जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१०

Submitted by जिप्सी on 19 July, 2010 - 00:09

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

नाश्ता Happy

थोडी फोटुगिरी

महिला स्पेशल ट्रेन

ज्युनिअर मायबोलीकर

खाद्ययात्रेचा अंतिम भाग प्रदर्शित केल्याने "लंच"चे फोटो काढले नाहीत, पण सगळ्यांसाठी हि स्वीट डिश Happy

यो रॉक्स पारंपारीक पोझ मध्ये Happy

मायबोलीकर (हम साथ साथ है.....)

==================================================
सगळ्यांचा आग्रहाखातर आणि यो च्या परवानगीने "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना Happy Light 1
==================================================

==================================================
घारूअण्णांची सामुहिक धुलाई कौतुकाने पाहताना लिंबुदा Happy
घारूअण्णा/लिंबुदा Light 1 घ्या.
==================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या टीमला १५० मार्क होते हां. प्लीज नोट. फोटोत फिकं दिसतंय ते, कोणाला शंका येऊ नये म्हणून आपला बारिकसा खुलासा Proud
(अर्थात, पण खजिना आम्ही न जिंकल्यामुळे आम्हाला अंतिम विजेतेपदाचं बक्षिस मिळालं नाही हा भाग वेगळा :))

मस्त फोटो..

हे सगळं मिळून वर्षाविहार २०१० ग्रूपमध्ये हलवायला हवे.

जल्ला योग्या तू लोकांना जलवायचं काम करन काय सोडू नकोस हां.....

अरे ह्या ग्रुप फोटूत कॅमेरावाले सगळे गायब आहेत.. त्यांचा वेगळा ग्रुप फोटो काढायला हवा होता...

ते कै नै, सगळ्यात खरा कस होता चित्रकोडे जुळवण्यात, अन आमच्या टीमच्या धुरन्धर मेम्बरान्नी सगळ्यान्च्या आधी चित्र पूर्ण केले अन आम्हाला भल्लाथोरला जल्लोष करायला सन्धी दिली!

>>>>> हे कोण तात्याविंचू का? <<<
नाही, विन्चवाला एकच वाकडी विषारी नान्गी अस्ते नी ती देखिल पाठीमागे शेपटासारखी
हा खेकडा आहे, अन याला दोन नान्ग्या अस्तात, त्या पुढे तोन्डाजवळ अस्तात. विषारी नसल्या तरी पकड जबरदस्त अस्ते! Happy

<< अरे वृ लिहा की.>> अगं तू लिहिलायस की. तूला सांगू का कसा लिहायचा ते ? vRu असा लिही वृ... :फिदी:.

योगेश , मस्त फोटो Happy
बाकी, मेदूवड्यात जिरं घातलं होतं हे मला आत्ता फोटो पाहिल्यावर कळलं. Proud

वॉव! युके चांगलच दणाणुन सोडलेलं दिस्तय, माबोकरांनी!!!
बादवे.....दक्षी नाय दिसत कुट्टं? Uhoh

Pages