संभाजी ब्रिगेड म्हटलं की लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट” आणि या घटनेचा मिडियानी एवढा बाऊ केला आहे की, संभाजी ब्रिगेड म्हणजे सकाळ संध्याकाळ जणु एकच काम करत फिरते, भांडारकर शोधने व तोडने.
अरे ती एक प्रतिक्रिया होती, हो प्रतिक्रिया.
आता कशाची प्रतीक्रिया हे सांगायची गरज पडु नये. एक संघटनेला नुसतं एका प्रतिक्रियेमुळे भारतातील मिडीयाने असे रंगवुन दाखविले जणु काही ती संघटना म्हणजे आतंक पेरत फिरणारी दहशतवादी बापटयांची टोळी आहे.
पण या पेक्षा मोठ मोठाले कांड करणा-या संघटना मात्र पांढरपेशी लोकाना अगदी चालतात. अयोध्येची मशीद फोडणारी संघटना असो, गोध्र्यात कत्तल घडविणारी संघटना असो वा क्रिकेटचं पिच खोदुन दहशत माजविणारी, महाराष्ट्रात राडा संस्कृती आणणारी किंवा त्याच संघट्नेतुन बाहेर पडुन उत्तर भारतियाना झोडपणारी नवनिर्मीती असो. हया सगळ्य़ा संघटनांच्या दहशती पुढे संभाजी बिगेडचं ते भांडारकर प्रकरण म्हणजे किस खेत कि मुली. पण नाही मिडीयाना ह्या सगळ्य़ा संघटनांची दहशती कृत्ये अगदी मान्य आहेत. पण संभाजी ब्रिगेडची मात्र याना भलतीच एलर्जी.
खरंतर संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे. समावेशक तत्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे. अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.
विद्यार्थी, युवक युवतिंचे संघटन करुन समाजासाठी पुर्णवेळ कार्यकर्ते तयार करणे, अन्याया विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे. आपल्या प्रश्नांसाठी लढने व स्वयंरोजगार निर्माण करुन मराठा बांधवाना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मुख्य उद्देश डोळ्य़ापुढे ठेवुन या संघटनेची स्थापना झाली.
राज्यभर ब्रिगेडच्या शाखा आहेत, १४ मे या दिवशी संभाजी राजेंच्या जन्मदिवशी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाते. त्यातुन युवक मराठा कार्यकर्ते तयार केले जातात. Standing Commando Force ह्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात १०० जणांची फौज उभी करण्याचे काम चालु आहे.
अधिक माहिती ईथे वाचा.
http://sambhajibrigade.blogspot.com/
तसेच मराठा सेवा संघाचा शिवधर्म व त्यांची भुमिका पण किती व्यापक आहे ते ईथे वाचा.
http://www.msschanda.com/pdf/Bhumika.pdf
थोड्सं भांडरकर प्रकरणा बद्दल
ज्या भांडारकर प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडला बदनाम केल्या जातं मुळात ते प्रकरण किती लज्जास्पद आहे ते बघु या.
जेम्स लेन नावाचा एक गोरा भारतात येतो, भांडारक संस्थेतील काहि लोकांच्या मदतीने शिवरायांवर पुस्तक लिहतो. या संस्थेतील आपल्याच मातितील लोकानी जेम्स लेनला खोटी माहिती पुरविली जी पुढे जाऊन वादग्रस्त ठरली. आता सगळे जेम्स लेनला दोषी धरतात. पण मुळात हि १४ लोकं ज्यानी जेम्स लेनला हि माहिती पुरविली ते मात्र खरे गुन्हेगार असुनही मोकाट सुटलेत. संभाजी ब्रिगेडला भांडारकर संस्थेवर नक्कीच सुड उगवायचा नव्हता. ते या १४ लोकाना जाब विचारायला गेले होते. आणि पुढे हे सगळ घडलं.
त्या १४ लोकांची नावं.
१) व्हि. एल. मंजुल.
२) एस. एस. बहुलकर.
३) सुचेता परांजपे.
४) वाय. बि. दामले.
५) रेखा दामले.
६) भास्कर चंदावरकर.
७) मीना चंदावरकर.
८) माधव भंडारे.
९) मीरा कोसंबी.
१०) ए. आर. कुलकर्णी.
११) राजेंद्र वोरा.
१२) नरेंद्र वागळे.
१३) जयंत लेले.
१४) दिलिप चित्रे.
हि आहेत ती दिव्य रत्ने ज्यानी लेनच्या पुस्तकातुन चिकलफेक केलीय़. आता काय या लोकांची पुजा करायची का ?
आपल्या महापुरुषांची बदनामी करणा-या लोकाना जाब विचारल्यामुळे मिडियानी संभाजी ब्रिगेडला बदनाम करुन ठेवलं.
पण ज्या रक्तात शिवरायांचा संस्कार धावतो. त्या रक्ताला परिणामाची तमा नाही.
जय जीजाऊ, जय शिवराय.
जय संभाजी ब्रिगेड.
