सात्विक संतापाच्या चारोळ्या

Submitted by मंदार-जोशी on 20 September, 2010 - 01:46

गणपतीच्या कार्यक्रमांना
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंथा आहे

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....

आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...
Light 1 Wink Proud

गुलमोहर: 

@ गणू, तुम्हाला वितंडवादच घालायचा असेल तर दुसरीकडे जाऊन करा. यापुढे तुमच्या बडबडीवर मी तरी प्रतिक्रिया देणार नाही.

@ bumrang, चांगली चारोळी आहे तुमचीही. पालथे घडे कोण ते एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलेलंच आहे म्हणा.

गणूभाऊ तुम्ही चारोळ्या नीट वाचल्याच नाहीत, समस्या हिंदु विरुद्ध मुसलमान ही नाहीय, समस्या आपल्या सरकारचा दुटप्पीपणा ही आहे.
आपल्या ...म्हणजे कुठल्याही पक्षाच्या सरकारचा की फक्त काँग्रेस पक्षाच्या सरकारचा ?
Happy

अनिल, कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी थोड्याफार फरकाने हेच चालतं.
सर्वांना समान न्याय हे एक स्वप्नच राहिलं आहे कायम Happy

मंदार मस्त रे !
त्यातील सगळ्याच विचारांशी सहमत आहेच असे नाही पण चारोळ्या मस्त.>>> सेम पिंच

@ गणू, तुम्हाला वितंडवादच घालायचा असेल तर दुसरीकडे जाऊन करा. यापुढे तुमच्या बडबडीवर मी तरी प्रतिक्रिया देणार नाही.

मग आता action का काय ? पेपरमधे लक्ष ठेवेन मी- तुमच्या action बद्द्ल काहि येते का ते. Wink

गणू तुमच्या दुसऱया पोस्टला मी जरी प्रत्युत्तर दिले असले तरी मनातून थोडा आदर वाटत होता. खरेच वाटत होते की तुम्ही बरेच काही वाचन-चिंतन-मनन केले आहे. खरोखरच तुमची काही तत्वनिष्ठ बैठक असेल. पण नंतर जे पाल्हाळ तुम्ही लावले आहे ते इतके हास्यास्पद आहे.
मंदारच्या चारोळ्या ही एक सहज, साधी प्रतिक्रीया आहे. आपण दैनंदिन जीवनात काय पहातो, कशामुळे चिडचिड होते.त्यावर त्याला जे काही वाटले ते त्याने लिहीले आहे. त्यातून त्याच्या भावनांचा निचरा होण्यास मदत होत असेल. प्रत्येकानेच रचनात्मक, समाजावर विधायक परिणाम घडविणारे लिहीले पाहिजे हा अट्टाहास का?
आपण टप्प्याटप्याने जाऊ. सगळ्यात पहिले..
मंदारने जे लिहीले ते पूर्णपणे चुकीचे आहे अथवा नाही?
थोडे चुकले आहे हे मलाही मान्य आहे. पण बऱ्याच गोष्टी आत्ता घडत आहेत अथवा नाही.
कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

यात कोणालाही राग येईल का नाही. कसाबच्या ऐवजी कोणी जेम्स असता तरीपण ही चारोळी अशीच आली असती वा नाही. आता दुर्दैव त्यांचे म्हणायचे की जे जे अतिरेकी सापडतायत आणि सुखात जेलमध्ये आहेत ते सगळे एकाच धर्माचे आहेत.

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे

ही तर लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. आणि हे पूर्णपणे राजकारण आहे. इथे कोणत्याही राजकारण्याला वाद, त्वेष आणि मतभेद संपावेत असे मनापासून वाटत नाहीच. उलट ते जेवढे जास्त तेवढे त्याला बरे. म्हणजे आधीच पेटलेल्या आगीत तो आणखी तेल ओतून आपली पोळी भाजून घ्यायला रिकामा.

अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे

ही पण एक भेदक वस्तुस्थिती. मक्केच्या यात्रेकरूंना मिळणाऱया सुविधा अमरनाथला जाणाऱ्यांना मिळतात का हो. जर चौकशी करा आणि पहा. बर इथे पुन्हा हिंदू वि. मुसलमान आले. पोपच्या भेटीला जाणाऱया, बुद्धगयेला जाणाऱया यात्रेकरूंसाठी सरकार काय सोय पुरवते याची एक केवळ उत्सुकता म्हणून चौकशी करा म्हणजे लक्षात येईल इथे केवळ हिंदुविरोधी जायचे म्हणून मुसलमानधार्जिणे सरकार नाहीये. मुसलमान राज्यकर्त्यांनी वर्षोनुवर्षे भारतावर राज्य केले आणि स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही त्यांचा भारतीय राजकारणावर मोठा प्रभाव आहे.(हे चांगल्या अर्थाने म्हणतोय). पण सर्वसामान्य मुसलमानाचे काय. केवळ एकगठ्ठा मतदान मिळावे म्हणून त्यांना लालूच दाखविली जाते. आणि मग याचा राग इतर धर्मीयांच्या लोकांना आला तर ते नैसर्गिक आहे.
तुम्हाला जर ही पोस्ट नेहमीप्रमाणे उथळ आणि बाष्कळ वाटली असेल तर काही करू शकत नाही. कारण आज भारतात अशीच जनता आहे. आपल्यासारखे बुद्धिवंत फार कमी प्रमाणावर आहेत.

आजूबाजूला घडणार्‍या अनेक संताप/उद्वेग/खेद जनक गोष्टींबाबतच्या
भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करायचा प्रामाणिक प्रयत्न

ashuchamp

अजुनही तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते कळले नाहि. अहो, परिस्थीतीबद्दल वाइट वाटते तर ती चांगली करायचा प्रयत्न करायचा का वाइट ? ही प्रथम गोष्ट.

दुसरि गोष्ट - एकाहि कडव्यात मला संयमीत विचार दिसला नाहि. अहो सवाइ महोत्सव १० वाजता थांबवला जातो पण गणपतीच्या मिरवणुकिला १२ पर्येंत परवानगी मिळ्ते. हा विरोधाभास कुठे गेला ? त्याएवजी १२ वाजता गणपतीची मिरवणुक थांबवली जाते हे आयपीलच्या सोबत लिहिले ? काय संबंध ? आणी सवाइ महोत्सवची तुलना नमाजाबरोबर केली. परत काय संबध ?

काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

अहो विस्थापीत फक्त पंडितच नाहियेत. म्हणुनच म्हटले - पुण्या- मुंबइबाहेर जाउन पहा जरा.

कसाबच्या ऐवजी कोणी जेम्स असता तरीपण ही चारोळी अशीच आली असती वा नाही.

अहो पण आला का नाहि ? जेम्स लेन आला नाहि, दिपक मानकर आला नाहि, दारासिंग नाहि आला!

पोपच्या भेटीला जाणाऱया, बुद्धगयेला जाणाऱया यात्रेकरूंसाठी सरकार काय सोय पुरवते याची एक केवळ उत्सुकता म्हणून चौकशी करा म्हणजे लक्षात येईल

अहो हाच तर मुद्दा आहे. बरे तुम्हिच लिहिलेत. अमरनाथ आठवले. बुद्धगयेला जाणारे यात्रेकरु का आठवले नाहित ?

जाउ द्या - गेलाबाजार १९८४ मधले शीख देखिल आठवले नाहित.

अहो एका वाक्यात जरी तेवढी maturity व rationality दिसलीअसती ना, तर इथे काहिहि लिहिले नसते.
कळ्पाचा वास येतोच हो अशा प्रकारच्या लिखाणाला! आडुन आडुन कितीहि प्रयत्न करा फार सामाजिक लिहिण्याचा.

दुसर्या लेखात लिहिले आहे -परत इथे लिहितो. पुढचे इंग्रजी मधे लिहितो कारण मराठीत तो विचार मांडायला योग्य शब्द नाहित आणी तेवढ्या प्रभावीपणे हि येणार नाहि.

What outrages us the most? Is it the 'kind of action itself' or the 'blind irrationality' that motivates those actions?

