जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१०

Submitted by जिप्सी on 19 July, 2010 - 00:09

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

नाश्ता Happy

थोडी फोटुगिरी

महिला स्पेशल ट्रेन

ज्युनिअर मायबोलीकर

खाद्ययात्रेचा अंतिम भाग प्रदर्शित केल्याने "लंच"चे फोटो काढले नाहीत, पण सगळ्यांसाठी हि स्वीट डिश Happy

यो रॉक्स पारंपारीक पोझ मध्ये Happy

मायबोलीकर (हम साथ साथ है.....)

==================================================
सगळ्यांचा आग्रहाखातर आणि यो च्या परवानगीने "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना Happy Light 1
==================================================

==================================================
घारूअण्णांची सामुहिक धुलाई कौतुकाने पाहताना लिंबुदा Happy
घारूअण्णा/लिंबुदा Light 1 घ्या.
==================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स तुम्ही खूपच मजा केलेली दिसतेय. मी मिस केलं. मी कोणालाच ओळखत नव्हते त्यामुळे आले नाही या वेळेस. पण पुढच्या वेळेस मात्र नक्की येणार.

मस्त फोटो आलेत. फक्त ओळखू नाही आलेत बरेच जलचर आणि भूचर मा बो कर. विशेषत: ते कुणाचा तरी नेम धरून नेसत्या वस्त्रानिशी पाण्यात सूर मारणारे मा बो कर, आणखी ते गुरूत्वाकर्षणाचा नियम खोटा ठरवू पाहात पाण्यात पडू पाहणारे ग्रेट मा बो कर, वगैरे. यो रॉक्स, पल्लीला काँपिटीशन?
लिंबुदांना काठी शोभून दिसते हो. कौतुकाचार्य नव्हते वाटतं?

>>> आरे वा, लिंबु पोज भारी आहे एकदम <<<<
कसचं कसचं! पाठमोर्‍या माणसास "फोटोचा विषय" बनवुन फोटो टिपण्याचे कसब योग्याचे आहे Happy त्याचा क्यामेरा भारी आहे व त्याला तो वापरताही येतोय [ Wink ] हे त्या एका सूर मारतानच्या फोटोत दिसून आलेच. पण क्यामेरा भारी असो वा नसो, आगळावेगळा चित्रविषय निवडून उत्कृष्ट फ्रेमिन्ग करण्याची नजर व कौशल्यदेखिल त्याचेकडे आहे हे त्या पाठमोर्‍या फोटोतून सिद्ध होते आहे.
मला हा फोटो भारी आवडला, अहो समोरुन सगळ्यान्चेच फोटो निघतात, काही जणान्चे डावीउजवीकडेनेही निघतात (चौकित्-यस्टीस्टॅन्डवर लावलेले अस्तात ते Proud ) पण हे असे पाठीमागुनही फोटो निघण्याचे भाग्य (मनुष्यप्राण्यामधे) फार थोड्यान्च्या नशिबी अस्ते! Proud
विशाल, तू काढलेला माझा फोटो देखिल भारी आलाय, फक्त मी तुझ्याकडे वळून बघायच्या आत - बेसावध असताना फोटो निघाला असता तर अजुन खास दिसला अस्ता (माझ्याकडे रोखुन बघितले अस्ता, अगदी क्यामेरातुनही, मी अस्वस्थ होऊन बहुतेक वेळेस माझि नजर तिकडे वळतेच वळते)
हे दोन्ही फोटो मी सेव्ह करुन ठेवले आहेत. फोटोबद्दल धन्यवाद

छ्या, यंदा काय मजा आली नसेल वविला!!! वविअच्या फोटोत चेस आणि परीक्षा देणारे लोक्स दिसतायत की!!!!

फक्त योगेश२४ ची फोटोग्राफी चांगली आहे म्हणून मस्त फोटो आलेत.

Wink

बरं मला पडलेले प्रश्नः
१. रीनाने यंदा गझल म्हटली का? म्हटली असल्यास कुणी ऐकली?
२. आनंदमैत्री याने कुठली गाणी म्हटली?
३. आनंदसुजु याने यंदा कुठल्या "त्या गाण्याची एक गंमतच आहे" अशी माहिती दिली? त्यानी गायलेली पिकनिक साँग्ज कुणाच्या लक्षात आहेत का?
४. पूनम आणी मीनू यांची काही "मैत्रीपूर्ण संभाषणे" झाली का?
५. घारूअण्णांनी काय धमाल केली?
६. साजिराडा हे यंदा असे निवांत "चिंतन मोडात" का घुसले?
७. रेन डान्स करताना कोण कोण घसरून पडले? त्यापैकी कितीजण योरॉक्सच्या नृत्याविष्काराने घाबरून पडले?
८. योरॉक्सने कोळीडान्स केला का?
९. महिला स्पेशल ट्रेनमधील किस्से असा एक बाफ चालू करायचा का?
१०. युकेज रीजॉर्टमधल्या स्विमिंग पूलचा चित्रविचित्र आकार आणि त्यातील खुणा बघून कुणी दा विंची कोड शोधायचा प्रयत्न केला का?