मधुकर, हा भाग १ आहे की एकुणच
मधुकर, हा भाग १ आहे की एकुणच इतके आहे? कारण लेखात मुख्यतः भांडारकर प्रकरणच तर तेव्हडे आले आहे. आणि तुम्हीच म्हणता आहात की भांडारकरला उगीच प्रसारमाध्यमांनी हवा दिली/देत आहेत. ह्या लेखातूनही तेच होतय. लेखाचे शीर्षक पाहून माझी अपेक्षा झाली होती की संभाजी ब्रिगेडच्या आदर्श उपक्रमांची व सम्यक दृष्टीकोणाची माहिती मिळेल. जर अजून पुढचे भाग येणार असतील तर त्यातून ही माहिती मिळावी अशी अपेक्षा करतो.
पण माझ्या चारोळ्यांच्या
पण माझ्या चारोळ्यांच्या पानावर येउन तुम्ही हे वर पेस्ट केलेलं जे काही हगून गेलात>> किती गलिच्छ भाषा ही. छी छी.
तुझ्यावर झालेला संस्कार झळक्तोय. चलने दो.
असचं अधे मधे आपले संस्कार दाखवत जा.
वा... फारचचच.. छान लेख हो
वा... फारचचच.. छान लेख हो मधुकर राव...
मला एका वाक्याबद्दल अधिक माहिती हवी होती.
"ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो?" असे कोण कोणास म्हणाले होते???
लगेचच आणि योग्य माहिती मिळेल हि अपेक्षा...
टण्या यांना अनुमोदन. जोपर्यंत
टण्या यांना अनुमोदन.
जोपर्यंत जाळपोळी शिवाय, इतरहि काही केल्याचे लोकांच्या नजरेत येत नाही, तोपर्यंत लोकांना तेव्हढेच आठवणार.
जय जीजाऊ, जय शिवराय.
जय संभाजी ब्रिगेड
असे नुसते म्हणता, त्यांनी सर्वांनी बरेच काही काही चांगले केले. नि त्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास होता.
"देवाचं अस्तित्व नाकारणारी" अश्या संस्थेने खरे तर काहीतरी दुसरेच नाव घ्यावे.
बुद्धिजीवी ना तुम्ही! बुद्धीने काम करा ना! थोडीशी बुद्धि खरच वापरली असती तर प्रतिक्रियेला संयमित ठेवणे जमले असते.
इतर लोकांनी अमुक केले नि तमुक केले, ते तुमच्या मते चुकीचे! पण तुम्हीहि तसेच केलेत, मेंढरासारखे, तर तुम्हीच चांगले नि ते वाईट असे कसे म्हणता?
बुद्धिजीवी = बुद्धी असणार्यांच्या जिवावर उठणारे. असा सोडवलात का हा समास? हंSS. लैच हुष्षार म्हणायचे न् काय!
बकवास ब्रिगेड आणि बकवास
बकवास ब्रिगेड आणि बकवास लेख्..
मधुकर, तुमच्याकडून चांगल्या माहितीपर लेखांची अपेक्षा होती..
झक्कींना अनुमोदन!
लेखाचे शीर्षक पाहून माझी
लेखाचे शीर्षक पाहून माझी अपेक्षा झाली होती की संभाजी ब्रिगेडच्या आदर्श उपक्रमांची व सम्यक दृष्टीकोणाची माहिती मिळेल. >>>> मलाही टण्यासारखेच वाटले होते. पण कुठेच तसं दिसलं तर नाहीच, उलट नेहमीप्रमाणे जातीयवादी विखार दिसला. असा विखार मनात पोसून दुसर्याचं काहीच वाईट होत नाही उलट तो विखार, पोसणार्याच्या विवेकालाच एक दिवस जाळतो.
मधुकर, चॉईस इज युअर्स. वेळीच विखार हाकलून स्वतःला मुख्य प्रवाहाचा एक भाग बनवायचं की विखार पसरवायला बघून मुख्य प्रवाहापासून स्वतःला उगीचच्या उगीच तोडत रहायच. या लेखांतून तू कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व नक्कीच करत नाहियेस कारण तू ज्यांना दलित वगैरे म्हणतोस त्यांच्याशी आमचा कामानिमित्ताने रोजचा संबंध येतो व कुणीही हा विखार मनात बाळगून वागत नाहीत आणि त्यामुळे ते मुख्य प्रवाहाचा आपोआपच भाग बनलेत. ही खरी प्रगती!
तुझे विचार मी त्यांना २-३ दा सांगितले व विचारलं की तुम्हीही हे असंच मानता का? तर खो खो हसत त्यांनी या विचारांना मागासलेलं म्हटलं.
------
जय जीजाऊ, जय शिवराय.
जय संभाजी ब्रिगेड.
असे नुसते म्हणता, त्यांनी सर्वांनी बरेच काही काही चांगले केले. नि त्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास होता.
"देवाचं अस्तित्व नाकारणारी" अश्या संस्थेने खरे तर काहीतरी दुसरेच नाव घ्यावे. >>>> अगदी अगदी झक्की.
