वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुकर हा मधुकरच वाटला. पण स्वभावाने अ‍ॅग्रेसिव्ह वाटला होता तसा नाही निघाला तो. खूप सौम्यपणे बोलत होता...>>>काही जणांच्यात स्वभावापेक्षा लेखणीत जास्त धार असते गं अश्विनी.. Happy

आगावा,तुला बघुन मला अर्भाटसरांची आठवण झाली रे एकदम.. :).. ते वविला आले नाहीत यावेळी म्हणुन नाहीतर दोन सरांना एकत्र पहायला अजुन मजा आली असती.. Happy

असुदे, आगाऊ ,लळे,मंजे सहीच वृ.
मी ही पहिल्यांदाच वविला आले पण जाम धमाल आली,
सकाळी बरोब्ब्र ७ वाजता किमया समोर हजर झालो, तेव्हा फक्त आगाऊ दिसला, लेकीने लग्गेच विचारल 'बस गेली बहुतेक' तिला संयोजकांच्या टायमिंगचा अंदाज कसा असणार ? Proud केजो हळूच कुठुनतरी झाडामागून उगवला ते कळ्ळ्च नाही,नंतर हळु हळू मंजीकुटूंब
संयोजकांनी किमयाच्या विरुद्ध दिशेला बस उभी केल्याने आम्ही आमच सगळ लटांबर घेऊन 'पुण्यात तला भला मोठा सिग्नल तत्व बाजुला ठेऊन क्रॉस केला. Proud
सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्यांनी बस दणाणून सोडली होती,परेशच्या गाण्यानी धमाल उडवून दिली.
बस मधे शाळू मैत्रीण शामली मला जवळ जवळ १५-१६ वर्षांनी भेटली तो आनंद अवर्णनीय होता
रीसॉर्टला उतरल्यावर, सगळेच जण भेटलेलो नसुन ओळखीचे वाटत होते. लिंबु ला बरेच दिवसापासून भेटायची इच्छा होती, पण त्याच्याहातातली भलीमोठी काठी पाहून बोलायच डेरींग झाल नाही Proud नंतर भरपूर गप्पा मारल्या ती गोष्ट वेगळी Proud
सांस ने अतीशय उत्कृष्ट संयोजन केलेल वेळोवेळी जाणवत होत. गेम्स तर एकदम धमाल होते. आमच्या टीम मधे, असुदे, पर्‍या, तोषा, आनंद केजो वगरे सगळी रथी महारथी मंडळी होती त्यामुळे खजिना शोधण अगदीच सोप्प होत Proud डम्शेअर मधे आनंदची अ‍ॅक्टींग जबरी होती, उखाण्याच्या वेळेला मी आणि अमित अतिशय महत्वाच्या चर्चेत गुंतल्या मुळे आमची ओळख द्यायला विसरलो Proud
योरॉक्स आणि पल्ली च्या वाजले की बाराच्या जबरदस्त अदाकारी ने अमृता खानविलकर ला नक्कीच काँप्लेक्ष आला असता Happy
पावसाने लाज राखून हजेरी लावल्याने अजून् धमाल आली.

पल्लीने काढलेली आकृती आणि तिने मारलेल्या त्या उड्या अगदी पुढच्या वविपर्यंत लक्षात राहतील सर्वांच्या..

स्मी मी पण होते तुमच्या टीममधे आणि डमशेराज ला आंद्याच्या वाईट अभिनयावर एक शब्द ओळखुन मी १० मार्कपण मिळवुन दिलेले Sad

त्या उड्या घारुआण्णांवरच्या त्राग्याच्या नसून 'टी शर्ट वरील सुलेखन करणारी हीच का ती पल्ली?' अशा निरागस शंकेवर 'तीच ती मी' या उत्तराच्या होत्या. हो ना पल्ली? सचिन पण कधी कधी ० वर आऊट होतो की. Wink Light 1

काही जणांच्यात स्वभावापेक्षा लेखणीत जास्त धार असते गं अश्विनी.. >>>> खरंच. लेखणी हे एकप्रकारचं शस्त्रच आहे Happy त्याचा उत्तम उपयोग आपल्या इतिहासात मला वाटतं केसरी मधे झाला असेल.

स्मी Angry मेधे हो ना ग आपण कैच केल नै का आपल्याला सगळेच विसरले. आपल्या टीममधे हे हाल मग बाकिच्यांच काय म्हणा Sad

पल्लीच्या थोडं कमरेत वाकून छोटुश्या मुलीसारख्या मारलेल्या तीन उड्या मी अगदी समोरुन पाहिल्या आणि अनवधानाने मी पण तशा उड्या मारणार होते Uhoh (ते नैका, कुणी मांडीवर बाळाला हलवून झोपवत असेल तर समोरचा पण नकळत मांडीवर बाळ असल्यासारखं पाय हलवू लावतो).