गणूभाऊ, नेहमीप्रमाणे बरेच काही लिहीलेत पण मी जो सगळ्यात पहिला मुद्दा मांडला त्याला मात्र सोयीस्कररित्या बगल दिलीत.
मंदारच्या चारोळ्या ही एक सहज, साधी प्रतिक्रीया आहे. आपण दैनंदिन जीवनात काय पहातो, कशामुळे चिडचिड होते.त्यावर त्याला जे काही वाटले ते त्याने लिहीले आहे. त्यातून त्याच्या भावनांचा निचरा होण्यास मदत होत असेल. प्रत्येकानेच रचनात्मक, समाजावर विधायक परिणाम घडविणारे लिहीले पाहिजे हा अट्टाहास का?

ना इथे मंदारने आव आणला आहे की तो फार सामाजिक लिहून समाज सुधरविण्याचा प्रयत्न करतोय. असा कुठलाही उद्देश नसताना 'हे काय तुम्ही असल्या कळपातल्या आरोळ्या मारता. त्यापेक्षा जाऊन समाज सुधारा' असे उपदेश का बरं द्यावेत.
मला असे वाटते की माबो हे मनातले विचार शेअर करण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे तुम्ही इथे असेच लिहीले पाहिजे किंवा असे नाही लिहीले पाहिजे असा दबाव आणूच शकत नाही.
त्यातून हेच का लिहीले?..लेन आणि दिपक मानकर का नाही?..
शिख का नाहीत?
अरे काहीही लिहले तरी हा प्रश्न येणारच. तो काही भारताचा सामाजिक इतिहास लिहीत नाहीये, सर्व गोष्टींना स्पर्श करायला.
तुम्हाला असे विचारले, इथे प्रतिसाद देताय त्याचबरोबर माबोवर इतर काही जण धार्मिक तेढ वाढविणारे लिखाण करतायत तिथे तुम्ही का नाही विरोध दर्शवत. तिथेही प्रतिक्रीया देणाऱ्यांना उपदेश.
भारतीय खरेच मागासले आहेत नाही का?
तुमच्या भावना समजतायत पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी मांडताय यासाठी हा लिखाणप्रपंच.

बापरे.. कसले भांडता लोकहो....

प्रत्येकाची विचार करण्याची द्रुष्टी वेगवेगळी असते हो... ती सारखी असावी हा अट्टहास कशाला...

आणि ते शक्यही नाही... त्यामुळे येथे आपाआपली मते एकमेकांवर थोपवल्याने काही १ फायदा नाही..

विचारांच्या कक्षा अनुभवाने वाढत जातात... ह्या सगळ्याची त्यास गरज नाही...

हे माझे वैय्यक्तीक मत आहे... (आणि ते स्विकारावे हा आग्रह ही नाही...)

आशु मला तुझेही पटतेय... म्हणूनच मी गणू यांच्या दुसर्‍या धाग्यावर लिहिलेय, कुणीही एकतर्फी विचार करु नये. Happy

रश्मि, विचारांच्या कक्षा अनुभवाने वाढत जातात... ह्या सगळ्याची त्यास गरज नाही...>>>किती मस्त लिहिलेस... अपून तो...बोले तो... एकदम फिदा Happy

ashuchamp

मी कोणत्याहि मुद्द्याला बगल दिलेली नाहि. मंदारच्या चारोळ्या हे मला चांगलेच निमित्त मिळाले. मी मधुकर ह्यांच्या धाग्यावरही लिहिले असते (लिहिले आहेच पण तो तितक्यात बंद झाला) किंवा अजुन असा दुसरा मिळाला असता तरि लिहिले असते, मी सर्व धाग्यांवर तर लिहु शकत नाहि. मधुकरच्या धाग्यावर त्यांना पाहुन आणी नंतर त्याच्या आवडिचे वाक्य वाचुन, मला जे म्हणायचे होते (कळप बदलु - ब्राह्मण ते हिंदु ) याहुन दुसरे काय उदाहरण हवे होते ?

अरे काहीही लिहले तरी हा प्रश्न येणारच. तो काही भारताचा सामाजिक इतिहास लिहीत नाहीये, सर्व गोष्टींना स्पर्श करायला.
अहो नेमके सगळे हिंदुच आठवले कसे हो ? किती वेळा विचारु हा प्रश्न ? ह्याचे उत्तर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो (खरे झोपलेल्यापेक्षा झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे अवघड आहे तरि सांगतो) - ते हिंदु ह्या कळपातुन लिहित होते. त्यासाठी तर त्यांना विरोध. असो.