वविकरानो Light 1

नंदे, असुदे असुदे ! समजू शकतो आम्ही Happy पुढच्यावर्षी सतीश, तू आणि तुझं छोटू यालच पुढल्यावर्षीच्या वविला. आपण अगदी झबलं टी-शर्टसुद्धा बनवायला सांगू टी-शर्ट समितीला.

पण क्यामेरा भारी असो वा नसो, आगळावेगळा चित्रविषय निवडून उत्कृष्ट फ्रेमिन्ग करण्याची नजर व कौशल्यदेखिल त्याचेकडे आहे हे त्या पाठमोर्‍या फोटोतून सिद्ध होते आहे.>>>>लिंबुदा, धन्यवाद!!! Happy

मी कोणालाच ओळखत नव्हते त्यामुळे आले नाही या वेळेस >>> मिनू, कुणीच कुणाला आधीपासून ओळखत नसतं. वविला आल्यावर ओळख होते. Happy

आहे का कोणाकडे व्हीडीओ क्लीप ? योगेशच्या लावणी नृत्याची मजा नुसत्या फोटोने येणार नाही.>>>

क्लिप्स आहेत माझ्याकडे, पण त्या इथे अपलोड कशा करायच्या. साईझही खुप मोठी आहे. अ‍ॅडमिन कृपया सांगाल काय कसे अपलोड करायचे ते?

योगेश, तुला तिथे सान्गत असलेले हेच ते फुलपाखरू Happy

अर्थातच घाईगडबडीत (क्यामेरा झुम लौकर सेट न करता येणे/ क्विक अ‍ॅक्शन न जमणे / चष्मा लावुन की न लावता फोटो काढू या गोन्धळात असणे वगैरे अनेक कारणान्मुळे) फ्रेमिन्ग बरोबर न जमल्याने फुलपाखराच्या पन्खाचा वरील भाग फ्रेम मधे आलाच नाहीये Sad तो आला अस्ता, तर हाच फोटो क्लास पीस ठरला असता! असो.
याच फुलपाखराचा दुसरा फोटो माझ्या प्रोफाईलमधे लावलाय!

युकेकडे पाठ केल्यावर उजव्या हाताच्या डोन्गररान्गेत दिसलेली ही गुहा कम लेणी झुम वापरुन टिपायचा प्रयत्न केला

तुला तिथे सान्गत असलेले हेच ते फुलपाखरू>>>>लिंबुदा झक्कासच आलाय फोटो. जबरी आवडला. मी गेलो होतो शोधायला पण फक्त "फुल"च दिसल "पाखरू" उडुन गेलेलं Sad

लिंबू, दिसला दिसला फोटू. कुठली लेणी आहेत ती? एकच गुहा दिसतेय.
रिसोर्ट पासुन पाच एक किमी वर आहेत या लेणी... नाव असं काही नाहिय वाटतं, पण पाहण्या सारखंही जास्त काही नाहि.

उमेशदा,

<<विशेषत: ते कुणाचा तरी नेम धरून नेसत्या वस्त्रानिशी पाण्यात सूर मारणारे मा बो कर >> तो मी आहे... Happy

इंद्रा बराच वेळ एखादी काठी शोधत होता याला बाहेर काढण्यासाठी, असुदेने त्याला थेट या पद्धतीने बाहेर काढला....
जेवणाच्या थाळीत अजुन छान दिसला असता नाही? Wink

asude.JPG

ववि २०१० वृत्तांत वर्षा नसतांनाही उत्साह आणि आंनदाने चिंब भिजवणारा वर्षा विहार २०१०

यंदाचा ववि ब-र्याच प्रकारे वेगळा ठरला.... सर्वाधिक संख्या, नेटक संयोजन,चांगला ठिकाण,नव्या-जुन्या माबोकरांचा उत्तम मेळ.....
महाराष्ट्राच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षातला हा ववि ........
टिपुसभर पाउस नसतांनाही वर्षभर आठवणीनी चिंब भिजवुन टाकाणार वर्षाविहार २०१०
http://www.maayboli.com/node/17946?page=3#comment-811668

mast fotos

अण्णा, एकदम मस्त वृतांत... तुम्ही केलेला शेवट खरोखर अप्रतिम ठरला. अगदी अगदी सुवर्ण महोत्सवी वर्षातला ववि वाटला.

घारू, मस्त रे फोटोसहीत वृत्तान्त Happy
विशाल, तुझाही बघितला रे भो! मस्त Happy
[तिथे हजर असुनही बघण्यात न आलेले बरेच तपशील आत्ता कळताहेत सगळ्यान्च्या वृत्तान्त्तातून Happy ]

Pages