वा वा... जोरदार वृत्तांत आलेत की आत्तापर्यंत.. अजून भरपूर जण पहिल्यांदाच होते त्यांनी पण लिहा की पटापट वृत्तांत.....

तो धक्का म्हणजे ’आगाऊ’ या आय-डीचं प्रत्यक्ष दर्शन! विशाल कुलकर्णीने त्याच्याशी माझी ओळख करून दिली आणि ’हा’ आगाऊ हे कळल्यावर मी कपाळावर हातच मारून घेतला.>>>>

सेम पिंच हिअर, लले माझी पण तीच अवस्था होती, मागे एकदा दक्षीने त्याचा फोटो पाठवला होता, पण फोटोतला आगाऊ खरोखरच आगाऊ वाटत होता. असो माबोकरांसाठी हा काँबी...

बर्‍यापैकी सभ्य वाटणारा 'आगाऊ' (उभा), जपानी 'केड्या' (अर्थातच बसलेला) आणि अर्थातच लली दी ग्रेट !

IMG_5409.JPG

पल्लीला आलेलं फ्रस्ट्रेशन हा एक व्हिज्युअल अनुभव होता! Lol पल्ली, Light 1 वर सांसची मल्लीनाथी की म्हणे ही वस्तू दिवाळी अंकावर असते!! मग तर आमची खात्रीच की हा आकाशकंदील असायला हवाय, पण निघाली कात्री!!! Proud

मस्त खेळ होते. जेवणाआधीच सांसने सर्व उपस्थितांना चार कंपूत एकत्र केले. मला एका टीमची कॅप्टन बनवून बकरा बनवले Proud Light 1 पण माझी टीम उत्साही होती आणि गुणीही Happy प्रत्येक खेळासाठी आपणहोऊन हात वर येत होते, त्यामुळे मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. पहिल्या खेळात सगळ्यांनाच 'ठेंगा' मिळाला! चक्क सांसलाही तो खेळ यशस्वी करून दाखवता आला नाही! Proud आम्हाला भौमितीय 'झारा' आल्याने, मयूरीची भाषा निंबूडाने करेक्ट कॅच करून चटकन चित्र काढले आणि उरलेल्या टीमने क्षणात वस्तू ओळखली. डम्ब शराड्जमध्ये इतर टीमसोबत यो आणि आनंदमैत्री हे नेहेमीचे यशस्वी होते, आणि गाणं 'कोणता झेंडा घेऊ हाती..' वीटेवर चालण्यासाठी प्रणवने व्हॉलंटियर केले, तर साजिराला मला उठवावे लागले. तसा साजिरा फेदरवेट दिसतो, पण विटेवर उभं रहाताच दोन्ही विटांचे दोनदोन तुकडे करण्याचा विक्रम केला त्याने!! Lol पण हे श्रेय न त्याचे, पण त्याच्या पादत्राणांचे Wink बूट उतरवल्यावर ह्या दोघांच्या टीमने बाजी मारत स्पर्धा जिंकली. नंतरचा खेळ केवळ माझ्या आवाजासाठी डिझाईन केल्यामुळे, निंबूडाच्या स्मरणशक्तीच्या जोरावर आम्ही तोही जिंकला. मग सगळ्यांच्याच उखाण्यांच्या फैरी झडल्या.. र ला ट जोडून मी ऑन द स्पॉट दोन उखाणे करून दिले.. मायबोली क्विझमध्ये मात्र तितके यश लाभले नाही.. ट्रेझर हन्टचे प्रश्न मस्त होते.. काही उत्तरात कस लागला Happy जिगसॉ पझलने मात्र आमची विकेट घेतली.. ते पूर्ण करून पहिला क्ल्यू शोधतोय, तोवर खजिना घेऊन गेलंही पब्लिक Uhoh त्यामुळे त्या टीमने एकदम शेवटाकडून मुसंडी मारत पहिला क्रमांक पटकावला. आमचे उतरलेले चेहरे पाहून मग सांसने आमच्या टीममधून खेळलेल्या झिम्माड सरींनाही बक्षिस देऊन उगीउगी केले Happy बच्चे कंपनीलाही भेट मिळाली, तिथेही रंगांचे चॉईस झाले! Happy

गेम्समधून नेहेमीच मायबोली स्पिरिट उफाळून वर येते. अशा खेळांमधून टोटली अनोळखी लोकांशी आपण गप्पा मारतो, थोडी मस्ती होते, खेचाखेची होते.. खेळ नसतील तर जेवणानंतर लोक आपापले कंपू करून फक्त गप्पा हाणतील Uhoh मी आधीही म्हटले तसे, ह्या नवीन सांसने मस्त आयोजन केले होते, बरेच कष्टही घेतले होते ह्यासाठी. त्यांचं पुन्हा स्पेशल कौतुक Happy