प्रत्येकाची विचार करण्याची द्रुष्टी वेगवेगळी असते हो... ती सारखी असावी हा अट्टहास कशाला...

प्रत्येकाची विचार करण्याची द्रुष्टी वेगवेगळीच असावी. पण प्रश्न उद्भवतात ते काहि लोक विचार करणे बाजुलाच ठेवतात तेव्हा. मग विचार करण्याची वेगळी द्रुष्टी हा फारच पुढचा प्रश्न झाला.

गणूभाऊ,

या चारोळ्या फार गांभीर्याने घेऊ नका हो. आवडल्या तर त्याचा आनंद लुटा नाहीतर दुर्लक्ष करा. चारोळ्या लिहिणार्‍याची भावना प्रामाणिक आहे का, चारोळ्या फक्त १-२ व्यक्तींवरच / समाजावरच का लिहिल्या आणि इतरांवर का नाही, लिहिणारा पक्षपाती आहे का निष्पक्षपाती इ. विचार करत बसलात तर तुम्हालाच त्रास होईल.

(हे माझे वैय्यक्तीक मत आहे. ते स्वीकारावे असा आग्रह अजिबात नाही. माझ्या या मताने तुमच्या किंवा कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी बिनशर्त माफी मागतो.)

प्रत्येकाची विचार करण्याची द्रुष्टी वेगवेगळी असते हो... ती सारखी असावी हा अट्टहास कशाला...
प्रत्येकाची विचार करण्याची द्रुष्टी वेगवेगळीच असावी. पण प्रश्न उद्भवतात ते काहि लोक विचार करणे बाजुलाच ठेवतात तेव्हा. मग विचार करण्याची वेगळी द्रुष्टी हा फारच पुढचा प्रश्न झाला >>>

दुसरे काय करतात किंवा कश्या पद्ध्तीने विचार करतात.. अथवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतच नाहीत.. हा ज्याच्या त्याच्या वैय्यक्तीक जडन घडणीचा प्रश्न आहे... त्यामुळे तुम्ही तुमचे विचार आणि मत त्यांच्यावर लादून काहीही उपयोग नाही.. एवढेच म्हणायचे आहे... बाकी तुम्ही माझ्यापेक्शा सुज्ञ आणि मोठे (वयाने व अनुभवाने )आहात.... Happy

मंदारच्या चारोळ्या हे मला चांगलेच निमित्त मिळाले.

तुम्हाला वाद घालायची खुमखुमी असेल पण तुम्हाला वाद घालायला मिळावा म्हणून पोस्ट करत बसायची माझी इच्छा नाही.

मी सर्व धाग्यांवर तर लिहु शकत नाहि.

देअर यु आर. सर्व धाग्यांवर तुम्ही लिहू शकत नाही. जिथे जिथे तुम्हाला वाटेल तिथेच तुम्ही लिहीणार. याला काय अर्थ आहे? म्हणजे मंदारने त्याला वाटेल ते लिहीले की तुम्ही म्हणणार अरे हे का नाही लिहीले. ते काही नाही लिहीले. पण तुम्हाला कोण नाही विचारणार या पोस्टवर का नाही लिहीले त्यावर का नाही लिहीले. लक्षात येतेय का जसे तुम्हाला कोणत्या पोस्टवर लिहायचे याचे स्वातंत्र्य आहे तसेच त्याला कोणत्या विषयावर लिहायचे याचे स्वातंत्र्य आहे.

अहो नेमके सगळे हिंदुच आठवले कसे हो ? किती वेळा विचारु हा प्रश्न ?