जिजाऊ व शिवराय आई भवानीचे भक्त. शिवरायांनी शिवलिंगावर करंगळीच्या रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्याची शपथ घेतली. संभाजीराजे तर धर्मवीरच होते.
या सगळ्यांनी अनेक देवळांचा जीर्णोद्धार केला. प्रत्येक गड किल्ल्यावर ठायी ठायी मुर्ती स्थापन केलेल्या दिसतात.
लढायला सुरुवात ही "हर हर महादेव" ललकारीने होत असे.
मग नक्की काय आवडलं त्यांचं? फक्त जात? छे !!! त्या दिव्यपुरुषाला जातीच्या बंधनात आपण कोण अडकवणार? आपली लायकीच नाही ती. त्यांच्या नखाची जरी सर आली तरी आपला हा जन्म सफल समजा.
आम्हाला शिवरायांचं संपूर्ण व्यक्तिमत्वच आवडतं. देशासाठी / स्वराज्यासाठी लढणार्या प्रत्येकाची एकच जात असते ती म्हणजे मायभूमीचे सुपुत्र्/सुपुत्री असणं. राजे ज्या ध्येयाने भारलेले होते त्यात त्यांना सहकार्य करणार्या प्रत्येकाची जात काय होती? फक्त स्वामीनिष्ठा हीच त्यांची जात. ना ते ब्राह्मण होते, ना मराठा, ना कुंभार, ना चांभार.
नेहमीप्रमाणे अत्यंत भंपक आणि
नेहमीप्रमाणे अत्यंत भंपक आणि बकवास लेख.
मधुकरराव, तुम्ही हे माहिती देण्याच्या नावाखाली जे ब्राह्मणद्वेषी लेख लिहिता, ते आता बंद करा. 'सम्यक', 'आदर्श' वगैरे शब्द वापरून तुम्ही जो वेड पांघरायचा प्रयत्न करता, ते लक्षात न येण्याएवढे लोक इथे (तुमच्यासारखे) बिन्डोक नाहीत. इथे खरोखर बुद्धिमान लोक आहेत.
तुम्ही आत्तापर्यंत लिहिलेल्या लेखांमधून एवढेच जाणवते की तुम्हाला बहुजनहिताची चाड वगैरे काही नाही. तुमचा स्वतःचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास नाही. ज्या जेम्स लेनच्या पुस्तकाला तुम्ही वर नावं ठेवत आहात, त्याच टाईपची बिनबुडाची विधानं करणारी पुस्तकं तुम्ही वाचता आणि त्याचे संदर्भ देऊन इथे लेख डकवता. कोणत्याही संस्थेशी संलग्न राहून तुम्ही प्रत्यक्ष काही काम केलेले नाही. फक्त ब्राह्मणांना झोडपले म्हणून तुम्ही संभाजी ब्रिगेडची इथे तारीफ करता आहात. हिंदूंना विरोध करणारे म्हणून मागे तुम्ही मुसलमानांची 'अत्यंत सहनशील, सौम्य (आणि अजून काय काय)' अशी तोंड फाटेस्तोवर बिनबोभाट स्तुती केली होती. ब्रिगेडने इतर काही विधायक काम केले आहे ह्याची कदाचित तुम्हाला माहितीही नाही आणि ती इथे लिहायचा तुमचा उद्देश तर नक्कीच नाही. तुम्ही कारण नसताना जी १४ माणसांची नावं दिली आहेत, त्यावरूनच तुमचा उद्देश स्पष्ट होतो.
इथे वर जी तुम्ही यादी दिली आहे, त्यातील माझ्या माहितीत तरी ए आर कुलकर्णी हे शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर असंख्य पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. मागे औरंगजेबाचं कौतुक करत तुम्ही खुद्द शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाविषयी शंका व्यक्त केली होती आणि आज इथे निर्लज्जासारखे 'जय जिजाऊ, जय शिवराय' असं लिहिता आहात. आणि वर परत ही यादी देऊन त्यांनी 'महापुरूषांना बदनाम केले' वगैरे विधानं आपली काही लायकी नसताना करता आहात! तुम्हाला खरोखर शरम वाटली पाहिजे. मूर्खासारखी 'परिणामांची तमा नाही' वगैरे काहीतरी वर वाक्यं लिहीलीत, आणि वर परत स्वतःला बुद्धिजीवी म्हणवताहात. झक्कींनी तुमची बुद्धिजीवीची व्याख्या अगदी बरोब्बर सांगितली आहे.
ह्या असल्या तद्दन भिकार लेखांची प्रतिक्रिया देण्याचीसुद्धा लायकी नाहीये. पण टण्या, अश्विनी वगैरे लोक तुमच्याकडून अधिक माहितीची वगैरे अपेक्षा करत आहेत. म्हणून मग तुमचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी एवढी पोष्ट लिहिली.
मधुकर, तुम्ही जेम्स लेनचं
मधुकर,
तुम्ही जेम्स लेनचं पुस्तक बघितलं आहे का?
तुम्ही ज्या नावांचा उल्लेख केला आहे, त्या लोकांचे सुरुवातीला आभार मानले आहेत. याचा अर्थ माहिते पुरवली असा होत नाही.