एकंदर ह्या वविमुळे फ्रेश वाटलं एकदम Happy

पुण्या-मुंबईपासून लांब रहायला गेल्यानंतर जुन्या मित्र-मैत्रिणींशी असलेला संपर्क हळूहळू कमी होत गेला. तरीही त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी फोन हे एक महत्त्वाचं साधन होतं. कालांतराने फोनचे नंबर बदलले, नवे नंबर सांगायला मैत्रिणींना फोन केले तर त्यांचेही बदललेले Sad आणि मग मागचे सगळे मैत्रीचे बंध तुटत गेले.
दरम्यान, इंटरनेट, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगशी ओळख झाली आणि मैत्रीच्या अकाऊंटचा, सतत अस्वस्थ करणारा ’झिरो बॅलन्स’ पुन्हा बाळसं धरणार अशी चिन्हं दिसायला लागली.
महाराष्ट्रात परतल्यावर मायबोलीच्या कृपेने नव्या ओळखी झाल्या, परिचय झाले, गाठीभेटी झाल्या. मैत्रीचे सोहळे पुन्हा समोर दिसायला लागले. पण आत कुठेतरी जुनं ते सगळं सुटलं अशी खुटखुट होतीच.
अशातच मागच्या महिन्यात एक दिवस पौर्णिमा (पूनम छत्रे)ची विपु आली आणि तिनं माझ्या शाळेतल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचा संदर्भ विचारला. तिच्या अंदाजाने माझी मैत्रिण ही तिच्या नात्यातली होती. अजून काही संदर्भ तपासून पाहिल्यावर ’ती तीच आहे’ याची आम्हाला दोघींनाही खात्री पटली आणि जवळजवळ ६-७ वर्षांनी पुन्हा एकदा त्या मैत्रिणीशी मी फोनवरून बोलले. (१५-१६ वर्षांपूर्वी त्या मैत्रिणीच्या लग्नात इ. पूनमने मला पाहिल्याचं, भेटल्याचं सांगितलं. मला मात्र त्यातलं काहीच आठवत नाहीय अजून!)
हा आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का पचवायला मला किमान ३-४ दिवस तरी लागले. कारण पहिलं म्हणजे मी आणि पूनम काही प्रथमच बोलत नव्हतो. आमच्या आडनावसाधर्म्यामुळे आम्ही याआधीच एकमेकींशी जाऊबाई इ. म्हणून प्रेमळ Wink वार्तालाप केला होता. आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की इतक्या वेळा बोलून, माझे फ़ोटो पाहूनही पूनमला याआधीच ही लिंक कशी लक्षात आली नाही. (या प्रश्नावर ’प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते’ असं म्हणून पूनमनं माझी समजूतही काढली होती :हाहा:)
१८ जुलैला वविच्या निमित्ताने मी आणि पूनम प्रत्यक्ष भेटलो. लहानपणीची मैत्री-ताटातूट-नवी ई-मैत्री-त्यात त्या जुन्या मैत्रीचे संदर्भ-पुनर्भेट-ज्या ई-मैत्रीमुळे ती पुनर्भेट घडली त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेट... ही साखळी मला विलक्षण वाटली. एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद झाला.
खरंतर, ववि-२००९लाच माझी आणि पूनमची भेट व्हायची, ती हुकली. पण ते बरंच झालं. तेव्हा कदाचित आम्ही छत्रे-छत्रे म्हणून भेटलो, बोललो असतो. यावेळच्या भेटीला एकदम निराळंच परिणाम प्राप्त झालं.
माझ्यासाठी यावेळच्या वविची ही मोठी जमेची बाजू. Happy

स्मी तु मेरा भी नाव विसर्‍या... एवढ्या भल्या रात्री तुला उठवुन काय फायदा... ? Angry वृतांतात नाव नाही माझं ? Sad

अरे मल्ली तु भल्या रात्री पहाटे मेसेज किया म्हणून विसर्‍या Proud
पण नाही, मल्ली चे विशेष आभार, :स्मित:, माझ बुकिंग मी नक्की केल नव्हत, बस तशी फुल्ल झाली होती, आदल्या दिवशी सकाळी मल्ली ला फोनुन विचारल मल्ल्या माझ कन्फरम केलस का बुकिंग का पैसे आणून देऊ ?? मल्लीच उत्तर तुझ बुकिंग कन्फर्म फिकर नॉट , फक्त वेळेत ये म्हणजे झाल. मल्ली धन्स रे Happy
येताना आम्ही पेंगुळलेलो असताना पल्ली आणि मल्ली च्या गडांच्या गप्प्पा ऐकुन वाटल इथल्याच एका गडावर दोघांना सोडून द्याव Proud

येताना आम्ही पेंगुळलेलो असताना पल्ली आणि मल्ली च्या गडांच्या गप्प्पा ऐकुन वाटल इथल्याच एका गडावर दोघांना सोडून द्याव
Lol