हाच प्रश्न तुम्हाला विचारला तर हो. मागे माबोवरच कुणीतरी छान शब्द वापरला होता. निधर्मांध. फार चपखल बसतो नाही इथे. सगळे उपदेश इथे येऊनच का? फक्त हिंदू (आता मी ही उघड उघड बोलतो) धर्मियाने काही लिहीले तर पोटशूळ निर्माण होतो पण बाकीच्यापैकी कोणी काही असे लिहीले तर तिथे मूग गिळून गप्प.
चला आता विषयच निघाला आहे आणि एवढे हिरीरीने उपदेश करताय तर कसाब आणि अफझल गुरूला मिळणाऱया वागणूकीबद्दल तुमच्या काय भावना आहेत?
ज्यांनी आपल्या मायभूमीवर आक्रमण करून निरपराध्यांचे रक्त सांडले. यातून त्यांना काय मिळाले? केवळ धर्मरक्षणाचे आसुरी समाधान?
आणि याला आपण काय उत्तर दिले. त्यांना तुरुंगात ठेऊन त्यांच्या जिवीताला धोका होऊ नये यासाठी पोलिस संरक्षण. का नाही संताप येणार कोणाला? तुम्हाला नाही येणार. नसेल येत तर तसे माबोवर जाहीरपणे कबूल करा?

ते हिंदु ह्या कळपातुन लिहित होते. त्यासाठी तर त्यांना विरोध. असो.

चला हे उघडपणे मान्य केलेत तर. काय चुकले हो हिंदू कळपातून लिहीले तर. त्याने विपर्यास केला असता, वस्तुस्थितीपेक्षा फारकत घेऊन विनाकारण गरळ ओकले असते तर तुमच्याही आधी मी त्याला टोकले असते. पण तसे नाहीये. याचेही उत्तर देऊन टाका. मंदारने जे लिहीते त्यात वस्तुस्थितीचा अंश आहे का त्याचा हा कल्पनाविलास आहे?

प्रश्न उद्भवतात ते काहि लोक विचार करणे बाजुलाच ठेवतात तेव्हा.

नुसताच विचार करणाऱ्यांनीच या देशाचे सर्वात जास्त नुकसान केले आहे. कारण त्यांच्या मते बाकीचे लोक विचारच करत नाहीत. सगळ्यांनी विचार केला पाहिजे हा त्यांचा अट्टाहास असतो. (अर्थातच ते म्हणतील त्याच दिशेने...तसे नाही केले तर लगेच धर्मांध, कंपूशाही, कळप वगैरे उपाधी लावायला हे मोकळे)
(दुटप्पीपणात बुद्धिवंतही सरकारपेक्षा कमी पडत नाहीत.) Happy

दुसरे काय करतात किंवा कश्या पद्ध्तीने विचार करतात.. अथवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे करतच नाहीत.. हा ज्याच्या त्याच्या वैय्यक्तीक जडन घडणीचा प्रश्न आहे...

रश्मिताइ परत चुकता आहात माझे म्हणणे समजुन घ्यायला. माझी कुठली विचारपध्दती तुम्हाला दिसली ? मी फक्त विचार करायला सांगतो आहे. reasoning करायला सांगतो आहे - blind belief तोडायला सांगतो आहे - हिंदु असण्याचा, बिहारी असण्याचा, दलित असण्याचा. आता हे blind belief आहेत हेच काहि जणांना मान्य होणार नाहि हे माहित असुनहि. माझी हिच इच्छा आहे कि स्वता: खरच ब्राह्मण आहोत का, मुसलमान आहोत का यावरच विचार करावा.

एक मुल्ला नसरुद्दिनची गोष्ट आहे. तो एकदा बायकोबरोबर इस्राएल- तेल अवीव ला गेला तेथे एका नाइट क्लब मधे एक comedian आपली कला सादर करित होता.नसरुद्दिनची बायको पुर्ण शो शांत बसुन होती. पण मुल्ला मात्र प्रत्येक वाक्याला जोर्जोरात हसत होता. शेवटी बायकोने त्याला विचारले "तुम्हाला हिब्रु समजते हे मला माहित नव्हते" मुल्ला म्हणाला " मला कोठे हिब्रु समजते ? मी तर त्याच्यावर विश्वास ठेवला"

सर्व जग अशा मुल्ला नसरुद्दिननी भरले आहे. प्रत्येक मुल अगणीत curiosity घेउन जन्माला येते आणी ती curiosity कळपात ढकलुन देउन पुर्ण्पणे संपवली जाते. तुम्हाला सांगीतले तुम्हि हिंदु आहात, तुम्हि विश्वास ठेवला, तुम्हाला सांगीतले तुम्हि ख्रिश्नन आहात, तुम्हि विश्वास ठेवलात.