In India, my scholarly home has been the Bhandarkar Oriental Research Institute in Pune, and there I profited from the advice and assistance of the senior librarian, V. L. Manjul. I read texts and learned informally a great deal about Marathi literature and Maharashtrian culture from S. S. Bahulkar, Sucheta Paranjpe, Y. B. Damle, Rekha Damle, Bhaskar Chandavarkar, and Meena Chandavarkar. Thanks to the American Institute of Indian Studies and Madhav Bhandare, I was able to spend three productive periods of research in Pune.
ही मूळ वाक्यं आहेत. कृपया अर्थ लक्षात न घेता विधानं करू नका.
भास्कर चंदावरकर, दिलीप चित्रे या दिवंगत व्यक्तींचा असा अपमानास्पद उल्लेख केल्याचा निषेध.
आणि प्रतिक्रिया देणं म्हणजे ग्रंथालयाची नासधूस करणं नव्हे. तुम्ही ज्या भांडारकर संस्थेला नावं ठेवता आहेत, तिथे आज प्रचंड प्रमाणात बौद्ध वाङ्मयाचं जतन केलं गेलं आहे. तुम्ही ज्या 'प्रतिक्रियेचं' कौतुक करत आहात, त्या घटनेमुळे अनेक अभ्यासकांचं, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.
टण्याला अनुमोदक! कमुनिस्टाना
टण्याला अनुमोदक!
कमुनिस्टाना जसा कॅपिटलिस्ट, कडवे संघ वाल्याना जसा मुसल्मान तसा संभाजी ब्रिगेड्ला 'बामण'. कोणितरी लागतोच द्वेश करायला म्हणजे मग संगठना उभारणे सोपे जाते. डोके भडकावने सोपे जाते....
संघाचे इतर सम्यक व आदर्श असे अनेक उपक्रम आहेत. संभाजीचे (ब्रिगेडचे) असे उप्क्रम ऐकायला/ जाणुन घ्यायला जरूर चालेल. बाकी
खालचा भाग भरपूर मनोरंजन करुन गेला.
"अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे."
बाकी मधुकर्च्या ब्रह्मण द्वेशावर भाष्य करण्याआधी इथला मुस्लिम द्वेश पण निशेधार्य मानावा की नाही?
बाकी मधुकररावनी खरे रंग दाखवण्याचे धाडस केले ह्याचे कौतुक!
हा लेख छान
हा लेख छान आहे
http://www.complete-review.com/quarterly/vol5/issue1/laine1.htm
म्हणजे हा लिंक वरचा लेख छान आहे. उगाच गैरसमज नको
>> संभाजी ब्रिगेड म्हटलं एक लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट”
काय करणार त्यांचे हे एकच मोठे काम असेल. बाकिच्यांनी बर्याच उचापती केल्यात त्यामुळे लोकांना वेगवेगळ्या घटना आठवतात. बाकी ईतर संघटनांना कोन चांगल म्हणतो ?
बाकी केल काय तर आपल्याच लोकांना मारलेत व जेम्स साहेब तिकडे मजेत ?
>> खरंतर संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे. समावेशक तत्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे. अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.
हे सगळ आहे तर मग हे प्रकरण कसे झाले? तुमच्या लिंक बघीतल्या त्यात तर काय काय भाषा आहे.
ती काही या वरच्या description मधे बसत नाही .. हे का?
का नाही एकाला पाठवुन जेम्स साहेबाची मुलाखत घेत नुसती ओरड का? जेम्स काय लोकाना विचारुन पुस्तक लिहायचे का? वाचावे लगेल तुमच्या लिकवर नाही
हा लेख गुलमोहरात योग्य
हा लेख गुलमोहरात योग्य नसल्याने चालू घडामोडी या ग्रूपमधे हलवला आहे.
मला नाही वाटत मधुकरराव काही
मला नाही वाटत मधुकरराव काही उत्तर देतील.
बहुसंख्य लोकांच्या मताविरुद्ध लिहीले की ते पेटून निघून काही काही लिहीतात, त्याची गंमत बघायची हाच त्यांचा हेतू.
मधुकरराव स्वतःला बहुतेक 'सम्यक् व बुद्धिजीवी' म्हणत असतील. त्यांच्या व्याख्येप्रमाणे ते असतीलहि. उद्या ते म्हणतील, बाजीराव पेशवे इ. लोक केवळ दलितांवर अन्याय करायलाच राज्य करत होते. त्यांनी लोकांना अत्यंत सहनशील व सौम्य अश्या मुसलमान धर्माचा स्वीकार करण्यापासून वंचित केले!! तसे तर खुद्द छत्रपति श्री संभाजी महाराजांनीहि मुसलमान धर्म स्वीकारायला अत्यंत कडक नि जहाल शब्दात विरोध केला! तर, कृपया तुम्ही 'संभाजी' या नावाची इतकी बदनामी करू नका. दुसरे काहीतरी नाव घ्या, खरे तर औरंगजेबाचेच नाव का देत नाही तुमच्या ब्रिगेडला? नि मग काहीहि लिहा. आपण सर्वजण आता संभाजीब्रिगेडला औरंगजेब ब्रिगेड म्हणू या!