पहाटे ४.३० वाजता मल्ल्याचा समस आला, राजे..जागे व्हा, पहाट झाली. त्यानंतर तासाभराने अंथरुणातून बाहेर पडलो. साधारण ६.३० च्या नंतर भिडे मालकांना फोन लावला, कुटंशिक आलात? तर त्यांनी पोवईला पोचल्याची खबर दिली. त्यानंतर अर्ध्या तासाने घरातून निघालो..खारघर नोडला येवून वाट बघत उभा राहीलो. दरम्यान दोन वेळा अश्विनी (के वाली) ला फोन लावून झाला, पण बहुदा बसमधले माबोकर भलतेच रंगात आलेले असल्याने तिला माझा आवाज ऐकुच येइना. मग थोडा वेळ आम्ही समस-समस खेळलो. शेवटी सातच्या नंतर कधीतरी इंद्राचा फोन आला, विशल्या कुठे उभा आहेस तू? आम्ही पोचलोय जवळपास आणि हायसे वाटले.
बसमध्ये शिरलो आणि जाणीव झाली आपण वविला निघाल्याची. कल्ला सुरू होता. सगळ्यात आधी कानावर आले ते वैभवच्या ढोलकीचे सूर आणि मन प्रसन्न झालं. दोन मिनीट आशुमायशी बोलून व्यासपीठ गाठलं (बसमधलं Wink ) दोन्ही आनंद फुल्ल फॉर्ममध्ये होते. आनंदसुजुंनी आमचा गाण्याचा संग्रह किती तोकडा आहे याची जाणीव करून दिली. गाडी एक्सप्रेस वे ला लागल्यावर कुणासाठी तरी (बहुदा अश्विन) म्हणून पुन्हा थांबवण्यात आली. तेवढ्या वेळात अग्निहोत्र आणि अल्पोपहार अशा दोन्ही गोष्टी उरकून घेण्यात आल्या. आनंदसुजूंनी भुकलाडुमधली शेव जपुण ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला, ती योग्य वेळी वापरली जाणार होती. Proud
बघता बघता पोचलो पण.......
रिसोर्टवर काय झाले ते मोस्टली वरच्या वृत्तांत आलेच आहे, तेव्हा मी फक्त काही महत्वाच्या क्षणांची (फोटों) झलक देतो...
खांद्यावरची बॅग, कॅमेरा एक क्षणभरही आपल्यापासुन दुर न केलेले आणि आल्या आल्या घारुआण्णांच्या दंडावर (दंड : संघाची काठी) अधिकार मिळवलेले लिंबुदा !

IMG_5377.JPG

यंदाच्या वविचे मुख्य आकर्षण (अमृता खानविलकरला काँप्लेक्स देणारा यो)

IMG_5386.JPGIMG_5387.JPG

मध्येच आलेली झुक झुक गाडी (ड्रायव्हर : निंबुडा)

IMG_5362.JPG

गुडघाभर पाण्यात सराईतासारखे पोहणारे ( Wink ) मायबोलीकर

IMG_5355.JPGIMG_5394.JPGIMG_5400.JPGIMG_5372.JPGIMG_5391.JPG

माबोकरांचा जबरा उत्साह पाहून रंगात आलेले सुनीलभौ परचुरे (कपड्यातले) आणि गणूभौ कुलकर्णी (अर्ध्या कपड्यातले)...

IMG_5415.JPG

हळु हळू आणखीही काही जण त्यांना जॉइन झाले.

IMG_5417.JPG

पाण्यात खेळण्यातला उत्साह ओसरल्यावर कपडे चेंज करण्यासाठी म्हणून रुम कडे परतलो. जी आधीच महिलांच्या ताब्यात होती. मेरा नंबर कब आयेगा या चिंतेत वाट पाहणारे माबोकर...

श्री श्री श्री आनंदसुजु म्हाराज...

IMG_5339_0.JPG

माबोकर भगिनींची पाच मिनीटे कधी संपतात याची अर्धा तास वाट पाहणारे माबोकर....

IMG_5427.JPG

तसल्या गोंधळातही ध्यानमुद्रा लावून बसलेल्या योगमाता सौ. असुदे...

IMG_5430.JPG

श्री श्री श्री आ.सु. म्हाराजांचे लाठीकाठीचे प्रात्यक्षिक... मागे असुदेंचे अग्निहोत्राचे पुरश्चरण...

IMG_5446.JPG

बघा बघा महाराजांच्या तेजस्वी मस्तकामागे कसे तेजोवलय उमटले आहे Wink

IMG_5447.JPG

बच्चे कंपनीला बक्षीसे वाटताना कविभाय...

IMG_5460.JPG

बडे बच्चे अर्थात धोधो (विजेता) संघ....

IMG_5462.JPG

शेवटी उखाण्यांतुन ओळखीचा कार्यक्रम मात्र झकास झाला.

पल्ली .....

IMG_5475.JPG

असुदे, आ.सु. महाराज आणि सुकि..

IMG_5463.JPG

आमचेही फोटो सेशन (प्रणव, अस्मादिक, मल्ली आणि प्र_साद)

IMG_5472.JPG

सगळ्यात शेवटी... पुणे आणि मुंबईकरांच्या बशी...