रश्मि ताइ कोण कशा पद्धतीने विचार करतात हा प्रश्नच नाहिये. प्रश्न हा आहे की विचारच करत नाहित!

गळे उपदेश इथे येऊनच का?

परत कळपातला हिदु बोलतो आहे. असो.


ज्यांनी आपल्या मायभूमीवर आक्रमण करून निरपराध्यांचे रक्त सांडले. यातून त्यांना काय मिळाले? केवळ धर्मरक्षणाचे आसुरी समाधान?

अहो परत तेच - ते आणी आपण. अहो साहेब, मी तोहि निषेध करतच आहे. पण तुम्हि आता केवळ हिंदु असल्यामुळे तुम्हाला ते दिसणार कसे ?


काय चुकले हो हिंदू कळपातून लिहीले तर

काहि विशेष होणार नाहि त्याने . अजुन एखादे डोके फुटेल एवढेच.

नुसताच विचार करणाऱ्यांनीच या देशाचे सर्वात जास्त नुकसान केले आहे.
गम्मत आहे. जो असा विचार करतो कि कोणी हाणामार्या करु नयेत त्याने हे लोकांना बोलुन सांगाण्याशिवाय दुसरा उपाय आहे ? का त्याने प्रत्येकवेळेला मारामारी करुन दाखवायची , को अशी मारामारी करु नका म्हणुन ? Wink

आणी जे लोक क्रुतीवर विश्वास ठेवतात ते तर जगाचे कल्याण करतच आहेत. आज जे सर्वत्र सुखसमाधानाचे, शांततेचे, आनंदाचे , सुरक्षिततेचे वातावरण आहे ते ह्या लोकांमुळेच आहे Biggrin

शेवटी, अजुन किती दिवसांची फी दीली आहे मंदार साहेबांनी आपल्याला वकिली करायला ? Wink

@ ashuchamp

पुरे आता. अरे गणु साहेबांना बोलायचंय ना, बोलूदे. दमले की गप्प बसतील.

अजुन किती दिवसांची फी दीली आहे मंदार साहेबांनी आपल्याला वकिली करायला ?

पुष्कळ लोक फी न घेताच मंदार साहेबांची वकिली करताहेत. त्या लोकांना मंदार यांचे म्हणणे पटते. कारण जे मंदार यांनी पाहिले तेच त्यांनीहि पाहिले. आणि त्यांनाहि तसेच वाटले. तुम्हाला काय वाटते, इथे मंदार सांगतात म्हणून नंदीबैलासारख्या माना डोलावणारे लोक येतात?

स्वतःबद्दल हुषार असल्याचा (गैर्)समज बाळगणे ठीक आहे, पण इतरांना एकदम मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला नुसते वाटते तुम्हाला खूप समजते, तुम्ही खूप हुषार आहात. खरे तसे नाहीये. जे सगळे हिंदू आहेत, ते सगळे "तुम्हाला सांगीतले तुम्हि हिंदु आहात, तुम्हि विश्वास ठेवला" असे नाहीयेत. तुम्हाला माहित आहे का की महात्मा गांधींसारख्या व्यक्तीने सर्व धर्मांचा अभ्यास करून शेवटी हिंदूच रहायचे ठरवले. आणि अनेक लोक आहेत की जे, निधर्मांध नसल्याने, हिंदू असूनहि विचार करू शकतात.

खरे तर तुम्हाला हिंदूच काय, मुस्लिम, ख्रिश्चन इ. कुठल्याहि धर्माबद्दल काही दीडदमडीच्या लायकीची माहिती असेल असे वाटत नाही. नुसतेच कळप काय नि कंपू असे काहीतरी लिहीता!

असले काहीतरी विचार तुम्ही फक्त हिंदूंबद्दलच लिहू शकता, किंवा ख्रिश्चनांबद्दल. आणि तुमचे नशीब, अजून जिवंत आहात. कारण हिंदू विचार करतात.

मुसलमानांबद्दल असे काही बोलण्याची वेळ येणार नाही,
कारण बरेच लोक, नुसतेच तुम्ही मुसलमान असे सांगितले म्हणून मुसलमान झाले नाहीत. जाणून बुजून, विचार करून पण नाही,

तर मुसलमान हो नाहीतर तुझ्यासकट तुझ्या सगळ्या कुटुंबाला मारून टाकेन असे सांगितले म्हणून.