सध्या तरी तुमचे लिखाण वाचले की आमच्या लहानपणी रस्त्यावर एक वेडी बाई ज्याला त्याला शिव्या देत, दगड मारत जात असे, ती आठवते.
ब्रह्मण द्वेशावर भाष्य
ब्रह्मण द्वेशावर भाष्य करण्याआधी इथला मुस्लिम द्वेश पण निशेधार्य मानावा की नाही?
तसे कुणीहि काहीहि निषेधार्ह मानावे हो. पण खोटे नाटे, पुराव्याशिवाय, वेडेवाकडे लिहीले तर निषेध करावा.
तुम्ही म्हणता तिथे खोटे काय आहे ते सांगा! नि खरे असेल तर निषेध कसला? आवडत नाही म्हणून?
तसे तुम्ही घाबरू नका. मुसलमानांना स्वतःविरूद्ध लिहिणार्यांचा निषेध कसा करायचा ते कळते, तुमच्यासारख्यांची मदत नको त्यांना.
कमुनिस्टाना जसा कॅपिटलिस्ट,
कमुनिस्टाना जसा कॅपिटलिस्ट, कडवे संघ वाल्याना जसा मुसल्मान तसा संभाजी ब्रिगेड्ला 'बामण'. कोणितरी लागतोच द्वेश करायला म्हणजे मग संगठना उभारणे सोपे जाते. डोके भडकावने सोपे जाते....>>>>
पेशवा, अनुमोदन! आपल्याच देशात आपल्याच माणसांशी असे तावातावाने कशाला भांडतात सगळे? त्यातून नेमके काय सिद्ध होते? त्यापेक्षा आपल्या देशापुढे अजूनही मोठे मोठे प्रश्न आहेत आणि भयंकर असे शत्रू आहेत. आपली लढण्याची खुमखुमी हे सगळेच लोक तिथे का नाही उतरवत?
मी मायबोलीवर नवीन आहे आणि माझे इथले वाचन त्यामानाने कमी आहे. त्यामुळे कोणी कोणती विधाने, कुठले लेख कोणत्या उद्देशाने लिहिले आहेत, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, हे मला फारसे माहिती नाही. त्यामुळे माझ्याकडून कधी कधी बेजबाबदार विधाने येत असावीत. पण मी मानवता धर्माच्या बाजूने आहे, हे स्पष्ट करते. माणसा-माणसात द्वेष पेरणार्या सर्व व्यक्ती आणि संस्था यांच्या विरोधात असणार्या तुम्हा सर्वांच्या बाजूनेच मी ही आहे!!!
संभाजी ब्रिगेड-एक आदर्श व
संभाजी ब्रिगेड-एक आदर्श व सम्यक संघटना हे शीर्षक वाचून ब्रिगेडच्या इतर काही चांगल्या आदर्श व सम्यक कामाविषयी माहिती असेल असे वाटले होते. पण या लेखात भांडारकर वरील हल्याच्या न पटणार्या समर्थनाशिवाय काहीही नाही.
आपल्याच देशात आपल्याच
आपल्याच देशात आपल्याच माणसांशी असे तावातावाने कशाला भांडतात सगळे? त्यातून नेमके काय सिद्ध होते? त्यापेक्षा आपल्या देशापुढे अजूनही मोठे मोठे प्रश्न आहेत आणि भयंकर असे शत्रू आहेत.
हे मान्य आहे हो सगळ्यांनाच.
पण काही जणांच्या मते ब्राह्मणांना मारून टाकले, की सगळे प्रश्न आपोआप सुटतील. खात्री बाळगा, मधुकरराव त्यासाठीच, त्यांच्या कुवतीनुसार काय करायचे ते करत आहेत. त्यांच्या मते, मध्यपूर्वेतील प्रश्न, कॅन्सर, हेहि ब्राह्मणांच्या मुळेच उद्भवले. छत्रपति श्री शिवाजी महाराजांचे खरे शत्रू ब्राह्मणच होते.
आता त्यांची idea discuss करायला great mind काय कामाचे?
तुम्ही मायबोलीवर नवीन आहात असे म्हणता, म्हणून सांगतो. इथे असे वादविवाद नेहेमीच होतात. काही विषय लोकप्रिय आहेत, जसे भारत नि अमेरिका, वगैरे. बरेच दिवस अशी खडाजंगी झाली नव्हती, म्हणून मधुकररावांनी हा त्यांचा आवडता विषय उकरून काढला. नि सुरुवात जरी 'great minds' असल्याचे ढोंग करून केली तरी शेवटी मूळची small minds किती वेळ असे ढोंग चालवू शकतील?
हा काय प्रकार आहे काही कळायला
हा काय प्रकार आहे काही कळायला मार्ग नाही...काय तर म्हणे चुकीचाच इतिहास शिकवला ...कशावरून? केवळ हे गुंड दहशत माजवतात म्हणून इतिहासच बदलायचा? आणि हे सम्यक वगैरे? आनंद आहे...