IMG_5456.JPGIMG_5458.JPG

बाकी जमेल तसे भर टाकत राहीनच, तुर्तास एवढेच!

अ‍ॅडमिन, हा बाफ देखील मुख्यपृष्ठावर टाकतील काय?

बरेचसे माबोकर शोधु शकत नाहीयेत बहुदा !

ववि २०१० वृत्तांत वर्षा नसतांनाही उत्साह आणि आंनदाने चिंब भिजवणारा वर्षा विहार २०१०

दिंडी चालली...... चालली........ माबो.कर हो खरोखरीच यंदाचा ववि सुंदर , अविस्मरणीय झाला. नविन संयोजक,जुन्यांचाही खारीचा वाटा,तुम्हां सर्वांचा उदंड उत्साह......
सकाळी पहिला धक्का दिला तो किरुनी,सहकुटुंब चक्क मालकांच्या आधी,पिकअप च्या ठिकाणी हजर.आजचा दिवस बहुदा पायलट करणा-यांनी चांगला दिवस, वार तीथी पंचांग पाहुनच ठरवला असणारं.मी ही वेळेत निघालो होतोच तेवढ्यात विन्याचा समस "ब्यानरच्या दो-या घेउन या". पटापट पिकअप करत मुंबैची बस मुलुंडात ६.१५ ला हजर. सर्वात जास्त जण इथेच चढ्णार असल्याने इथेच थोडा उशीर होणार हे संयोजकांनीही बहुदा ग्रुहीतच धरलं असावं. एकएक माबोकर हजर होत होते.मुलुंडातल्या पार्कातले सारे जण वळुन वळुन या कंपुकडे पाहत होत.बरेचसे वविचा टीशर्ट घालुन होते त्यामुळे बहुदा...
"आण्णा पोहोचले"च्या गोंगाटात स्वागत झालं आणि दिवसभरच्या आंनंदाची एक झलक पहायला मिळाली.आल्या आल्या विन्यानी ब्यानर माझ्याकडे देवुन कामाला लावलं.मीही सुरवात करुन दिली आणि आठवलं अरेच्या सकाळ पासुन माझा फक्त एकदाच चहा झालायं. पुर्वानुभव आणि टपरी शोधण्याचं कसब यामुळे मला आणि मालकांना चट्कन चहाची टपरी सापडली.एक चहा तीथेच पिउन मालकांनी बाकी सर्वांसाठी चहा पार्सल केला. परत बसपाशी येउन वाटप महीला मंडळाकडे देउन आम्ही उरलेले ब्यानर झेंडे बांधायला घेतले.५२ सीटर बस, दोन्ही बाजुला दोन फड्कते झेंडे, तर एका बाजुला ब्यानर आणि आत उत्साही माबोकर !!! बस्स कारवां निकल पडा लोग पिकअप होते गये...जुड्ते गये... कारवा बढता गया !!!!

mabo 1.JPG

गाडीनी ऎरोली पुल ओलांडला आणि मग मात्र बसच्या मागच्या भागात जी मैफील जमली ती संध्याकाळी ववि संपेपर्यंत रंगतच गेली.ठरल्याप्रमाणे वैभव ढोलकी घेउन आलाच होता.प्रथेप्रमाणे "पुंडलीका वर दे" चा घोष दुमदुमला.केळकर बुवांनी आजची तयारी फारच पुर्वीपासुन कारुन ठेवली असावी बहुतेक.. एका मागे एक गाणी आणि प्रतेक गाण्यामागुन "या गाण्याची एक वेगळीच गंमत आहे" असा विनम्र(????)शेरा.

mabo 2.JPGmabo 3.JPG4.JPG5.JPG

एरोलीन ते जुइनगर सगळे पिक अप करत वेगात निघालेली बस जुइनगरला मात्र ठरलेल्या ठिकाणापेक्षा थोडी पुढे जाउन थांबली, इन्द्र-इन्दाणीला (आणि छोट्या युवराजांनाही)थोडी पायपीट करत यावे लागेल असे दिसताच काही माबोकर उतरुन मागे पळत गेले काहींनी चटकन ब-र्याच वेळापासुन राहीलेले अग्नीहोत्र ही उरकुन घेतले.बच्चे कंपनी ही आपल्याच नादात आज सगळी फूल तिकीट फूल्टुना.... बसमधे त्यांना स्वतंत्र बसायची व्यवस्था.

46.JPG

बस जुन्या मुंबै-पुणे रस्त्याकडे न वळता पनवेल बायपासला लागली आणि माझ्या लक्षात आले की अश्विन पाचमुखी मारुतीपाशी वाट पाहात होता.विन्यानी त्याला भ्रमणध्वनीवरुन डायरेक्ट यु.के.लाच पोहोचायला सांगितले. आणि बस पुढे निघाली. वाट्वरची सगळी टोल-धाड पार करत बस खोपोलीच्या रस्त्याला लागली.आता बसच्या मागच्या भागात गर्दी वाढली होती कोरम फुल्ल होता.वैभवची ढोलकी कडाड्त होती.केळकरबुवा फूल फार्मात ना भौ..