आणि त्यात काही चूक आहे असे तुम्हाला वाटले तरी केवळ विचार म्हणूनहि तसे लिहीण्याची सोय नाही. ज्यांच्यात दम होता त्यांनी या विचारसरणीला विरोध केला. तुम्ही जाम भेकड. जे ऐकून घेतात त्यांच्या चांगूलपणाचा फायदा घेऊन वाट्टेल ते बोलता, एव्हढेच तुमचे शौर्य!

हिंमत असेल तर चार दिवस मुसलमानांच्या मशीदीत जाउन त्यांना एक दोन प्रश्न विचारून बघा!!
नसेल तर उगाच इथे येऊन काहीतरी लिहू नका!!

>>अजुन किती दिवसांची फी दीली आहे मंदार साहेबांनी आपल्याला वकिली करायला ?
कळपाच्या बाहेर ठेवलेला वकिल बोलतो आहे Wink

बाकी चालू द्यात.

हिंमत असेल तर चार दिवस मुसलमानांच्या मशीदीत जाउन त्यांना एक दोन प्रश्न विचारून बघा!!
नसेल तर उगाच इथे येऊन काहीतरी लिहू नका!!

--------

SmileyCentral.com

चला बुद्धिवंत या पातळीवरही उतरले का. गणूभाऊ निदान तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुमच्या कृपेने अजून इतके वाईट दिवस नाही आले की मी कोणाची वकीली करावी आणि ती करण्यासाठी फी आकारावी लागेल. वाहवा मला किती बरे वाटते आहे की असल्या कोत्या बुद्धिवंतापेक्षा मी एक भावनिक हिंदू आहे ते.

रच्याकने, तुम्हाला तेच तेच बोलून कंटाळा येत नाही का हो. का हेच बोलणे तुमचे धर्मकर्तव्य आहे. अरे चुकलो निधर्मकर्तव्य आहे. Happy

जे लोक क्रुतीवर विश्वास ठेवतात ते तर जगाचे कल्याण करतच आहेत. आज जे सर्वत्र सुखसमाधानाचे, शांततेचे, आनंदाचे , सुरक्षिततेचे वातावरण आहे ते ह्या लोकांमुळेच आहे.

तुम्ही जरी उपहासाने लिहीले असले तरी हेच बरोबर आहे. (रच्याकने तो शब्द कृती असा आहे. लिहा पाहू १० वेळेस) Happy
निदान कृती करणाऱ्यांनी काहीतरी केले तरी हो. नुसतेच वांझोटे विचारवंत काय कामाचे. हिटलरच्या आक्रमणाला जर इंग्लंडने हिंसाचाराच्याच भाषेत उत्तर दिले नसते तर आज सगळ्या जगावर त्यांचेच राज्य असते कदाचित. त्यावेळीही होते तुमच्यासारखे बुद्धिवंत, शांततामय मार्गाने हिटलरचे मन वळविले पाहिजे म्हणणारे.
सगळीकडे शांतता पाहिजे, मानवता पाहिजे, बंधुवाद पाहिजे हे सगळे म्हणायला ठिकाय हो. या गोष्टी घरात बसून सकाळी चहाच घोट घेत, पेपर वाचत बोला. तिथेच त्या शोभून दिसतील. पण प्रत्यक्षात तसे नसते. शांतता कायम एकाच बाजूने टिकून राहू शकत नाही. समोरच्याने तलवार उपसली तर तुम्ही तिथेच बसून शांततेची जपमाळ ओढत बसू शकत नाही हो.

मला ह्यांवर माझे विचार लिहायचे आहेत, पण येथिल एकुण वादाचा सूर हा विषयावरिल वाद नसुन काहीतरी वेगळे आंतरप्रवाह (under current) त्यात असल्याचे मला दिसल्याने माझा विचार लिहायची हिम्मतच होत नाही आहे.

तुमच्यासारखे बुद्धिवंत

गणूंसारखे बुद्धिवंत? Biggrin

कळपाच्या बाहेर ठेवलेला वकिल
अगदी बरोब्बर! यांना कोण हो कुठल्या कळपात घेणार? उगाच त्या कळपाचा सत्यानाश.