हि केवळ अन केवळ राजकीय स्वार्थासाठी चाललेली गुंडगिरी आहे....आंबेडकरांच्या नावाची वाट लाऊन भागले नाही म्हणून आता संभाजीच्या नावाने चालू...काय बोलणार? आणि बहुजनांचे नक्की काय भले केलेय या ब्रिगेडने? गावात पाणीपुरवठा, स्त्रियांना संरक्षण, दारूपासून पुरुषांना दूर करण्याचे उपाय? काहीच नाही...काय उगाच मूर्खपणा आहे...तुम्हाला आम्ही पण मूर्खच वाटतो कि काय? कदाचित ब्राह्मण असल्याने असू सुद्धा ...
फचिनच्या पोस्टीला जोरादार
फचिनच्या पोस्टीला जोरादार अनुमोदन!!!!!!
विरोध करायला पण अक्कल लागते मधुकर. असो, जास्त भाष्य करायच्या पण लैकीचं लेखन नाहीये.
जेव्हा डोकं ठिकाणावर ठेऊन लिहाल तेव्हा सगळेच ऐकतील.
मधुकर, मी तुम्ही दिलेल्या
मधुकर, मी तुम्ही दिलेल्या तिनही दुव्यांवर जाउन आलो. त्यापैकी जी अनुदिनी (blog) आहे त्यावर केवळ संभाजी ब्रिगेडने त्यांच्या वा त्यांच्या विचारांच्याविरुद्ध जे काही छापून आले, बोलले गेले त्याविरोधातच केवळ लिहिलेले आहे. त्यात आदर्शवादी वा सम्यक विचारसरणी दर्शविणारे कृत्य मला कुठे दिसले नाही. माझी बघण्यात चूक होत असल्यास निदर्शनास आणून द्यावी. तसेच बरेचसे वृत्तपत्रीय लेख हे कुठलाही संदर्भ न देता आलेले आहेत. उदा: संभाजीराव भिड्यांनी महात्मा फुलेंना देशद्रोही म्हटले आहे ह्या बातमीत कुठल्या दिवशीचा/आठवड्याचा अंक वगैरे काहीच नाही.
दुसरा दुवा: 'शिवधर्म'चे जे संकेतस्थळ आहे त्यावर मुख्य मजकूर सोडता बाकी मजकूर नीट उमटत नाहिये. त्याबद्दल काही खास फाँट उतरवून घ्यायला लागत असेल तर सांगा.
तिसरा दुवा अत्यंत महत्वाचा. डॉ. आ.ह.साळुंखे हे शिवाजी विद्यापीठातील तत्वज्ञानाचे ज्येष्ठ्य प्राध्यापक. त्यांचे भाषण आपण खरेच मुळापासून वाचा. मला त्यांची सर्वच मते पटतील असे नाही पण तरिही एक उत्कृष्ट भाषण व विचार म्हणुन मी त्याकडे बोट दाखवेन. त्यांनी कळकळीने सांगितलेली विवेकवादाची भुमिका, भावनांवर ताबा ठेवून विवेकी कृतीवर भर देण्याची विनंती, द्वेषास समूळ उपटून देउन सर्वसमावेशक वृत्तीचा अंगिकार करणे इत्यादी गोष्टी फार महत्वाच्या आहेत. परंतू, वरील लेखाच्या अनुषंगाने बघितल्यास संभाजी ब्रिगेड ही आदर्श व सम्यक संघटना का आहे ह्याचा बोध ह्या लेखातून होत नाही. पुरुषोत्तम खेडकरांच्या भाषणात त्यांना काय करायचे आहे हे त्यांनी सांगितले आहे व त्यासाठी तीस संस्था-उपक्रमांची यादी दिली आहे. ह्या प्रत्येक संस्थेची उद्दिष्ट्ये दिली आहेत. परंतू त्यांनी केलेले कार्य (कदाचित ह्या भाषणाच्या वेळी ह्या सर्व संस्था बाल्यावस्थेत असतील वा त्यांचे कार्य नुकतेच सुरु झाले असेल वगैरे) फारसे नमूद केलेले दिसत नाही. पुनःश्च, संभाजी ब्रिगेडबद्दल त्यात फारच त्रोटक (एक परिच्छेद) माहिती आहे व तीसुद्धा ब्रिगेडच्या उद्दीष्टांबाबत, प्रत्यक्ष कामाबाबत नव्हे.
मी अजुनही तुमच्याकडून ह्याबद्दल अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा ठेवतो.