7.JPG8.JPG

आरत्यांची प्यारोडी,नवीन चालींच्या बालकविता,महाराष्ट्रगीत,लावण्या असं करत करत गाडी हांजी--हांजी वर पोहोचली आणि मुंबैची बस यु.के.च्या दारात हजर..... दारातच माबोकरांसाठी वेगळं पार्किंग आहे अस सांगत यु.के वाल्यांनी पुढ्च्या चोख व्य्वस्थेची कल्पना दिली.लिंब्या ही तीथेच हजर होता. (बहुदा आधीच ठरल्याप्रमाणे त्याने कढुलिंबाची काही रोपटी मनिषा लिमयेंकडे सुपुर्द केली.सर्वांनी वाटुन घेण्याच्या सुचनेसकट)

9.JPG

मालंकांनी चेंज रुमची चावी ताब्यात दिली आणि सर्वांना न्याहारीसाठी येण्यास सांगितले.धुम्रपान दंडीकांची देवाणघेवाण, तसच नवीन माबोकर आणि जुने माबोकर यांच्या आपापसातील ओळखीचा एक अंक पार पडला.न्याहारीचा एक राउंड संपत असतानाच मलाही नीलच्या क्यामेरातुन फोटोकाढायचे होते,पण पठ्ठा शेवट्पर्यंत सुरुच झाला नाही.न्याहारी बहुत सही, मेदुवडा,सांबर,चट्णी,पोहे,ब्रेड,आमलेट चहा-कोफी जोडीला.......

10.JPG11.JPG12.JPG

तेवढ्यात पुणेकरांची बस आली आणि "न्याहारी लवकर करा रे पुणेकर पोहोचलेत नाहीतर काही उरणार नाही" असा खास पुणेरी सल्ला कोणीतरी दिलाच बहुदा हा कोणीतरी पुण्योद्भव(बोर्न आणि ब्रोटअप) मुंबैकर आसावा.परत न्याहारी करत सगळे एकमेकांना भेटत होते.हळुहळु सगळे माबोकर मुख्य सभागृहात जमत होते.तेवढ्या कोणीतरी समोरच्या हिरवळीवर राष्ट्रीय(??) खेळाचा डाव मांडला होता.मीही मग थोडा वेळ फलंदाजी करुन बघीतली.वय वर्ष ८ ते ३८ असे सगळ्या वयाचे गोलंदाज झाले पण माझ्या ब्याटला काही कोणाचा चेंडु स्पर्श करु शकला नाही. महीला मंडळानी ताब्यातल्या एकमेव चेंज रूमवर जो ताबा मिळ्वला तो शेवट्पर्य़ंत सोडला नाही.समस्त महीलांची पाण्याच्या दिशेनी होणारी हालचाल उशीराने होत होती हे पाहुन वेळीच सांस (सांस्कृतिक सामितीच्या)सदस्यांनी घाई करायला सुरवात केली.राष्ट्रीय खेळ थांबवत सर्वांना स्वीमींगपुलाकडे जाण्यास सांगण्यात आलं.चेंजरूम समोरच्या झाडातुन आंनंदमैत्रीने कशी कोण जाणे एक चिंबोरी(खेकडा म्हणत होता तो)पकडली.... त्याचे आणि चिंबोरीच एक छोट्सं फोटो सेशन ही उरकण्यात आंल.(हा खाण्याचा/खरा आहे का, विषारी नाही का असं एक माहीतीपुर्ण चर्चासत्रही पार पडंल)शेवट भुत दया दाखवत त्याला सोडुन देण्यात आंल(खेकड्याला)
महीला मंडळनी केव्हांच स्वीमिंग पूल्कडे मोर्चा वळवला होता.पाण्यात पोहोणं गाडी-गाडी, राइडस हे सार क्रमाक्रमानी सुरु झालं होत्या.सगळ्या माबोकरणी अगदी आंनंदात पाण्यात डुंबत होत्या {अगदी समर्थांनी म्हट्ल्याप्रमाणे "पाणी उदंड जाहले स्नान संध्या करावया!!! पाणी उदंड जाहले डुंबावया !!!}.

