमच्या...., पेटता पलिता आहे...!

काळ्या पैश्याला झाकणार्‍या,
पांढर्‍या शुभ्र खादीचा झगा आहे,
अश्वासनांच्या खैराती विसरून,
स्वतःचा खिसा भरण्याचीच मुभा आहे..

काळं काय पांढरं काय?
सारी षंढपणाची कमाल आहे...
आमच्या नसांमध्ये पाणी,
त्यांचं रक्त तेवढं लाल आहे...

जुने काय, नविन काय,
सर्वांचे स्वतंत्र अस्तित्व आहे,
कुणि काय स्विकारायचे,
ही ज्याची त्याची विचारधारा आहे...

^^^^

कही च्या कहीच आहे Sad

संताप आम्हाला पण येतो, पण पुन्हा शांत होतो कारण, सावरकरांनी देशासाठी काय नाही केले पण त्यांना यांनी देशद्रोही ठरवले,

@ मंदार, सूकि आणि विशाल...

मस्त लिहिलय.....

नंदनवनात हिंसाचाराचा
नेहमीच नंगानाच आहे...
लढणार्‍या जवानाला मात्र
मानवाधिकाराचा जाच आहे !>>>>>>>>>>>>>> दुर्दैवाने अगदी खरं

झक्कास........ !
नेमक्या शब्दात नेमक्या भावना!
पण उघड उच्चारायची भ्रान्त आहे

संताप एकदम नेमका उतरलाय.
विशाल तुस्सी भी छा गये हो Happy

Pages