तरी सुद्धा मी लिहीतेच.. Proud

desclaimer : मी ह्यांत कुठल्याच एका कंपुची सदस्य नसुन मी माझ्या स्वतंत्र अशा विचाराने आणि बुद्धीने माझी मते मांडत आहे (असे लिहीणे फार जरुरीचे आहे आजकाल माबोवर :P)

गणु,
मी तुमचे विचार वाचत आहे आणि मला ते बर्‍याच अंशी पटत आहेत कारण कुठेतरी माझेही विचार तसेच आहेत. पण हे विचार खुपच व्यापक आहेत. ह्यांवर मी एक खुप मागे लेख लिहीला होता (विषय होता महाराष्ट्र कोणाचा). http://www.maayboli.com/node/4506
संपुर्ण विश्व जिथे कुठलाही धर्म नाही, एकच देश, एकच कायदा आहे. पण हे खुपच व्यापक आणि स्वप्निल विचार आहेत. प्रत्यक्षात आणणे कधिच शक्य नाही.

कसं असतं ना, जेव्हा दोन देशांमधे युद्ध होते उदा. जर भारत आणि इतर कुठल्याही देशात जर युद्ध झाले तर देशातील प्रत्येकाचे रक्त खवळुन उठेल आणि तो भारताच्या बाजुने बोलायला लागेल, देशप्रेमाच्या कविता करेल, मग त्यात माझ्यामते हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, ब्राम्हण,मराठा, दलीत, सर्व सर्व एकजुटीने आपल्या देशाच्या बाजुने बोलतील.
पण महाराष्ट्र आणि इतर राज्यातील वाद समोर आला तर सर्व महाराष्ट्रीय़न दुस-या राज्याशी एकजुटीने भांडतील.
आता महाराष्ट्रात ब्राम्हण विरुद्ध इतर वाद जेव्हा येईल तेव्हा पुन्हा ब्राम्हण एकत्र येतिल आणि बाकीचे त्यांचा कंपु करतील.
ब्राम्हणांमधे पुन्हा आहेच... कोब्रा का डेब्रा का इतर...
किंवा मराठ्यांमधे देखिल, ९६ कुळी कोण, कुणबी कोन वगैरे वगैरे..
त्याच्याही पुढे जाउन लोकं लग्नानंतर देखिल तुझे माहेरचे संस्कार, माझे संस्कार अशा लेव्हल देखिल भांडणे हि करतातच.
ह्यांत त्यांचे चुकीचे आहे असे नाही. जगातील सर्व जणांना एकाच संस्कारात, एकाच धारणेत घडविणे केवळ अशक्य आहे.(हे कितीही योग्य असले तरी स्वप्निलच विचार आहेत) म्हणुन मग कुठेतरी आपापला कळप, कंपु, जाति, जमाती हे form होतच राहील. आणि हे असेच घडत राहील.

आम्हाला संस्कॄत मधे एक सुभाषित होते 'वयम पंचाधिकम शतम'. कौरव- पांडवांच्या बद्दल हे सुभाषित लिहीले होते. त्याचा अर्थ असा होता की जेव्हा आम्ही एक-मेकांशी लढु तेव्हा ते पाच (पांडव) आणि आम्ही १०० आहोत पण जेव्हा आमच्यावर दुसरा कुणी आक्रमण करेल तेव्हा आम्ही १०५ आहोत. तेव्हा 'वयम पंचाधिकम शतम'.
तेव्हा ह्यांवर इलाज काही आहे असे मला तरी वाटत नाही.
मनुष्य आदि कालापासुन आपल्या (जे त्याला त्याच्या कुवतिनुसार, संस्कारानुसार समजलेले असतात असे हक्क) हक्कांसाठी लढत आला आहे आणि लढत राहील. Happy

वर्षा..विचार पटले १०० टक्के. फारच सुरेख शब्दात मांडलेत. योग्य वेळी योग्य पोस्ट टाकल्याबद्दल तुमचे अभिनंदन
(मंदारच्या वतीने...वाचतोयस ना रे बाबा. तेवढा चेक पोहचता कर घरी.) Happy

Pages