जाता जाता: डॉ साळुंखे हे तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक. चार्वाकाच्या तत्वाज्ञावार केलेली त्यांची भाषणे आवडीने ऐकली/वाचली होती. पण हेच विवेकवादाचे कट्टर पुरस्कर्ते, निरीश्वरवादी (बुद्धासारखा निरीश्वरवाद नव्हे ज्यात पुनर्जन्म/आत्मा/मुक्ती इत्यादी येतेच तर संपूर्ण निरीश्वरवाद) विचारवंत पुढे 'धर्म'स्थापनेच्या बरोबर का गेला हे मला न समजणारे आहे. असाच संभ्रम मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण वाचताना वा सावरकरांचे लिखाण वाचताना पडतो. डॉ शेषराव मोर्यांनी ह्याचे (त्यातल्या त्यात मला पटलेले) 'हे लोकाभिमुख नेते होते, ह्यांना लोकांना बरोबर घेउन जायचे होते, केवळ भावनाहीन तर्काधिष्ठीत बुध्दीवादी विचाराने टिका करत बसायचे नव्हते' असे सुंदर विश्लेषण केले आहे (अवतरण चिन्हातील विधान हे माझे डॉ मोर्यांनी अनेक पुस्तकात, लेखात केलेल्या विवेचनांवर आधारीत अनुमान आहे. हे शब्दशः मोर्यांचे विधान नव्हे). धर्माला संपूर्ण लाथा मारा असे परखडपणे फार कमी विचारवंतांनी म्हटले (माझ्या अल्पमाहितीनुसार म. फुल्यांनी बर्यापैकी ह्यास अनुसरून लिहिले आहे).
>>>>> ती संघटना म्हणजे आतंक
>>>>> ती संघटना म्हणजे आतंक पेरत फिरणारी दहशतवादी बापटयांची टोळी आहे.<<<<
की सगळा भातच, भात कम खडे ज्यादा असा आहे? तसे असेल तर "तथास्तू" :P)
यातिल "बापट यांची" यात स्पेस विसरला का? की "बाप्यान्ची" असे म्हणायचे होते की मुद्दामहून "बापट" हे कोब्रा आडनावच घुसवायचे होते?
स्पष्टीकरण मिळाल्यावर निषेध नोन्दवायचा की कसे ते ठरवेन
(साला नशिबच खराब आमचे! पूर्ण लेख वाचायच्या आधीच पहिल्या प्यार्यातच, मऊ शिजलेल्या भाताच्या पहिल्या घासालाच खडा यावा तसे झाले हे
१९८०च्या आगेमागे, पन्जाबात
१९८०च्या आगेमागे, पन्जाबात शिखान्च्या समुहात "खलिस्तानाच्या" निमित्ताने (पाकीपुरस्कृत) ज्या पद्धतीचे हिन्दूद्वेष्टेपण, जशाप्रकारे भिनवले गेले तशाच काहीशा प्रकारे, महाराष्ट्रात "दलितान्च्या" निमित्ताने, व त्यातल्यात्यात अल्पसन्ख्य मऊ जमात ती ब्राह्मण, त्यान्ना टीकेचे लक्ष करुन "सन्घटनात्मक दहशतवाद" रुजवायचे काम सुरू आहे कि काय अशी शन्का घ्यायला प्रचण्ड प्रमाणात वाव आहे.
नाव सम्भाजीचे, पण अन्तिम ध्येय हिन्दूधर्मियात फूट पाडणे हेच आहे असे मानायला वाव आहे. मराठ्यान्विरुद्ध उघड ब्र काढणे शक्य नाही, पण त्यान्चीच माथी शिवाजी-सम्भाजीराजान्च्या निमित्ताने ब्राह्मणान्विरुद्ध भडकावुन अन्ती येथे बेदिली माजवुन त्याचा फायदा उचलण्याची ही रणनिती पन्जाबात आधिच अनुभवुन झालेली आहे!
बहुसंख्य लोकांच्या मताविरुद्ध
बहुसंख्य लोकांच्या मताविरुद्ध लिहीले की ते पेटून निघून काही काही लिहीतात, त्याची गंमत बघायची हाच त्यांचा हेतू.>>> १००% अनुमोदन.
ईतुकाच अर्थ घ्यावा, विषय दुर्ल़क्षिला जावा!
टण्या, 'जाता जाता' हा
टण्या, 'जाता जाता' हा परिच्छेद वाचनीय आणि मननीय झाला आहे. मधुकर, दलितोद्धार, अन्यायनिर्मूलन हे साध्य व प्रस्थापितांना विरोध हे साधन अशी मांडणी होऊ शकते. इथे साधन हेच साध्य होत आहे. त्यामुळे विचार inconsistent होतात. हे समजतच नाही/बिनमहत्त्वाचे वाटते/अपमानास्पद वाटते/लज्जास्पद वाटते/.....
आताच रायनर मारिया रिल्केचे एक अवतरण वाचले -
We are walking backwards - eyes fixed on what we're attached to and, of course, we call what's behind us, the unknown. How can we know it if we don't even face it?
मला वाटले की मधुकरचे विनोदी
मला वाटले की मधुकरचे विनोदी लेखन चुकून चालु घडामोडीत गेले, उत्सुकतेने वाचायला आले, तर तेच ते जुने....... मागिल पानावरुन पुढे चालु प्रकरण....
ती आधीची देवळांची भानगड अर्धीच सोडली काय???? लिस्टमध्ये तर ७-८ देवळे होती...