14.JPG15.JPG

एकडे पुरुष मंडळी मात्र कधी त्या एकमेव चेंज रूमचा(फ्ल्याट्चा मिळतो ना तसाच) ताबा मिळतो याची वाट बघत धुम्रपानाचे हप्ते फेडत होते. अखेर मिळुन सा-या जणी बाहेर पडल्या आणि रूम ताब्यात आली.मग मात्र पटापट आवरुन सगळेच स्विमींगपूल पाशी पोहोचले. या सगळ्या गडबडीत मला लिंब्याचे खरच आभार मानले पाहीजेत मी पाण्यात उतरणार होतो तर धुम्रपानदंडीकेचं पाकीट आणि माझा दंड कोण सांभाळणार ही माझी काळजी लिंब्यानी सहज मिटवली. आणी शेवट पर्यंत अगदी खजिना आणि राजदंडाच्या थाटात सांभाळलानं(बहुदा त्यांच्या चिरंजीवांनाही सुचना देउन ठेवल्या आसाव्यात, कारण थोड्या वेळानी दंड चिरंजीवांकडे पाहीला मी.धुम्रपानदंडीकेचं पाकीट पाकीट मात्र स्वता:कडेच ठेवलं असावं....) ४ फूट ते ६ फूट खोल सुंदर पसरलेला तो नीळाशार तरण तलाव सुंदर......कडेकडेनी एकेक जण पाण्या उतरला.न उतरणा-यांचा गणपती बाप्पा मोरयाही झाला. मग कोणी सुर मारत, कोणी एकमेकानां आधार देत पाण्यात उतरत होतं.काठावर लिहिलेली खोलीची माप आणि प्रत्यक्ष माप यात काहीतरी घोळ होता ४ फुटापाशीखोली चक्क ५ फुट पाणी होतं.
अचानक "बोल बजरंग बली की जय" चा घोष घुमला.

17.JPG18.JPG19.JPG

पाण्यातच हंडीचे थर लावाचे प्रयत्न सुरु झाले.मी, राज्या,आनंद,दीपक अशी भक्कम खालच्या थराचे माबोकर गोळा झाले तेवढ्यात किरुला कोणीतरी ए ह्यालाही घ्या रे खालीच म्हण्त पाण्यात सोडलं.एक तर ठरच लागत नव्हते लागले तर टिकत नव्हते .बराच निकराचा प्रयत्न करुन एकदाचे थर नीट लागले तर वरच्या थरातुन "कोणीतरी पादलं रे" अस कोण ओरडलं कोणास ठाउक आणि आमचा आख्खा खालचा थरचं खोखो हसतं बाजुला सरकला. भर पाण्यात हास्याचा धबधबा सुरु झालां शेवट काठावर क्यामेरे सरसाउन बसलेल्यांची दया येउन एकदाचे ३ थर लागले.सगळ्या क्यामेरावाल्यांनी पटापट स्न्याप घेतले.

20.JPG

पलीकडे रेनडांसपाशी आणी अलीकडच्या तलावात महीला मंडळांचा धुडगुस चालुच होता.

16.JPG35.JPG36.JPG

रीसोर्टचा डीजे(???)अगदी खरवडुन मराठी गाणी रेमिक्स वगैरे लावायचा प्रयत्न करत होता.अचानक "नटरंग"ची अप्सरा एका किना-यावर अवतरली आणि भर सकाळंच्या पारी त्या तरण तलावकाठी बारीच्या लावणीचा फडच जमलां ना

21.JPG22.JPG23.JPG

वाहवा क्या अदा, काय तो नखरा !!!! आम्हीच नाही तर पलीकड्चे वेगळ्या ग्रुप मधली दोन मध्यमवयीन गृहस्थही नकळत थांबले.योग्या तर सहीच पेटला होता, अगदी तालीम करुन आल्याप्रमाणे, प्रत्येक ठेका,लय,सम बरोबर पकडतं होता. शेवट्च्या कड्व्यात तर फेटयांऎवजी पाणीचं उडवायला सुरवात झाली. .......मिसलां तिथे त्यावेळी नसणा-यांनी अस्सल नटरंग मिसला.भर दिवसा बारा वाजवलेनं पठ्याने सगळ्यांचे.......
पाण्यात एकीकडे बास्केट्बाल ही चालु झालं होतच.आता बरेच से जण राईड असलेल्या पलीकड्च्या तलावात पोहोचले होते.

24.JPG25.JPG26.JPG

या वेळेपर्यंत महीला मंडळ बर्यापैकी पाण्यातुन बाहेर पडलं होतं. एका काठावरं कोप-यात लली,फदी,मल्ली,योडी,मालक,पल्ली,अशा खाशा संयोजकांच फोटो शूट चालु झालं होतं.

27.JPG28.JPG

अचानक परत नटरंगची लावणी झाली परत तोच जल्लोष झाला, या वेळी मात्र अक्षरश: तलावाचे काठ माबोकरंनी भरले होते.एका काठावर योग्यानी फड लावला होता.

29.JPG30.JPG47.JPG48.JPG

तर अचानक दुस-या बाजुला पल्ली आणि आणखी एक माबोकरीणही लावणीचाच ताल पकडत होत्या

33.JPG34.JPG

आणि आमचा मात्र पाण्यात उभे राहुन टाळ्या शिट्याचा पाउस चालु होता.