फारच फालतु लिखाण आहे,
फारच फालतु लिखाण आहे, तुमच्यासारख्या लेखकाकढुन ही अपेक्षा नव्हती,
जातियवादाचा घाण वास येतो, आणि या अशा वॄत्तिमुळेच हिरव्यांची पिलावळ वाढली, ज्या समाजाकडुन कधीच पलटवार झाला नाही त्यांना लक्ष्य करण्याची प्रथाच पाडली आहे त्याचेच तुम्ही अनुकरण करता आहे. काश्मिर युवक जसा भरकटलेला आहे तेच तुमच्या लेखात जाणवते. तुमचा हल्ला म्हणजे प्रतिक्रीया,
आणी अयोध्या, गोध्रा प्रकरण कत्तल, तुमच्या बुध्दिची किव येते असे लेखक या भारतात आहेत याची लाज वाटते.
मधुकर यांचा हा लेख ताबडतोब
मधुकर यांचा हा लेख ताबडतोब विनोदी लेखन ह्या प्रकारात हलवावा....
टण्या, झाकीसाहेब, फच्या नका इतके पोटतिडीकीने बोलु. त्यासाठी सुद्धा समोरच्याची लायकी लागते.
लिंब्या एक शाप दे ते ह्या मधुकर ला.....

(टण्या ह्यंनी सांगितल्याप्रमाणे इथला आक्षेपार्ह मजकुर काढल आहे)
तसा या लेखाविषयी, लेखकाविषयी,
तसा या लेखाविषयी, लेखकाविषयी, त्यांच्या मताविषयी वा त्यांच्या ब्रिगेडविषयी माझं काहीच म्हणणं नाही.
परंतु डॉ. मीरा कोसंबी , डॉ. अ.रा. कुलकर्णी आणि डॉ राजेन्द्र व्होरा याच्या बद्दल जे काही लिहिले आहे त्याचा निषेध !
डॉ. अ. रा. कुलकर्णी सरांच्या बद्दल हे वाचून फार फार वाईट वाटलं. ज्यांनी आपले सगळे आयुष्य शिवाजीच्या बद्दलच्या संशोधन आणि लिखाणावर घालवलं; त्यांच्याबद्दल असे उदगार कोणी काढूच कसे शकते ? अत्यंत वाईट वाटलं. त्यांच एक पुस्तक - त्यातला एक परिच्छेद जरी कोणीही वाचला तरी त्यांना कळू शकेल त्यांचे शिवाजीवरचे प्रेम ! १९८३मध्ये त्यांनी शिकवलेला शिवाजीचा इतिहास आजही जस्साच्या तस्सा आठवतोय आम्हा विद्यार्थ्यांना !
पण काहीही मुळातून न वाचता केल्या जाणार्या अशा टिका टिपण्णीचा पुन्हा एकदा निषेध ! निषेध ! ! निषेध ! ! !
अविवेकाला अविवेकी प्रत्युत्तर
अविवेकाला अविवेकी प्रत्युत्तर देण्यात काहीच अर्थ नसतो, किंबहुना त्यात नुकसानच जास्त असते, त्यामुळे विनोदी लिखाण ,फालतु लिखाण,अक्कल काढणार्या अशी हेटाळणी करणार्या पोष्टकर्त्यांनी पोष्ट टाकल्या नसत्या तरी चालले असते.
टण्या व अरभाट यांच्या सम्यक पोष्टींना मनापासुन अनुमोदन.
>>>> लिंब्या एक शाप दे ते
>>>> लिंब्या एक शाप दे ते ह्या मधुकर ला.....
तेच सर्वसमावेशक आहे! 
नै रे भो, शाप देऊन मी माझ्या पापात भर का घालू? अन आमाला पॉवर नाय शाप देयाची
आमी फकस्त "तथास्तू" म्हणणार
अयोध्येची मशीद फोडणारी संघटना
अयोध्येची मशीद फोडणारी संघटना असो, गोध्र्यात कत्तल घडविणारी संघटना असो वा क्रिकेटचं पिच खोदुन दहशत माजविणारी, महाराष्ट्रात राडा संस्कृती आणणारी किंवा त्याच संघट्नेतुन बाहेर पडुन उत्तर भारतियाना झोडपणारी नवनिर्मीती असो. >> हे वाचल्यानंतर काहीतरी constructive वाचायला मिळेल असे वाटले होते. पण अपेक्षाभंग झाला. तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे ,झापडबंद नसलेले ,खर्या अर्थाने हालाखीचे, दलित असल्याने अन्यायग्रस्त आयुष्य (इथे कुठलाहे उपहास नाही) जगलेले आहात. असे आयुष्य जगलेल्याम्चे प्रामाणिक लिखाण समाजाने (ह्यात ब्राह्मणही आलेच)नेहमीच मान्य केलेले आहे ,नव्हे उचलुन धरलेले आहे. असे लिखाण करण्याचे तुमची कुवत असताना देखील तुम्ही फक्त एकांगी ,तार्किकद्रुष्ट्या न पटणारे लिखाण का करता हा प्रश्न राहुन राहुन पडतो.
Pages