37.JPG38.JPGहे म्हंजे अक्षी "योगेशराव मुंबईकर" विरुध्द "पल्ली पुणेकर" अशी फड-बारीच्या लावण्यांची (उभ्याउभ्याच) जुगलबंदी चालु होती.एक मात्र खरं दोह्नीबी फड लैं तयारीचं होते.(संयोजकांस्नी इनंती पुढील वक्ताला अशा कलावंतांसाठी काई पट्का-फेटा, साडीचोळीच्या मानाची यवस्था केली तर लै बरं हुईल बगा)

आता दुपारचे बारा वाजुन गेले मालकांनी येउन १ वाजता जेवण असेल अशी सुचना देउन ठेवली.आपापलं आवरुन (यावेळी मात्र चक्क एक एसी रूम ताब्यात मिळाली ना भाउ सेपरेट!!!) आम्ही सगळे मुख्य हौलमधे जमा झालो.हळुहळु सगळे जमत होते सांसच्या संयोजकांनी आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली होती.वेगळ्या टीम्सच्या घोषणा "झिमाड,रिम-झीम,धो-धो,मुसळधार"
सालां बाहेर मात्र पाउसाचा टिपुस थेंबही नव्ह्ता चक्क उनं पडलं होत.
सांसवाल्यांनी सगळ्या टीम्सच्या मेंबराना ब्याज दीले.

39.JPG

चुकुन अश्विनीने "जेवणानंतर सगळे क्याप्ट्न आपापल्या टीम बरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बसतील!!!!" अशी घोषणा केली.(खरंतर सगळ्या मुंबै-पुण्याच्या सगळ्या बुधवारकरांना कोणं आंनद झाला होता.....)पण नंतर त्या घोषणेत त्वरीत सुधारणा करुन "खेळण्यासाठी" अशी पुरवणी जोडली गेली.........
जेवणं झाली...... सुंदर जेवण,पुलाव,डाळ,दोन्ही भाज्या,नान,सलाद,रायता..... गुलाबजाम तर फारच उत्तम.

40.JPG

दुपारचे दोन वाजत आले होते सांसवाल्यानी सरळ खेळांना सुरवातच केली.दीपक,अश्विनी- गुणीबाई(म्ह्णंजे गुण देणारी),लली,कविता,मालक आणि मालकीणबाई .....बढिया को-ओर्डीनेशन.....
या वर्षी सगळेच खेळ ब-यापैकी नवीन होते.चारही टीम छानच जमल्या होत्या.खेळं रंगले...
भुगोलाच्या खेळात मला कात्रीच चित्रं समजावायच होत आणि अति तांत्रिक क्लु मुळे त्याचा कंदील झाला... थ्यांक्स टु पल्ली... कलाकार आणि तंत्रद्यांच बहुदा काही जमत नाही हेच खरं ग बाइ !.एक मन-गगनात स्वैर तर दुसरा जमिनीवर सैरभैर ..... छ्या हे काही खरं नाही
घरकामाच्या याद्यांमधे परेश खुपच छान वाचत होता (एकतर नेहेमीची सवय असावी किंवा घरी असलं काही कसब दाखवायची वेळ येत नसावी "य़ु नो स्कोप नाही मिळतं ना घरी")

42.JPG

ऐन आषाढात या विटेवरुन चालण्याचे हे यत्न-प्रयत्न पाहुन बहुतेक तो पंढारीचा विठ्ठ्लही गहीवरला असेल...

43.JPG

कारण हा खेळ चालु असतानाच सकाळपासुन गायबलेल्या पावसानी बाहेर हजेरे लावली सगळे खेळ होईपर्य़ंत चालुच होता.
स्टेजपाशी हे सगळे खेळ चालु असताना , काही मायबोलीकरांची थोडीशी डुलकी ही घेउन झाली.

44.JPG

सगळ्यात शेवटी खजिन्याचा शोध चालु झाला "धो-धो" ला खजिना मिळताचं असा जल्लोश झाला.

45.JPG

संध्याकाळचे ५ वाजले होते, चहा भजी असा नाश्ता झाला, आता सगळ्यांना परतीचे वेध लागायला लागले, बक्षीस वितरण झालं.ग्रुप फोटो झाले आणि मंडळी आपापल्या बसेसकडे निघाली.
परतीच्या प्रवासातही सकाळसारखाच जल्लोष.मी मागचे ५/६ वर्ष ववि केलेत नेहेमी परतीचा प्रवास थकवा कंटाळा असतो.पण असंल काही न होता बस तेवढयाच उत्साहात मुलुंडात परत पोहोचली..
यंदाचा ववि ब-र्याच प्रकारे वेगळा ठरला.... सर्वाधिक संख्या, नेटक संयोजन,चांगला ठिकाण,नव्या-जुन्या माबोकरांचा उत्तम मेळ.....
महाराष्ट्राच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षातला हा ववि ........
टिपुसभर पाउस नसतांनाही वर्षभर आठवणीनी चिंब भिजवुन टाकाणार वर्षाविहार २०१०

घारू, मस्त वृत्तांत Happy

कात्रीच चित्रं समजावायच होत आणि अति तांत्रिक क्लु मुळे त्याचा कंदील झाला. >>> Rofl

Pages